Maharashtra

DCF, South Mumbai

CC/09/2

Paresh C. Shah - Complainant(s)

Versus

United India Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

Adv. Anand Patwardhan

28 Jun 2010

ORDER

 
Complaint Case No. CC/09/2
 
1. Paresh C. Shah
177/3 Javahar Nagar, Goregaon(west) Mumbai-62
Mumbai
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance Co. Ltd.
Regional office,stadium house, 5th floor veer nariman road, Churchgate, Mumbai-20
Mumbai
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. SHRI.S.B.DHUMAL. HONORABLE PRESIDENT
  Shri S.S. Patil , HONORABLE MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

द्वारा - श्री.एस्.बी.धुमाळ : मा.अध्यक्ष

1. ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे -
    तक्रारदारांनी दि.20/10/2004 रोजी रक्‍कम रु.5,23,000/- ला तवेरा कार नंबर एम्एच्-04-सीबी-9996 ही स्‍वत:च्‍या वापरासाठी विकत घेतली. सदर कारसाठी त्‍यांनी सामनेवाला यांचेकडून विमा पॉलिसी घेतली, तिचा नंबर 020500/31/05/0001407 असा असून सदरची पॉलिसी ही दिनांक 28/10/2005 ते 27/10/2006 या कालावधीसाठी घेतली होती. वरील विमा पॉलिसीची छायांकित प्रत तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत नि.ला दाखल केली आहे.
2) तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सदरची तवेरा कार ते स्‍वत:च्‍या उपयोगासाठी म्‍हणजेच घरुन ऑफीसला जाण्‍यासाठी तसेच, इतर कारणांसाठी वापरत होते. दि.14/05/2006 रोजी त्‍यांनी सदरची कार त्‍यांचे ऑफीसच्‍या शेजारी उभी केली होती. दुस-या दिवशी सकाळी सदरची कार त्‍यांना त्‍या ठिकाणी आढळून आली नाही. तक्रारदारांनी सदर कारचा शोध घेतला परंतू सदची कार त्‍यांना मिळून आली नाही म्‍हणून त्‍यांनी कार चोरीस गेल्‍याची खबर पोलीस स्‍टेशनला दिली. तसेच कार चोरीस गेल्‍याची माहिती ताबडतोब म्‍हणजे दि.15/05/2006 रोजी सामनेवाला यांना दिली. तक्रारअर्जासोबत तक्रारदारांनी पोलीस स्‍टेशनला दाखल केलेल्‍या एफ.आय.आर.ची छायांकित प्रत दाखल केली आहे. तक्रारदारांनी विमा पॉलिसीपौटी चोरीस गेलेल्‍या कारची नुकसानभरपाई मिळावी म्‍हणून सामनेवाला यांचेकडे क्‍लेम सादर केला परंतू सामनेवाला यांनी दि.06/06/2007 चे पत्राने तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला. तक्रारदारांचा क्‍लेम नाकारण्‍यासाठी सामनेवाला यांनी दिलेले कारण म्‍हणजे तक्रारदार चोरीस गेलेली कार ही व्‍यावसायिक कारणासाठी वापरत होते असे दिले आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे ते टूर व ट्रॅव्‍हल्‍सचा व्‍यवसाय करीत असले तरी तक्रारअर्जात नमूद केलेली कार त्‍यांनी त्‍यांचे व्‍यैयक्‍तीक कारणासाठी घेतली होती व त्‍यांनी त्‍या कारचा वापर व्‍यवसायिक कारणासाठी कधीही केलेला नव्‍हता. सदरची कार तक्रारदार स्‍वत: चालवित असत. आर.टी.ओ. मधील रजिस्‍ट्रेशनमध्‍ये सदर कारची नोंद खाजगी वाहन असे करण्‍यात आलेले आहे असे असतानासुध्‍दा सामनेवाला यांनी चुकीच्‍या कारणावरुन त्‍यांचा क्‍लेम नाकारला आहे.
3) तक्रारदारांनी त्‍यानंतर Insurance Ombudsmanयांचेकडे दाद मागितली असता त्‍यांना तेथे न्‍याय मिळाला नाही म्‍हणून तक्रारदारांनी या मंचासमोर सदरचा तक्रारअर्ज दाखल केलेला आहे. सामनेवाला यांचे सेवेत कमतरता असून सामनेवाला यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे असे जाहीर करावे अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना चोरीस गेलेल्‍या कारच्‍या नुकसानभरपाईपोटी रक्‍कम रु.5,23,000/- द्यावेत व सदर रकमेवर तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला त्‍या तारखेपासून द.सा.द.शे.18 टक्‍के दराने व्‍याज द्यावे अशी विनंती तक्रारदारांनी केली आहे. तक्रारदारांने त्यांना झालेल्‍या मानसिक त्रासासाठी रक्‍कम रु.3,00,000/- नुकसानभरपाई मिळावी व या अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.25,000/-सामनेवाला यांचेकडून वसुल होवून मिळावेत अशी मागणी केली आहे. 
4) सामनेवाला यांनी लेखी म्‍हणणे दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्‍य केली. सामनेवाला यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांनी तक्रारदारांच्‍या कार नंबर एम्एच्-04-सीबी-9996 या कारसाठी ''प्रायव्‍हेट कार पॅकेज पॉलिसी'' दिली होती व सदरची पॉलिसी ही दि.20/10/2005 ते 19/10/2006 या कालावधीसाठी होती. सामनेवाला यांनी सदर पॉलिसीच्‍या अटी व शर्तींची छायांकित प्रत त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यासोबत सादर केली आहे. सामनेवाला यांचे म्‍हणण्‍याप्रामणे तक्रारदारांनी त्‍यांची वर नमूद केलेली कार चोरीस गेल्‍याची माहिती त्‍यांना दि.15/05/2006 च्‍या पत्राने गुरगांव पोलीस स्‍टेशनला दाखल केलेल्‍या एफ.आय.आर. सोबत पाठविली ती सामनेवाला यांना दि.02/08/2006 ला मिळाली. तक्रारदारांकडून कार चोरीस गेल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर सामनेवाला यांनी मे.स्‍मार्ट इन्‍व्‍हेस्‍टीगेटर्स यांना तक्रारदारांनी कार चोरीस गेल्‍यासंबंधी दाखल केलेल्‍या क्‍लेमचा खरेखोटेपणाचा शोध घेण्‍यासाठी नेमणूक केली. मे.स्‍मार्ट इन्‍व्‍हेस्‍टीगेटर्सने याबाबत तपास करुन त्‍यांचा अहवाल दि.22/01/2007 रोजी सामनेवाला यांचेकडे दिला. सदर अहवालामध्‍ये इन्‍व्‍हेस्‍टीर्गरने त्‍यांचे तपासामध्‍ये तक्रारदार हे ट्रॅव्‍हल एजंन्‍सीचा ''एस.पी.ग्रुप'' या नांवाने व्‍यवसाय करत असून ते त्‍यांच्‍या कार भाडयाने देत असत. त्‍यांनी तक्रारदारांकडे चौकशी केली असता तक्रारदाराने त्‍यांना सांगितले की, दिनांक 14/05/2006 रोजी ते डहाणू जवळील मनोर येथील जैन मंदीरात गेले होते व तेथून रात्रीी 10.30 वा. त्‍यांचे मुंबई येथील ऑफीसला परत आले. त्‍यांनतर त्‍यांनी सदरची तवेरा कार त्‍यांचे ऑफीस शेजारी उभी केली व नंतर कारची चावी ऑफीसमध्‍ये ठेवली. तक्रारदारांच्‍या कारची चोरी दि.15/05/2006 रोजी झाली असे इन्‍व्‍हेस्‍टीगेटरच्‍या तपासामध्‍ये निष्‍पन्‍न झाले. पोलीसांनी चोरीस गेलेल्‍या कारचा तपास केला परंतू त्‍यांना सदर कार मिळून आली नाही म्‍हणून पोलीसांनी केस समरी मागितली. कार चोरीस गेल्‍याबद्दल उशिरा का माहिती दिली याबाबत तक्रारदार समाधानकारक खुलासा करु शकले नाहीत. इन्‍व्‍हेस्‍टीगेटरने आपल्‍या अहवालामध्‍ये तक्रारदार टूर आणि ट्रॅव्‍हल्‍सचा व्‍यवसाय करत असल्‍याचे मान्‍य केले आहे. इन्‍व्‍हेस्‍टीगेटरने त्‍यांचे तपासात इंन्‍कम टॅक्‍स रिर्टर्नसच्‍या प्रती, कारचे आर.सी.बुक इत्‍यादी कागदपत्रांच्‍या प्रती सामनेवाला यांचेकडे सादर केल्‍या आहेत.
 
5) सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.22/03/07 रोजी पाठविलेल्‍या पत्रामध्‍ये ते त्‍यांचीचोरीस गेलेली कार व्‍यावसायकि व खाजगी कारणासाठी वापरत असल्‍याचे स्‍पष्‍टपणे मान्‍य केले आहे. सामनेवाला यांनी दिनांक 22/03/2007 रोजी तक्रारदारांना पत्र पाठवून काही बाबींचा खुलास मागविला. तक्रारदारांनी दि.23/03/2007 रोजी उत्‍तर पाठवून त्‍यांचकडे इतर अनेक वाहने असून संबंधीत वाहनांचा तपशिल त्‍यांनी त्‍या पत्रात दिला आहे. तसेच, त्‍यांना वरील व्‍यवसायात मिळणा-या उत्‍पन्‍नाची माहिती दिली आहे. सामनेवाला यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी त्‍यांची चोरीस गेलेली कार ते व्‍यावसायिक कारणासाठी वापरत असल्‍याचे मान्‍य केले असून तक्रारदारांनी विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा भंग केला त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला आहे. तक्रारदारांनी Insurance Ombudsmanकडे केलेला अर्जसुध्‍दा नाकारण्‍यात आला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नाकारण्‍यापूर्वी इन्‍व्‍हेस्‍टीगेटर्सची नेमणूक केली होती व संबंधीत कागदपत्रांची माहिती घेवून सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्‍ेलम नाकारला आहे. तक्रारदारांनी विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा भंग केलेला असल्‍यामुळे क्‍ेलम नाकारण्‍यात आला. त्‍यामुळे सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे असे म्‍हणता येणार नाही. सामनेवाला यांनी तक्रारअर्जातील मजकूर नाकारलेला असून तक्रारदारांची नुकसानभरपाईची तसेच व्‍याजाची मागणी स्‍पष्‍टपणे नाकारली आहे. सामनेवाला यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारअर्ज खर्चासहित रद्द होणेस पात्र आहे.
 
6) तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केले आहेत तसेच, शपथपत्र दाखल केले आहे. सामनेवाला यांनी कैफीयतीसोबत यादीप्रमाणे कागदपत्रे दाखल केले आहेत. त्‍यामध्‍ये तक्रारदार यांना दिलेल्‍या प्रायव्‍हेट कार पॅकेज पॉलिसी व त्‍याच्‍या अटी व शर्तींची छायांकित प्रत, इन्‍व्‍हेस्‍टीगेटर्सचा रिपोर्ट इत्‍यादी कागदपत्रे सादर केले आहेत. सामनेवाला त्‍याचे डिव्‍हीजनल मॅनेजर श्री.पी.आर.हिंगर तसेच, मे.स्‍मार्ट इन्‍व्‍हेस्‍टीगेटर्सचे मालक श्री.इंदरपाल सिंग यांचे शपथपत्र दाखल केले आहेत. या कामी तक्रारदार तसेच सामनेवाला यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
 
7) तक्रारदारांचे अड.तरसेमसिंग व सामनेवाला यांचे अड.कारंजकर यांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला व सदर प्रकरण निकालासाठी ठेवण्‍यात आले.
 
8) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात - 
मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे सामनेवाला यांच्‍या सेवेत कमतरता आहे हे सिध्‍द करतात काय ? 
उत्तर       -होय.
 
मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांना तक्रारअर्जात मागितल्‍याप्रमाणे चोरीस गेलेल्‍या कारच्‍या नुकसानभरपाईपोटी रक्‍कम रु.5,23,000/- व्‍याजासहित सामनेवालायांच्‍याकडून वसुल करता येईल काय ?तसेच, मानसिक
                त्रासापोटी नुकसानभरपाई व या अर्जाचा खर्च वसुल करता येईल काय ? 
उत्तर      - अंतिम आदेशाप्रमाणे.
 
कारणमिमांसा  
स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्र.1 - तक्रारदार हे टूर्स आणि ट्रॅव्‍हल्‍सचा व्‍यावसाय करतात. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांनी दि.20/10/2004 रोजी रक्‍कम रु.5,23,000/- ला तवेरा कार नंबर एम्एच्-04-सीबी-9996 ही स्‍वत:च्‍या वापरासाठी खरदी केली. वरील कारसाठी त्‍यांनी सामनेवाला यांचेकडून तक्रारअर्जात नमूद केलेली विमा पॉलिसी घेतली. सामनेवाला यांनी तक्रारदारांना तक्रारअर्जात नमूद केलल्‍या तवेरा कारसाठी प्रायव्‍हेट कार पॅकेज पॉलिसी दिली होती हे सामनेवाला यांना मान्‍य आहे. सामनेवाला यांनी दिलेली वरील विमा पॉलिसी ही दि.20/10/2005 ते 19/10/2006 या कालावधीसाठी होती व वरील विमा पॉलिसीत दिलेली आश्‍वासित रक्‍कम रु.5,29,000/- नमूद करणेत आली आहे.
 
           तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.14/05/2006 रोजी सायंकाळी त्‍यांनी सदरची कार त्‍यांचे ऑफीसच्‍या शेजारी उभी केली होती. दुस-या दिवशी सकाळी सदरची कार त्‍यांना त्‍या ठिकाणी आढळून आली नाही. त्‍यांनी तक्रारदारांनी सदर कारचा शोध घेतला परंतू सदची कार त्‍यांना मिळून आली नाही म्‍हणून त्‍यांनी कार चोरीस गेल्‍याची खबर पोलीस स्‍टेशनला दिली. पोलीसांनी या बाबत गुन्‍हयाची नोंद करुन तपास केला परंतू त्‍यांना सदर चोरीस गेलेली कार तपासात आढळून आली नाही.
 
          तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांनी त्‍यांची कार दि.14/05/06 ते 15/05/06 चे रात्री चोरीस गेली व त्‍यानंतर त्‍यांनी ताबडतोब त्‍याची माहिती सामनेवाला यांना दिली. चोरीस गेलेली कार सापडली नाही म्‍हणून तक्रारदारांनी विमा पॉलिसीपोटी चोरीस गेलेल्‍या कारसंबंधी सामनेवाला यांचेकडे नुकसानभरपाई मिळावी म्‍हणून क्‍लेम सादर केला तथापि, सामनेवाला यांनी दिनांक 06/06/2007 चे पत्राने त्‍यांचा क्‍लेम नाकारला. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला यांनी चुकीच्‍या कारणावरुन त्‍यांचा क्‍लेम नाकारला असून अशा त-हेने क्‍लेम नाकरणे ही सामनेवाला यांचे सेवेतील कमतरता आहे.
 
          सामनेवाला यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांची कार चोरीस गेल्‍याबाबतचा क्‍लेम सदर तक्रारदारांनी सादर केल्‍यानंतर त्‍याची शहानिशा करण्‍यासाठी सामनेवाला यांनी मे.स्‍मार्ट इन्‍व्‍हेस्‍टीगेटर्स यांची नेमणूक केली. मे.स्‍मार्ट इन्‍व्‍हेस्‍टीगेटर्स यांनी याबाबत तपास करून तक्रारदारांची कार दि.15/05/2006 रोजी चोरीस गेली हे खरे असे असे म्‍हटले आहे तथापि, तक्रारदारांनी चोरीस गेलेल्‍या कारसंबंधीची माहिती सामनेवाला विमा कंपनीस उशिरा दिली व तक्रारदार चोरीस गेलेली कार हे त्‍यांच्‍या टूर आणि ट्रॅव्‍हल्‍सच्‍या व्‍यावसायासाठी वापरत होते असे नमूद केले आहे. सामनेवाला यांनी मे.स्‍मार्ट इन्‍व्‍हेस्‍टीगेटर्सचा रिपोर्ट नि.'इ' ला सादर केला आहे. सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा भंग केला आहे. कार चोरीस गेल्‍याची माहिती तक्रारदारांनी सामनेवाला यांना ताबडतोब दिली नाही तसेच, तक्रारदार सदरची कार व्‍यावसायिक कारणासाठी वापरत होते. तक्रारदारांनी वरील प्रमाणे विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा भंग केल्‍याने सामनेवाला यांनी तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला.
 
            तक्रारदारांची तवेरा कार दि.15/05/2006 रोजी चोरीस गेली याबाबत तक्रारदारांनी पोलीस स्‍टेशनला दिलेली खबर व पोलीस तपासाबाबतचे कागदपत्रे दाखल केले आहेत. सामनेवाला यांच्‍या इन्‍व्‍हेस्‍टीगेटर्सने तक्रारदारांची तवेरा कार दि.15/05/2006 रोजी चोरीस गेली ही बाब मान्‍य केली आहे. सामनेवाला यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा खालील प्रमाणे भंग केला आहे -
 
1) तक्रारदारांनी कार चोरीस गेल्‍याची माहिती सामनेवाला यांना ताबडतोब दिली नाही.
 
2) तक्रारदारांनी सदरच्‍या कारची विमा पॉलिसी प्रायव्‍हेट कार पॅकेज पॉलिसी म्‍हणून घेतली असताना सुध्‍दा तिचा वापर व्‍यावसायिक कारणासाठी केला.
 
         तक्रारदारांचे म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांची कार चोरीस गेल्‍याची माहिती त्‍यांना दि.15/05/2006 रोजी सकाळी मिळाली व त्‍यानंतर त्‍यांनी पोलीस स्‍टेशनला खबर दिली व त्‍यानंतर त्‍याच दिवशी म्‍हणजे दि.15/05/2006 रोजी सामनेवाला यांना कार चोरीस गेल्‍याची माहिती दिली. याकामी सामेनवाला यांनी कैफीयतीसोबत कागदपत्रे हजर केली आहेत त्‍यामध्‍ये पान क्र.20 निशाणी 'ब' येथे तक्रारदारांनी चोरीस गेलेल्‍या कारसंबंधी पाठविलेले पत्र हजर केले. सदरचे पत्र दि.15/05/06 रोजीचे असून त्‍यातील मजकूर विचारात घेता तक्रारदारांनी कार चोरीस गेल्‍यासंबंधीचे पत्र सामनेवाला यांना दि.15/05/06 रोजी पाठविल्‍याचे दिसते. सदर पत्रामध्‍ये त्‍यांनी त्‍यांची कार चोरीस गेली असून त्‍यासंबंधी पोलीस स्‍टेशनला एफ.आय.आर. दाखल केल्‍याचे म्‍हटले आहे. वरील पत्र निदर्शनास आणून तक्रारदारांचे वकीलांनी दि.15/05/06 रोजी तक्रारदारांची त्‍यांची कार चोरीस गेल्‍याची माहिती सामनेवाला यांना दिली होती असे म्‍हटले आहे. सामनेवाला यांचे वकील श्री.कारंजकर यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे सदर पत्रावर तक्रारदारांनी तारीख 15/05/06 लिहिलेले असले तरी सदरचे पत्र सामनेवाला यांचे ऑफीसला दिनांक 02/08/06 रोजी मिळाले व तसा त्‍यांचे ऑफीसचा आवकचा शिक्‍का सदर पत्रावर मारण्‍यात आलेला आहे. सामनेवाला यांचे वकीलांनी विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्ती निदर्शनास आणून तक्रारदारांनी चोरीस गेलेली कार संबंधीची माहिती सामनेवाला यांना ताबडतोब देणे आवश्‍यक होते परंतू तशी माहिती ताबडतोब तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिली नाही. त्‍यामुळे तक्रारदारांनी विमा पॉलिसीच्‍या मुलभूत अटी व शर्तींचा भंग केला असे कथन केले. आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या समर्थनार्थ सामनेवाला यांचे वकीलांनी ओरिसा राज्‍य United India Insurance V/s. S.K.Bhattasali & Anr., reported in 2010(1) CPR 53 या निकालपत्राचा आधार घेतला आहे. वरील केसमध्‍ये विमाधारकाने त्‍याच्‍या क्‍ेलम संबंधीची माहिती विमा कंपनीला ठराविक मुदतीत देणे आवश्‍यक आहे असे म्‍हटले आहे.
 
           सामनेवाला यांनी दाखल केलेले वर नमूद पत्र नि.'ब' वरुन स्‍पष्‍टपणे दिसून येते की, तक्रारदारांनी दि.15/05/06 चे पत्राने सामनेवाला यांना त्‍यांची कार चोरीस गेल्‍याची माहिती दिली होती. सामनेवाला यांचे वकीलांनी सदर पत्रावर दि.02/08/06 चा आवक झाले असे नमूद करणारा शिक्‍का निदर्शनास आणले असले तरी तक्रारदारांनी सदर कार चोरीस झालेली माहिती उशिराने दिली होती असे म्‍हणता येणार नाही. त्‍यामुळे त्‍यांचे वकीलांनी वर नमूद केलेला ओरिसा राज्‍य आयोगाचा निकाल या कामी लागू होणार नाही. तक्रारदारांनी कार चोरीस गेल्‍यासंबंधी माहिती उशिराने दिली या सामनेवाला यांच्‍या आरोपात तथ्‍य वाटत नाही.
 
           सामनेवाला यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांना त्‍यांनी प्रवासी कार म्‍हणून विमा पॉलिसी दिली असताना सुध्‍दा तक्रारदारांनी सदरची कार आपल्‍या व्‍यावसायासाठी वापरली. आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍टयर्थ सामनेवाला यांनी त्‍यांचे मे.स्‍मार्ट इन्‍व्‍हेस्‍टीगेटर्सच्‍या रिपोर्टचा आधार घेतला आहे. मे.स्‍मार्ट इन्‍व्‍हेस्‍टीगेटर्स यांनी आपल्‍या अहवालात असे म्‍हटले आहे की, तक्रारदार हे 'एस्.पी.ग्रुप' या नांवाने टूर्स आणि ट्रॅव्‍हल्‍सचा व्‍यवसाय करतात. उपलब्‍ध पुराव्‍यावरुन त्‍यांचेकडे दोन टाटा सुमो व टोयाटो क्‍वालिस ही वाहने आहेत. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे वरील वाहनाव्‍यतिरिक्‍त तक्रारअर्जात नमूद केलेली तवेरा कार ते त्‍यांचे व्‍यावसायासाठी वापरत होते. सामनेवाला यांचे वकीलांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदार यांनी दि.31/03/2002 ते 31/03/2003 या कालावधीसाठी जे इन्‍कम टॅक्‍स रिटर्न दाखल केले आहे त्‍यामध्‍ये तक्रारदारांना त्‍यांच्‍या टूर्स आणि ट्रॅव्‍हल्‍सच्‍या व्‍यावसायापासून मिळणा-या उत्‍पन्‍नाची नोंद दाखविली आहे. तक्रारअर्जात नमूद केलेली तवेरा कार ही तक्रारदारांनी दि.24/10/2004 रोजी विकत घेतली आहे त्‍यामुळे वरील इन्‍कम टॅक्‍स रिटर्नमध्‍ये दाखविलेल्‍या उत्‍पन्‍नाशी या तवेरा कारचा काही संबंध आहे असे म्‍हणता येणार नाही. सामनेवाला यांचे वकीलांनी दिनांक 31/03/2003 च्‍या खर्चाचे बॅलेन्‍शीटच्‍या नोंदी निदर्शनास आणून तक्रारदारांनी त्‍यामध्‍ये त्‍यांच्‍या व्‍यावसायामध्‍ये मिळणा-या उत्‍पन्‍नाची नोंद केली आहे असे म्‍हटले आहे. सामनेवाला यांचे मे.स्‍मार्ट इन्‍व्‍हेस्‍टीगेटर्सने त्‍यांच्‍या अहवालामध्‍ये नमूद केले आहे की, त्‍यांनी तक्रारदारांचे चार्टड अकौटंट श्री.शाह याचंकडे चौकशी केली असता चार्टड अकौटंट श्री.शाह यांनी गेल्‍या दोन वर्षात तक्रारदारांनी इन्‍कम टॅक्‍स रिटर्नस् काही तांत्रिक कारणामुळे दाखल केले नाहीत असे सांगितले. मे.स्‍मार्ट इन्‍व्‍हेस्‍टीगेटर्सने विनंती केल्‍यावरुन तक्रारदारांच्‍या चार्टड अकौटंटने प्रोव्‍हीजनल बॅलेन्‍शीटची प्रत दिली असे दिसते. सदर बॅलेन्‍शीटमध्‍ये तक्रारदारांना टूर्स आणि ट्रॅव्‍हल्‍सच्‍या व्‍यावसायापासून मिळणा-या उत्‍पन्‍नाची नोंद केली आहे तथापि, त्‍यामध्‍ये तवेरा कारचा उल्‍लेख सुध्‍दा केलेला नाही. तक्रारदारांच्‍या तवेरा कारची आर.टी.ओ.मध्‍ये नोंद खाजगी कार म्‍हणून नोंदणी करण्‍यात आली. तक्रारदारांनी त्‍यांची तवेरा कार टूर्स आणि ट्रॅव्‍हल्‍ससाठी कधीही वापरली नव्‍हती असे तक्रारदारांतर्फे स्‍पष्‍टपणे सांगण्‍यात आले. सामनेवाला यांचे वकीलांचे म्‍हणण्‍याप्रमाणे तवेरा कार ही सात आसनी कार असून ती सर्वसाधारणपणे प्रवासी वाहन म्‍हणून वापरली जाते. वैयक्तिक कार म्‍हणून तवेरा कारचा वापर सर्वसाधारणपणे केला जात नाही. याबाबत Insurance Ombudsmanत्‍यांचे आदेशामध्‍ये नमूद केलेला मजकूर सामनेवाला यांचे वकीलांनी निदर्शनास आणला. तक्रारदार हे टूर आणि टॅव्‍हल्‍सचा व्‍यवसाय करतात यावरुन ते त्‍यांच्‍या असणा-या सर्व कार्स त्‍यांच्‍या व्‍यवसायासाठी वापरतात असे म्‍हणता येणार नाही तसेच, तवेरा कार सात आसनी असल्‍याने कोणीही वैयक्तिक वापरासाठी घेत नाही असेही म्‍हणता येणार नाही. मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने National Insurance Co.Ltd. V/s. Nitin Khandelwal, 2008 CTJ 680 (Supreme Court) (CP) या केसमध्‍ये असे म्‍हटले आहे की, “ In the case of theft of a vehicle, the breach of condition is not germane. The law is well settled that in case of theft of the vehicle, the nature of use of the vehicle cannot be looked into and the insurance company cannot repudiate the claim on that basis”.
 
           तक्रारदारांनी तवेरा कार व्‍यावसायिक कारणासाठी वापरली होती असे कोणताही विश्‍वासार्ह पुरावा सामनेवाला यांनी सादर केला नाही सबब सामनेवाला यांना तक्रारदारांनी सदरची तवेरा कार व्‍यावसायिक कारणासाठी वापरली हे सिध्‍द करता आले नाही. वर नमूद केल्‍याप्रमाणे सामनेवाला यांना दोन्‍ही आरोप पुराव्‍यानिशी सिध्‍द करता आले नाही त्‍यामुळे तक्रारदारांनी विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा भंग केला ही बाब सामनेवाला यांना सिध्‍द करता आली नाही. वरील बाबींचा विचार करता व वर नमूद केलेल्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निकालावरुन सामेनवाला यांनी तक्रारदारांचा क्‍लेम चुकीच्‍या कारणावरुन नाकारला हे सिध्‍द होते. अशा पध्‍दतीने क्‍लेम नाकारणे ही सामनेवाला यांचे सेवेत कमतरता आहे हे तक्रारदारांनी सिध्‍द केले आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.
 
स्‍पष्‍टीकरण मुद्दा क्र.2 - तक्रारदार यांच्‍या कारसाठी सामेनवाला यांनी दिलेली विमा पॉलिसी ही दि.20/10/2005 ते 19/10/2005 या कालावधीसाठी होती त्‍या पॉलिसी अंतर्गत देणेत येणारी आश्‍वासित रक्‍कम (IDV) रु.5,29,0000/- अशी नमूद करणेत आली आहे. दिनांक 15/05/2006 रोजी तक्रारदारांची तवेरा कार चोरीस गेली हे सामनेवाला यांना मान्‍य आहे. सामनेवाला यांना तक्रारदारांनी विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तींचा भंग केला आहे हे सिध्‍द करता आले नाही त्‍यामुळे सामनेवाला यांनी चुकीच्‍या कारणावरुन तक्रारदारांचा क्‍लेम नाकारला आहे व अशा परिस्थितीत सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्‍यांच्‍या चोरीस गेलेल्‍या तवेरा कारची नुकसानभरपाई म्‍हणून विमा पॉलिसी अंतर्गत्‍ा रक्‍कम रु.5,23,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्‍य होईल.
 
         तक्रारदारांनी वरील रक्‍कम रु.5,23,000/-वर सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.18 टक्‍के दराने व्‍याज द्यावेत अशी मागणी केली आहे. सामनेवाला यांनी चुकीच्‍या कारणावरुन तक्रारदारांचा क्‍लेम दि.06/06/2007 रोजीच्‍या पत्रान्‍वये नाकारला तथापि, तक्रारदारांनी केलेली 18 टक्‍के दराने व्‍याजाची मागणी अवास्‍तव जादा आहे. या तक्रारअर्जातील वस्‍तुस्थितीचा विचार करता सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्‍कम रु.5,23,000/- यावर दि.06/06/07 पासून संपूर्ण रक्‍कम तक्रारदारांना मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे असा आदेश करणे योग्‍य होईल.
 
         तक्रारदारांनी त्‍यांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.3,00,000/- ची मागणी केली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांची वरील मागणी अमान्‍य केली आहे. तक्रारदारांची वरील नुकसानभरपाईची मागणी अवास्‍तव जादा आहे. तक्रारदारांची व्‍याजाची मागणी 9 टक्‍के दराने मंजूर करण्‍यात आलेली आहे या सर्व बाबींचा विचार करता सामेनवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्‍हणून रक्‍कम रु.10,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्‍य होईल. तक्रारदारांनी या अर्जाच्‍या खर्चापोटी सामनेवाला यांचेकडून रक्‍कम रु.25,000/- ची मागणी केली आहे. या अर्जाचे स्‍वरुप पाहता सामनेवाला यांनी तक्रारदारांना या अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/- द्यावेत असा आदेश करणे योग्‍य होईल. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर त्‍याप्रमाणे देण्‍यात येते.
 
वर नमूद कारणास्‍तव तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत असून खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहे -
 
अं ति म आ दे श
 
1.तक्रार क्रमांक 02/2009 अंशतः मंजूर करणेत येत आहे. 
2.सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.5,23,000/- (रु.पाच लाख तेवीस हजार मात्र) द्यावेत व वरील रकमेवर दि.06/06/2007 पासून द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज संपूर्ण रक्कम तक्रारदारांना
   मिळेपर्यंत द्यावी. 
3.सामनेवाला यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (रु.दहा हजार मात्र) व या अर्जाचा खर्च म्हणून रक्क्‍म रु.1,000/-(रु.एक हजार मात्र) द्यावेत. 
4. सामनेवाला यांनी वरील आदेशाची अंमलबजावणी या आदेशाची प्रत प्राप्त झालेल्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत करावी. 
5. सदर आदेशाची प्रमाणित प्रत सर्व पक्षकारांना देणेत यावी.

 

 
 
[HON'ABLE MR. SHRI.S.B.DHUMAL. HONORABLE]
PRESIDENT
 
[ Shri S.S. Patil , HONORABLE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.