जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 47/2016 तक्रार नोंदणी दि. :- 10/11/2016
तक्रार निकाली दि. :- 11/01/2017
निकाल कालावधी :- 2 म.1 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- श्री.बबन केशव कुनघाडकर,
वय 42 वर्षे, व्यवसाय-शेती,
रा.हिवरगांव, ता.चामोर्शी, जि.गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) युनायटेड इंडिया इंश्युरन्स कंपनी लिमिटेड,
तर्फे डिव्हीजनल मॅनेजर,
डिव्हीजनल ऑफीस नं.2, अंबिका हाऊस,
शंकर नगर,, नागपूर-440010,
(2) मे.कबाल इंशुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस लिमिटेड,
तर्फे श्री.सुभाष आग्रे, प्लॉट नं.101,
करंदीकर हाऊस, मंगला टॉकीजच्या शेजारी,
शिवाजी नगर, पुणे-411005..
(3) तालुका कृषि अधिकारी, चामोर्शी,
तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री.उदय क्षिरसागर
गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील :- अधि.श्री. देशपांडे
गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे :- स्वतः
गणपूर्ती :- (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.)
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, सादिक मो.झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 11 जानेवारी 2017)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याची आई शेतीचा व्यवसाय करीत होते. शेतातील उत्पन्नावर तक्रारकर्त्याची आई कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्त्याची आई रुक्माबाई केशव कुनघाडकर हीचा दि.10.10.2009 रोजी विषारी साप चावल्याने मृत्यु झाला. शासनातर्फे तक्रारकर्त्याची आईचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढला असल्याने व तक्रारकर्त्याची आई शेतकरी असल्याने तक्रारकर्ता मृत शेतक-याचा वारसदार म्हणून गैरअर्जदार क्र.1 कडून रुपये 1,00,000/- च्या विमा रकमेसाठी पाञ होता. तक्रारकर्त्याची आईचा अपघाती मृत्यु झाल्याने गैरअर्जदार क्र.3 कडे विमा योजने अंतर्गत दि.26.4.2010 ला रितसर अर्ज केला, तसेच वेळोवेळी गैरअर्जदारांनी मागीतलेल्या दस्ताऐवजाची पुर्तता केली. तक्रारकर्त्याची आईच्या दाव्याबाबत गैरअर्जदार क्र.1 यांनी कोणताही निर्णय न घेतल्याने अर्जदाराने वकीलामार्फत दिनांक 9.6.2016 ला नोटीस पाठविला. परंतु, गैरअर्जदार यांनी दावा फेटाळला की नाही याबाबत माहिती न दिल्यामुळे, सदर तक्रार दाखल करावी लागत आहे. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्त्याचा दावा अकारण प्रलंबित ठेवून तक्रारकर्त्याची फसवणूक केली आहे. शासनाने ज्या उद्देशाने मृत शेतक-याच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्या उद्देशालाच गैरअर्जदार हे तडा देत आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ने दावा प्रलंबित ठेवून सेवेमध्ये ञृटी केली. त्यामुळे तक्रारकर्त्यास मानसिक, शारिरीक ञास व आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांनी विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दि.26.4.2010 पासून द.सा.द.शे. 18 % व्याजाने मिळण्याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 15,000/- अर्जदारास गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावे, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 10 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.12 नुसार लेखी उत्तर दाखल केले, गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.क्र.15 व गैरअर्जदार क्र.3 यांनी नि.क्र.9 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.12 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराने तक्रारीत आयुक्त (कृषि), महाराष्ट्र शासन, पुणे यांना गैरअर्जदार म्हणून समाविष्ट न केल्यामुळे, सदर तक्रार विद्यमान मंचासमोर चालू शकत नाही. त्यामुळे, सदर तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली. गैरअर्जदार क्र.1 यांनी पुढे असे नमुद केले की, अर्जदार यांनी मृतकाचे कायदेशिर वारसदार यांना तक्रारीत समाविष्ट केलेले नाही. पोस्टमॉर्टम अहवालामध्ये मृतकाचा मृत्यु विषारी सापाने चावल्यामुळे झाला, असे नमुद केले आहे. परंतु, केमिकल रिपोर्ट सादर केलेला नाही. गैरअर्जदार क्र.3 यांनी, गैरअर्जदार क्र.2 मार्फत अर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदार क्र.1 कडे सादर केल्याचे दिसून येत नाही. गैरअर्जदाराने पुढे त्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 व 2 ही विमा कंपनी असून शासनाच्या वतीने गैरअर्जदार क्र.3 मार्फत शेतकरी विमा योजनेअंतर्गत दावे स्विकारतात. मात्र, अर्जदाराचे प्रकरण गैरअर्जदार क्र.1 च्या कार्यालयात आलेले नाही तसेच, त्याबाबतची माहिती गैरअर्जदार क्र.1 यांना देण्यात आलेली नाही. गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदाराचे प्रकरण गैरअर्जदार क्र.1 कडे पाठविले नसल्यामुळे, सेवेत त्रृटी असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सदर तक्रारीचे कारण दिनांक 10.10.2009 रोजी उदभवले असून, अर्जदार यांनी सदर तक्रार दिनांक 15.6.2016 रोजी दाखल केली आहे. सदर तक्रार मुदतबाहय असून,विलंब माफीकरीता अर्जदार यांनी कोणताही अर्ज सादर केलेला नाही. अर्जदार यांनी घटना घडल्यापासून विहित मुदतीचे आंत विमा म्हणजेच 90 दिवसांचे आंत दावा दाखल करणे आवश्यक होते. सदरची तक्रार मुदतबाहय असल्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली.
4. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.15 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, गैरअर्जदारक्र.1 ने राज्य शासनाकडून विमा प्रिमियम स्विकारुन जोखीम स्विकारली असल्यामुळे, अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 चे ग्राहक आहेत. गैरअर्जदार क्र.2 हे केवळ विमा सल्लागार असून, ते विनामोबदला शासनास मदत करतात. मयत रुक्माबाई केशव कुनघाडकरयांचा अपघात दिनांक 10.10.2009 ला झाला. त्याबाबतचा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.3 मार्फत गैरअर्जदार क्र.2 यांना दिनांक 24.2.2011 रोजी प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 कडे दिनांक 1.3.2011 रोजी सादर केला. सदरील दावा 90 दिवसाच्या वाढीव कालावधीनंतर प्राप्त झाल्या कारणाने दावा उशिरा दाखल केल्याचे नमुद करुन गैरअर्जदार क्र.1 यांनी दावा नामंजूर केला आहे, असे कार्यालयीन नोंदीनुसार दिसून येते. त्यामुळे, अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार क्र.2 विरुध्द खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली.
5. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.9 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, मयत रुक्माबाई केशव कुनघाडकर यांचा मृत्यु साप चावल्याने झालेला होता. त्यांचा विमा दाव्याबाबतचा प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी, चामोर्शी कार्यालयाकडे पत्र क्र.525 दिनांक 18.1.2011 अन्वये सादर केलेला होता. सदर प्रस्तावात त्रृटी आढळून आल्याने त्रृटींचे पुर्तता करुन गैरअर्जदाराकडे सादर केलेला आहे. परंतु, कंपनीने आजतागायत मंजूर की नामंजूर कळविलेले नाही.
6. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले तोंडी व लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 चा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून विमा पॉलिसीचा लाभ : होय
मिळण्यास पाञ आहे काय ?
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
7. अर्जदाराचे आईचे नावाने नि.क्र.2 नुसार दाखल दस्तऐवजावरुन सिध्द होते की, अर्जदाराच्या आईची शेतजमीन होती व आहे. तसेच, अर्जदार हा आईच्या आकस्मिक मृत्युनंतर शेतकरी जनता अपघात विमा दाव्याचा लाभार्थी आहे. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-
8. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन दिसून येते की, अर्जदाराच्या आईचा विषारी साप चावल्याने आकस्मिक मृत्यु झाला. गैरअर्जदार क्र.1 चे हे म्हणणे गृहीत धरता येत नाही की, त्यांना दावा प्राप्त झालेला नाही. कारण, गैरअर्जदार क्र.3 ने आपल्या लेखी उत्तरासोबत गैरअर्जदार क्र.1 ला दावा दिनांक 18.1.2011 रोजी मिळाल्याबाबतचे दस्तऐवज दाखल केले आहे. गैरअर्जदार क्र.1 चे हे म्हणणे की, अर्जदाराचे तक्रारीत गैरअर्जदार क्र.2 च्या लेखी उत्तरानुसार गैरअर्जदार क्र.2 ने विमा दावा गैरअर्जदार क्र.1 कडे पाठविल्याचे नमुद केले असल्यामुळे गैरअर्जदार क्र.1 चे हे म्हणणे की गैरअर्जदार क्र.2 मे.कबाल इंशुरन्स ला पार्टी केले नाही, हे गृहीत धरता येत नाही.
गैरअर्जदार क्र.1 चे हे म्हणणे गृहीत धरता येत नाही की, अर्जदाराने व्हिसेरा रिपोर्ट सादर केलेला नाही. कारण तज्ञ डॉक्टरांचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्युचे कारण स्पष्ट नमुद आहे ‘’मृतकाचा मृत्यु विषारी सापाने चावल्यामुळे झाला’’ व रिपोर्टमध्ये “No Viscera Preserved” अशी नोंद असल्यामुळे व व्हिसेरा रिपोर्ट देणे ही डॉक्टरांची जबाबदारी असल्याने, या कारणासाठी अर्जदारास जबाबदार ठरविणे योग्य नाही.
गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास विमा दावा मंजूर की नामंजूर केल्याबाबतत पत्राव्दारे कुठलीही सुचना न दिल्याने सदर तक्रार मुदतबाहय आहे, हे गृहीत धरता येत नाही.
एकंदरीत, गैरअर्जदार यांनी कोणतेही कारण स्पष्ट न करता व कोणतेही साक्ष पुरावे सादर न करता अर्जदाराचा विमा दावा निकाली काढलेला नाही व त्याबाबत कोणताही स्पष्ट खुलासा सादर केलेला नसल्यामुळे, गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराप्रती अनुचित व्यापार पध्दती अवलंबून न्युनतापुर्ण सेवा दिली असल्याचे या मंचाचे मत असल्यामुळे मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
9. या तक्रारीचे आदेश वरील विवेचनावरुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अंतिम आदेश –
(1)
(2)
1,00,000/- दावा दाखल केल्यापासून म्हणजेच दिनांक 26.4.2010
पासून, द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45
दिवसांत द्यावे.
(3)
त्रासापोटी रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- आदेशाची
प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(4)
(5)
गडचिरोली.
दिनांक – 11.01.2017.
(सादिक मो.झवेरी) ( रोझा फु.खोब्रागडे )
सदस्य अध्यक्ष (प्र.)