तक्रार क्र. CC/ 13/ 1 दाखल दि. 28.01.2013
आदेश दि. 10.10.2014
तक्रारकर्ते :- 1. श्रीमती मायावता मडामे,
वय – 40 वर्षे, धंदा – घरकाम
2. आशिक मधुकर मडामे,
वय – 26 वर्षे, धंदा – मजुरी
3. दिपकर मधुकर मडामे,
वय – 24 वर्षे, धंदा – मजुरी
4. कु.प्रमाली मधुकर मडामे
वय – 17 वर्षे, धंदा – शिक्षण,
अ.पा.क.आई तक्रारकर्ती क्र.1 मायावता मडामे,
सर्व रा.उसरागोंदी, ता.जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. मा.विभागीय व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमीटेड,
डी.ओ.-2, अंबिका हाऊस, शंकर नगर,
नागपुर - 10
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा.सदस्य हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.एम.बी.नंदागवळी.
वि.प.तर्फे अॅड.यु.के.खटी
.
(आदेश पारित द्वारा मा. सदस्या श्रीमती गीता रा.बडवाईक )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 10 ऑक्टोंबर 2014)
1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 12 अन्वये विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी बाबत दाखल केली आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. तक्रारकर्ती नं.1 चे पती मृतक मधुकर मडावी हे व्यवसायाने शेतकरी असून ते शेतमजुरी करीत होते. त्यांची मौजा वाडीपार तलाठी साजा क्र.19 ता.जि.भंडारा येथे 1.10 हेक्टर आर ही शेतजमीन होती. तक्रारकर्ते क्र.2 ते 4 ही त्यांची मुले व मुली आहेत. दिनांक 17/5/2011 रोजी मृतक मधुकर मडामे हे मौजा उसरागोंडी ता.जि.भंडारा येथे मजुरीच्या कामासाठी आले असता काम आटोपून ते भंडा-यावरुन उसरागोंदी येथे सायंकाळी अंदाजे 6.30 वाजे दरम्यान सायकलने परत जात असतांना भंडारा येथील स्मशान घाटाजवळील रोडवर ट्रॅक्टर क्र.MZV 3607 च्या चालकाने त्यास ठोस मारल्याने तो खाली पडला. खाली पडल्याने त्याच्या छातीला, पोटाला व कमरेला जबर मुका मार लागल्याने त्याला उपचाराकरीता मेडीकल कॉलेज, नागपुर येथे भरती केले असता त्यास रात्री 11 वाजता मृत घोषित करण्यात आले. अपघातासंदर्भात पोलीस स्टेशन,भंडारा येथे FIR नोंदविण्यात आला. तसेच त्याअनुषंगाने इतर कागदपत्रे जसे घटनास्थळ पंचनामा, मरणान्वेषण प्रतिवृत्त, पोस्टमार्टम रिपोर्ट, अंतीम अहवाल, मृत्यु प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे तयार केली व ट्रॅक्टरच्या चालकाविरुध्द भादवि 279, 338 व 304 (अ) अन्वये गन्हा नोंदविला. तक्रारकर्ते हे मृतकाचे वारस असल्याने तक्रारकर्त्यांनी शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळण्याबाबत दिनांक 27/12/2011 रोजी तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांचेकडे अर्ज दाखल केला. त्याअर्जासोबत दिनांक 26/12/2011 ला संबंधित तलाठयाकडून प्राप्त झालेले तलाठयाचे प्रमाणपत्र, नमुना 6(क), फेरफार नोंदवही इत्यादी सह प्रस्ताव दाखल केला. तसेच तालुका कृषी अधिकारी यांचे दिनांक 10/2/2012 चे पत्राचे अनुषंगाने कागदपत्रांची पुर्तता दिनांक 23/2/2012 रोजी केली. परंतु विरुध्द पक्षाने दिनांक 12/3/2012 ला तक्रारकर्त्यांना पत्र पाठवून त्यांनी प्रस्तुत घटनेच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आंत प्रस्ताव सादर केला नाही, या कारणास्तव तक्रारकर्त्यांचा प्रस्ताव नामंजुर केला. विरुध्द पक्षाच्या सदर कृतीबाबत तक्रारकर्त्यांनी दिनांक 20/7/2012 रोजी वकीलामार्फत विरुध्द पक्षाला नोटीस पाठविली व विमा दाव्याची मागणी केली. परंतु नोटीस प्राप्त होऊन देखील विरुध्द पक्षाने नोटीसला उत्तर दिले नाही अथवा तक्रारकर्त्याला विमा दाव्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरीता तसेच विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटीबाबत सदरहू तक्रार दाखल केली आहे.
3. तक्रारकर्त्यांनी तक्रारीसोबत दस्तऐवज दाखल करण्याच्या यादीप्रमाणे एकुण 24 दस्त तक्रारीच्या पृष्ठ क्र.16 ते 68 वर दाखल केले आहेत.
4. तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन मंचाने विरुध्द पक्षास नोटीस पाठविल्या. विरुध्द पक्षाने त्यांचे लेखी उत्तर दाखल केले.
विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की तक्रारकर्ते हे मयत मधुकर मडामे यांचे कायदयाने वारस आहेत व ते शेतकरी आहेत हे केवळ 7/12 उता-यावर नांव असल्याने ते सिध्द् होत नाही. विरुध्द पक्षाचे असे म्हणणे आहे की विरुध्द पक्षाकडे कागदपत्रे त्रिपक्षीय कराराच्या अटीप्रमाणे 90 दिवसांच्या आंत पाठवावयाचे होते, परंतु ती सर्व कागदपत्रे 90 दिवसांच्या नंतर उशीराने दिनांक 12/3/2012 रोजी प्राप्त झाले. त्यामुळे प्रस्ताव नामंजुर करुन परत पाठविला. तसेच त्रिपक्षीय करार ठरविण्याच्या संदर्भात दोन्ही पक्षाला दावे अर्जात पक्ष म्हणुन जोडलेले नाही. त्यामुळे दावे अर्जाचा कायदयाने विचार करता येणार नाही व तो अर्ज खारीज होण्यालायक असून तो खारीज करण्यात यावा. विरुध्द पक्षाकडे असलेला पैसा हा जनतेचा पैसा असल्यामुळे विरुध्द पक्ष अशा बाबींचा विचार करुन गरजु/पीडित व्यक्तीला तो पैसा देण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे त्यांना सर्व फिर्यादींचा सखोल अभ्यास व मुदतीचा विचार करुनच पैशाचा व्यवहार करावा लागतो. त्यामुळे जिथे नियमांचे उल्लंघन आहे तेथे गैरअर्जदाराच्या दावा अर्जीतील पैशाबद्दल विचार करावा लागतो. त्यामुळे पैसे देण्यास टाळाटाळ करण्याच्या किंवा सेवेतील त्रृटींचा प्रश्न येत नाही. तक्रारकर्त्यांनी विरुध्द पक्षांना उगाचच त्यांची चुकी नसतांना मंचासमोर उभे केले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती विरुध्द पक्षाने केली आहे.
5. दोन्ही पक्षांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तऐवज, लेखी युक्तीवाद तसेच विरुध्द पक्षाचा लेखी युक्तीवाद, लेखी उत्तर या सर्वांचे अवलोकन करता मंचासमोर खालील प्रश्न उपस्थित होतो.
1. तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का? – होय.
कारणमिमांसा
6. शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत विमा कंपनीकडे महाराष्ट्र शासन हे प्रिमीयमची रक्कम जमा करते व विमा रक्कम देण्याचे दायित्व सुध्दा हे विमा कंपनीचे असते. त्यामुळे दोन्ही पक्षांना प्रतिपक्ष केले नाही, या कारणास्तव तक्रार खारीज करण्याचा विरुध्द पक्षाचा आक्षेप मान्य करता येत नाही.
7. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन ही बाब स्पष्ट होते की मृत मधुकर मडामे हे शेतकरी असून त्यांचा दिनांक 17/5/2011 ला अपघाताने मृत्यु झाला. तसेच तक्रारकर्ते हे मृतकाचे वारस आहेत. पतीच्या मृत्युनंतर तक्रारकर्ते नं.1 ला दिनांक 26/12/2011 ला शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले दस्तऐवज महसुल विभागामार्फत प्राप्त झाल्यानंतर तिने दुस-याच दिवशी दिनांक 27/12/2011 ला तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांचेकडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेकरीता प्रस्ताव सादर केला. त्यानुसार दिनांक 10/2/2011 ला तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी तक्रारकर्त्याला कागदपत्रांच्या त्रृटींची पुर्तता करण्यासाठी पत्र पाठविले. ज्यामध्ये ‘प्रपत्र – ग’ हे तहसिल कार्यालयात हलफनामा केलेला नाही, असे कळविले. त्याप्रमाणे तक्रारकर्तीने त्रृटींची पुर्तता केली. त्यानंतर विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीला दिनांक 12/3/2012 ला पत्र पाठवून तिचा प्रस्ताव उशीरा प्राप्त झाल्याने रद्द करण्यात आल्याचे कळविले. सदरचे पत्र प्राप्त झाल्यावर तक्रारकर्त्याने मा.कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना पत्र पाठविले तसेच वकीलामार्फत विरुध्द पक्षाला नोटीस पाठविली.
08. विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे की तक्रारकर्त्याने त्रिपक्षीय कराराच्या अटीप्रमाणे सर्व कागदपत्रे 90 दिवसाच्या आंत पाठवावयास पाहिजे होते. परंतु विरुध्द पक्षाने त्रिपक्षीय करार मंचामध्ये दाखल केलेला नाही अथवा तक्रारकर्त्याला देखील त्याची प्रत दिलेली नाही. त्यामुळे त्रिपक्षीय कराराच्या अटीप्रमाणे घटना घडल्यापासून 90 दिवसांचे आंत दस्तऐवज सादर करावयास पाहिजे होते, याबाबत कोणतेही दस्त दाखल न केल्यामुळे विरुध्द पक्षाचे म्हणणे मान्य करता येणार नाही, असे मंचाचे मत आहे. या उलट शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत 90 दिवसानंतर येणारे प्रस्ताव समर्थनीय कारण असले तर ते स्विकारण्यात यावे अशी तरतुद आहे. तक्रारकर्तीने तिला प्रस्तावासोबत दाखल करावयाचे आवश्यक कागदपत्रे प्राप्त झाल्याबरोबर दुस-याच दिवशी विमा प्रस्ताव कागदपत्रासह सादर केला. आवश्यक कागदपत्रे उशीरा म्हणजेच 90 दिवसांनंतर प्राप्त झाले, हे समर्थनीय कारण आहे असे मंचाचे मत आहे. परंतु विरुध्द पक्षाने योजनेचा विचार न करता केवळ 90 दिवसानंतर प्रस्ताव प्राप्त झाला या शुल्लक कारणास्तव प्रस्ताव नामंजुर केला. तक्रारकर्त्याचा विमा दावा प्रस्ताव शुल्लक कारणास्तव नामंजुर करणे, ही विरुध्द पक्षाची कृती त्यांचे सेवेतील त्रृटी दर्शविते. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
09. तक्रारकर्त्याचा विमा दावा प्रस्ताव विरुध्द पक्षाने मंजुर न करता नामंजुर करणे ही विरुध्द पक्षाची कृती म्हणजेच त्यांचे सेवेतील त्रृटी असल्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी तक्रारकर्त्याला मंचामध्ये तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे तक्रारकर्ता शारीरिक, मानसिक नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
1.तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर.
1.
2.विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- (एक लाख) 9% टक्के व्याजासह दयावे. व्याजाची आकारणी दिनांक 27/12/2011 पासून करण्यात यावी.
2.
3.विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासासाठी नुकसान भरपाई रुपये 5,000/- (पाच हजार) दयावे.
4.विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2,000/- (दोन हजार) दयावे.
5.विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.
5.
- विरुध्द पक्षाने सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त
झाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावी.