Maharashtra

Solapur

CC/10/428

Unique Builder Prop.Jaysinha Laxman Pawar R/o Malewadi T.Malshiras Dist.Solapur - Complainant(s)

Versus

United India Insurance Co.Ltd 893 K.V.Vora Building,Akluj Dist.solapur - Opp.Party(s)

Adv.Shinde

17 Jul 2012

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum, Solapur.
 
Complaint Case No. CC/10/428
 
1. Unique Builder Prop.Jaysinha Laxman Pawar R/o Malewadi T.Malshiras Dist.Solapur
Atpost malewadital. mashiras
solapur
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance Co.Ltd 893 K.V.Vora Building,Akluj Dist.solapur
893 K.V.vora building mahavir peth akluj tal.malshiras
solapur
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MRS. Shashikala S. Patil PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.J. Dalbhanjan MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.


 

          


 

ग्राहक तक्रार क्रमांक : 428/2010.


 

 


 

                                                    तक्रार दाखल दिनांक : 19/07/2010.     


 

                                                         तक्रार आदेश दिनांक : 17/07/2012.


 

                                निकाल कालावधी: 01 वर्षे 11 महिने 28 दिवस    


 

 


 

मे. युनीक बिल्‍डर्स, प्रोप्रा. जयसिंह लक्ष्‍मण पवार,


 

वय सज्ञान, रा. मु.पो. माळेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर.        तक्रारदार


 

 


 

                        विरुध्‍द


 

 


 

युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि., 893, के.व्‍ही. व्‍होरा


 

बिल्‍डींग, महावीर पेठ, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर.              विरुध्‍द पक्ष


 

 


 

                        गणपुर्ती :-   सौ. शशिकला श. पाटील, अध्‍यक्ष (अतिरिक्‍त कार्यभार)


 

                       सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्‍य


 

 


 

 


 

                   तक्रारदारयांचेतर्फेविधिज्ञसोपान उर्फ काकासाहेब ज्ञा. शिंदे


 

                   विरुध्‍दपक्षयांचेतर्फेविधिज्ञ: जी.एच. कुलकर्णी


 

 


 

निकालपत्र


 

 


 

सौ. शशिकला श. पाटील, अध्‍यक्ष(अतिरिक्‍त कार्यभार)यांचे द्वारा :-


 

 


 

1.    प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्‍यात असा आहे की, ते व्‍यवसायिक असून कॉन्‍ट्रॅक्‍टर आहेत. त्‍या व्‍यवसायाकरिता सन 2007 मध्‍ये ट्रक-टिप्‍पर क्र. एम.एच.45/0323 खरेदी केला आहे. सदर वाहनास विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे पॉलिसी नं.161205/31/09/01/00001544 अन्‍वये दि.2/8/2009 ते 1/8/2010 सर्वसमावेशक विमा संरक्षण दिलेले आहे. दि.9/9/2009 रोजी ड्रायव्‍हर शहानवाज शेख व क्लिनर बाळासाहेब कदम यांनी सदरचा ट्रक-टिप्‍पर किरकोळ दुरुस्‍तीसाठी श्रीनाथ वेल्‍डींग वर्क्‍स येथे पाठविला होता. सदर दुकानाच्‍या मालकाने सांगितल्‍याप्रमाणे ड्रायव्‍हरने ट्रक-टिप्‍पर दुकानासमोरील मोकळ्या जागेत पार्क केला आणि त्‍यास कुलूप लावले. परंतु दि.9/9/2009 ते 10/9/2009 च्‍या रात्रीमध्‍ये कोणीतरी त्‍यांचा ट्रक-टिप्‍पर चोरुन नेला. दि.10/9/2009 च्‍या दुपारी ट्रक चोरीस गेल्‍याचे निदर्शनास आल्‍यानंतर शोध घेऊनही त्‍याचा तपास लागला नाही. त्‍यामुळे पोलीसाकडे त्‍याची नोंद करुन पंचनामा करण्‍यात आला. त्‍यानंतर तक्रारदार यांनी ट्रक-टिप्‍परची विमा रक्‍कम मिळविण्‍यासाठी वाहनाचे कागदपत्रांसह विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे संपर्क साधला. परंतु विरुध्‍द पक्ष यांनी दि.5/4/2010 रोजीच्‍या पत्रान्‍वये पॉलिसी अट क्र.5 चा भंग केल्‍याच्‍या कारणामुळे विमा दावा नामंजूर केला आहे. त्‍यांनी कोणत्‍याही अटीचा भंग केलेला नाही आणि ट्रक-टिप्‍पर पार्किंग करताना योग्‍य काळजी घेतलेली आहे. विरुध्‍द पक्ष यांनी सेवेमध्‍ये त्रुटी केलेली आहे. शेवटी तक्रारदार प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून रु.9,00,000/- विमा रकमेची मागणी केलेली आहे. तसेच त्‍यांनी मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार खर्चापोटी रु.10,000/- ची मागणी केली आहे.


 

 


 

2.    विरुध्‍द पक्ष यांनी दि.4/10/2010 रोजी प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. त्‍यांनी तक्रारदार यांची तक्रार अमान्‍य केली आहे. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार यांचे वाहन क्र. एम.एच.45/0323 करिता त्‍यांनी पॉलिसी नं.161205/31/09/01/00001544 अन्‍वये दि.2/8/2009 ते 1/8/2010 कालावधीकरिता रु.8,00,000/- चे विमा संरक्षण दिलेले आहे. तक्रारदार यांनी दि.11।9/2009 च्‍या पत्राद्वारे झालेल्‍या नुकसानीबाबत सूचना दिल्‍यानंतर तक्रारदार यांच्‍याकडून पोलीस पेपर्स, वाहनाची कागदपत्रे, विमा दावा प्रपत्र इ. मागविण्‍यात आले. त्‍याप्रमाणे तक्रारदार यांनी वेळोवेळी कागदपत्रे दाखल केली. तसेच त्‍यांनी अभियोक्‍ता श्री. एस.आर. इंगळे यांच्‍यामार्फत इन्‍व्‍हेस्‍टीगेशन करुन दि.10/11/2009 रोजी अहवाल घेतला आहे. तसेच स्‍वतंत्रपणे कागदपत्रांची तपासणी केली असता विमा संरक्षीत वाहन श्रीनाथ वेल्‍डींग वर्क्‍स, वेळापूर येथे पार्क केले होते. त्‍यावेळी वाहनाचे संरक्षणासाठी कोणतीही सुरक्षीतता घेतली नसल्‍याचे व वाहनामध्‍ये कोणीही उपस्थित ठेवले नसल्‍याचे निदर्शनास आले. वाहन सुरक्षीत ठेवण्‍याबद्दल असलेल्‍या अट क्र.5 चा तक्रारदार यांनी भंग केलेला आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांना विमा रक्‍कम देय नाही आणि त्‍यांच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी नसल्‍यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्‍याची त्‍यांनी विनंती केली आहे.


 

 


 

3.    तक्रारदार यांनी दाखल केलेला तक्रार-अर्ज, विरुध्‍द पक्ष यांची कैफियत, दोन्‍ही पक्षांनी दाखल कागदपत्रे, प्रतिज्ञालेख, लेखी युक्तिवाद यांचे सुक्ष्‍मरित्‍या पडताळणी व अवलोकन केले असता पुढील मुद्दे उपस्थित झाले व कारणमिमांसा देऊन पुढील आदेश पारीत करण्‍यात आले.


 

 


 

3.1) सदर तक्रार-अर्ज तक्रारदार यांनी त्‍यांचा ट्रक चोरीस गेल्‍याने नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून दाखल केला आहे. विरुध्‍द पक्ष यांनी लेखी जबाब दाखल केला आहे. त्‍यामध्‍ये ट्रक ड्रायव्‍हरने त्‍यांचा ट्रक कुलूप न लावता योग्‍य ती काळजी न घेता घटनास्‍थळी लावली होती. त्‍यास तक्रारदार हेच जबाबदार आहेत. पॉलिसीच्‍या अटी व नियमाप्रमाणे पॉलिसी अट क्र.5 प्रमाणे 5. The Insured shall take all reasonable steps to safeguard the vehicle insured from loss or damage and to maintain it is efficient condition and the Company shall have at all times free and full access to examine the vehicle insured or any part thereof or any driver or employee of the insured. In the event of any accident or breakdown, the vehicle insured shall not be left unattended without proper precautions being taken to prevent further damage or loss and if the vehicle insured be drived before the necessary repairs and effected, any extension of the damage or any further damage to the vehicle shall be entirely at all insured’s own risk. अशी दखल घेणे आवश्‍यक होते. परंतु दखल घेतली नाही. त्‍यामुळे चोरीस गेलेल्‍या ट्रकची विमा रक्‍कम देता येणार नाही, असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी त्‍यांची तक्रार सबळ पुराव्‍याने सिध्‍द करण्‍याकरिता मंचाच्‍या अभिलेखावर पॉलिसी प्रतिलिपी, फिर्यादीची झेरॉक्‍स, फिर्यादीचा जबाब, घटनास्‍थळ पंचनामा, आर.सी. बूक, ड्रायव्‍हींग लायसेन्‍स, वाहन चोरीस गेल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांना पाठविलेले पत्र अशी कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदार यांचा ट्रक सन 2007 मध्‍ये खरेदी केला आहे. तो दि.9/9/2009 रोजी श्रीनाथ वेल्‍डींग वर्क्‍स येथे आणून लावला होता. त्‍याचे वेल्‍डींग काम चालू होते. दि.10/9/2009 रोजी रात्री 12.21 चे सुमारास श्रीनाथ वेल्‍डींग वर्क्‍सचे मालक विष्‍णू मोरे, वेळापूर यांनी कळविले की, तुमचा टिप्‍पर गॅरेजसमोर नाही. तुम्‍ही घेऊन गेला आहात काय ?  त्‍यावर अर्जदार यांनी टिप्‍पर आणलेला नाही, असे सांगितल्‍याने त्‍वरीत टिप्‍परची शोधाशोध केली. परंतु मिळून आला नाही. टिप्‍पर चोरी गेल्‍याची खात्री झाल्‍यानंतर तक्रारदार यांनी दि.16/9/2009 रोजी सोलापूर जिल्‍हा पोलीस ठाणे, वेळापूर येथे एफ.आय.आर. 63/2009 हा दाखल केला आहे. त्‍यामध्‍ये जाबजबाब घेण्‍यात आलेले आहेत. ते अभिलेखावर दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी ट्रक चोरीस गेल्‍याचे विरुध्‍द पक्ष यांना त्‍वरीत कळविलेले नाही. परंतु कळविल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी दि.5/4/2010 रोजीचे पत्रामध्‍ये पॉलिसी अट नं. 5 चे अटीचा भंग केला असल्‍याने क्‍लेम देण्‍याचे नाकारले आहे. सदर पत्रही अभिलेखावर दाखल केले आहे. तक्रारदार यांनी घटनास्‍थळाचा पंचनामा दाखल केलेला आहे. विरुध्‍द पक्ष यांनी दि.10/11/2009 रोजी इंगळे एस.आर. यांच्‍याकडून चौकशी अहवाल घेण्‍याकरिता कळविल्‍यानंतर चौकशी अहवाल पूर्ण करुन तो अभिलेखावर दाखल केला आहे. त्‍यामध्‍ये दि.10/9/2009 रोजी टिप्‍पर चोरीस गेलेला आहे. त्‍याची फिर्याद रजिस्‍टर्ड केलेली आहे. परंतु चार्जशीट दाखल नाही. त्‍यामुळे समरीही दाखल नाही, असे नमूद केल्‍याने तक्रारदार यांनी स्‍वत:च्‍या पुराव्‍याकरिता प्रतिज्ञालेख दाखल केला आहे. साक्षीदाराचा प्रतिज्ञालेख दाखल आहे. परंतु सिताराम नामदेव माने यांच्‍या अफिडेव्‍हीटमध्‍ये ते वॉचमन वेळापूर येथे असल्‍याचे नमूद केले आहे. परंतु प्रत्‍यक्षात गॅरेजचे मालक यांनी त्‍यांच्‍याकडे कधीही वॉचमन लावलेलाच नव्‍हता, असा जबाब पॉलिसीच्‍या समोरील जबाबामध्‍ये दिलेला आहे. यामध्‍ये या दोन्‍ही कागदपत्रामध्‍ये तफावत जाणवत आहे. तक्रारदार यांनी ट्रक चोरीस गेल्‍यानंतर त्‍वरीत पोलीस तक्रार दाखल केलेली नाही. त्‍याबद्दलही मंचास साशंकता निर्माण होते. कारण युनीक बिल्‍डर्सचा वापर हा व्‍यवसायिक कारणाकरिता केलेला आहे. सन 2007 मध्‍ये टिप्‍पर खरेदी केला व पॉलिसी कालावधी हा दि.2/8/2009 ते 1/8/2010 असताना पॉलिसी उतरल्‍यानंतर त्‍वरीत 1 महिन्‍यातच म्‍हणजेच दि.9/9/2009 रोजी गॅरेजमध्‍ये ट्रक दुरुस्‍तीसाठी दिल्‍यानंतर तेथून रात्रीच्‍या वेळी चोरीस गेलेला आहे. ही घटना गॅरेजमधील व्‍यक्‍तीने जबाब देताना नमूद केले आहे की, एका गाडीतून दोन व्‍यक्‍ती आल्‍या. त्‍यांनी युनिक बिल्‍डर्सची गाडी तयार झाली आहे काय ?  असे विचारले व कोणतीही परवानगी न घेता गाडी घेऊन गेले आहेत. त्‍यामुळे तक्रारदार यांची तक्रार व दाखल केलेला जबाब यामध्‍ये तफावत दिसून येत आहे. तक्रारदार यांनी मात्र त्‍यांच्‍या तक्रार-अर्जामध्‍ये या मुद्याची कोणतीही माहिती नमूद केलेली नाही. या मुद्यावरुन असे स्‍पष्‍ट होत आहे की, कदाचित तक्रारदार यांच्‍याकडूनही कोणतीही व्‍यक्‍ती येऊन गाडी घेऊन गेली असावी, याबद्दल शंका निर्माण होते. कारण त्‍यांच्‍याकडे गाडीची चावी असणे, याचाच अर्थ यामध्‍ये संगनमताचे तथ्‍य असल्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. म्‍हणून अशा परिस्थितीमध्‍ये विरुध्‍द पक्ष यांनी पॉलिसीमध्‍ये अट क्र.5 प्रमाणे नमूद केल्‍याप्रमाणे अटीची दखल घेतली असता तक्रारदार व गॅरेज मालक या दोघांनीही गाडीच्‍या सुरक्षीततेची काळजी घेणे अत्‍यंत आवश्‍यक व गरजेचे आहे, हे मान्‍य व कबूल करणे न्‍यायोचित, विधीयुक्‍त व संयुक्तिक आहे. वास्‍तविक पाहता, तक्रारदार यांनी श्रीनाथ इंजीनिअरींग व मेकॅनिकल वर्कशॉप, वेळापूर यांच्‍याकडे टिप्‍पर दुरुस्‍तीसाठी दिलेले होते. वेल्‍डींगचे काम सुरु होते, हेही उभयतांना मान्‍य आहे. असे असताना श्रीनाथ इंजिनिअरींग वर्क्‍सशॉपच्‍या मालकाच्‍या ताब्‍यामधून सदरचे टिप्‍पर चोरीस गेलेला आहे, असाही स्‍पष्‍ट अर्थ व परिस्थिती आहे व असे असतानाही सदर मालकाने कोणत्‍याही प्रकारची तक्रार नोंदविलेली नाही. गॅरेज मालकाने तक्रारदार यांना फोनवरुन कळविले, याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. सदरची तक्रार ही शंकास्‍पद असल्‍याने व पॉलिसीच्‍या अट नं. 5 प्रमाणे अटीचा भंग व अवहेलना केली असल्‍यामुळे सदरचा तक्रार-अर्ज नामंजूर करण्‍यास पात्र आहे. म्‍हणून आदेश.


 

 


 

 


 

आदेश


 

 


 

1. अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात आली आहे.


 

      2. दोन्‍ही उभय पक्षकारांनी आपआपला खर्च स्‍वत: सोससावा.


 

 


 

 


 

(सौ. विद्युलता जे. दलभंजन)                              (सौ. शशिकला श. पाटील÷)


 

सदस्‍य                                            अध्‍यक्ष


 

       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.


 

                           ----00----


 

 (संविक/स्‍व/श्रु/12712)


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

 
 
 
[HONABLE MRS. Shashikala S. Patil]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.J. Dalbhanjan]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.