Maharashtra

Yavatmal

CC/11/91

Tarabai Subhashrao Maindalkar - Complainant(s)

Versus

United India Insurance Co. - Opp.Party(s)

Adv.Shelke

25 Apr 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/91
 
1. Tarabai Subhashrao Maindalkar
Ramwakadi
Yavatmal
M.S.
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance Co.
Dharampeth Extention, Shankar Nagar,
Nagpur
M.S.
2. Kabal Insurance Services Pvt. Ltd.
Near Rukhmini Nagar, Behind Jagtap Petrol Pump
Amarvati
M.S.
3. Taluka Krushi Adhikari
Yavatmal
Yavatmal
M.S.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE Mrs.Surekha Teware-Biradar PRESIDENT
 HONORABLE Mrs. Yojana Tambe Member
 
PRESENT:
 
ORDER

 

निकालपत्र
( पारीत दिनांक : 25/4/2012 )
( द्वारा मा. अध्‍यक्षा सौ.सुरेखा के.टेवरे- बिरादार.)
 
01.      अर्जदार यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये गैरअर्जदार यांच्‍या विरुध्‍द दाखल केली असून, तीद्वारे पुढील प्रमाणे मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
1.   गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमायोजनेअंतर्गत मिळणारी राशी रु.1,00,000/- ही 18     टक्‍के व्‍याजदराने द्यावी.
2. मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.10,000/-
3. तक्रारीचा खर्च रु. 5000/-
 
अर्जदारांच्‍या तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालीलप्रमाणे आहे.
 
 
अर्जदारांनी सदर तक्रारअर्जामध्‍ये नमुद केले आहे की, अर्जदार, मयत सुभाष श्रावण मैंदळकर याची पत्‍नी आहे.    सुभाष श्रावण मैंदळकर नावे मौजा रामवाकडी ता.जि.यवतमाळ येथे गट क्र. 4  अंतर्गत  5 हे. 96 आर शेतजमीन आहे. शासनाने अपघातग्रस्‍त शेतक-यांस व त्‍याच्‍या कुटुंबियास लाभ देण्‍याकरीता 15 ऑगस्‍ट 2009 ते 14 ऑगस्‍ट 2010 या कालावधीकरिता शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना राबविली
अर्जदारयांनी नमुद केले आहे की,  अर्जदार हिच्‍या पतीचा दिनांक 14/9/2009 रोजी अज्ञात वाहनाने धडक दिल्‍याने रोड अपघातामध्‍ये अपघाती मृत्‍यू झाला, अर्जदारास उपरोक्‍त विमा योजनेची माहिती नव्‍हती व त्‍यानंतर अर्जदारास सदर योजनेची माहिती मिळाल्‍यानंतर अर्जदाराने विकास धारा बहुदउद्देशिय संस्‍था, अमरावती यांच्‍या माध्‍यमातून सदर विमा योजनेअंतर्गत विमा रक्‍कम मिळावी म्‍हणून तसा प्रस्‍ताव गैरअर्जदार क्र. 3 कडे पाठविला व तो प्रस्‍ताव दिनांक 19/3/2010 रोजी प्राप्‍त झाला. परंतु गैरअर्जदार क्र. 3 यांनी प्रस्‍तावात त्रुटी असल्‍याचे कारण सांगुन दिनांक 20/3/2010 रोजी प्रस्‍ताव परत केला. त्‍यानंतर अर्जदाराने सदर प्रस्‍तावातील त्रुटींची पुर्तता करुन पुन्‍हा गैरअर्जदार क्र. 3 कडे प्रस्‍ताव सादर केला. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा दाव्‍याबाबत कोणतीही माहिती दिली नाही व म्‍हणून   अर्जदार यांनी गैरअर्जदारांविरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार मंचामध्‍ये दाखल केली आहे व वरीलप्रमाणे मागणी केली आहे.
 
02.      गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपला लेखी जवाब दाखल केलेला आहे. त्‍यानुसार गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारीतील विपरित विधाने / आरोप अमान्‍य करुन पुढे असे नमुद केले की,    अर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदार क्र. 1 यांना मिळाल्‍यानंतर त्‍याची छानणी केल्‍यानंतर गैरअर्जदार क्र. 1 यांनी इन्‍व्‍हेस्‍टीगेटर नेमुन सदर प्रकरणातील संपुर्ण माहितीचा अहवाल मागीतला व इन्‍व्‍हीस्‍टीगेशन रिपोर्ट प्रमाणे जो अपघात झाला त्‍या अपघाताध्‍ये गाडी चालविणा-या व्‍यक्‍तीपाशी ड्रायव्‍हींग लायसन्‍स नव्‍हते. गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 2 च्‍या माध्‍यमातून ड्रायव्‍हींग लायसन्‍स दाखल करण्‍याबाबत अर्जदार यांना वेळोवेळी माहिती दिली, तरीपण ड्रायव्‍हींग लायसन्‍स दाखल न केल्‍यामुळे सदर पॉलिसीतील शर्ती व अटींचा भंग होत असल्‍यामुळे गैरअर्जदार यांनी सदर दावा नामंजुर केलेला आहे. अर्जदाराने सदर प्रकरणात कमिश्‍नर (अँग्रीकचर) महाराष्‍ट्र शासन पुणे यांना पार्टी करावयास पाहीजे होते. वरील सर्व कारणांमुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी.
 
 
 
      गैरअर्जदार क्र.2 यांनी त्‍यांचा लेखी जवाब सादर केला आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी त्‍यांच्‍या लेखी जवाबामध्‍ये अर्जदारांचे सर्व विपरीत म्‍हणणे खोडून काढले आहे व नमुद केले आहे की, अर्जदार हे त्‍यांचे ग्राहक होऊ शकत नाही कारण केवळ फक्‍त मध्‍यस्‍त सल्‍लागार असल्‍यामुळे व शासनास विना मोबदला सहाय्य करत असल्‍यामुळे अर्जदार त्‍यांचे ग्राहक नाही. गैरअर्जदार क्र. 2 यांनी पूढे नमुद केले आहे की, ते बीमा विनियामक और विकास प्राधिकरण भारत सरकार यांची अनुज्ञप्ति प्राप्‍त विमा सल्‍लागार कंपनी आहे. सदर प्रकरणामध्‍ये सुभाष श्रवणजी मैदंळकर यांचा दिनांक 14/9/2009  रोजी मृत्‍यू झाल्‍यानंतर त्‍या बाबतचा प्रस्‍ताव आमच्‍या कार्यालयास दिनांक 15/11/2010 रोजी प्राप्‍त झाला व त्‍यानंतर हा दावा गैरअर्जदार क्र. 1 यांना दिनांक 16/11/2010 रोजी पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्‍यात आला. सदर प्रस्‍ताव हा विमा कंपनीने बंद केला असून तसे अर्जदाराला दिनांक 24/3/2011 च्‍या पत्राने कळविले आहे.  त्‍यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी.
गैरअर्जदार क्र. 3 यांनी आपला लेखी जवाब दाखल केला असून, त्‍याद्वारे असे नमुद केले की, अर्जदाराने दिनांक 8/11/2010 रोजी अपुर्ण प्रस्‍ताव सादर केल्‍याने तो परत करण्‍यात आला त्‍यानंतर अर्जदाराने दिनांक 4/11/2011 रोजी प्रस्‍ताव दुरुस्‍ती करुन सादर केला असून त्‍यानुसार सदर प्रस्‍ताव दिनांक 16/11/2010 रोजी विमा कंपनीचे प्रतिनिधीस सुपुद केलेला आहे व आपले कर्तव्‍य बजावले आहे. त्‍यामुळे अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार क्र. 3 विरुध्‍द खारीज करण्‍यात यावी.
 
03.      अर्जदारांनी प्रस्‍तुत तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केली असून, सोबत क्‍लेम फॉर्म भाग 1 व त्‍यासोबतचे सहपत्र,  इत्‍यादी दस्‍तावेंजांच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहे तसेच लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
 
गैरअर्जदार यांनी आपला लेखी जवाब प्रतिज्ञापत्रावर दाखल केला   आहे.
-: कारणे व निष्‍कर्ष :- 
 
04.      प्रस्‍तुत प्रकरणात दोन्‍ही पक्षांतर्फे दाखल करण्‍यात आलेले सर्व दस्‍तावेज व प्रतिज्ञालेख बारकाईने पाहण्‍यात आले.
 
     सदर प्रकरणातील विमा पॉलिसी ही महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील शेतक-यांकरिता " गृप पर्सनल अक्‍सीडेंट पॉलिसी " अंतर्गत अपघाती मृत्‍यू किंवा अपंगत्‍व आल्‍यास शेतकरी व त्‍यांच्‍या वारसास नुकसान भरपाई मिळावी, या हेतुने महाराष्‍ट्र शासनाने विमा पॉलिसी काढली व सदर योजनेनुसार गैरअर्जदार क्र. 1 विमा कंपनीने उपरोक्‍त विमायोजनेनुसार जोखीम स्विकारली, या बद्दल वाद नाही.
          अर्जदाराचे निवेदन तथा दाखल दस्‍तावेजांवरुन असे स्‍पष्‍ट दिसून येते की, अर्जदार यांनी, मयत सुभाष श्रावण मैंदळकर यांचे वारसदार या नात्‍याने, विमाधारक सुभाष श्रावण मैंदळकर यांचा दिनांक 14/9/2009 रोजी अपघाती निधन झाले व या कारणाने अर्जदार यांनी विमाधारकाचा अपघाती मृत्‍यू झाला या सदरा खाली शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत विमा रक्‍कमेची मागणी केलेली आहे. अर्जदारातर्फे दाखल दस्‍तऐवजांवरुन असे दिसून येते की, विमाधारक सुभाष श्रावण मैंदळकर हे रस्‍ता अपघातामध्‍ये अपघाती मृत्‍यू पावले.
           गैरअर्जदार क्र. 1 यांचा असा आक्षेप आहे की, अपघाताध्‍ये विमाधारकाकडे वाहन चालविण्‍यासाठी ड्रायव्‍हींग लायसन्‍स नव्‍हते. ड्रायव्‍हींग लायसन्‍स दाखल न केल्‍यामुळे सदर पॉलिसीतील शर्ती व अटींचा भंग होत असल्‍यामुळे गैरअर्जदार यांनी सदर दावा नामंजुर केलेला आहे.   
            प्रस्‍तुत विमा पॉलिसी ही शेतक-यांच्‍या लाभाकरिता  शासना मार्फत राविण्‍यात येणा-या योजनेनुसार गैरअर्जदार क्र. 1 कडून " शेतकरी वैयक्‍तीक विमा पॉलिसी "  अंतर्गत काढली आहे. अशा प्रकारच्‍या विमा योजनेतील विमा दावे मंजुर करण्‍याकरिता शासनामार्फत परिपत्रक काढण्‍यात आले आहे. सदर परिपत्रकानुसार रस्‍त्‍यावरील अपघात असल्‍यास, विमा कंपनीला विमा दावा मंजुर करण्‍याकरिता, प्रथम माहिती अहवाल, स्‍थळ पंचनामा, मृत्‍यू विश्‍लेषण अहवाल, इत्‍यादि दस्‍तऐवजांची आवश्‍यकता आहे व हे सर्व दस्‍तऐवज गैरअर्जदार क्र. 1 यांना प्राप्‍त झालेले आहेत. म्‍हणून अशा परिस्थितीत मृतक सुभाष श्रावण मैंदळकर यांचा मृत्‍यू रस्‍त्‍यावरील अपघात असून, या सदर्भातील सर्व दस्‍तऐवज प्राप्‍त होऊनही गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदाराचा दावा मृतकाकडे ड्रायव्‍हींग लायसन्‍स नाही, या कारणास्‍तव नाकारला, यावरुन गैरअर्जदार क्र. 1 कडून सेवेत त्रुटी झाली. तसेच अर्जदाराचे तक्रारीनुसार मृतक विमाधारक हा अपघाताच्‍यावेळी मागे बसून होते. त्‍यामुळे मृतक विमाधारक हे वाहन चालवित होते, हे सिध्‍द करण्‍याची जवाबदारी गैरअर्जदार क्र. 1 वर येते व या बाबत गैरअर्जदार क्र. 1 यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.  
 
