नि. २३
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ४५७/२०१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : ३/९/२०१०
तक्रार दाखल तारीख : ६/९/२०१०
निकाल तारीख : १९/११/२०११
----------------------------------------------------------------
श्री सुकुमार आण्णासो पाटील
वय ३४ वर्षे, धंदा– शेती,
रा.बेडग, ता. मिरज जि.सांगली .....तक्रारदारú
विरुध्दù
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
तर्फे शाखाधिकारी
कार्यालयीन पत्ता – राम मंदीर शेजारी,
जयसिंगपूर, ता.शिरोळ, जि.कोल्हापूर .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री मनोज भोसले
जाबदार तर्फे : +ìb÷. श्री के.ए.मुरचिटे
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज आपल्या वाहनाच्या अपघात विमा दाव्याबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांच्या मालकीचे टाटा सुमो हे वाहन असून सदर वाहनाचा तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे विमा उतरविला आहे. सदर विम्याचा कालावधी हा दि.२१/५/०९ ते २०/५/१० असा आहे. तक्रारदार यांचा मित्र हणमंत मल्लूर याच्याकडे वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना आहे. जाबदार हे त्याचा मित्र हणमंत मल्लूर यांस घरगुती कारणाकरिता वरचेवर वाहन चालविण्यासाठी देत असत व अर्जदार हे त्याच्यासोबत शेजारी बसत असत. सदर मित्र गाडी चालवित असताना अर्जदार हे गाडीसाठी “एल” बोर्ड लावून गाडी चालविणेसाठी देत असत. दि. २२/७/२००९ रोजी तक्रारदार व त्यांचा मित्र मल्लूर हे वेळणेश्वर येथून चिपळूणकडे जात असताना तक्रारदार यांचा मित्र हणमंत मल्लूर हा वाहन चालवत होता. त्यावेळी सदर वाहनाचा अपघात झाला. तक्रारदार यांनी विमा कंपनीस सदर अपघाताची सूचना दिली व जाबदार यांचेकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन विमा क्लेम दाखल केला. परंतु जाबदार कंपनीने तक्रारदार यांचा विमादावा नामंजूर केला. जाबदार यांनी दिलेल्या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने २० कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार यांनी याकामी नि.१३ वर आपले म्हणणे शपथपत्राच्या स्वरुपात दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार हे सदर वाहनाचा वापर वडापसाठी करीत होते. अपघातसमयीही प्रस्तुत वाहनामधून प्रवासी वाहतूक केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी पॉलिसीमधील अटी व शर्तीचा भंग केला आहे. वाहन चालवितेवेळी सदर वाहन चालकाकडे वाहन चालविण्याचे शिकाऊ लायसेन्स हे योग्य व प्रमाणीत नाही. वाहन चालवितेवेळी तक्रारदार हे सदर वाहनामध्ये बसलेले नव्हते. त्याबाबत तक्रारदार यांनी केलेले कथन हे खोटे व लबाडीचे आहे. हणमंत मल्लूर हे तक्रारदार यांचेकडे नोकरीस आहेत. सदर मल्लूर हे वाहन चालवित होते व त्यामधून प्रवासी वाहतूक करीत होते. त्यामुळे जाबदार यांनी पॉलिसीमधील महत्वाच्या अटी व शर्तीचा भंग केला असल्यामुळे तक्रारदारांचा विमादावा फेटाळण्यात आला आहे त्याबाबत जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. सदर वाहनाचे दुरुस्तीसाठी तक्रारअर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे खर्च आल्याचा मजकूर जाबदार यांनी अमान्य केला आहे. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांनी योग्य कारणास्तव फेटाळला असल्याने तक्रारदार हे मागणीप्रमाणे कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत त्यामुळे तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी नि.१४ च्या यादीने १२ कागद दाखल केले आहेत. जाबदार यांनी नि.१६ वर सर्व्हेअर यांचे शपथपत्र दाखल केले आहे.
४. तक्रारदार यांनी नि.१७ ला पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे. तसेच नि.१९ वर पुरावा देणेचा नाही अशी पुरसिस दाखल केली आहे. जाबदार यांनी नि.२० ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.२२ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
५. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व दोन्ही बाजूंचा दाखल लेखी युक्तिवाद यांचे अवलोकन केले. दोन्ही विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. प्रस्तुत तक्रारअर्ज व त्यामधील कागदपत्रांचे अवलोकन केले असता प्रस्तुत तक्रारअर्ज चालविण्यास या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र आहे का ? हा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित होतो. सदर मुद्याबाबत जाबदार यांनी आपले युक्तिवादामध्ये कोणताही ऊहापोह केला नाही. परंतु सदरचा मुद्दा कायदेशीर असलेने याठिकाणी विचारात घेणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी विमा पॉलिसी ही जाबदार यांच्या जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथील शाखेतून घेतली आहे. वाहनाचा अपघात हा रत्नागिरी जिल्हयामधील आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये जाबदार यांचा पत्ता कोल्हापूर येथील नमूद केला आहे. सदरचे वाहनाचा नंबर हा एमएच १४/एक्स १७८७ असा आहे. या सर्व बाबी पाहता प्रस्तुतचा तक्रारअर्ज या मंचामध्ये का दाखल केला आहे याबाबत कोणताही खुलासा तक्रारअर्जामध्ये केलेला नाही. ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम ११ चे अवलोकन करता जाबदार हे या मंचाच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रातील राहणारे नाहीत. जाबदार यांची शाखा या मंचाच्या अधिकार क्षेत्रात आहे परंतु केवळ शाखा आहे या कारणास्तव तक्रारअर्ज या मंचाच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रामध्ये दाखल करता येईल का ? याबाबत सन्मा.सर्वोच्च न्यायालयाने 2010 CTJ Page 2 या सोनी सर्जिकल विरुध्द नॅशनल इन्शुरन्स कंपनी या निवाडयाचे कामी दिलेला निष्कर्ष महत्वपूर्ण ठरतो. सदर निवाडयाचे कामी सन्मा.सर्वोच्च न्यायालयाने पुढील निष्कर्ष नोंदविला आहे. The expression branch office in the C.P. Act means the branch office where the cause of action has arisen. तक्रारदार यांच्या तक्रारीस कारण सांगली शाखेशी संबंधीत नाही. तक्रारदार यांच्या तक्रारीचा सांगली शाखेशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे केवळ या जिल्हयामध्ये शाखा आहे, या कारणास्तव प्रस्तुत तक्रारअर्ज या मंचात दाखल करता येणार नाही. भौगोलिक अधिकारक्षेत्र ठरविताना दुसरी बाब विवचारात घ्यावी लागेल ती म्हणजे तक्रारीस पूर्णत: अथवा अंशत: या मंचाच्या अधिकारक्षेत्रामध्ये कारण घडले आहे का ? हे पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांचे वाहनाचा अपघात रत्नागिरी जिल्हयामध्ये झाला आहे. सदर वाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली येथे नोंदविलेले नाही. अशा परिस्थितीत तक्रारअर्जास या मंचाच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रामध्ये कोणतही कारण घडलेले नाही. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून विमासेवा घेतली आहे. तक्रारदार यांचा विमादावा जाबदार यांचे जयसिंगपूर शाखा जि.कोल्हापूर यांनी नाकारला आहे. त्यामुळे तक्रारअर्ज दाखल करुन घेण्यास व चालविण्यास या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र येत नाही या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला असल्याने तक्रारदार मागणीप्रमाणे या मंचाकडून कोणताही अनुतोष मिळणेस पात्र नाहीत. या मंचास भौगोलिक अधिकारक्षेत्र येत नसल्याने तक्रारदार यांना योग्य त्या मंचापुढे तक्रारअर्ज दाखल करण्याची मुभा ठेवून तक्रारअर्ज परत करणे संयुक्तिक ठरेल या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज तक्रारदार यांना परत करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दिनांकò: १९/११/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११