// आदेश //
(दि. 21/12/2021)
द्वारा- श्री. डी.एस. पराडकर, सदस्य
तक्रारदार एम्को लिमिटेड (Emco Ltd.) कंपनीने गणेश टावरी चिफ फायनान्शियल ऑफीसर आणि कंपनी सेक्रेटरी यांचेमार्फत दि.28/08/2018 रोजी तक्रार मंचात दाखल केली. तक्रारदार कंपनीने त्यांचे पॉवर जनरेशन ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्यूशन युटिलिटी आणि इंडस्ट्रीज साठी विमा संरक्षण मिळावे म्हणून सामनेवाला विमा कंपनीकडून स्टोअरेज कम इरेक्शन इनश्युरन्स पॉलिसी दि.30/05/2014 ते दि.28/02/2015 या कालावधीसाठी पॉलिसी क्रमांक 120200/44/11/02/50000001 विमा हप्ता रक्कम रु.1,05,222/- भरणा करुन घेण्यात आली. दि. 11/12/2014 रोजी भावनगर एनर्जी कंपनी लिमीटेड या कंपनीचे पाडवा सब स्टेशन भावनगर येथील जागेवर चोरी झाल्याने व घोघा पोलीस स्टेशनमध्ये दि.15/12/2014 रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. चोरीदरम्यान झालेली नुकसानभरपाईची रक्कम रु.6,50,000/- मिळणेसाठी तसेच सदर विमा क्लेमबाबतच्या दाव्याच्या रकमेबाबत सामनेवाला यांना विलंबाने कळविल्याबाबत विलंब माफ करण्यात यावा अशी विनंती करुन सामनेवाला विमा कंपनीला दि. 16/12/2014 रोजीचे मेलद्वारे कळविण्यात आले. सामनेवाला यांनी दि. 16/12/2014 रोजीचे मेलद्वारे तक्रारदारास श्री. दिपक शहा यांची सर्व्हेअर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याबाबत कळविले. त्यानुसार तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली. सर्व्हेअरने त्यांचा अहवाल सादर केला. दि.16/07/2016, दि. 28/12/2016, दि. 09/01/2017 रोजीचे पत्राद्वारे विमा दावा मंजूर करावा अशी विनंती केली. तसेच दि. 09/01/2017 व दि. 20/01/2017, दि. 14/02/2017 रोजीच्या पत्राद्वारे कळवून सुध्दा विमा दावा मंजूर न करता नो क्लेम म्हणून कोणतेही कारण न देता दि. 01/03/2017 रोजी नाकारण्यात आला असल्याने मंचात तक्रार दाखल करण्यात आली. सामनेवाला यांना नोटीस प्राप्त झाल्याने त्यांनी त्यांची लेखी कैफियत दि. 14/11/2018 रोजी कॉस्ट रु.500/- तक्रारदारास देण्यात येऊन दाखल केली. तक्रारदारांनी त्यांचे पुरावा शपथपत्र दि. 10/07/2019 रोजी दाखल केले, प्रकरण सामनेवाला यांचे पुरावा शपथपत्रासाठी नेमले असता, सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी दि. 03/11/2018 रोजी प्रस्तूत तक्रार नव्याने डबल (दुबारा) फायलींग केलेली असून, सदर तक्रारीस तक्रार क्रमांक सीसी/111/2018 असा क्रमांक देण्यात आला. सामनेवाला यांचेविरुध्द दुस-यांदा तक्रार दाखल केलेली असल्याने सदरची तक्रार फेटाळण्यात यावी असा अर्ज दि. 03/11/2018 रोजी सामनेवाला यांचा सदरच्या दिनांकाचा अर्ज दि. 31/05/2019 रोजीचे आदेशाने फेटाळण्यात आला. तक्रारदाराने सामनेवाला यांना रु. 200/- कॉस्ट देऊन डबल फायलींगचे अर्जावर दि.20/12/2018 रोजी म्हणणे सादर केले.
(2) सामनेवाला 1 व 2 यांचेतर्फे वकील श्री. व्ही.के. गुप्ता यांनी दि. 14/10/2021 रोजी मा. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल मुंबई बेंच कोर्ट क्र. II यांनी दि. 09/08/2021 रोजी पारीत केलेल्या आदेशाची प्रत सादर केली. सदर पारीत केलेल्या आदेशान्वये तक्रारदार एमको लिमिटेड ही कंपनी Insolvency (दिवाळखोरी) मध्ये गेल्याने Corporate Insolvency Resolution ची कार्यवाही सुरु झाल्याने, मुळ तक्रारदार कंपनीचे कायदेशीर अस्तित्व राहिले नसल्याने, तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी असा अर्ज मंचात दाखल केला.
(3) दि. 21/12/2021 रोजी तक्रारदार पुकारले असता गैरहजर. सामनेवाले 1 व 2 करिता वकील श्री. विनोदकुमार गुप्ता हजर. सदर प्रकरण आज सामनेवाला 1 व 2 यांनी दि.14/10/2021 रोजी दाखल केलेल्या अर्जांवर म्हणणे दाखल करण्यासाठी प्रकरण नेमण्यात आले. मात्र तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार क्रमांक सीसी/111/2018 मधील डबल फायलिंगचे अर्जावर दि. 31/05/2019 रोजी आदेश पारीत करुन सामनेवाला 1 व 2 यांचा दि. 03/11/2018 रोजीचा अर्ज निकाली काढण्यात आला आहे. मात्र सामनेवाला 1 व 2 यांचे वकीलांनी दि. 21/12/2021 रोजी हजर होऊन त्यांनी दाखल केलेल्या अर्जात तक्रारदार सतत गैरहजर राहत असल्याने आज दि. 21/12/2021 रोजी दाखल केलेल्या सदर अर्जात नमूद केलेल्या तारखांना तक्रारदार सतत गैरहजर राहिल्याने तसेच मंचानेही तक्रारदारास सदरच्या अर्जावर म्हणणे देण्यासाठी ब-याचवेळा संधी देण्यात आलेली असूनही तक्रारदाराने सामनेवाला यांनी दाखल केलेल्या वरील अर्जावर म्हणणे दाखल करण्यासाठी प्रकरण दिर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्याचे दिसून येते. मात्र तक्रारदारांनी अदयाप वरील अर्जावर त्यांचे म्हणणे दाखल केले नसल्याने तसेच तक्रारदार हे सदर प्रकरणात दि. 09/01/2020 पासून सातत्याने गैरहजर. आहेत. मागील रोजनाम्यांचे अवलोकन केले असता, तक्रारदार दि. 09/01/2020, दि. 16/03/2020, दि. 17/12/2020, दि. 17/03/2021, दि. 24/08/2021, दि.14/10/2021, दि. 17/11/2021, दि. 20/12/2021, दि. 21/12/2021 या तारखांना प्रस्तूत तक्रारीतील तक्रारदाराच्या सततच्या गैरहजेरीमुळे प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 13 (2) (सी) अन्वये पुढे चालविण्यात स्वारस्य दिसून येत नाही. सबब तक्रार खारीज करुन निकाली काढण्यात येते. त्यामुळे सामनेवाला 1 व 2 यांचे वकीलांनी दि.14/10/2021 रोजीच्या दाखल केलेल्या अर्जात अवसायकाची नियुक्ती झाल्याने तसेच तक्रारदार कंपनीला कायदेशीर अस्तित्व राहिलेले नसल्याने, प्रस्तूत तक्रार खारीज करावी यासाठी दिलेला अर्ज निरुपयोगी होत असल्याने तक्रार निकाली काढण्यात येते. खर्चाबाबत आदेश नाहीत. प्रस्तूत तक्रारीत हाच अंतिम आदेश समजण्यात यावा. प्रकरण निकाली.