Maharashtra

Satara

CC/15/258

M/s Shubhangi Tours & Travels Pvt Ltd, shti Akshay Shankar Beloshe - Complainant(s)

Versus

United India Insurance Co. Ltd, Senior Divisional manager - Opp.Party(s)

Chavan

30 Sep 2016

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/15/258
 
1. M/s Shubhangi Tours & Travels Pvt Ltd, shti Akshay Shankar Beloshe
Ruighar, At post Bhilar, Tal Javali
Satara
MH
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance Co. Ltd, Senior Divisional manager
Yashodhan Complex, Front of Science college, Sadar BAzar Satara
Satara
MH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MILIND PAWAR HIRUGADE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
  HON'BLE MRS.SUREKHA HAJARE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 30 Sep 2016
Final Order / Judgement

                                  तक्रार अर्ज क्र. सीसी /258/2015

                                  तक्रार दाखल दि. 15/10/2015

                                  तक्रार निकाली दि. 30/09/2016

                               निकाल कालावधी – 11 महिने 6 दिवस

 

मे. शुभांगी टूर्स अॅण्‍ड ट्रॅव्‍हल्‍स प्रोप्रा

श्री. अक्षय शंकर बेलोशे

रा. रुईघर, पो. भिलार, ता. जावली, जि. सातारा.                ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

मा. डिव्‍हीजनल  मॅनेजर युनायटेड इंडिया इन्‍श्‍युरन्‍स कं. लि.

यशोधन कॉम्‍प्‍लेक्‍स, सायन्‍स  कॉलेज समोर, सदरबझार,

सातारा.                                                      ....  जाबदेणार.     

**************************************************************************

                        तक्रारदार     –   अॅड चव्‍हाण 

                        जाबदार क्र.  –    अँड. गोवेकर

**************************************************************************                   

                    //  निकालपत्र  //

                        (पारीत दिनांक : 30/09/2016 )

         (द्वारा- श्री. मिलींद पवार (हिरुगडे),अध्‍यक्ष यानी पारित केला)

 

1)          तक्रारदाराने  जाबदारांविरुध्‍द ग्राहक संरक्षण  कायदा 1986 चे कलम 12 अन्‍वये  प्रस्‍तुत तक्रार  दाखल केलेली  आहे.

      तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये उपस्थित केलेला विवाद थोडक्‍यात असा आहे की,  तक्रारदारांनी स्‍वतःच्‍या  उदरनिर्वाहासाठी टाटा इंडिगो कार क्र. एमएच – 11/ बीडी -  5360 ही  2012 साली खरेदी केली.  या वाहनाचा विमा जाबदेणार यांचेकडे  पॉलीसी क्र. 1613073114 पी 111749715 असून दिनांक  25/03/2015 ते 24/03/2016 या कालावधीसाठी उतरविला होता. सदर वाहनाचा  विमा हप्‍ता  रु. 19,902/-  देऊन जाबदेणार यांच्‍या  कोरेगांव शाखेत सदर वाहनाची  पॅकेज  पॉलीसी घेण्‍यात आली.   दिनांक 17/05/2015  रोजी तक्रारदार यांचा ड्रायव्‍हर शरद सिताराम  बेलोशे  महाबळेश्‍वरला जात असताना  जेवणाचा डबा घरी विसला म्‍हणून    ड्रायव्‍हर गाडीतून खाली उतरला व गाडीचे  दार लावले.  सेंट्रल  लॉक असल्‍यामुळे   दार लॉक झाले, म्‍हणून पुन्‍हा दार उघडण्‍याचा प्रयत्‍न  केला असता  दार उघडले नाही व  गाडी उतार  असल्‍यामुळे  खाली घसरत जावून  तालीवरुन पलटी झाली व डोंगर  उतारावरील  घरामध्‍ये  व तालीमध्‍ये  अडकली.  त्‍यामुळे सदर गाडीचे रक्‍कम रु. 1,80,000/- नुकसान झाले  आहे.  तक्रारदार यांना  वाहनाच्‍या अपघातापूर्वी दिनांक 9/5/2015 ते 13/5/2015 या कालावधीत त्‍यांचा उजवा हात फ्रॅक्‍चर झाल्‍यामुळे वाई, मिशन हॉस्‍पीटलमध्‍ये  अॅडमिट होते.  दिनांक 17/5/2015 रोजी ड्रायव्‍हरने  अपघाताची झाल्‍याचे सांगितल्‍यावर  त्‍यांनी  पांचगणी पोलीस स्‍टेशनला कळविले. घटनेमध्‍ये कोणतीही जीवीत हानी न अगर जखमी न झाल्‍याने पोलीसांनी कारवाई केली नाही. त्‍यानंतर जाबदेणार यांचे कोरेगांव  शाखेला सदर अपघाताची  सूचना दिली.  जाबदारांच्‍या सूचनेप्रमाणे  संबंधीत सर्व  कागदपत्रांसहीत इन्‍श्‍युरन्‍स पॉलीसी आणि क्‍लेम फॉर्म जाबदारांना भरुन देण्‍यात आला. त्‍यानंतर जाबदारांच्‍या संबंधीत डिपार्टमेंटकडून तक्रारदारांच्‍या वाहनाचा सर्व्‍हे  करण्‍यात आला.  जाबदारांच्‍या सूचनेप्रमाणे  तक्रारदार यांनी सदरच्‍या वाहनाची  पंडित अॅटोमोटीव्‍ह कं. वर्कशॉपमध्‍ये दुरुस्ती करुन घेतली असता त्‍याचा खर्च रक्‍कम रु. 2,01,600/- झाला आहे.  वाहनाच्‍या दुरुस्‍तीचे इस्‍टीमेट व संबंधीत सर्व पूर्तता केली होती.   अशी वस्‍तुस्थिती  असतानाही जाबदेणार यांनी  कोणतेही संयुक्‍तीक कारण नसताना, कोणत्‍याही अटींचा व तरतुदींचा भंग झाला नसताना तक्रारदारांचा  Closing your claim file on account of following reason. Breach of Policy conditions material to loss ( Condition no. 5)  नुसार दिनांक  18/09/2015 रोजी नोटीस देवून ओन डॅमेज क्‍लेम नाकारला असल्‍याचे  तक्रारदारास कळविले.

            तरी तक्रारदारांची विनंती की, ओन डॅमेज  क्‍लेम रु. 1,80,000/-  दि. 18/09/2015 पासून 12 % दराने देण्‍याचा जाबदारांना हुकूम व्‍हावा. शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- तक्रारदार अर्जाचा खर्च रु. 5,000/- आणि इतर झालेला खर्च रु. 10,000/- इत्‍यादी मागणी केली आहे.

 

      तक्रारदारांनी आपल्‍या तक्रार अर्जाच्‍या पुष्‍ठयर्थ  निशाणी – 2 कडे शपथपत्र,  निशाणी – 5 कडे विमा पॉलिसी/ आर. सी. बुक, ड्रायव्‍हरचे ड्रायव्‍हींग लायसन्‍स, विमा दावा नाकारल्‍याचे पत्र, तक्रारदाराचे दवाखान्‍याचे बिल, वाहनाचे फोटो, निशाणी – 15 कडे  गाडी दुरुस्‍तीचे  बिल   इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.

 

(2)     जाबदेणार यांना मंचाची नोटीस प्राप्‍त झाले नंतर  जाबदेणार यांनी त्‍यांचे वकीला मार्फत त्‍यांची लेखी कैफियत शपथपत्र स्‍वरुपात दाखल केली आहे.  त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये जाबदेणार यांनी असे नमुद केले आहे की,    तक्रारदाराची टाटा इंडिगो कार क्र. एमएच – 11/ बीडी -  5360 या वाहनाचा विमा जाबदेणार यांचेकडे  पॉलीसी क्र. 1613073114 पी 111749715 असून दिनांक  25/03/2015 ते 24/03/2016 या कालावधीसाठी उतरविला होता हा मजकूर खरा व बरोबर  आहे. दिनांक 17/5/2015 रोजी सदर अपघातातील वाहन  अपघाताच्‍या वेळी चालवित असलेले ड्रायव्‍हर श्री.  शरद सिताराम बेलोशे हे गाडीचे इंजिन चालू कंडीशनमध्‍ये   ठेवून जेवणाचा डबा  विसरला म्‍हणून गाडी बंद न करता  व कोणतीही काळजी न घेता चढाला  असल्‍यामुळे  मागील बाजूस घसरुन गेली व 8 ते 9 फुट  खड्डयात  जावून पडली. ड्रायव्‍हरने दक्षता न घेतल्‍यामुळे सदरच्‍या वाहनाचा अपघात झाला असल्‍याने पॉलिसीच्‍या  अटी व शर्ती नं. 5 नुसार अटींचा भंग केला आहे.  कंडीशन क्र. 5 :  The Insured shall take all reasonable steps to safeguard the  vehicle insured from loss or damage and to maintain it in efficient condition and the company shall have at all times free  and full access to examine the vehicle insured or any part thereof or any driver or employee of the insured.  In the event  of any accident or breakdown, the vehicle insured shall not be left unattended without proper precautions being taken to prevent further damage or loss and  if the vehicles insured bed  before the necessary repairs are effected, any extension of the damage or any further damage to the  vehicle shall be entirely at the insured own risk.  पॉलिसीतील कलम 5  प्रमाणे  वाहन अनअटेन्‍डेड  ठेवल्‍यामुळे  तक्रारदाला  क्‍लेम देण्‍याची जबाबदारी  नाही.  त्‍यामुळे योग्‍य कारणावरुन तक्रारदाराचा क्‍लेम नामंजूर केलेला आहे.  दिनांक 18/09/2015 रोजी क्‍लेम नामंजूरीचे  तक्रारदारास पत्र पाठवून  कळविले आहे.   तरी तक्रारदाराचा प्रस्‍तुतचा अर्ज खर्चासहीत फेटाळण्‍यात यावा अशी मागणी जाबदेणार यांनी केली आहे.

     

      जाबदेणार यांनी निशाणी – 19 कडे सर्व्‍हे रिपोर्ट व त्‍याचे  असेसमेंट,  निशाणी – 22 कडे विमा पॉलिसीची प्रत, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केले आहे.

 

3.    तक्रारदार यांची तक्रार, जाबदेणार यांचे लेखी म्‍हणणे, उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्तिवादाचे अवलोकन केले असता, तसेच तक्रारदार यांचे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्‍यानंतर तक्रारीमध्‍ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.

            मुद्दे                                 उत्‍तर

1. जाबदेणार यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर करुन

  त्रुटीयुक्‍त सेवा   दिल्‍याचे सिध्‍द होते काय ?                        होय.    

2. तक्रारदार विमा रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?                  होय. 

3. काय आदेश ?                                        अंतिम आदेशाप्रमाणे.

                // कारणमीमांसा //

4.    मुद्दा क्र. 1 व 2  :-  तक्रारदार यांच्‍या टाटा टाटा इंडिगो कार क्र. एमएच – 11/ बीडी -  5360 करिता या वाहनाचा विमा जाबदेणार यांचेकडे  पॉलीसी क्र. 1613073114 पी 111749715 असून दिनांक  25/03/2015 ते 24/03/2016 या कालावधीसाठी विमा संरक्षण दिल्‍याविषयी उभय पक्षकारांमध्‍ये विवाद नाही.  विमा कालावधीमध्‍ये दि. 17/05/2015           रोजी तक्रारदार यांच्‍या विमा संरक्षीत वाहनाचा अपघात झाल्‍याबाबत उभयतांमध्‍ये वाद नाही. वाहन अपघातानंतर तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्‍याकडे विमा दावा दाखल केल्‍याबाबत व  जाबदेणार यांनी त्‍यांचा विमा दावा  दिनांक 18/09/2015  नामंजूर केल्‍याबाबत उभय पक्षकारांमध्‍ये विवाद नाही.

           जाबदेणार यांचे दि. 18/09/2015  रोजीचे विमा दावा नामंजूर करणारे पत्र अभिलेखावर दाखल आहे. त्‍यामध्‍ये  Closing your claim file on account of following reason. Breach of policy condition –Material to use [condition to use ] चा भंग झाल्‍याचे

 

 कारण देऊन विमा दावा नामंजूर केल्‍याचे निदर्शनास येते. उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता, विरुध्‍द पक्ष यांनी विमा दावा नामंजूर करुन ‘सेवेतील त्रुटी’ निर्माण केली आहे काय ?  हा मुद्दा उपस्थित होतो.  जाबदेणार यांनी  विमा पॉलिसीमधील अट क्र. 5 चा आधार घेवून  गाडीची योग्‍य काळजी व सुरक्षिता जपली नाही असा बचाव घेवून  गाडीचे  अपघातास तक्रारदारास जबाबदार  धरुन विमा दावा नाकारला आहे.  याबाबत  अपघातावेळी झालेल्‍या घटनेचा परामर्श घेणे  मे. मंचास न्‍यायोचित वाटते.  अपघात घटनेवेळी तक्रारदार यांच्‍या ड्रायव्‍हरने  जेवणाचा डबा आणण्‍यासाठी  गाडीतून उतरुन खाली गेला तेवढयात गाडी  पुढे गेली मात्र सेन्‍ट्रल लॉक  असल्‍यामुळे दार उघडले नाही व गाडी उतारावरुन  घसरुन जावून  अपघात झाला असे असले तरी  या ठिकाणी हे नमूद करणे भाग आहे की, तक्रारदार यांच्‍या  गाडीचे नुकसान होण्‍यामागे तक्रारदार हे जबाबदार नाहीत. ड्रायव्‍हरने  अपघात घडत असताना गाडी थांबवण्‍याचा प्रयत्‍न केला मात्र  सेन्‍ट्रल लॉक झाल्‍यामुळे  त्‍याला गाडी  थांबवता आली नाही म्‍हणजे त्‍यान प्रयत्‍न केला होता  पण त्‍याला अपयश आले. म्‍हणजे  गाडीच्‍या अपघातास निष्‍काळजीपणा ही बाब कारणीभूत नाही. निर्विवादपणे झालेला अपघात, वाहनाचे नुकसान व जाबदेणार यांच्‍या मते तक्रारदार यांनी पॉलिसीतील तरतुदीचा केलेला भंग यांचा एकमेकांशी थेट कोणताही संबंध येत नाही. तक्रारदार  यांच्‍या ड्रायव्‍हरकडून झालेली चूक ही केवळ तांत्रिक चूक आहे आणि त्‍या चुकीस विमा पॉलिसीतील तरतुदींचा मुलभूत भंग गृहीत धरता येणार नाही. याबाबत मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने ‘बी.व्‍ही. नागराजू /विरुध्‍द/ ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कं.लि.’ या निवाडयातील न्‍यायिक प्रमाणानुसार  विमा कंपनी पॉलिसीतील अटीकडे अत्‍यंत कठोरपणे न पाहता पॉलिसी कराराच्‍या मुख्‍य हेतूकडे लक्ष दिले पाहिजे. प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये जाबदेणार यांनी पॉलिसी कराराच्‍या मुळ उद्देशाकडे दुर्लक्ष करुन तांत्रिक बाब पुढे केलेली आहे आणि विमा रक्‍कम देण्‍याचे दायित्‍व अमान्‍य केलेले असून जी त्‍यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे.

          तक्रारकर्ता यांनी नि.  15 कडे अपघातग्रस्‍त वाहनामध्‍ये दुरुस्‍ती बिले हजर केलेली  आहेत. त्‍याचे अवलोकन करता एकुण रु.  201550 /- एवढा खर्च तक्रारकर्ता यांनी केलेला दिसतो. तक्रारदार यांच्‍या वाहनाकरिता रु. 398125  /- रकमेचे विमा संरक्षण दिलेले आहे.  हे विमा पॉलिसीवरुन दिसून येते.  जाबदेणार यांनी नियुक्‍त केलेले सर्व्‍हेअर व लॉस असेसर यांच्‍या सर्व्‍हे रिपोर्टप्रमाणे वाहनाच्‍या नुकसानीकरिता रु 143499   /- नुकसान भरपाई निश्चित केलेली आहे   . मात्र प्रत्‍येक प्रकरणात सर्व्‍हेअर रिपोर्ट हा जरी महत्‍वाचा भाग असला तरी विमा धारकांनी दुरुस्‍ती पोटी दिलेली बिले यांचे कडे दुर्लक्ष करता येवु शकत नाही. 

याबाबत मा.राष्‍ट्रीय आयोगाने.  I (2012) CPJ 376 (NC)

NATIONAL INSURANCE COMPANY LTD…..V/s…..NAINA UN-EMPLOYED TRANSPORT,CO-OPERATIVE SOCIETY LTD.  या निवाडयामध्‍ये

 Consumer Protection Act,1986—Section 14(1)(d), 21(b)—Insurance – Accident—Vehicle damaged—Surveyor appointed—Refund of repair charges—Genuine Bills—Dismissed—Appeal before State Commission—Allowed and petitioner was directed to pay Rs.1,56,434/- Surveyor assessed loss amounted to Rs.21,577/- only—Hence revision—Report of Surveyor is important piece of evidence and has to be given due weight but it is not sacrosanct and can be displaced by complainant by leading cogent and trustworthy evidence to contrary – Respondent had placed the bona fide bills given by repairer as well as by spare part suppliers to establish—Petitioner has not placed any material to challenge authority and veracity of bills—No reason to discard bills of repair and spare part suppliers—No infirmity in order passed by For a below—Order upheld.

          या निवाडयामध्‍ये विमा धारकानी दाखल केलेली दुरुस्‍ती व स्‍पेअर पार्टसची बिले दुर्लक्षीत केली जावु शकत नाहीत असे स्‍पष्‍ट नमुद केले आहे.त्‍यामुळे प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्ता यांनी सदर अपघातग्रस्‍त वाहनाचे दुरुस्‍तीपोटी केलेला खर्च रु. 201550/- या बिलांकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे मा. न्‍यायमंचास वाटते.

            जाबदेणार यांचे लेखी जबाबानुसार जाबदेणार यांनी नियुक्‍त केलेले सर्व्‍हेअर व लॉस असेसर यांच्‍या सर्व्‍हे रिपोर्टप्रमाणे वाहनाच्‍या नुकसानीकरिता रु 143499   /- नुकसान भरपाई निश्चित केलेली आहे   परंतु सदर सर्व्‍हे रिपोर्टे हा प्रतिज्ञापत्रावर दाखल केलेला नाही, या बाबत…. मा.राष्ट्रीय आयोगाने’   I 2012 CPJ 538 NC –    NATIONAL  INSURANCE COMPANY LTD……V/S……MOHD.ISHAQ  &  ORS.                             

या निवाडयामध्‍ये     Consumer Protection Act, 1986 –Section 2(1)(g), 14(1) (d), 21(b) –Insurance—Accident—Repair cost of vehicle claimed—Surveyor appointed – Non-claimed—Surveyor appointed—Non-settlement of claim—Non-co-operation of complainant alleged—District Forum allowed complaint- State Commission dismissed appeal—Hence revision—Contention, non settlement of claim was because of failure on part of insured himself to submit requisite document—not accepted—For a below very rightly rejected report of Surveyor on ground that it is not supported by affidavit of its author

          या मध्‍ये सर्व्‍हेअर रीपोर्ट हा शपथपत्रावर दाखल करणे आवश्‍यक असल्‍याचे नमुद केले आहे परंतु प्रस्‍तुत प्रकरणात विरुध्‍द पक्ष यांनी सर्व्‍हे रिपोर्टे हा प्रतिज्ञापत्रावर दाखल केलेला नाही.त्‍यामुळे सदर विरुध्‍द पक्ष यांचा सर्व्‍हे रिपोर्ट पुराव्‍याचे कामी वाचता येवु शकत नाही असे मा.मंचाचे मत आहे.

       उपरीनिर्दीष्‍ठ  निवाडयातील न्‍यायिक तत्‍वानुसार तक्रारकर्ता यांचे दुरुस्‍ती बिलापोटी मागणी केलेली रक्‍कम रु. 180000/-त्‍यावर विमा दावा नामंजूर केल्‍याच्‍या तारखेपासून म्‍हणजे दिनांक 18/09/2015 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने मिळविण्‍यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्‍ही आलो आहोत. वरील विवेचनावरुन आम्‍ही मुद्दा क्र.1 त 3 चे उत्‍तर होकारार्थी दिले आणि शेवटी खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.

// आदेश //

         1.   तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

                   2.    जाबदेणार यांनी तक्रारदार यांना  टाटा इंडिगो - वाहन क्र. एमएच – 11/  

                  बीडी -  5360  चे तक्रारदार यांनी  मागितलेली अपघात विमा रक्‍कम रु.                  

                  1,80,000/- (अक्षरी रुपये एक लाख ऐंशी हजार फक्‍त) द्यावेत. तसेच

                  प्रस्‍तुत रकमेवर विमा दावा नाकारल्‍यापासून  म्‍हणजे दि. 18/09/2015             

                  पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज

                  द्यावे.

            3.    जाबदेणार यांनी तक्रारदार यांना  मानसिक, शारीरिक त्रासापोटी आणि

तक्रार खर्चापोटी रु. 3,000/- द्यावेत.

            4.    जाबदेणार यांनी उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्‍तीपासून

                  तीस दिवसात करावी.  

5.    उभय पक्षकारांना आदेशाची प्रत नि:शुल्‍क द्यावी.

 

(सौ.सुरेखा हजारे)   (श्री. श्रीकांत कुंभार)      (श्री.मिलींद पवार (हिरुगडे) )

         सदस्‍य              सदस्‍य                     अध्‍यक्ष

            सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, सातारा

 

ठिकाण : सातारा

दिनांक :30/09/2016           

 
 
[HON'BLE MR. MILIND PAWAR HIRUGADE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[ HON'BLE MRS.SUREKHA HAJARE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.