जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.2009/69. प्रकरण दाखल दिनांक – 18/03/2009. प्रकरण निकाल दिनांक –09/07/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा. श्री.सतीश सामते, सदस्य सुमंगला एन्टरप्रायझेस, द्वारा प्रो.प्रा.मोहन बद्रीनाथ बालगारकाशी वय, 48 वर्षे, धंदा व्यापार रा.उदय नगर, भाग्यनगर रोड, नांदेड. अर्जदार विरुध्द यूनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. द्वारा, विभागीय व्यवस्थापक, विभागीय कार्यालय, गैरअर्जदार गुरु कॉम्प्लेक्स, जी. जी. रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.शिरीष नागापूरकर. गैरअर्जदारा तर्फे - अड.श्रीनिवास मददे. निकालपत्र (द्वारा,मा.श्री. सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार यूनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनीच्या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी दावा दाखल केलेला आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, त्यांनी गैरअर्जदार यांचेकडे शॉप किपर इन्शूरन्स पॉलिसी दि.18.9.2007 ते 27.9.2008 या कालावधीसाठी घेतली होती. तिचा पॉलिसी क्रमांक 230600/48/07/34/00000704 असा आहे. दि.4.12.2007 रोजी अर्जदार आपल्या दूकानात हजर असताना दोन अज्ञात इसम दूकानात आले व त्यांना बालाजीच्या पूजेसाठी काही रु.100/- च्या नोटा ज्यावर एल हा कोड असलेल्या नोटाची गरज आहे. अर्जदाराने त्यांचे काऊंटरमधील ड्रावर मधील रु.10,000/- रक्कमेचे बंडल काढले ज्यात रु.500/- व रु.100/- च्या नोटा होत्या. त्या इसमानी अर्जदाराला परत ते बंडल दिले व ते नीघून गेले. थोडया वेळानंतर अर्जदाराच्या असे लक्षात आले की, नोटाच्या बंडलमधून रु.500/- च्या 12 नोटा म्हणजे रु.6,000/- कमी आहेत. त्यामूळे त्यांना खाञी झाली त्या अज्ञात इसमानी रु.6000/- ची चोरी केली. अर्जदाराने पोलिस स्टेशन भाग्य नगर येथे गून्हा नंबर 413/07 दाखल करण्यात आला. अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडे कराराप्रमाणे चोरीच्या कारणासाठी दावा दाखल केला. दि.10.11.2008 रोजी गैरअर्जदार कंपनीने कायदेशीर कारणास्तव अर्जदाराचा दावा नाकारला. गैरअर्जदाराने चोरी पासून अर्जदाराच्या काऊंटरमधील संरक्षणाची हमी घेतली आहे ती रक्कम चोरीस गेली म्हणून रु.6,000/- अर्जदारास देणे भाग आहे. तसेच अर्जदार यांनी झालेल्या मानसिक ञासापोटी रु.3,000/- दावा खर्चाबददल रु.3,000/- मागितले आहेत. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे विमा पॉलिसी त्यांना मान्य आहे. परंतु अर्जदाराने त्यांचे काऊंटरमधील ड्राव्हर मधील रु.10,000/- स्वतः बाहेर काढले व त्यानंतर दोन अनोळखी इसमांच्या हातात दिले आणि सदर रक्कमेच्या सूरक्षतेसाठी कोणतीही काळजी घेतली नाही व निष्काळजीपणे स्वतः रक्कमेचे बंडल अनोळखी इसमाच्या ताब्यात दिले व नंतर ते बंडल स्वतः परत घेतले. सदर घटनेस अर्जदार हे स्वतः जबाबदार आहेत. त्यांचे स्वतःच्या हलगर्जीपणामूळे, निष्काळजीपणामूळे व बेसावधगिरीमूळे ही घटना घडली. अर्जदाराने दिलेल्या रुपयाचे बंडल परत केले असे म्हटले आहे व असे असेल तर चोरी होऊ शकत नाही. अर्जदाराची तक्रार नितांत खोटी आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दाखल केलेल्या क्लेममध्ये व एफ.