जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/85 प्रकरण दाखल दिनांक – 18/04/2009. प्रकरण निकाल दिनांक – 14/08/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. आत्माराम पि. लक्ष्मणराव गोडबोले वय, 30 वर्षे, धंदा व्यवसाय रा.आंबेडकर,लोहा ता. लोहा जि.नांदेड. अर्जदार विरुध्द 1. शाखा व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. दुसरा मजला, मेडेवार कॉम्प्लेक्स, देगलूर ता.देगलूर जि. नांदेड. गैरअर्जदार 2. शाखा व्यवस्थापक, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. तारासिंग मार्केट, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.ए.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.जी.एस.औढेंकर निकालपत्र (द्वारा,मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष) गैरअर्जदार यूनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी यांच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात की, त्यांनी गैरअर्जदार यांचेकडे शॉपकिपर पॉलिसी नंबर 2300602/11/07/00000664 ही पॉलिसी रु.3,50,000/- रक्कमेसाठी घेतली होती. अर्जदार यांची राहूल टेंट अन्ड साऊंड सर्व्हीस हा व्यवसाय आहे. दि.29.12.2008 रोजी शॉर्टसर्किटने दूकानाला आग लागली व दूकानातील सर्व सामानाचे जळून रु.3,50,000/- चे नूकसान झाले. ही बाब कळाल्यावर अर्जदार घटनास्थळी गेले त्यामूळे त्यांचे लक्षात आले की, दूकानामध्ये आग लागण्याचे पूर्वी रु.5,51,740/- चेसामान होते. त्यांचे मिञ मदन गूरु खोडवे यांचे मदतीने हैद्राबाद येथून खरेदी केले होते. सदरील घटनेची पोलिस स्टेशन लोहा येथे गून्हा नंबर 04/2008 प्रमाणे दि.30.12.2008 ला तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यामूळे पंचानी 12 20 खोलीमध्ये प्रवेश केला असता अर्धवट जळालेले सामान दिसत होते त्यामध्ये टेंट, संतरजी, लाईटींग, पडदे, कनात गादी, गाडी लोड, गादी कव्हर, आसन पटटया, पाच साऊंड बॉक्स, महाराजा खूर्च्या, फायबर खुर्च्या, वायरिंग, माईक, फोकस इत्यादी सामान अर्धवट दिसून आल्याचे पाहीले. गैरअर्जदार विमा कंपनी, तहसिलदार यांना नूकसानी बददल सूचना देण्यात आली. गैरअर्जदारांनी त्यांचे सर्व्हेअर यांना पाठविले. त्यांनी घटनास्थळी जाऊन नूकसानीचा आढावा घेऊन रु.38,900/- चे नूकसान हेतू पूरस्पर दाखवलेले जे की, चूक आहे. अर्जदाराचे रु.3,50,000/- चे नूकसान झालेले आहे. ते 18 टक्के व्याजाने मिळावे तसेच मानसिक व आर्थिक ञासापोटी रु.1,00,000/- व व्यवसायाचे नूकसानीबददल रु.1,00,000/- व दावा खर्च म्हणून रु.10,000/- ची मागणी केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांना सूचना प्राप्त झाल्याबरोबर त्यांनी त्यांचे सर्व्हेअर श्री. तोतला यांना पाठविले असता त्यांनी नूकसानीची रक्कम रु.39,049/- ठरविली आहे व तसा अहवालही दिलेला आहे. गैरअर्जदार यांना पॉलिसी मान्य आहे त्याबददल वाद नाही. या अंतर्गत रु.3,00,000/- पर्यतची नूकसानीची जबाबदारी गैरअर्जदार यांनी स्विकारली होती. अर्जदार जरी म्हणत असले तरी आगीच्या आधी रु.5,51,740/- चे सामान दूकानात होतेव आगीत रु.,3,50,000/- चे नूकसान झाले हे त्यांचे सर्व्हेअरनी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर एवढे नूकसान आढळले नाही. यानंतरही गैरअर्जदार यांनी किती नूकसान भरपाई दयावी याबददल नीर्णय घेतलेला नाही. त्यामूळे ही प्रिमॅच्यूअर स्वरुपाची तक्रार आहे ती रु.5,000/-खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व दोघानीही केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेत ञूटी आहे काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी त्यांचे दूकानास दि.30.12.2008 रोजी आग लागल्याबददल एफ.आय.आर., पोलिस पंचनामा, काही फोटोज, एम.एस.ई.बी., एस.बी.आय. यांना दिलेले पञ दाखल केलेले आहे. तसेच दि.21.1.2009 रोजीचा विद्यूत निरिक्षक यांचा स्पॉट इन्सेप्कशन रिपोर्ट ज्यात जोड दिलेलया वायरचा इन्सुलेशन खराब होऊन फेज व न्यूटल एकञित आल्याने शॉर्ट सर्किट होऊन वायर जळाले, त्यांचे तूकडे खाली असलेल्या कापडी पडदयावर गादीवर व टेन्ट साहित्यावर पडून सामानास आग लागली असा अहवाल दिलेला आहे. म्हणजे शॉर्टसर्किटने आग लागली हे गैरअर्जदार यांना मान्य आहे. वाद फक्त रक्कमे बददलचा आहे. त्याबददल अर्जदार यांनी श्री.एल.टी. गंजेवार यांचे वर्ष 2006-07 व 2007-08 यांचे ट्रायल बॅलेन्स शिट व ट्रेडींग अकाऊट दाखल केलेले आहे. हे जरी असले तरी यांस ठोस पूरावा म्हणता येणार नाही. अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात असा उल्लेख केला आहे की, त्यांनी हैद्राबाद येथून त्यांचे एक मिञ मदन गूरु खोडवे यांचे सहायाने सामान खरेदी केल्याचे म्हटले आहे. त्यामूळे खरेदीची बिले त्यांनी दाखल केली असती व जे खरेदीसाठी साक्षीदार आहेत त्यांची साक्ष नोंदविली असती, बँकेचे दिलेले स्टॉक स्टेटंमेंट दाखल करता आले असते परंतु असे अर्जदाराने केलेले दिसत नाही. घटनास्थळावर प्रथम जाऊन सर्व्हेअर हा एकमेव टेक्निकल व्यक्ती आहे जो सर्व्हे करतो. याप्रमाणे श्री. तोतला यांनी जायमोक्यावर जाऊन सर्व्हे केला तो सर्व्हे रिपोर्ट या प्रकरणात दाखल आहे. याप्रमाणे सर्व्हेअरच्या म्हणण्यानुसार देखील शॉर्टसर्किटने आग लागली व लोकांनी आग विझवली. फायर ब्रीगेड बोलाविण्यात आले नाही यांचा अर्थ आग मोठी नव्हती. 12 x 20 चे त्यांचे दूकान व स्टोअर आहे. सर्व्हेअरच्या मते एवढया लहान जागेत रु.5,50,000/- चा स्टाक बसू शकत नाही. आम्हाला देखील ही गोंष्ट पटते. अर्जदारानी आपल्या तक्रार अर्जात असा उल्लेख केला की, दूकानामधील सर्व सामान हे अर्धवट जळाले. तेव्हा त्यांचे तूकडे शिल्लक होते व अर्धे जळाले. याप्रमाणे सर्व्हेअरनी जितके जळालेले सामान आहे तेवढे मोजून व बाजार भावाप्रमाणे त्यांची किंमत लाऊन एक स्टेटमेंट तयार केले होते. याद्वारे रु.55,610/- चे आगीत जळून नूकसान झाले. यात वापरलेल्या वस्तू म्हणून 10 टक्के डिप्रिसियेशन धरले ते रु.5561/- होते. गैरअर्जदार यांची जबाबदारी रु.49,049/- ठरवली ज्यातून रु.1049/- साल्व्हेज कमी केले व पॉलिसी एक्सेसचे रु.10,000/- कमी केलेले आहे. पण पॉलिसी एक्सेसचे गैरअर्जदारांनी कमी केलेली ही रक्कम माफ करता येते. अर्जदाराचे आधीच नूकसान झालेले आहे त्यामूळे हे रु.10,000/- गैरअर्जदार यांनी कमी करु नये. त्यामूळे अर्जदारास रु.49,049/- एवढी रक्कम मिळण्यास ते पाञ आहेत. सर्व्हेअरनी दिलेल्या सर्व्हे रिपोर्टप्रमाणे गैरअर्जदार यांनी ती रक्कम नक्की केली होती ही बाब त्यांनी दाखल केलेल्या डिसबर्समेंट व्हाऊचर वरुन दिसून येते. त्यांनी रु.38,900/- चे व्हाऊचर अर्जदाराचे दूकानाचे नांवाने तयार केले होते. फक्त व्हाऊचर सही करुन अर्जदारास देण्याचे बाकी होते. याचा अर्थ गैरअर्जदार यांचा नीर्णय झालेला आहे हे स्पष्ट दिसते. त्यामूळे अंतीम पञ गैरअर्जदाराने दिले नसते ही प्रिमॅच्यूअर स्वरुपाची तक्रार आहे. सर्व्हे रिपोर्टप्रमाणे त्यांनी अर्जदारास नूकसान भरपाईची रक्कम दयावी या मतास आम्ही आलो आहोत. एवढी रक्कम अर्जदारांनी घ्यावी असे त्यांनी केलेले नाही व क्लेम नामंजूरही केलेला नाही असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केल्याचे स्पष्ट होते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.49,049/- व त्यावर प्रकरण दाखल केलेल्या दिनांकापासून म्हणजे दि.18.04.2008 पासून पूर्ण रक्कम पदरीपडेपर्यत 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम दयावी, असे न केल्यास यानंतर दंडणीय व्याज म्हणून 12 टक्के व्याजाने रक्कम दयावी लागेल. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दाव्याचा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यु, पारवेकर लघुलेखक. |