तक्रार क्रमांक – 101/2009 तक्रार दाखल दिनांक – 06/03/2009 निकालपञ दिनांक – 17 /04/2010 कालावधी - 01 वर्ष 01 महिने 11 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर मे. सुरेश फारमा एजन्सी 379, गोडाऊ, कसार अली, नजराना सिनेमाच्या जवळ, भिवंडी, जिल्हा- ठाणे. .. तक्रारदार विरूध्द दि. मॅनेजर युनायटेड इंडिया इंशुरन्स कं. लि., भिवंडी, दुसरा मजला, D-3, गोपाल नगर, मुंबई-आग्रा रोड, भिवंडी, जि-ठाणे. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा सौ. भावना पिसाळ - सदस्य श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल ए.बी.मोरे वि.प तर्फे वकिल यु.एस.पांडे आदेश (पारित दिः 17/04/2010) मा. सदस्या सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार मे सुरेश फार्मा एजन्सी यांनी मे. युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कं. लि., विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या दुकान व गोडाऊन मध्ये पावसाचे पाणी शिरुन मालाचे नुकसान झाले त्याबद्दलच्या नुकसान भरपाईचे रु.9,36,165/- एवढी रक्कम 9% व्याजाने दि.26/07/2005 पासून मागणी केले आहेत.
2. तक्रारकर्ता यांचे मे. सुरेश फार्मा एजन्सी चे औषधाचे गोडाऊन आहे. मालाचा 'Standard Fire & Specials' या खाली रु.15,00,000/-चा इन्शुरन्स आहे. त्यांचा पॉलीसी नं. 121403/11/ 05/00137 असुन त्यांचा व्हॅलीड काळ दि.21/04/2005 पासून दि.20/04/2006 पर्यंत होता गोडाऊनमधील औषधाच्या स्टॉकचे रिस्ककव्हर होते त्याचा प्रिमीयम ते नियमित भरत होते. .. 2 .. दि.26 व 27 जुलै 2005 ला ठाणे-मुंबई परिसरात मुसळधार पाऊस पडला होता. व त्या पावसाने पूर येऊन सर्व पाणी गोडाऊन मध्ये 8 ते 9 फुटापर्यंत चढले त्यामुळे गोडाऊनमध्ये ठेवलेला औषधाचा माल पुर्णपणे बुडला व नाशवंत होऊन गेला हे आतआलेले पाणी 15 ते 20 तास तसेच भरलेले होते. त्यामुळे एकंदर नुकसान रु.12,00,000/- एस्टीमेट केले गेले. विरुध्द पक्षकार यांनी सर्व्हेअर शिलान अड कं. माढवला होता. तक्रारकर्ता यांनी त्यांना खरेदी-विक्रीची बॅलन्सशीट दिली व त्यानंतर प्रत्यक्ष नुकसान निरीक्षणानंतर ठरवुन रिपोर्ट दिला. तलाठी ऑफीसमधुन म्युनीसिपल कॉर्पोरेशन कडुन साधारणपणे एकंदर नुकसान रु.12,12,994/- एवढे रिपोर्ट केले गेले आहे. तक्रारकर्ता यांनी दि.16/10/2005 रोजी म्युनिसीपालीटीकडुन डंपर नं.MH04AM/149 या डंपरद्वारे माल उचलून डंपींग ग्राऊंडवर टाकुन त्यांची विल्हेवाट लावल्याचे सर्टिफिकेट जा.क्र.230 चे नि 6D वर लावले आहे. एकंदर रु.13,17,300/- रकमेचा माल गोडाऊनमध्ये ह्यावेळेस जमा होता. व प्रत्यक्ष निर्दशनास आलेले एकंदर नुकसान रु.10,17,300/- एवढे झाले होते. तरीही तक्रारकर्ता यांच्या क्लेम 26/07/2005 विरुध्द पक्षकार यांनी दि.23/01/2009 रोजी रु.81,135/-रकमेचा धनादेश देऊन सेटल केल्याचे म्हटले आहे. तक्रारकर्ता यांना सदरच्या चेकची रक्कम मिळाली आहे (Under Protest) व राहीलेली रक्कम रु.9,36,165/- मिळण्याची मागणी तक्रारकर्ता यांनी केली आहे.
2. विरुध्द पक्षकार यांनी त्यांची लेखी कैफीयत दि.04/05/2009 रोजी निशाणी 7 वर दाखल केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे कि, त्यांनी त्यांचा सर्व्हेअर शिलान अड कं. सर्व्हेअर असोसिएट्स अन्ड व्हॅल्युअर्स प्रत्यक्ष निरीक्षण व नुकसान झालेल्या औषधांच्या मालाचे परिक्षण व व्हॅल्युएशन काढण्यास पाठवले होते व त्यामध्ये असे आढळले कि, बराचसा माल 'Dabur' च्या औषधाचा होता व नंतर चर्चेअंती असेस केलेली रक्कम रु.91,361/- होती असे म्हटले आहे व त्यापैकी विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यास रु.81,135/- अगोदरच पोच केली आहे. सर्व्हेअरने तक्रारकर्ता यांना शेवटचे स्मरणपत्र दि.29/09/2006 रोजी पाठवुन काही महत्वाची व आवश्यक कागदपत्रे दाखल करण्यास सांगितली होती. परंतु तक्रारकर्ता यांनी 10 दिवसात .. 3 .. कोणतेही जरुरीची कागदपत्रे वेळेवर दाखल न केल्यामुळे सदरचा क्लेम पुनश्च विचाराधिन घेतला तक्रारकर्ता यांचा क्लेम 'No claims' केला गेला.
3. उभयपक्षकारांची शपथपत्रे पुरावा कागदपत्रे, लेखी कैफीयत व लेखी युक्तीवाद पडताळुन पाहीले व मंचापुढे पुढील एकमेव प्रश्न उपस्थित होतो. प्र. विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्तायांचा सदर क्लेम नाकारणे योग्य व कायदेशीर आहे? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच नकारार्थी देत आहे व त्यासाठी पुढील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा तक्रारकर्ता यांचा औषधाचा माल हा सदर पत्ता 379 कसार अली गाळा नं. 3 भिवंडी मधील गोडाऊनमध्ये साठवलेला होता. त्यात 15 तास पावसाचे पाणी 8 ते 9 फुटापर्यंत असल्याने पुर्ण माल पाण्यात बुडुन नाशवंत झाला होता. तसेच सर्व्हेअर रिपोर्टप्रमाणे तो संपुर्ण विभागच पाण्याखाली बुडाला असल्याचे म्हटले आहे. सर्व्हेअरने जानेवारी 2005 ते 26 जुलै 2005 जेवढा माल या काळात खरेदी केला होता तसेच सालवेज किंमत शुन्य होती. त्यामुळे तेवढयाच काळातील नष्ट झालेल्या मालाची किंमत सर्व्हेअरने रु.91,361/-लावली आहे. दि.29/08/2005 रोजीच्या भिवंडी तलाठी यांच्या रिपोर्टप्रमाणे सदर गोडावुनमधील औषधांचे एकंदर नुकसान रु.12,12,994/- एवढया रकमेचे झाल्याचे म्हटले आहे. मंचाच्या मते पाण्याखाली बुडालेला माल हा औषधांचा होता तो बुडाल्यामुळे निश्चितच नाशवंतच होणार व औषधाचा जीवनाशी संबंध असल्यामुळे तो वापरणे योग्य नाही किंवा त्यांची कोणतीही सालवेज रक्कम मिळणेही शक्य नाही. व पॉलीसी ही फक्त ठराविक काळात खरेदी केलेल्याच मालाची नसुन ती संपुर्ण गोडावुनमध्ये असलेल्या सर्व औषधी मालाबाबत घेतलेली होती. त्यामुळे तक्रारकर्ताच्या क्लेम रु.10,17,300/- पैकी फक्त रु.81,135/- एवढीच रक्कम तक्रारदाराला क्लेमपोटी देणे योग्य व कायदेशीर वाटत नाही. विरुध्द पक्षकार यांनी त्यांच्या सेवेत निष्काळजीपणा व त्रृटी दाखलेल्या आहेत म्हणुन हे मंच पुढील अंतिम आदेश देत आहे.
.. 4 .. अंतीम आदेश
1. तक्रार क्र. 101/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत असुन या तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्तास द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्तायास त्यांच्या पॉलीसीनुसार औषधाच्या मालाच्या नुकसानापोटी व दाखल केलेल्या क्लेमपैकी रु.9,36,165/- (रु. नौ लाख छत्तीस हजार एकशे पासष्ट फक्त) एवढी राहीलेली रक्कम द्यावी. व या रकमेवर सदर तक्रार मंचापुढे दाखल केलेल्या तारखेपासुन 9% व्याज पुर्ण रक्कम फिटेपर्यंत द्यावे. या आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 2 महिन्याच्या आत करावे अन्यथा तदनंतर वरील रकमेवर 3% जादा दंडात्मक व्याज द्यावे लागेल. 3.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्तायास मानसिक त्रासाचे रु.2,000/- (रु. दोन हजार फक्त) द्यावेत. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही.
दिनांक –17/04/2010 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.भावना पिसाळ)(सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे D:\judg.aft.02-06-08\Pisal Madam
|