Maharashtra

Nagpur

CC/400/2022

SHRI. RISHABH VIJAY GOLCHHA, THROUGH HIS POAH SHRI. VIJAY KAMAL GOLCHHA - Complainant(s)

Versus

UNITED INDIA INSURANCE CO. LTD. - Opp.Party(s)

ADV. SANJAY C. MISHRA

20 Dec 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/400/2022
( Date of Filing : 02 Jun 2022 )
 
1. SHRI. RISHABH VIJAY GOLCHHA, THROUGH HIS POAH SHRI. VIJAY KAMAL GOLCHHA
R/O. FLAT NO.101, GULMOHAR APARTMENT, OPPOSITE HISLOP COLLEGE, CIVIL LINES, NAGPUR-440001
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. UNITED INDIA INSURANCE CO. LTD.
OFF.AT, 19, AMBICA HOUSE, DHARAMPETH EXTENTION, SHANKAR NAGAR, SQUARE, NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. SANJAY C. MISHRA, Advocate for the Complainant 1
 
Dated : 20 Dec 2022
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याचे वडील विजय कमल गोलछा यांनी विरुध्‍द पक्षाकडून दिनांक 27.01.2021 ते 26.01.2022  या कालावधीकरिता विमा पॉलिसी क्रं. 2302002820P112323197  अन्‍वये  विमामुल्‍य रक्‍कम रुपये 6,00,000/- करिता विमा हप्‍ता रक्‍कम रुपये 3,612/- जमा करुन स्‍वतः व इतर कुटुंबिय पत्‍नी- मनिषा विजय गोलछा , मुलगी- आरुषी विजय गोलछा व मुलगा- ऋषभ विजय गोलछा या सर्वांकरिता कौटुंबिक आरोग्‍य विमा योजना  (Family Medicare policy) अंतर्गत आकस्मिक वैद्यकीय उपचाराकरिता विमा उतरविला होता.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, तो दि. 24.12.2021 ला त्‍याचे मित्र असिस आलोक सिंग समवेत त्‍याच्‍या टोयोटो कार क्रं. MH-31-CA-4446 ने Publo येथे जेवणाकरिता गेले व त्‍यानंतर तो त्‍याच्‍या मित्रासह संजली लढ्ढा यांचे धरमपेठ नागपूर येथील घरी गेले व त्‍यानंतर तक्रारकर्ता हा घरी परत येत असतांना मि. असिस  आलोक सिंग हे कार चालवित होते आणि रात्री 1.20 वा. भोळे पेट्रोल पंप चौकातून येतांना मिनी ट्रैक क्रं. MH-49-AT-2866 या वाहनाने अपघात झाला व सदरच्‍या अपघाता मध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या  Jaw ला (जबडा) जबरदस्‍त मार लागला असून दात तुटले आणि त्‍याच्‍या नाकातून व कानातून रक्‍त निघत होते. म्‍हणून तक्रारकर्त्‍याला व्‍होकार्ट हॉस्‍पीटल शंकरनगर, नागपूर येथे उपचाराकरिता भरती करण्‍यात आले असता तेथील डॉक्‍टर तक्रारकर्त्‍यावर व्‍यवस्थितीत उपचार करीत नव्‍हते व हॉस्‍पीटल मधील व्‍यवस्‍थापनाने सर्जरी पोटी तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांना  रुपये 2,00,000/- मध्‍यरात्री जमा करण्‍यास सांगितले, परंतु तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांना मध्‍यरात्री एवढी मोठी रक्‍कम जमा करणे शक्‍य नव्‍हते.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांनी त्‍यांच्‍या मुलाचा (दिनांक 26.12.2021 ला ) डिस्‍चार्ज मागितला. सदरच्‍या अपघाताबाबत तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांनी विरुध्‍द पक्षाचे एग्झिक्‍युटिव यांना दि. 25.12.2021 ला माहिती दिली असता त्‍यांनी व्‍होकार्ट हॉस्‍पीटलला भेट दिली त्‍यावेळी व्‍होकार्ट हॉस्‍पीटल मधील डॉक्‍टरांनी तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांनी डॉक्‍टरच्‍या सल्‍ला विरुध्‍द डिस्‍चार्ज मागितला असल्‍याचे सांगितले. व्‍होकॉर्ड हॉस्‍पीटल मधील  डॉक्‍टरांनी कोणतीही रक्‍त तपासणी न करता तक्रारकर्त्‍याने अल्‍कोहलचे प्राशन केले असल्‍याचे डॉ. राहुल झामड यांनी दि. 02.02.2022 ला प्रमाणपत्र निर्गमित केले व सदरचे प्रमाणपत्र हे चुकिचे व विना आधाराचे आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलानी इतर हॉस्‍पीटलशी संपर्क केल्‍यावर त्‍यांच्‍या निदर्शनास आले की, व्‍होकार्ड हॉस्‍पीटलने केलेली रक्‍कमेची मागणी ही इतर हॉस्‍पीटल पेक्षा जास्‍त होती. तसेच तक्रारकर्त्‍यावर ज्‍या डॉक्‍टरांनी सर्जरी केली त्‍याच डॉक्‍टरांनी म्‍हणजेच डॉ. सी बांडे यांनी न्‍यू ईरा हॉस्‍पीटल येथे  सर्जरी केली.
  2. तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याला व्‍होकार्ड हॉस्‍पीटलमधून दि. 26.12.2021 ला डिस्‍चार्ज मिळाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याला न्‍यू ईरा हॉस्‍पीटल अॅन्‍ड रिसर्च इन्‍स्‍टीटयूट  सी.ए.रोड नागपूर यांच्‍याकडे पुढील उपचाराकरिता दि. 29.12.2021 ला भरती करण्‍यात आले होते व त्‍याकरिता रुपये 89,840/- चे बिल अदा केले होते.  त्‍यांनतर तक्रारकर्त्‍याला दि. 08.01.2022 ला Aditya Dental Implant, Facial Cosmetic, Hair Transplant & Cancer Hospital रामदासपेठ नागपूर येथे भरती करण्‍यात आले व तिथे तक्रारकर्त्‍याच्‍या जबडयावर (Jaw) सर्जरी करण्‍यात आली व त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने दि. 10.01.2022 रोजी रुपये 71,000/- चे बिल अदा केले. तक्रारकर्त्‍याने वैद्यकीय सल्‍लानुसार अनेक वैद्यकीय टेस्‍ट केल्‍या होत्‍या आणि  Aditya Dental Implant हॉस्‍पीटलला टाके काढत असतांना काही an foreign bodies jaw च्‍या खाली असल्‍याचे MIR रिपोर्टवरुन निदर्शनास आले. विरुध्‍द पक्षाचे एग्झिक्‍युटिव तक्रारकर्ता ज्‍या हॉस्‍पीटल मध्‍ये भरती होता त्‍या ठिकाणी भरती असल्‍याची बाब निश्चित करण्‍याकरिता हॉस्‍पीटलला भेट दिली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने  दि. 03.01.2022 ला  आवश्‍यक दस्‍तावेजावसह विमा दावा सादर केला होता व  त्‍याचा विमा दावा दाखल क्रं. 53200079 हा आहे.
  3.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने सिताबर्डी पोलिस स्‍टेशन नागपूर येथे प्रथम खबरी अहवाल क्रं. 23/2022 दि. 19.01.2022 अन्‍वये नोंदविला. तक्रारकर्त्‍याचा विमा दावा विरुध्‍द पक्षाने त्‍याचे दि. 15.02.2022 च्‍या पत्रान्‍वये   नाकारला. व त.क.च्‍या वडिलानी वि.प.चे ग्रीव्‍हन्‍सेस सेलवर तक्रार दाखल केली व वि.प.ने त्‍याचे दि. 24.02.2022 अन्‍वये त.क.चा विमा दावा नाकारला  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा रक्‍कम रुपये 9,02,559/- द.सा.द.शे. 24 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.  विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि.30.09.2022 रोजी पारित करण्‍यात आला.

    

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता  व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

         

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा  ग्राहक आहे काय ?                 होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?            होय

 

  1. काय आदेश ?                                  अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –. तक्रारकर्त्‍याच्‍या वडिलांनी विरुध्‍द पक्षाकडून दिनांक 27.01.2021 ते 26.01.2022  या कालावधीकरिता विमा पॉलिसी क्रं. 2302002820P112323197  अन्‍वये  विमामुल्‍य रक्‍कम रुपये 6,00,000/- करिता स्‍वतः व इतर कुटुंबिय पत्‍नी- मनिषा विजय गोलछा , मुलगी- आरुषी विजय गोलछा व मुलगा- ऋषभ विजय गोलछा या सर्वांकरिता कौटुंबिक आरोग्‍य विमा योजना  (Family Medicare policy) अंतर्गत आकस्मिक वैद्यकीय उपचाराकरिता विमा उतरविला होता हे नि.क्रं. 2(4) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याचा दि. 24.12.2021 रोजीच्‍या मध्‍यरात्री 1.20 वा. भोळे पेट्रोल पंप धरमपेठ चौक, नागपूर येथे मिनी ट्रैक क्रं. MH-49-AT-2866 या वाहनाने अपघात झाला व सदरच्‍या अपघाता मध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या  Jaw ला (जबडा) जबरदस्‍त मार लागला असून त्‍यात तक्रारकर्त्‍याचे दात तुटले आणि  नाक व कानातून रक्‍त निघत असल्‍यामुळे  तक्रारकर्त्‍याला वैद्यकीय उपचाराकरिता व्‍होकार्ट हॉस्‍पीटल शंकरनगर, नागपूर येथे भरती केले असता तेथे करण्‍यात आलेल्‍या वैद्यकीय उपचारावर तक्रारकर्त्‍याला रुपये 59,027/- इतका खर्च आला असल्‍याचे नि.क्रं. 2(6) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. त्‍यांनतर दि. 29.12.2021 रोजी न्‍यू ईरा हॉस्‍पीटल अॅन्‍ड रिसर्च इन्‍स्‍टीटयूट  सी.ए.रोड नागपूर यांच्‍याकडे करण्‍यात आलेल्‍या वैद्यकीय उपचारावर तक्रारकर्त्‍याला रुपये 89,840/- इतका खर्च आल्‍याचे नि.क्रं. 2(7 व 8) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. तसेच तक्रारकर्त्‍याला Aditya Dental Implant, Facial Cosmetic, Hair Transplant & Cancer Hospital रामदासपेठ नागपूर येथे दि. 08.01.2022 ला भरती करण्‍यात आले व तिथे तक्रारकर्त्‍याच्‍या जबडयावर (Jaw) सर्जरी करण्‍यात आली व तिथे ही वैद्यकीय उपचार घेतला होता हे नि.क्रं. 2(9) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याचा आकस्मिक झालेल्‍या अपघाता तील वैद्यकीय उपचाराकरिता तक्रारकर्त्‍याला रुपये 1,48,867/- इतका खर्च आलेला असल्‍याचे दिसून येते. त्‍याचप्रमाणे नि.क्रं. 2(11) वर दाखल सिताबर्डी पोलिस स्‍टेशन, नागपूर यांच्‍याकडे दि. 19.01.2022 रोजी करण्‍यात आलेल्‍या प्रथम खबरी क्रं. 0023  मध्‍ये स्‍पष्‍ट नमूद आहे की, तक्रारकर्त्‍याचा मित्र हा अपघाताच्‍या दिवशी वाहन चालवित होता परंतु तक्रारकर्ता हॉस्‍पीटलमध्‍ये भरती होता व हॉस्‍पीटल मधून डिस्‍चार्ज झाल्‍यावर एफ.आय.आर. दाखल करण्‍यात आला व अपघाताची माहिती देण्‍यात आली,  त्‍यामुळे सदरहू घटनेत उशिरा माहिती देण्‍याचे व एफ.आय.आर. दाखल करण्‍याचे कारण संयुक्तिक आहे. तसेच वाहन चालकाने मध्‍यप्राशन केला असल्‍याचा वैद्यकीय अहवाल सदर प्रकरणात दाखल नसल्‍यामुळे तक्रारकर्ता विमा दावा रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा योग्‍य व वैध असलेला विमा दावा हा तक्रारकर्ता अल्‍कोहलचे प्राशन करुन असल्‍याच्‍या कारणावरुन नाकारुन सेवेत त्रुटी केली असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  

     सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याची   विमा दावा रक्‍कम रुपये 1,48,867/- त्‍वरित अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब  व  क फाईल परत करावी. 
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.