आय.आर. च्या मजकूरामध्ये तफावत आहे. त्यांचेत ताळमेळ जमत नाही. एफ.आय.आर. मध्ये आठ ची सिरीयलची शंभराची नोट असे नमूद करण्यात आले आहे तसेच तक्रारीमध्ये एल कोड असलेली नोट असा म्हटले आहे. दोन्ही तक्रारीमध्ये तफावत आहे. दूसरीकडे अर्जदाराने सदर घटने संबंधी दोन दिवसांने उशिरा फिर्याद दिली. उशिरा देण्याचे कारण म्हणजे अशी घटना घडलीच नव्हती. पोलिसांनी दि.20.2.2008 रोजी नोटीस कलम 173 सी.आर.पी.सी प्रमाणे दिली यात अर्जदाराने स्वतःच्या चूकीमूळे व निष्काळजीपणाबददल नमूद केलेले आहे. तर गैरअर्जदाराने क्लेम संबंधी सर्व्हेअर नेमला, दूकानाची पाहणी केली परंतु एक्सक्यूसन क्लाज प्रमाणे दि.10.11.2008 रोजी अर्जदाराचा क्लेम नाकारण्यात आलेला आहे असे करुन कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे विमा पॉलिसी 230600/48/07/34/00000704 शॉप किपर इन्शूरन्स पॉलिसी घेतली आहे याविषयी वाद नाही, परंतु दि.4.12.2007 रोजी अर्जदाराने मनघडत कहाणी झाली आहे यावीषयी गैरअर्जदाराने आक्षेप घेतला आहे. गैरअर्जदाराच्या मते काऊंटरमध्ये ठेवलेली रक्कम व्यवस्थितपणे ठेवलेली असेल व त्यांचे सूरक्षेची योग्य ती काळजी घेतली असेल तर अशा स्थितीमध्ये जर रक्कम काऊंटरमधून चोरी गेली तर ती रक्कम चोरी झाल्यामूळे त्यांची नूकसान भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे, परंतु येथे अर्जदार स्वतः कबूल करतात की, ते हजर असताना दोन अज्ञात इसम त्यांचे दूकानात आले व त्यांनी एल कोड असलेल्या नोटा मागितल्या व अर्जदार हे स्वतः काऊंटर मधून बंडल काढतात व त्यांना देतात व त्यानंतर सदर अनोळखी इसमाकडून परत रक्कम घेतात पण घेताना त्यांची स्वतः खाञी करुन घेत नाहीत व निघून गेल्यानंतर काही नोटा कमी आहेत हे न पटण्याजोगे आहे. शिवाय अर्जदारानी चोरी झाल्यानंतर तब्बल तिन दिवसांनी तक्रार केली आहे. तिन दिवसांचे विलंबाचे कारण दिलेले नाही. विमा पॉलिसीतील नियम व अटी प्रमाणे ज्या पॉलिसीचे नियम गैरअर्जदाराने दाखल केलेले आहेत यात काऊंटरची सूरक्षे विषयी काळजी घेणे ही पहिली अट आहे. अर्जदार स्वतः निष्काळजीपणा करीत असतील तर त्यांस गैरअर्जदार जबाबदार नाहीत. त्यामूळे दि.6.2.2009 रोजी विमा कंपनीने दावा नाकारला तो बेकायदेशीर म्हणता येणार नाही व सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करु शकत नसल्या कारणाने अर्जदाराची मागणी मान्य करणे यांस काही एक कारण उरत नाही. अर्जदाराची तक्रार ही बोगस स्वरुपाची वाटते व गैरअर्जदार यांनी सर्व्हे रिपोर्ट दाखल केलेला आहे यात देखील स्पष्टपणे अर्जदाराच्या निष्काळजीपणावर टिपण्णी केलेली आहे. एकंदर अर्जदाराच्या दूकानाचे ट्रान्जेक्शन मोठे आहे व यांची सर्व काळजी ते घेत असतात तेव्हा त्यांचे समोर अनोळखी इसम असताना केलेला व्यवहार हा योग्य होता असे म्हणता येणार नाही. त्यामूळे एक्सक्लूजन क्लाज 3 Ia, Ib, Ic & coverages a,b,c याद्वारे दावा नाकारण्यास योग्य आहे. सबब आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |