निकालपत्र :- (दि.29/07/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार तक्रारदाराचा न्याय्य व योग्य पशुविमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-अ) यातील तक्रारदार हे मौजे किणी ता.हातकणंगले जि.कोल्हापूर येथील कायमचे रहिवाशी असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तक्रारदार हे शेतीबरोबर दुभती जनावरे पाळून त्यातून येणारे उत्पन्न हे उपजिविकेचे साधन आहे. सामनेवाला ही विमा सेवा देणारी विमा कंपनी आहे. तक्रारदार हे सामनेवालांकडे त्यांचे म्हैशीचा विमा पॉलीसी नं.160509/47/08/01/00000299 ने उतरविला होता. सदर पॉलीसीचा कालावधी दि.22/10/2008 ते 21/10/2009 असा आहे. तक्रारदाराने विमा उतरविलेली म्हैस खरेदीसाठी महावीर सह.दुध संस्थेशी संलग्न असणा-या महावीर नागरी पत संस्था किणी यांचेकडून कर्ज रक्कम रु.30,000/-घेतले होते व सदर पत संस्थेमार्फत विमा उतरविला होता. नमुद म्हैस ही मु-हा (मेहताना) जातीची कोयरी शिंगे, शेपूट गोंडा-काळा पांढरा वय अंदाजे 6-7 वर्षाची होती. म्हैशीच्या वर्णनाची प्रत्यक्ष पाहणी करुन खात्री केलेनंतर विमा उतरविला आहे. तिचे कानात टॅग नंबर UII/kop/19428 आहे. काही दुर्घटना झालेस सरंक्षण व्हावे या हेतूने विमा उतरविला होता. नमुद विमा उतरविलेली म्हैस ही दि.05/11/2008 रोजी मयत झाली. दि.18/12/2008 रोजी चुकीचे कारण दाखवून क्लेम नामंजूर केला आहे ही सामनेवाला यांचे सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे तक्रारदारास सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करणेत यावी. तक्रारदारास क्लेमची रक्कम रु.30,000/-दि.18/12/2008 पासून द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे व्याजासह तक्रारदारास देणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावा तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.10,000/-तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/-सामनेवालांकडून वसुल होऊन मिळणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारी सोबत सामनेवाला यांची पॉलीसी, सदर पॉलीसीची रिसीट, क्लेम नाकारलेचे सामनेवाला यांचे पत्र, मयत म्हैशीचा विमा रक्कम भरलेची रिसीट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार-अ) त्यांनी तक्रारदारचे तक्रारीतील कथने नाकारली आहेत. सामनेवालांनी कोणतीही सेवात्रुटी ठेवलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाने चालणेस पात्र नाही. मे. मंचास तक्रार चालविणेचे अधिकार क्षेत्र नाही. तक्रार अर्ज कलम 1 मधील मजकूर नाकारला आहे. कलम 3 मधील मजकूरास अनुसरुन सामनेवालांनी विमा पॉलीसी क्र.160509/47/08/01/ 00000299 विमा कालावधी दि.22/10/008 ते 21/10/2009 साठी दिलेली होती. सामनेवालांची जबाबदारी ही नमुद पॉलीसीच्या अटी व शर्ती तसेच exceptions and annextures यास अधीन राहून असेल. तक्रार अर्ज कलम 4 मधील म्हैशीचे वर्णन नाकारले आहे. कलम 5 ते 7 मधील मजकूर नाकारला आहे. सामनेवाला कंपनीने योग्य कारणास्तव क्लेम नाकारला आहे. कलम 8 मधील तक्रारदाराने केलेली मागणी नाकारली आहे. तक्रार अर्जातील कलम 9 मधील तक्रारदार अशिक्षीत, शेतकरी असल्याने हेतूपूर्वक क्लेम नाकारल्याचे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेचा मजकूर नाकारला आहे. तक्रार अर्जातील कलम 11 ते 13 मधील मजकूर नाकारला आहे. वस्तुत: क्लेम व सोबतचे पेपर त्यांची छाननी केली असता विमा उतरविलेली म्हैस व मयत म्हैशीच्या वर्णनामध्ये फरक आढळल्यामुळे क्लेम नाकारला आहे. पॉलीसीच्या Exclusion No.2 प्रमाणे पॉलीसी कालावधी सुरु झालेपासून 15 दिवसांचे आत जर पशुस रोग अथवा आजार झाला तर क्लेम देता येणार नाही. सबब सामनेवालांनी दि.18/12/2008 रोजी योग्य कारणास्तव दावा नाकारला आहे. ब) श्री महावीर नागरी पत संस्था मर्या. किणी ही प्रस्तुत कामी नेसेसरी पार्टी म्हणून पक्षकार करुन समाविष्ट केलेला नाही. सबब Joinder of Necessary party ची बाधा येत असलेने तक्रार फेटाळणेत यावी. सामनेवालांनी कोणतीही सेवात्रुटी ठेवलेली नसलेमुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत नामंजूर करावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत व्हेटर्नरी सर्जन्स सर्टीफिकेट, इन्शुअर्ड पॉलीसी कॉपी, पोस्ट मार्टेम सर्टीफिकेट, डॉ.लोव्हे जे.व्ही.श्री वारणा सह.दुध उत्पादक प्रक्रिया संघ लि. यांनी दिलेले सर्टीफिकेट इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत. (6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्डर, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे, उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सदरची तक्रार चालविणेचे अधिकारक्षेत्र सदर मंचास आहे का?--- होय. 2. सदर तक्रारीस Joinder of Necessary party चा बाध येतो का ? --- नाही. 3. सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 4. तक्रारदार विमा रक्कम मिळणेस पात्र आहे काय ? --- होय. 5. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.1 :-तक्रारदाराच्या म्हैशीचा विमा उतरविलेची बाब निर्विवाद आहे. सदर पॉलीसीचा क्र.160509/47/08/01/00000299 असून विमा कालावधी दि.22/10/2008 ते 21/10/2009 असा आहे. नमुद पॉलीसीची विमा रक्कम रु.30,000/- आहे. दाखल पॉलीसीमध्ये म्हैस ही काळया रंगाची मेहसाना जातीची, शिंगे बॅकवर्ड इनवर्ड, कोचरी शिंगे,शेपूट गोंडा पांढरा, टॅग नं.UII/KOP/19428 अशा वर्णनाची आहे. नमुद म्हैस ही दि.04/11/2008 रोजी आजारी पडली व दि.05/11/2008 रोजी मयत झाली हे दाखल शवविच्छेदन अहवालावरुन (पी.एम.रिपोर्ट) स्पष्ट होते. सदर पी.एम.रिपोर्ट मध्ये सदर म्हैस तक्रारदाराची असलेची नोंद आहे. तसेच म्हैस ही मु-हा जातीची, काळया रंगाची,शेपूट गोंडा काळा पांढरा,टॅग नं. UII/KOP/19428 कानात इन्टॅक्ट असलेचे नमुद केले आहे. सदर म्हैस ही Prolapsed & tearing vagina to cervix मुळे मयत झाली आहे. म्हैस 9 महिन्यातच व्याली आहे. Claving Normal - Advance pregnant- Pregnancy in month - 9 months pregnant सामनेवालांनी नमुद क्लेम दि.18/12/2008 रोजी मयत म्हैस व विमा उतरविलेल्या म्हैशीच्या वर्णनात फरक असलेने तसेच पॉलीसीच्या Exclusion Clause No.2 प्रमाणे विमा कालावधी सुरु झालेपासून 15 दिवसांच्या आत आजारी पडून मयत झाली म्हणून क्लेम नाकारला आहे. तक्रारदाराने रिजॉइन्डरमध्ये सामनेवालांचे म्हणणे खोडून काढले आहे. वरील दाखल कागदपत्रांचा विचार करता तक्रारदाराने महावीर नागरी सह.पत संस्थेचे कर्ज रक्कम रु;30,000/- घेवून म्हैस खरेदी केली होती. तिचा विमा सामनेवाला यांचेकडे उतरविला होता व हप्ताही अदा केलेला आहे. दि.17/04/2009रोजी नमुद पत संस्थेने नमुद म्हैस खरेदीसाठी दि.07/10/2008 रोजी रक्कम रु.30,000/-उचल केली असून रक्कम रु.2,314/-दि.31/3/2009 अखेर व्याज असून रक्कम रु.32,314/- येणे व पुढील व्याज येणे आहे. तसेच महावीर दुध संस्थेस तक्रारदार नियमित दुध पुरवठा करत होते.
पॉलीसीवरील म्हैशीचे वर्णन व नमुद म्हैशेचे पी.एम. वरील नोंदीवरुन शेपूट वगळता इतर बाबीत साम्य आहे. बोलीभाषेतसुध्दा शेपुट गोंडा काळा पांढरा असाच शब्द प्रयोग केला जातो. तक्रारदाराचे कर्ज, म्हैस खरेदीची तारीख, पॉलीसी तारीख, म्हैस मयत तारीख या क्रमाचा विचार करता त्यात विसंगती दिसून येत नाही.तसेच ही म्हैस सोडून अन्य म्हैशी तक्रारदाराकडे होत्या या बाबतचा पुरावा सामनेवालांनी या मंचासमोर आणलेला नाही. सबब मयत म्हैस व विमेदार म्हैस ही एकच होती ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सबब नमुद म्हैस ही विमाधारक म्हैस होती ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. EXCEPTIONS :- 2. Diseases contracted prior to commencement of risk and provided always that-any claim arising out of disease or illness contracted by the animal during the first 15 days from the commencement date of Policy. This exclusion shall not however, apply if insreance is in existence for a continuous period of 12 months wihtout any break. पशु गाभण रहाणे हा आजार नाही. सदर म्हैस 9 महिनयाची गाभण होती. सर्वसाधारण 10 महिन्यानंतर म्हैस व्याते. मात्र नमुद म्हैस Claving Normal - Advance pregnant नमुद केले आहे. सदर म्हैस ही Prolapsed & tearing vagina to cervix मुळे मयत झाली आहे. मानव असो अथवा पशु दोन्हीकडे गर्भार अवस्था सारखीच असते. या गोष्टी नैसर्गिक आहे त्या कोणाच्याही हातात नाहीत. नमुद म्हैस ही सदर प्रक्रियेदरम्यान योनीमार्ग फाटल्यामुळे मयत झाली आहे व हा 15 दिवसात झालेला आजार म्हणून विचार करता येणार नाही. सबब Exclusion Clause No.2 हा येथे लागू होत नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.सबब सामनेवालांनी तांत्रिक कारणावरुन सदरचा क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2:- मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनानुसार तक्रारदार हे पॉलीसीची विमा रक्कम रु.30,000/- व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3 :- सामनेवालांच्या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. सबब तक्रारदार त्यापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा रक्कम रु.30,000/-(रु.तीस हजार फक्त) अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.18/12/2008 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज अदा करावे. (3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |