निकालपत्र :- (दि.03/08/2010) ( सौ. प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदार या शेतकरी असून त्यांनी सामनेवाला क्र.1 कडून शेतकरी अपघात विमा पॉलीसी घेतली असून पॉलीसी नं.160500/47/04/51/0000359 असा होता. व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत एखादया शेतक-याचा अपघाती मृत्यू झाल्यास रक्कम रु.1,00,000/-नुकसान भरपाई त्याचे वारसांना दिली जाते. तसेच शेतक-यांच्या शरिराचा एखादा अवयव निकामी झालेस त्यास रक्कम रु.50,000/-नुकसानभरपई म्हणून दिली जाते. यातील तक्रारदार हे दि.25/02/2005 रोजी शेतामध्ये काम करीत असताना मशागतीचे वेळी तक्रारदार यांचे उजव्या डोळयास दुखापत झाली म्हणून तक्रारदारांनी डॉ. अरविंद तिळवे यांच्या ''भालचंद्र आय हॉस्पिटल'' येथे उपचार घेतले. पंरतु औषधोपचारानंतर देखील तक्रारदार यांना उजव्या डोळयाने दिसेनासे झाले अखेर डॉक्टरांनी दुखापतीमुळे उजव्या डोळयाची दृष्टी नाहीशी झाल्याचे सांगितले. तक्रारदार यसांचे सामनेवाला क्र;1 कंपनीकडे विमा पॉलीसी असलेमुळे तक्रारदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह सामनेवाला क्र.1कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली.परंतु सामनेवाला क्र.1कंपनीने तक्रारदांरांचे डोळयाचे दुखापतीबाबत चुकीचे कारण देवून दि.12/06/2006 रोजी तकारदार यांचा क्लेम नामंजूर केला आहे. (2) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदार यांचा उजवा डोळा निकामी झालेमुळे तक्रारदार यांना शेतातील भांगलन करणे, पाणी पाजणे, तसेच कोळपण करणे आणि इतर नियमित कामे करणे अडचणीचे होऊ लागले. तक्रारदार यांच्या उजव्या डोळयाची दृष्टी पूर्णपणे गेल्यामुळे तक्रारदार यांना कायमस्वरुपी अपंगत्व आले. तक्रारदार यांना दि.25/02/2005 रोजी दुखापत झालेनंतर उजव्या डोळयाची दृष्टी पूर्ण गेल्याचे तक्रारदार यांना समजून आले. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु सामनेवाला क्र.1 कंपनीने दुखापतीचे चुकीचे कारण देवून तक्रारदार यांचा क्लेम दि.12/09/2006रोजी नामंजूर केला. वस्तुत: विम्याचा मूळ हेतू बाजूला ठेवून तक्रारदारांचा न्याययोग्य विमा क्लेम सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेने सदरची तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब पॉलीसीप्रमाणे नुकसानभरपाईची रक्कम रु.50,000/-व औषधोपचाराकरिता आलेला प्रवास खर्च रु.3,200/-, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.15,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/-असे एकूण रु.88,200/-सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत क्लेम फॉर्म, भालचंद्र आय हॉस्टिपलचा दाखला, डिस्चार्ज कार्ड, पोलीस पाटील दाखला, श्री मधुकर पाटील यांचा जबाब, सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेचे पत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
(4) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेत तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु तक्रारीतील इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराचा क्लेम दाखल झाल्यानंतर सामनेवालाने खाजगी इन्व्हेस्टीगेटर अॅड विजय पोतनीस यांची नेमणूक केली. त्यांनी केलेल्या तपासणीत असे आढळून आले की तक्रारदारांना झालेली डोळयाची दुखापत सुमारे 10/12 वर्षापूर्वी झाली होती असे तक्रारदाराच्या शेजारी राहणा-या सविता गंगाधर शेटे यांनी सांगितले. सदर इन्व्हेस्टीगेटर ने डॉ.तिळवे यांचीही भेट घेतली. परंतु डॉ.तिळवे हे तक्रारदाराचे कुठलेही कागदपत्र/केसपेपर्स त्यांना दाखवू शकले नाहीत. तसेच डॉ. तिळवे यांचे हॉस्पिटल, ऑपरेशन थिएटर इत्यादी कुठलीच व्यवस्था नाही. इन्व्हेस्टीगेटर श्री विजय पोतनीस यांनी आपल्या रिपोर्टमध्ये उपरोक्त सर्व बाबींचा उल्लेख करुन तक्रारदारांना झालेल्या डोळयाच्या दुखापतीबद्दल व उपचाराबद्दल संशय व्यक्त केला तेव्हा त्यांच्या आधारेच सामनेवालाने तक्रारदाराचा क्लेम दि.12/069/2006 रोजी नामंजूर केल्याचे तक्रारदारांना पत्राने कळवले. त्यामुळे सामनेवाला कंपनीने तक्रारदाराचा क्लेम खोटा व लुबाडणूकीचा असलेमुळेच नामंजूर केला व त्यामध्ये सामनेवाला कंपनीच्या सेवेमध्ये कुठलीही त्रुटी नाही. तक्रारदाराचा क्लेम सामनेवाला विमा कपंनीने योग्य कारणाने व पूर्ण जबाबदारीने नामंजूर केला आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी अशी मागणी सामनेवालाने केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत अॅड विजय पोतनीस यांचा इन्व्हेस्टीगेशन अहवाल व डॉक्टरांनी भरुन दिलेला फॉर्म इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच दि.23/09/2009 रोजी इन्शुरन्स पॉलीसी दाखल केली. (6) आम्ही दोन्ही बाजूंच्या वकीलांचे युक्तीवाद ऐकले तसेच दोन्ही पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे तपासले. तक्रारदारांवर उपचार करणा-या डॉ.तिळवे यांच्या बद्दल चौकशी करणा-या इन्व्हेस्टीगेटरने त्यांनी दिलेल्या उत्तराबाबत समाधान न झाल्यामुळे त्यांना इंटरॉगेटरी प्रश्नावली देऊन त्यांच्याकडून माहिती मागवावी अशी विनंती सामनेवालाने केली होती. प्रस्तुत मंचाने दि.18/11/2009 रोजी आदेश देऊन सदर प्रश्नावली डॉ.तिळवे यांना देण्याबाबत सामनेवाला यांना परवानगी दिली होती. सदर प्रश्नावलीला डॉ. तिळवे यांनी दि.03/07/2010 रोजी शपथपत्रासह उत्तरे दिली होती. त्यानुसार तक्रारदार इंदुबाई पाटील हयांच्या उजव्या डोळयाला शेतात काम करताना डोळयाला दगड लागून जखम झाल्यामुळे उपचारासाठी दि.25/02/2009रोजी अॅडमिट झाल्या होत्या.त्यांनी दि.28/02/2005पर्यंत डॉ.तिळवे यांच्याकडून उपचार घेतले.परंतु औषधोपचारा नंतरही तक्रारदार यांना उजव्या डोळयाने दिसेनासे झाले. कायमस्वरुपी अपंगत्व आले असे कथन केले आहे. (6) डॉ.तिळवे हे नेत्रतज्ञ असून त्यांनी शपथपत्रावर केलेल्या उपरोक्त कथनाला अविश्वसार्ह मानण्यासारखे कुठलेही सबळ कारण सामनेवाला विमा कंपनीने दाखवले नाही किंवा तसा कुठलाही योग्य पुरावाही सामनेवाला विमा कंपनीने दाखल केला नाही.त्यामुळे सामनेवाला विमा कंपनीचे तक्रारदाराची तक्रार खोटी व लुबाडणूकीची आहे हे कथन हे मंच ग्राहय धरु शकत नाही. कुठलाली सबळ पुरावा नसताना तक्रारदाराचा न्याय योग्य क्लेम सामनेवालाने नामंजूर केला आहे व ही सामनेवालाच्या सेवेतील निश्चित व गंभीर त्रुटी आहे अशा स्पष्ट निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला कंपनीने तक्रारदारास विमा क्लेमचे रु.50,000/-(रु.पन्नास हजार फक्त) दि.12/09/2006 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह दयावेत.
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |