निकालपत्र :- (दि.16.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2 व 3 यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.1 यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, सामनेवाला क्र.2 यांचे वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला क्र.1 व 3 गैरहजर आहेत. सबब, गुणदोषावर प्रस्तुतची तक्रार निकाली काढीत आहोत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला क्र.1 व 2 या विमा कंपनी आहेत, इलम सिस्टीम लि. ही कंपनी कोल्हापूर येथे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे एजंट म्हणून काम करीत होती. त्यामध्ये सामनेवाला क्र.3 हे मॅनेजर म्हणून काम करीत होते. तक्रारदारांचा मुलगा, दयानंद तुकाराम कुंभार यांनी दि.30.10.2001 रोजी सामनेवाला क्र.1 कंपनीकडून त्यांचे कोल्हापूर येथील एजंट, इलम सिस्टीम इंडिया यांचेकडून रक्कम रुपये 35/- चा हप्ता भरुन रक्कम रुपये 50,000/- चा वैयक्तिक अपघात स्वरुपाचा विमा घेतला आहे. सदर पॉलीसीचा कालावधी दि.31.10.2001 ते 29.10.2002 असा आहे. तक्रारदारांचा मुलगा, दयानंद यांने सदर पॉलीसीच्या भरलेल्या हप्त्याच्या रक्कमेची पावती दिली आहे. सदर पॉलीसीच्या कालावधीमध्ये तक्रारदारांच्या मुलाचा दि.21.02.2002 रोजी अपघाती मृत्यू झालेला आहे. त्याचवेळी सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन तक्रारदारांनी सामनेवाला क्र.3 मार्फत सामनेवाला क्र.1 यांना कळविले व रक्कम रुपये 50,000/- ची मागणी केली. परंतु, सामनेवाला यांनी तक्रारदारांचा सदरचा क्लेम नाकारला. सबब, विमा क्लेमची रक्कम रुपये 50,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह व कोर्ट खर्च तक्रारदारांना मिळणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ईलम इंडिया यांनी दिलेली पावती, पॉलीसी सर्टिफिकेट, संतोष कांबळे यांचा जबाब, मृत्यूचा दाखला, तक्रार क्र.710/02 मधील निकाल, सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.2 विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारीत उल्लेख केलेली पॉलीसी तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनीकडून घेतलेली नाही. ईलम सिस्टीम लि. यांचेविरुध्द सी.बी.आय. चौकशी सुरु आहे. सामनेवाला विमा कंपनीला अनावश्यक पक्षकार केले आहे. (5) सामनेवाला क्र.3 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, प्रस्तुत सामनेवाला हे फक्त नोकर असलेने तक्रारदारांचे क्लेमाबत काही माहिती नाही. तक्रारदारांनी तक्रारीत उल्लेख केलेली इलम सिस्टीम कंपनी यांना पार्टी करणे जरुरी होते. सबब, तक्रारदारांची तक्रार काढून टाकणेत यावी व नुकसान भरपाई म्हणून रुपये 5,000/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (6) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेली इलम सिस्टीम कंपनीने पॉलीसीचा हप्ता रुपये 35/- भरुन घेतला असलेची पावती तक्रारदारांनी दाखल केली आहे. सदर पावतीवर सामनेवाला विमा कंपनीच्या मार्फत प्रिमियमची रक्कम स्विकारली आहे याबाबत कोणताचा मजकूर दिसून येत नाही. तसेच, युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी लि., विभागीय कार्यालय, 1454, राईट टाऊन, जबलपूर अशी पॉलीसी दिसून येते. प्रस्तुत प्रकरणी इलम सिस्टीम कंपनीस पक्षकार केल्याचे दिसून ये नाही. प्रस्तुत तक्रारीचा विचार करता तक्रारदारांचा मुलगा, दयानंद तुकाराम कुंभार याच्या नांवे पॉलीसी घेतल्याचा कोणताही पुरावा प्रस्तुत प्रकरणी दिसून येत नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीत कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. सबब आदेश. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. (2) खर्चाबाबत आदेश नाहीत. (4) प्रस्तुतचा आदेश ओपन कोर्टामध्ये अधिघोषित करणेत आला.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |