Maharashtra

Nagpur

CC/559/2017

SHRI. VIVEK PRABHAT TIWARI, THROUGH AUTH. REPRESENTATIVE OF ABHIJEET ASHOKA INFRASTRUCTURE PVT. LTD. - Complainant(s)

Versus

UNITED INDIA INSURANCE CO. LTD., THROUGH CHAIRMAN/ AUTHORIZED SIGNATORY - Opp.Party(s)

ADV. MRS. S.K. PAUNIKAR

13 Oct 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/559/2017
( Date of Filing : 02 Dec 2017 )
 
1. SHRI. VIVEK PRABHAT TIWARI, THROUGH AUTH. REPRESENTATIVE OF ABHIJEET ASHOKA INFRASTRUCTURE PVT. LTD.
OFF. AT, 79/4, PRASHANT NAGAR, AJANI, NAGPUR-12
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. UNITED INDIA INSURANCE CO. LTD., THROUGH CHAIRMAN/ AUTHORIZED SIGNATORY
OFF. AT, 24, WHITES ROAD, CHENNAI-600014
CHENNAI
TAMILNADU
2. UNITED INDIA INSURANCE CO. LTD., THROUGH DIVISIONAL MANAGER (DO-II)
19, AMBIKA HOUSE, DHARAMPETH, EXTENSION, SHANKAR NAGAR SQR., NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. MRS. S.K. PAUNIKAR, Advocate for the Complainant 1
 Adv. B.Lahiri/ D.Chatterjee/Shouche, Advocate for the Opp. Party 1
Dated : 13 Oct 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये -

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तो  फ्लायओव्‍हर ब्रिजेस अॅन्‍ड रोड इत्‍यादीचे बांधकाम करण्‍याचा व्‍यवसाय करतो. तक्रारकर्त्‍याने वैनगंगा नदिच्‍या प्रवेश रोडवर कारधा, जि, भंडारा येथे पुलाचे बांधकाम केले. पुलाचे बांधकाम BOT या तत्‍वावर करण्‍यात आले. Toll च्‍या वसुलीकरिता तक्रारकर्ता कंपनीने आवश्‍यक Infrastructure,   Toll Booth, Office इत्‍यादी विकसित केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून दि. 07.11.2013 ते  06.11.2014 या कालावधीकरिता Standard Fire and Special Perils Policy  पॉलिसी क्रं. 200/11/13/11/00000/783 अन्‍वये
  1. Road (Approach Road, Structural Work, Crash Barriers Etc.)
  2. Bridges, Civil Works Side Walls / Side Bars.
  3. Road Furniture and Protection Work (Toll Plaza, side walls / side bars, gantry and sign Boards, other structural and Civil works etc.)
  4. Buildings and office premises (Includes office buildings, fff, electrical installations, interior, office assets, AC. DG sets, Store items etc.)  

रुपये 61,59,00000/- करिता विमाकृत केले होते.

 

  1.       तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, ऑगस्‍ट 2014 च्‍या पहिल्‍या आठवडयात मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदिची पाण्‍याची पातळी वाढली होती आणि दि. 05.08.2014 ते 06.08.2014 ला रात्रीच्‍या दरम्‍यान जुन्‍या पुलावरुन पाणी वाहत होते. पाण्‍याची पातळी कमी झाल्‍यावर तक्रारकर्त्‍याला आढळले की, काही कठडयाचे  नुकसान (Railing damage) झाले आणि कठडयाचे  काही भाग पाण्‍यासोबत वाहून गेले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा प्रस्‍ताव सादर केल्‍यावर विरुध्‍द पक्षाने तपासणीकरिता सर्वेअर म्‍हणून संदिप मशरु याची नेमणूक केली व त्‍यांनी आपला सर्वे अहवाल दि. 01.07.2016 ला विरुध्‍द पक्षाकडे सादर केला. विरुध्‍द पक्षाने सर्वेअरच्‍या अहवालाच्‍या आधारावर तक्रारकर्त्‍याचा विमा दावा दि. 11.04.2017 ला नाकारला. 

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, करारनामानुसार उभय पक्षामध्‍ये वैनगंगा नदीवर मोठया पुलाचे बांधकाम करतांना आवश्‍यकतेनुसार प्रोजेक्‍टचे आणि सध्‍याच्‍या पुलाची देखभाल आणि दुरुस्‍ती कबूल करण्‍यात आली होती. तसेच सर्वबाबतीत प्रोजेक्‍टचे काम  Intery priner च्‍या खर्चाने पूर्ण करणे आहे. याचा अर्थ असा की, तक्रारकर्त्‍याला देण्‍यात आलेल्‍या प्रोजेक्‍टच्‍या कामामध्‍ये दुरुस्‍ती ( स्‍वच्‍छ, आकर्षक आणि सध्‍याच्‍या पुलाची देखभाल) इत्‍यादीचा समावेश होता. त्‍यामुळे पॉलिसीच्‍या शर्ती व अटीमध्‍ये सध्‍याचा पूल  आणि त्‍याचे (व्‍याप्तिक्षेत्र)कव्‍हरेजचा समावेश आहे,  त्‍यामुळे सर्वेअर त्‍याच्‍या निरीक्षणानुसार विभाजन करु शकत नाही. तसेच पॉलिसी मध्‍ये  सध्‍याचा पुल आणि करारातील पुल या दोन्‍ही वेगळया गोष्‍टी आहेत व सध्‍याचा (जुना) पुल याचा समावेश पॉलिसी मध्‍ये नाही.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, सर्वेअरच्‍या अहवालात नमूद आहे की, तपासणी दरम्‍यान जुन्‍या पुलाचे दोन्‍ही बाजुचे कठडे (रेलिंग) पैकी काही उखडले आणि काही गहाळ झाले आणि काही (क्षतिग्रस्‍त अवस्‍थे) डॅमेज कन्‍टींशन मध्‍ये होते व पुलाच्‍या कठडयाचा पॉलिसीमध्‍ये समावेश नसल्‍याचे नमूद केले आहे. पॉलिसीत खालीलप्रमाणे चार मुख्‍य मुद्दे नमूद आहेत.
  1. Road (Approach Road, Structural Work, Crash Barriers Etc.)
  2. Bridges, Civil Works Side Walls / Side Bars.
  3. Road Furniture and Protection Work (Toll Plaza, side walls / side bars, gantry and sign Boards, other structural and Civil works etc.)
  4. Buildings and office premises (Includes office buildings, fff, electrical installations, interior, office assets, AC. DG sets, Store items etc.) 

विमा पॉलिसीमधील वरील नमूद क्‍लॉज B मध्‍ये नमूद आहे की, Bridges, Civil Works Side Walls / Side Bars याचा पॉलिसीमध्‍ये समावेश आहे. तसेच क्‍लॉज C मध्‍ये नमूद Road Furniture and Protection Work (Toll Plaza, side walls / side bars, gantry and sign Boards, other structural and Civil works etc.) याचा ही पॉलिसी मध्‍ये समावेश आहे. विमा पॉलिसीमध्‍ये क्‍लॉज B मध्‍ये Bridges हा शब्‍द नमूद आहे. त्‍यामध्‍ये जुना पूल समाविष्‍ट आहे आणि other structural and Civil works etc चा सुध्‍दा समावेश आहे. ते हे दर्शविते की, संपूर्ण अस्तित्‍वात असलेले structure आणि construction याचा समावेश विमा पॉलिसीच्‍या मथळया अंतर्गत आहे. मोठया प्रोजेक्‍टकरिता पॉलिसी विकत घेतांना प्रत्‍येक छोटया मालमत्‍तेचा तपशील नमूद करणे शक्‍य नाही, त्‍यामुळे Fire Policy च्‍या (संज्ञासूचीनुसार)  नॉमेनक्‍लेचरनुसार विमा दावा करणा-याने पॉलिसीमधील मोठे हेड INR च्‍या किंमतीप्रमाणे स्‍पष्‍ट केलेले नाही. विमाधारकाने प्रत्‍येक छोटी-छोटी मालमत्‍ता अंतर्भूत करण्‍याकरिता संपूर्ण प्रोजेक्‍टचा विमा उतरविला होता. त्‍यामुळे इथे रेलींग ऑफ ब्रिज असे विशेष वाक्‍य नमूद करणे गरजेचे नाही. त्‍याचप्रमाणे सर्वेअरने त्‍याच्‍या सर्वे अहवालात दिलेला खुलासा ग्राहय धरला जाऊ शकत नाही.

  1.     तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने दि. 05/06.08.2014 ला सर्वेअरचे अहवाल दि. 01.07.2016 वर आक्षेप नोंदविला होता. सर्वे अहवालात असे अनेक मुद्दे आहेत की, त्‍यावर सर्वेअरने / वि.प.ने स्‍पष्‍टीकरण दिलेले नाही. अहवालातील मुद्दा क्रं. 15,  15.3 आणि 16.9 हे पूर्णपणे निराधार आहेत आणि त्‍यामध्‍ये गणना करण्‍यात चूक झालेली ( calculation mistake) आहे. विरुध्‍द पक्षाने विमा दावा नाकारतांना त्‍या चुकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहेत. तसेच आय.आर.डी.ए.च्‍या मार्गदर्शक सूचनेनुसार मा. सर्वोच्‍च न्‍यायालय आणि राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाच्‍या निर्णयानुसार सर्वेअरचा अहवाल हा घटना आणि त्‍याची तीव्रता समजावून घेण्‍याकरिता आहे म्‍हणून  सर्वेअरचा अहवाल हा विमा दावा नाकारण्‍याकरिता ग्राहय धरला जाऊ शकत नाही.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा सर्वेअरच्‍या अहवालाचा आधार घेऊन नाकारणे ही विरुध्‍द पक्षाची सेवेतील त्रुटी असून वि.प.चा निष्‍काळजीपणा आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष तक्रार दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केलेली आहे.

 

अ. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे.

 

आ. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विमा दाव्‍या पोटी रुपये 5,23,580/- व त्‍यावर 18 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम देण्‍याचा आदेश द्यावा.  

 

इ. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व तक्रारीचा खर्च ही द्यावा.

 

  1.       विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, सर्वेअरने त्‍याचा तज्ञ अहवाल दाखल केला आहे व तो सहजासहजी नाकारल्‍या जाऊ शकत नाही. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला नुकसान भरपाईचा दावा हा विमा पॉलिसी अंतर्गत येत नाही. नविन तसेच जुन्‍या पुलाची देखभाल ही त्‍यांच्‍या करारात आहे जर त्‍यांच्‍या जुन्‍या पुलाला काही झाले तर त्‍याची किंमत NHAI यांना मोजावी लागते, त्‍यामुळे जुन्‍या पुलाची किंमत विमा मुल्‍या अंतर्गत घेतली नाही. तसेच नुकसान झालेली मालमत्‍ता ही NHAI ची आहे, त्‍यामुळे विमाधारकाला त्‍याचा विमा काढण्‍यात फायदा नव्‍हता.
  2.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, विमाधारकाने पुनर्स्‍थापित करण्‍याकरिता नुकसान झालेल्‍या तारखेच्‍या आधिची बिले सादर केलेली आहे. विमाधारकाने  स्‍टॉक मधील जुने रेलिंगची (कठडयाची) नोंद असलेले रजिस्‍टर सादर केलेले नाही.  पुनर्स्‍थापित करिता पुरविण्‍यात आणि बसविण्‍यात आलेले रेलींगचे (कठडयाचे)  इनव्‍हाईस सादर केले. तक्रारकर्त्‍याने रेलींग हे नोंद असलेल्‍या रजिस्‍टर मधून वापरले असेल तर विमाधारकाने रेलींग बसविण्‍याकरिता लागलेल्‍या मजुरीची बिले सादर करणे आवश्‍यक होते. कारण नुकसान झालेल्‍या मालमत्‍तेचे निरीक्षण केल्‍यावर लक्षात येते की, नदीचे जुन्‍या पुलाचे कठडयाचे नुकसान झालेले आहे, परंतु विमा दाव्‍यातील दस्‍तावेज आणि सर्वेअरचा अंतिम सर्वे अहवाल दर्शवितो की, जुन्‍या पुलाची देखभाल हा प्रोजेक्‍टचा एक भाग आहे आणि तो तक्रारकर्ता करीत होता आणि मालमत्‍तेचा मालक विमाधारक नाही आणि तो विमाधारकाने बांधलेला नाही, त्‍यामुळे जुन्‍या पुलाची किंमत आणि त्‍याची मालमत्‍ता हा प्रोजेक्‍ट निविदाची किंमत नव्‍हती. परंतु त्‍याची देखभाल टोल फी मधून जमा झालेल्‍या रक्‍कमेतून विमाधारक करीत होता. विमाधारकाने जुन्‍या पुलाच्‍या रेलींगबाबत नुकसानभरपाईचा दावा केला  Stone pitching , filter media crash Barrier आणि रोड फर्निचरचे नुकसान विमा पॉलिसीत अंतर्भूत आहे, परंतु यामध्‍ये रेलींगचा समावेश नाही, त्‍यामुळे विमाधारक विमा दावा मिळण्‍यास पात्र नाही.
  3.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

अ.क्रं.                 मुद्दे                                            उत्‍तर   

1 तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक ठरतो काय?       होय

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला काय ?            होय

3. काय आदेश ?                                       अंतिम आदेशानुसार

    

  • निष्‍कर्ष   
  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत - तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून दि. 07.11.2013 ते  06.11.2014 या कालावधीकरिता Standard Fire and Special Perils Policy  पॉलिसी क्रं. 200/11/13/11/00000/783 अन्‍वये
  1. Road (Approach Road, Structural Work, Crash Barriers Etc.)
  2. Bridges, Civil Works Side Walls / Side Bars.
  3. Road Furniture and Protection Work (Toll Plaza, side walls / side bars, gantry and sign Boards, other structural and Civil works etc.)
  4. Buildings and office premises (Includes office buildings, fff, electrical installations, interior, office assets, AC. DG sets, Store items etc.) 

रुपये 61,59,00000/- करिता विमा काढला होता. ऑगस्‍ट 2014 च्‍या पहिल्‍या आठवडयात मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदिची पाण्‍याची पातळी वाढली होती आणि दि. 05.08.2014 ते 06.08.2014 ला रात्रीच्‍या दरम्‍यान जुन्‍या पुलावरुन पाणी वाहत होते. पाण्‍याची पातळी कमी झाल्‍यावर तक्रारकर्त्‍याला निदर्शनास आले की, काही कठडयांचे नुकसान (Railing damage) झाले आणि कठडयाचे काही भाग पाण्‍यासोबत वाहून गेले,  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने नुकसान भरपाईबाबत विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा प्रस्‍ताव सादर केला होता.  विरुध्‍द पक्षाने तपासणीकरिता नियुक्‍त केलेल्‍या सर्वेअर संदिप मशरु यांनी दि. 01.07.2016 ला आपला सर्वे अहवाल विरुध्‍द पक्षाकडे सादर केला होता व त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारला होता. नि.क्रं.2 (1) वर तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या पॉलिसीचे अवलोकन केले असता लक्षता येते की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून विमा पॉलिसी घेतांना त्‍यामध्‍ये Description of Policy of Property या मथळयाखाली खालीलबाबी नमूद आहेत.

  1. Road (Approach Road, Structural Work, Crash Barriers Etc.)
  2. Bridges, Civil Works Side Walls / Side Bars. तसेच तक्रारकर्त्‍याने नि.क्रं. 6 वर दाखल केलेले Section 1 detail tender notice (NIT) and qualifying criteria या मथळयाखाली scope of work मधील clause 12 मध्‍ये  Repairs of existing bridge   नमूद आहे.   

 

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून पॉलिसी घेतांना संपूर्ण प्रोजेक्‍टचा विमा काढला होता त्‍यामध्‍ये वैनगंगा नदीवर BOT तत्‍त्‍वावर बांधकाम करावयाचा पुल व जुन्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या पुलाची दुरुस्‍ती व देखभाल याचा समावेश आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा हा सर्वेअरने सादर केलेल्‍या सर्वे अहवालातील क्‍लॉज 12.0,  12.1, 12.2  मध्‍ये खालीलप्रमाणे बाबी नमूद केलेल्‍या आहेत, त्‍यानुसार नाकारला असल्‍याचे नमूद केले आहे.

Cause

12.1   From the nature of damages, inspection of the affected assets it was found that overflowing of the river damaged some of the Old Bridge railings.

12.2   But on checking the policy we found that insured was covering the executed project of New Bridge with approach road constructed by them. And Old bridge and its railing was not part of that insured New Bridge assets hence the claim preferred loss is not covered under the policy held by the insured and so claim is not payable.

तसेच सर्वेअर अहवालातील क्‍लॉज नं. 11.5 मध्‍ये खालीलप्रमाणे नमूद आहे की, 11.5  Policy head granted cover for Stone pitching,  Filter media, Crash Barrier (On the side of the approach road of new bridge),  Road furniture. None of these head covers the ‘Railing of a bridge’ . Hence insured couldn’t  submit the justification for coverage of the Railing of Old bridge. .

  1.      तक्रारकर्त्‍याने नि.क्रं. 2 वर दाखल केलेल्‍या विमा पॉलिसीत विमाकृत केलेल्‍या डिस्‍क्रिपशन ऑफ पॉलिसी या मथळयाखाली एका पेक्षा जास्‍त पुल (Bbridges) नमूद आहे व त्‍यामध्‍ये जुन्‍या पुलाचा समावेश आहे व पुलाचे सिव्‍हील वर्क, साईड वॉल / साईड बार इत्‍यादीचा समावेश असल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी  Suresh Jain VS Universal Sompo Gen Insurance Co. Ltd. 2016 (2)  CLT 409 या न्‍यायनिवाडयाचा आधार घेतलेला असून तो योग्‍य आहे. विरुध्‍द पक्षाने पॉलिसीमधील सर्व अटींचे अवलोकन करणे आवश्‍यक असतांना केवळ विरुध्‍द पक्षाने सर्वेअर रिपोर्टवरुन तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारणे ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते. तसेच पुलावरील ब्रिजचा विमा काढतांना इतर सर्व छोटी छोटी साधन नमूद करणे शक्‍य नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने सर्वेअरच्‍या अंतिम अहवालामध्‍ये रेलिंग ऑफ ब्रिज नमूद नाही या कारणास्‍तव विमा दावा नाकारुन तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असल्‍याचे दिसून येते.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विमा दावा पोटी रक्‍कम रुपये 5,23,580/- व त्‍यावर दिनांक 11.04.2017 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्‍के  दराने व्‍याजासह रक्‍कम द्यावी.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला शारीरिक व मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- द्यावे.
  4. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत करावी.
  5.  उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.  
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.