          उपरोक्‍त विवेचनावरुन असे दिसून येते की, अर्जदारातर्फे गैरअर्जदार विमा कंपनीस आवश्‍यक ते सर्व दस्‍तावेज पाठविण्‍यात आलेले आहेत. हे सर्व दस्‍तावेज गैरअर्जदार क्र. 1 यांना प्राप्‍त झालेले आहेत. म्‍हणून अशा परिस्थितीत आम्‍ही या निर्णयास आलो आहोत की, मृतक सुभाष श्रावण मैंदळकर यांचा मृत्‍यू अपघातामुळे झाला असून, या संदर्भातील सर्व दस्‍तावेज प्राप्‍त होऊनही गैरअर्जदार विमा कंपनी यांनी अर्जदाराचा दावा नाकारला यावरुन गैरअर्जदार क्र. 1 कडून सेवेत त्रुटी झाली                            
 
      अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या महाराष्‍ट्र शासन निर्णय क्रमांक शेअवि 2008/प्र.क्र. 187/11 ए, मंत्रालय विस्‍तार, दिनांक 6 सप्‍टेंबर 2008 नुसार विमा दावा विहीत कागदपत्रांसह प्राप्‍त झाल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या कालावधीत विमा रक्‍कम अदा करणे विमा कंपनीस बंधनकारक आहे.
          उपरोक्‍त सर्व दस्‍तावेजांवरुन अर्जदार विमा रक्‍कम मिळणेस पात्र असूनही, गैरअर्जदार क्र. 1 कडून अर्जदारास विमा रक्‍कम प्राप्‍त झाली नाही, म्‍हणून उपरोक्‍त नमुद महाराष्‍ट्र शासन निर्णयानुसार आम्‍ही या निर्णयास आलो आहोत की, अर्जदार विमा रक्‍कम रुपये 1,00,000/- व त्‍यावर दरसाल दरशेकडा 15 टक्‍के दराने व्‍याज मिळण्‍यास पात्र आहे. तसेच मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 2000/- व तक्रार खर्च रुपये 1000/- मिळण्‍यास पात्र आहे.
          उपरोक्‍त सर्व विवेचनावरुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्‍यात येते.
2)      गैरअर्जदार क्र. 1  विमा कपंनी यांनी निकाल प्राप्‍ती पासून   30 दिवसांचे आंत, अर्जदार यांना विमा रक्‍कम रुपयेः 1,00,000/- ( रुपये एक लाख फक्‍त ) द्यावे व या रक्‍कमेवर तक्रार दाखल दिनांक 8/4/2011 पासून ते पुर्ण रक्‍कम अदा करे पर्यंत दरसाल दरशेकडा 15 टक्‍के दराने होणा-या व्‍याजाची रक्‍कम अर्जदार यांना देण्‍यात यावी. अन्‍यथा मुदतीनंतर उपरोक्‍त रुपये 1,00,000/- व या रक्‍कमेवर दिनांक 8/4/2011 पासून ते पुर्ण रक्‍कम प्राप्‍त होईपर्यंत दरसाल दरशेकडा 18 टक्‍के दराने दंडणिय व्‍याजासह रक्‍कम देण्‍यास गैरअर्जदार क्र. 1 जवाबदार राहतील.
 
3)     अर्जदारास  झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारयांना रुपये 2000/- ( रुपये दोन हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रुपयेः 1000/- ( रुपये एक हजार फक्‍त) सदर निकाल प्राप्‍ती पासून तीस दिवसांचे आंत द्यावे.
 
4)     मा.सदस्‍यांसाठीच्‍या फाईल्‍स संबंधीतांनी परत घेवुन जाव्‍यात.
5)     निकालपत्राच्‍या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्‍तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्‍यात 7याव्‍यात.
 
6)     गैरअर्जदार क्र. 2 ते 7 विरुध्‍द आदेश नाही.
 
              
( सौ.सुरेखा के.टेवरे-बिरादार )         ( श्रीमती योजना तांबे )  
           अध्यक्षा.                        सदस्या     
जिल्हाग्राहक तक्रार निवारण न्यायमंचयवतमाळ
 
 
 
 
[HONORABLE Mrs.Surekha Teware-Biradar]
PRESIDENT
 
[HONORABLE Mrs. Yojana Tambe]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.