तक्रार क्र. 42/2012 दाखल दि. 07.05.2012
आदेश दि. 10.09.2014
तक्रारकर्ती :- श्रीमती आरती कमलाकर बोटकुले,
वय 29 वर्षे, व्यवसाय—नोकरी
रा. अडयाळ,ता.पवनी
जि.भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. शाखा व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमीटेड,
अत्री मेंशन,रेल टोली,गोंदिया
ता.जि.गोंदिया
2. शाखा व्यवस्थापक,
दि भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को.ऑप.बँक,
शाखा – अडयाळ, ता.पवनी जि.भंडारा
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री अतुल दि. आळशी
मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक
मा. सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्त्यातर्फे अॅड.नंदागवळी.
विरुध्द पक्ष 1 तर्फे अॅड.खत्री व अॅड.वर्मा.
विरुध्द पक्ष 2 तर्फे अॅड.सक्सेना
( आदेश पारित द्वारा मा. सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया )
-// आ दे श //-
(पारित दिनांक 10 सप्टेंबर 2014)
1. तक्रारकर्ती श्रीमती आरती कमलाकर बोटकुले वय 29 वर्षे यांचे पती कमलाकर बोटकुले यांनी नविन घरावर विरुध्द पक्ष क्र.2 यांचे मार्फत विरुध्द पक्ष क्र.1 कडून विमा काढलेला होता. कमलाकर बोटकुले यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्यामुळे मृतकाचे कर्ज उर्वरित रक्कम रुपये 7,51,555/- व पुढे येणारे व्याज देण्याची जबाबदारी विरुध्द पक्ष नं.1 ची असल्यामुळे ती रक्कम मिळावी, ही तक्रारकर्तीने विरुध्द पक्षांना केलेली विनंती. विरुध्द पक्ष क्र.1 ने नाकारल्यामुळे तक्रारकर्तीने सदरहू तक्रार न्यायमंचात दाखल केली आहे.
2. तक्रारकर्तीची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे
तक्रारकर्तीचे पती कमलाकर बोटकुले हे छिन्दवाडा येथील जिल्हा परिषद, प्राथमिक शाळेत शिक्षक असतांना त्यांनी अशोकनगर, अडयाळ, ता.पवनी जि.भंडारा येथे प्लॉट क्र.109 वर नवीन घराचे बांधकाम केले असून मालमत्ता क्र.1344 आहे.
तक्रारकर्तीचे पती यांनी नवीन घराचे बांधकाम करीत असतांना विरुध्द पक्ष क्र.2 च्या बँकेतून दिनांक 10/6/2011 रोजी रक्कम रुपये 8,00,000/-(आठ लाख), वर उल्लेखीत घरावर कर्ज घेतले आहे. नवीन घराचे बांधकाम करीत असतांना वर उल्लेखीत घराचा विमा दिनांक 31/12/2010, पॉलीसी क्रमांक 230903/42/10/01/00000182 प्रमाणे विरुध्द पक्ष नं.1 यांचेकडून विरुध्द पक्ष नं.2 यांचे मार्फत काढण्यात आला होता.
तक्रारकर्तीचे पती कमलाकर बोटकुले यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना प्रथम कुबेर हॉस्पीटल,चंद्रपुर व त्यानंतर पुढील उपचाराकरीता व्होकार्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल,नागपुर येथे भरती करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान कमलाकर बोटकुले हे दिनांक 8/8/2011 रोजी मृत्यु पावले.
दिनांक 28/9/2011 रोजी तक्रारकर्तीने आपल्या वकिलामार्फत विरुध्द पक्षास नोटीस पाठविली होती.
तक्रारकर्तीची तक्रार दिनांक 7/5/2012 ला दाखल होवून विरुध्द पक्षास नोटीस पाठविण्यात आल्या.
3. तक्रारकर्तीने दिनांक 28/9/2011 रोजी विरुध्द पक्षास पाठविलेल्या नोटीसला दिनांक 28/9/2011 रोजी लेखी उत्तर पाठविले आहे ते पान नं.9 वर दाखल आहे. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी आपले लेखी उत्तर पान नं.33 वर दाखल केले आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.2 यांनी दिनांक 26/12/2012 ला आपले लेखी उत्तर दाखल केले आहे ते पान नं.29 वर आहे.
4. आपले लेखी उत्तरामध्ये विरुध्द पक्ष नं.1 यांनी स्विकारले की तक्रारकर्तीचे पती कमलाकर बोटकुले यांनी पॉलीसी नं. 230903/42/10/01/00000182 दिनांक 31/12/2010 ही Individiual Personal Accident Policy ही दिनांक 31/12/2010 ते 30/12/2011 या कालावधीकरीता काढलेली होती.
कमलाकर बोटकुले यांचा दिनांक 8/8/2011 रोजी उपचारा दरम्यान मृत्यु झाला. मृत्युचे कारण Acute Fulminant Hepatic Failure, Acute Renal Failure, Falciparum Malaria, Multiorgaon Failure मुळे तक्रारकर्ती च्या पतीचा मृत्यु झाला, असे व्होकार्ड हॉस्पीटल, नागपुर यांचे Death Summary (पान नं.17) मध्ये दर्शविले आहे, न कि कोणत्या अपघातामुळे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार ही खोटी व बनावटी असल्यामुळे खारीज करण्यात यावी असे लेखी उत्तरात नमुद केले आहे.
विरुध्द पक्ष क्र.1 चे कॉऊंसलर यांनी दिनांक 2/4/2011 रोजी कळविले की विरुध्द पक्ष क्र.1 चे लेखी उत्तर हाच लेखी युक्तीवाद समजण्यात यावा.
5. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी आपले लेखी उत्तर जे पान क्र.30 वर दाखल केले आहे त्यात असे म्हटले आहे की, कमलाकर बोटकुले यांनी नवीन मकानाचे बांधकाम करीत असतांना घराचा विमा दिनांक 31/12/2010 पॉलीसी नं. 230903/42/10/01/00000182 ही Standard Fire Special Perils Policy व दुसरा विमा Personal Accident Policy प्रमाणे काढण्यात आलेला होता. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार ही खोटी व बनावटी असल्यामुळे खारीज करण्यात यावी, असे म्हटले आहे.
6. विरुध्द पक्ष क्र.1 चे वकील अॅड.वर्मा यांनी युक्तीवाद केला की मृतक कमलाकर बोरकुटे यांनी पॉलीसी नं. 230903/42/10/01/00000182 ही Individual Personal Accident Policy दिनांक 31/12/2010 ते 30/12/2011 या कालावधीकरीता काढलेली होती. या पॉलीसीप्रमाणे Payment of compensation in respect of Death, Injury or disablement of the insured due to arising out of or directly or indirectly connected with o traceable to war invasion, act of foreign enemyh,Hopitilities (whether war be declared or not), War, Rebellion, Revolution, Insurrection, Mutiny, Military or usurped Power, Seizure, Capture Arrests, Restraints and Detainment of all Kings, Princes and people of whatever nation, condition or quality so ever.
Payment of compensation in respect of Death of, or bodily injury or any disease or illness of the insured.
- Directly of indirectly caused by or contributed to by or arising from ionisiing radiation or contamination by radio active substance from any nuclear fuel or from any nuclear waste from the combustion of nuclear fuel. For the purpose of this exception combustion shall include any self sustaining process of nuclear fission.
- Directly or indirectly caused by or contributed to by or arising from nuclear weapon materials. हयाप्रमाणे तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झालेला नाही. तर तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा उपचारादरम्यान झालेला आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खोटी व बनावटी असल्यामुळे खारीज करण्यात यावी.
-
7. विरुध्द पक्ष क्र.2 चे वकील श्रीमती चन्ने यांनी युक्तीवाद केला की तक्रारकर्तीची तक्रार खोटी व बनावटी असल्यामुळे खारीज करण्यात यावी.
8. तक्रारकर्तीचे वकील अॅड.नंदागवळी यांनी युक्तीवाद केला की मृतक कमलाकर बोटकुले यांचे घरावर असलेल्या कर्ज रुपये 7,51,555/- व पुढे येणारी व्याजाची रक्कम देण्याची जबाबदारी ही विरुध्द पक्ष क्र.1 ची असल्याने ती त्यांचेकडून तक्रारकर्तीस मिळावी.
9. तक्रारकर्तीची तक्रार, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद व उपरोक्त मुददे व दस्त यावरुन खालील मुददा उपस्थित होतो.
- तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे का?– नाही
कारण मिमांसा
10. तक्रारकर्तीचे पती कमलाकर बोटकुले यांनी नवीन घर बांधकाम करीत असतांना पॉलीसी क्रमांक 230903/42/10/01/00000182 ही Individual Persoanl Accident Policy ही दिनांक 31/12/2010 ते 30/12/2011 या कालावधीकरीता घेतली होती.
तक्रारकर्तीच्या तक्रारीमध्ये दर्शविल्यामप्रमाणे व व्होकार्ड हॉस्पीटलचे Death Summary मध्ये दर्शविल्याप्रमाणे कमलाकर बोटकुले यांचा मृत्यु हा उपचारादरम्यान झालेला आहे. मृत्युचे कारण Acute Fulminant Hepatic Failure, Acute Renal Failure, Falciparum Malaria, Multiorgaon Failure हे आहे. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा कोणत्याही अपघातामुळे झालेला नाही.
पॉलीसी क्र. 230903/42/10/01/00000182 ही Individual Personal Accident Policy आहे. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मान्य होण्यास पात्र नाही, असे या मंचाचे मत आहे.
करीता आदेश
अंतीम आदेश
- तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येते.
- खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.