Maharashtra

Nanded

CC/08/144

Prakash Venkati Wattamwar - Complainant(s)

Versus

United India Insurance Co Ltd - Opp.Party(s)

C S Deshmukh

30 Aug 2008

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/144
1. Prakash Venkati Wattamwar R/o Old Mondha, NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. United India Insurance Co Ltd Guru Complex, G G Road, NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 30 Aug 2008
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  144/2008.
                           प्रकरण दाखल तारीख   - 09/04/2008
                           प्रकरण निकाल तारीख - 30/08/2008
समक्ष -   मा.श्री.विजयसिंह राणे.               - अध्‍यक्ष.
         मा.श्रीमती.सुजाता पाटणकर           - सदस्‍या.
                  मा.श्री.सतीश सामते              - सदस्‍य.
 
प्रकाश पि. व्‍यंकटी वटटमवार
वय 55 वर्षे धंदा व्‍यवसाय                                     अर्जदार.
रा. जुना मोंढा, नांदेड.
     विरुध्‍द.
 
युनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी लि.
शाखा नांदेड, तर्फे व्‍यवस्‍थापक,
कार्यालय, गुरु कॉम्‍ल्‍पेक्‍स, जि. जि. रोड,
नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील           - अड.चंद्रशेखर देशमूख
गैरअर्जदार   तर्फे वकील         - अड.एस.पी.औढेंकर.
                      
                         निकालपञ
             (द्वारा - मा.श्री. सतीश सामते, सदस्‍य )
 
              गैरअर्जदार यूनायटेड इंडिया इन्‍शूरन्‍स कंपनी यांनी नूकसान झालेल्‍या मालाची किंमत कमी केली व काही कारण नसताना क्‍लेम नामंजूर केला ही तक्रार घेऊन अर्जदाराने हे प्रकरण दाखल केले आहे, ते खालील प्रमाणे आहे,
              अर्जदार यांचा जूना मोंढा येथे व्‍यंकट टेंडींग कंपनी च्‍या नांवाने गूळ विक्रीचा व्‍यवसाय आहे व माल साठविण्‍यासाठी त्‍यांनी गोदाम घेतलेला आहे व तेथे हे गूळ साठवितात. येथे मालाच्‍या सूरक्षितेसाठी गैरअर्जदार यांच्‍याकडे पॉलिसी नंबर 23600/11/05/11/00000609 या पॉलिसीद्वारे दि.20.11.2005 ते 25.11.2006 या कालावधीसाठी विमा उतरविला आहे. मालाचे आगीपासून, पूरापासून संरक्षण देण्‍याची हमी गैरअर्जदार यांनी घेतलेली आहे. दि.4.8.2006 रोजीच्‍या राञी अचानक गोदावरी नदीला पूर आला व त्‍या पूराचे पाणी गूळ साठवलेल्‍या गोदामात खोलगट भागातून शिरले व आतील गूळाचा माल पूर्णतः खराब झाला व अर्जदाराचे रु.2,57,500/- नूकसान झाले. सदरील नूकसान बददल तहसिल कार्यालय यांना सूचना दिली व गैरअर्जदार यांना देखील घटने बददल कळविण्‍यात आले. तहसिल कार्यालय यांनी गोदामातील मालाची पाहणी करुन झालेल्‍या नूकसानीबददल पंचनामा केला. यानंतर गैरअर्जदार यांच्‍याकडे नूकसान भरपाई मिळण्‍यासाठी सर्व आवश्‍यक कागदपञासह अर्ज दिला. यानंतर गैरअर्जदार यांनी श्री. कीशोर पिसे  यांना सर्व्‍हेअर म्‍हणून पाठविले व त्‍यांनी अर्जदाराच्‍या माघारी चूक पाहणी करुन खोटा अहवाल गैरअर्जदार यांना सादर केला. अर्जदारानी नूकसानीच्‍या दिवशी गोदामात किती माल होता याबददल बँकेचे प्रमाणपञ, गूळ खरेदी केल्‍याच्‍या पावत्‍या, इत्‍यादी आवश्‍यक कागदगपञ दिली आहेत. यानंतरही गैरअर्जदारांनी अर्जदाराचा क्‍लेम दिला नाही. म्‍हणून दि.5.12.2007 रोजी वकिलामार्फत त्‍यांना कायदेशीर नोटीस पाठविण्‍यात आली. यांला ही गैरअर्जदार यांनी खोटे उत्‍तर दिले. अर्जदार यांचा 2006 पासून व्‍यापार या कारणामूळे बंद करण्‍याची वेळ आलेली आहे. त्‍यामूळे  अर्जदाराची मागणी आहे की, त्‍यांचे झालेले मालाचे नूकसान रु.2,57,500/- शिवाय दि.2.8.2005 पासून 18 टक्‍के व्‍याजाने रक्‍कम मिळावी तसेच मानसिक ञासाबददल रु.25,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
              गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले, त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केले आहे. त्‍यांना विमा पॉलिसी बददल आक्षेप नाही. परंतु तक्रार अर्जातील परिच्‍छेद क्र.4 मध्‍ये दिलेल्‍या गूळाच्‍या भावावीषयी व साठवणी बददल आक्षेप आहे. अर्जदाराकडून सूचना मिळाल्‍याबरोबर त्‍यांनी त्‍याचे सर्व्‍हेअर श्री. कीशोर पिसे यांना पाठविले व त्‍यांनी दि.9.8.2006 रोजी जायमोक्‍यावर जाऊन सर्व्‍हे करुन झालेल्‍या नूकसानीचा अंदाज घेतला व ते नूकसान रु.17,065/- चे आहे असा अहवाल गैरअर्जदाराना दिला. अर्जदार यांनी स्‍टाक स्‍टेटमेंट, बॅलान्‍स शिट, सेल टॅक्‍स इनकम टॅक्‍सचे बिल, पंचनामा, एफ.आय.आर. इत्‍यादी कागदपञ मागितले परंतु ते अर्जदाराने दिले नाही. त्‍यामूळे गैरअर्जदार हे सर्व्‍हे रिपोर्ट मिळाल्‍याचे नंतर दि.27.2.2007 रोजी आवश्‍यक कागदपञ न दिल्‍या कारणाने तूमचा दावा नामंजूर करण्‍यात येत आहे असे कळविले असे करुन गैरअर्जदाराने कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही. म्‍हणून त्‍यांचा विनंती आहे की, खर्चासह अर्जदाराचा दावा फेटाळण्‍यात यावा.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे तसेच गैरअर्जदार यांनी देखील श्री.भगवान रामजी कोठाळे यांची साक्ष शपथपञाद्वारे नोंदविली आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून आणि वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
              मूददे                                उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांच्‍या सेवेतील ञूटी सिध्‍द होत काय ?      होय.
2.   काय आदेश ?                            अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
              गैरअर्जदार यांचे मागणी प्रमाणे अर्जदार यांनी दूकान संस्‍था नोंदणीचा दाखला, क्‍लेम फॉर्म, दि.8.8.2006 रोजी तहसिलदार यांना दिलेला अर्ज, व त्‍यांनी दि.16.8.2006 रोजी पंचनामा करुन पाहीलेले नूकसान, नांदेड मर्चन्‍ट को-ऑप बँक लि. यांनी दिलेले प्रत्‍येक महिन्‍याचे स्‍टॉक स्‍टेटमेंट जे बँकेने तपासले आहे. ट्रेडींग अकाऊन्‍टंस, बॅलेन्‍स शिट इत्‍यादी सर्व कागदपञ दाखल केलेले आहे व ही सर्व कागदपञे क्‍लेम सेंटल करण्‍यासाठी पूरेशी आहेत. एवढे असताना गैरअर्जदार यांनी दि.27.2.2007 रोजी पञ पाठवून आवश्‍यक कागदपञ सादर केली नाही असा आक्षेप घेऊन फाईल बंद केली आहे. असे करणे म्‍हणजेच सेवेतील ञूटी आहे. गैरअर्जदार यांचे सर्व्‍हेअर श्री. कीशोर पिसे यांनी प्रत्‍यक्ष घटनास्‍थळावर जाऊन गोदामाची पाहणी दि.9.8.2006 रोजी केली व झालेलया मालाच्‍या नूकसानीची  खातरजमा केली. त्‍यांनी आपल्‍या सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये स्‍पष्‍टपणे लिहीलेले आहे की,त्‍यांनी ज्‍यावेळेस गोदामाचे निरीक्षण केले त्‍यावेळेस गोदामामध्‍ये जवळपास तिन फूट पूराचे पाणी भरले होते. त्‍यामूळे पूर्णपणे आतील गूळ नष्‍ट झाला होता. दि.4.8.2006 रोजीच्‍या राञी गोदावरी नदीला पूर येऊन  शहरामध्‍ये पाणी शिरले होते हे सर्वश्रूत आहे व तहसिल कार्यालयाने सर्व पूरग्रस्‍त जागेची पाहणी करुन  पंचनामा केलेला आहे. याप्रमाणे अर्जदार यांचे गोदामाची देखील दि.16.8.2006 रोजी पंचनामा करुन जवळपास रु.2,10,000/- चे नूकसान झाल्‍याचे पंचनाम्‍यात म्‍हटले आहे. तहसिलच्‍या पंचनामा हे आवश्‍यक असणारे कागदपञ उपलब्‍ध असताना एफ.आय.आर., पोलिस पंचनामा, यासारख्‍या कागदपञाची आवश्‍यकता नाही व सर्व्‍हेअरने देखील स्‍वतः जागा पाहिलेली आहे. यांचा देखील उल्‍लेख सर्व्‍हेअरनी आपल्‍या अहवालात केलेला आहे. ज्‍यावेळेस गोदामामध्‍ये तिन फूटापर्यत पाणी दोन दिवस साचून राहते तेव्‍हा गूळा सारखा पदार्थ यांचे पूर्ण पाणी व पाक होऊन ते पाण्‍यात मिसळून जाते, त्‍यामूळे तेथे किती ढेपे गूळ होता, किती नूकसान झाले हे सर्व्‍हेअर केवळ जागेची पाहणी करुन, करु शकत नाही. आपल्‍या सर्व्‍हे रिपोर्ट मध्‍ये त्‍यांनी रु.27,065/- नूकसान दाखवलेले आहे. व त्‍यातून रु.10,000/- पॉलिसी एक्‍सेस वजा जाता नेट नूकसान रु.17,065/- असे दाखवलेले आहे जे की सर्वस्‍वी चूक आहे. अर्जदारांनी हा सर्व्‍हे रिपोर्टलाच चॅलेज केले आहे व खोटा असल्‍याचे म्‍हटले आहे.  अर्जदारांनी प्रतिउत्‍तरामध्‍ये सर्व्‍हेअरनी त्‍यांच्‍या माघारी सर्व्‍हे केला व नूकसानी बददल कोणाकडून काय काय माहीती घेतली यांचा उल्‍लेख केला नाही. शिवाय सर्व्‍हेअरनी गोदामात पाणी होते त्‍यामूळे मालाचे पाणी झाले व त्‍यांनी पाणी काढून पाहिले नाही. तेव्‍हा आता अंदाजे असेंस करुन सर्व्‍हेअरला नूकसान असेंस करता येणार नाही हे वरील अर्जदार यांचे म्‍हणणे पटण्‍यासारखे आहे.
गैरअर्जदार यांनी देखील आपले म्‍हणण्‍यात सर्व्‍हेअरचा सर्व्‍हे रिपोर्ट खोटा नाही असे म्‍हटलेले नाही. तेव्‍हा सर्व्‍हे रिपोर्ट वीषयीच एकंदरीत संदेह निर्माण होतो. अर्जदार यांनी डिसेंबर 2005 ला रु.2,57,000/- चा स्‍टॉक होता यानंतर मागील नोव्‍हेंबर 2005, व या पूढील जानेवारी 2006 ते जूलै 2006 पर्यतचे बँकेने प्रमाणीत केलेले स्‍टॉक स्‍टेटमेंट दाखल केलेले आहेत व यावरुन सरासरी गोदामामध्‍ये रु.2,00,000/- च्‍यावर मालाचा स्‍टॉक होता हे निदर्शनास येते. याशिवाय अर्जदार यांनी 2005,2006 चे बॅलेन्‍स शिट दाखल केलेले आहे. यात दि.4.8.2006 रोजी स्‍टॉक रु.2,68,552/- , बॅलेन्‍स शिटमध्‍ये दाखवण्‍यात आलेले आहे व यांला कर सल्‍लागार श्री. अशोक भूतडा यांनी प्रमाणीत केले आहे. सरासरी विक्री खरेदीची बिले व बॅलेन्‍स शिटमध्‍ये दाखवण्‍यात आलेला स्‍टॉक यावरुन अर्जदार यांनी सांगितलेला स्‍टॉक जवळपास तेवढाच गोदामात त्‍यादिवशी असला पाहिजे असे म्‍हणण्‍यास पूष्‍ठी मिळते. सर्व्‍हे रिपोर्ट मध्‍ये सर्व्‍हेअरनी जे असेसमेंट केलेले आहे त्‍यांला कूठलाही आधार दिसत नाही. प्रश्‍न फक्‍त गूळाचा भाव काय असावा याबददलचा आहे. अर्जदार यांनी या 600 किलोच्‍या ठेपीच्‍या गूळाचा भाव प्रति क्विंटल रु.1500/- प्रमाणे 120 क्विटलचे रु,1,80,000/- व 10 कि. गूळाची ढेप प्रतिक्विंटल रु.1550/- प्रमाणे 50 क्विंटलचे रु.77,500/- असे एकूण रु.2,57,500/- चे नूकसान झालयाचे म्‍हटले आहे. अर्जदार हे गूळाच्‍या भावा बददलचा पूरावा किंवा त्‍यावेळेस काय बाजार भाव होता हे पूरावानीशी देऊ शकले असते परंतु त्‍यांनी तो दिला नाही. परंतु सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये सर्व्‍हेअरनी रु.1440/- व रु.1490/- असे भाव दाखवलेले आहेत. म्‍हणजेच साधारणतः दोघाचे भावामध्‍ये 50 ते 60 रुपयाचा फरक आहे असे पाहता सर्व्‍हेअरचा भाव जरी ग्रहीत धरला तरी 120 क्विंटल चे रु.1440/- प्रमाणे रु.1,72,800/- होतात व 50 क्विंटलचे रु.1490/- प्रमाणे रु.74,500/- होतात असे एकूण रु.2,47,300/- चे नूकसान झालेले दिसून येते.  पॉलिसी एक्‍सेंस बददल ही रक्‍कम गैरअर्जदार यांना कमी केली आधीच विमेदार यांचे नूकसान झालेले आहे म्‍हणून पॉलिसी एक्‍सेंसची रक्‍कम कमी न करता क्‍लेमची रक्‍कम पूर्ण दयावी या बददल  exclusion clause term of this policy so must be read door to serve the main purpose of policy that is is indemnify damage     यावर मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने 1996  II   C.P.J. 28 SC    Nagarju Vs. Oriental Insurance Company Ltd.   यांचा आधार घेता येईल. पॉलिसी एक्‍सेंस बददल  Object of excess clause is ignore, petty claims once claim exceed limit it has to pay in full   यावषियी ओरिएन्‍टल इन्‍शूरन्‍स विरुध्‍द खंडवा ऑईल यूनिट 2006 I,   C.P.J. 327 यांचा आधार आधार घेता येईल. म्‍हणून गैरअर्जदार यांना सर्व्‍हे रिपोर्ट मध्‍ये कमी केलेले पॉलिसी एक्‍सेंसचे रु.10,000/- यातून कमी करता येणार नाहीत. अर्जदार यांनी  II 2005 C.P.J.   10 NC Vatorgard Chemical Private Ltd. Vs. National Insurance Company Ltd.  हा केस लॉ दाखल केलेला आहे. या प्रमाणे सर्व्‍हे रिपोर्ट मध्‍ये डिस्‍प्‍यूट आहे. सर्व्‍हे रिपोर्टप्रमाणे क्‍लेम दिला पाहिजे परंतु फॅक्‍ट वरती हे सर्व अवलंबून आहे व अशा प्रकारचे कागदपञ हे काही स्‍पेसिफीक पूराव्‍या द्वारे चॅलेंज करता येतील. राज्‍य आयोगानी सर्व्‍हे रिपोटवरती केलेला आदेश राष्‍ट्रीय आयोगाने डिसमिस केलेला आहे. या सर्व बाबीवरुन गैरअर्जदारांनी सेवा देताना व अर्जदाराचा क्‍लेम नाकारताना त्‍यात कसूर केलेली आहे हे स्‍पष्‍ट होते.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                         आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
 
2.                                         गैरअरर्जदार यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांचे झालेल्‍या मालाचे,   नूकसानी बददल रु.2,47,300/- व त्‍यावर दि.27.02.2007 पासून 9 टक्‍के व्‍याजाने पूर्ण रक्‍कम दयावी, असे न केल्‍यास त्‍यावर दंडणीय व्‍याज म्‍हणून 12 टक्‍के व्‍याजाने अर्जदारास पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासह दयावेत.
 
3.                                         मानसिक ञासाबददल रु.15,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- मंजूर करण्‍यात येतात.
 
4.                                         पक्षकाराना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
श्री.विजयसिंह राणे       श्रीमती सुजाता पाटणकर      श्री.सतीश सामते     
   अध्‍यक्ष                                  सदस्‍या                             सदस्‍य  
 
            
जे. यु. पारवेकर
लघूलेखक