जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 183/2008. प्रकरण दाखल तारीख - 16/05/2008 प्रकरण निकाल तारीख - 22/08/2008 समक्ष - मा.श्री.सतीश सामते - अध्यक्ष (प्र.) मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. श्रीमती इंदुबाई भ्र. दत्ताञय भालके अर्जदार. वय 45 वर्षे, धंदा घरकाम रा. प्रो.साई इंडस्ट्रीज एम.आय.डी.सी. नांदेड जि. नांदेड विरुध्द. युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. मार्फत ब्रॅच मॅनेजर नांदेड. गैरअर्जदार अर्जदारा तर्फे वकील - अड.व्ही.एस. गाणोरे गैरअर्जदार तर्फे वकील - अड. श्रीनिवास जी. मद्ये. निकालपञ (द्वारा - मा.श्री. सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यूनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनीच्या सेवेच्या ञूटीबददल अर्जदार यांची तक्रार आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार ही साई इंडस्ट्रीची प्रोप्रायटर आहे. या इंडस्ट्रीमध्ये चप्पल, बुट सॅन्डल, व इतर लेदर मालाचे उत्पादन होते. व येथेच एक गोडाऊन कच्चा व तयार माल साठी उपलब्ध आहे. यासाठी अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे पॉलिसी नंबर 230600/11/04/11/00000778 असा आहे. दि.20.9.2005 रोजीला अतिवृष्टी झाली व तयार कच्चा मालाचे रु.1,50,000/- चे नूकसान झाले तसेच गोडाऊनची भिंत पूर्णतः खराब होऊन पउली, त्यामुळे पूर्णतः रु.3,00,126/- चे नूकसान झाले. या घटनेची खबर ताबडतोब दि.21.9.2005 रोजी गैरअर्जदार कंपनीला दिली. त्यांनी सर्व्हेअर पाठवून नूकसानीचा अंदाज घेतला. गैरअर्जदार यांच्या मागणीप्रमाणे अर्जदार यांनी एफ.आय.आर., पोलिस पंचनामा, इत्यादी कागदपञ दिली परंतु तहसील कार्यालयाचा पंचनामा दिला नाही या कारणावरुन अर्जदारांचा क्लेम नामंजूर करण्यात आला. वरील बाबीमूळे अर्जदारांना त्यांचा व्यवसाय बंद करावा लागला. आर्थिक, व मानसिक ञासही सहन करावा लागला. म्हणून नूकसान भरपाईपोटी रु.5,00,000/- + 12 टक्के व्याजाने अर्जदारांना मिळावेत म्हणून हा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले. त्यांनी आपले म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदारांना वारंवार तोंडी व लेखी मागणी करुन सूध्दा त्यांनी आवश्यक कागदपञाची पूर्तता केली नाही. त्यांचप्रमाणे तहसील कार्यालयाचा पंचनामा गैरअर्जदाराकडे जाणूनबूजून दाखल केलेला नाही. अर्जदाराने आपला क्लेम कोणतेही कारण नसताना प्रलंबित ठेवला व गैरअर्जदाराच्या वेळ घेतला. त्यामुळे अर्जदारांना रु,25,000/- दंड करावा असे म्हणणे चूक आहे. दि.20.9.2005 रोजी अतिवृष्टी झाली व या पाण्यामूळे साई इंडस्ट्रीची भिंत पूर्णतः खराब झाली नाही. वास्तविक पावसाचे पाणी सदर इंडस्ट्रीच्या मागे जमा झालेल्या पावसाच्या पाण्यामूळे सदरची भिंत कोसळली होती. त्यामुळे सदर इंडस्ट्रीज मधील मालाचे किरकोळ स्वरुपाचे नूकसान झाले. रु.3,00,126/- चे नूकसान झाले नाही. अर्जदारानी पैसे उकळण्यासाठी खोटा अर्ज दाखल केलेला आहे. अर्जदारावर कोणतीही आपत्ती अचानक आलेली नाही,त्याने ती स्वतः ओढवली आहे. काळजी घेतली नाही त्यामुळे सदरचे नूकसान झालेले आहे. दि.23.9.2005 रोजी म्हणजे घटनेच्या दिवशी गैरअर्जदारास माहीती मिळाली व त्यांनी त्यांचे सर्व्हेअर श्री.रॉबट रोड्रीग्स यांना पाठविले असता त्यांनी घटनास्थळावर जाऊन प्रत्यक्ष नूकसानीचा आढावा घेतला असता मालाचे व भिंतीचे नूकसान किरकोळ स्वरुपाचे आहे असे असेंसमेंट केलेले आहे. सर्व्हेअरनी सर्व मालाचे बिलाचे अवलोकन करुन व प्रत्यक्षात ज्या मालाचे नूकसान झाले त्यांच नूकसानीचा समावेश व पॉलिसी एक्सेस व सालव्हेज असे पॉलिसी कंडीशनप्रमाणे कपात करुन व प्रॉफिट मारजीन कमी करुन सत्य रिपोर्ट दिलेला आहे व नूकसान रु.65,000/- झाल्याचा अहवाल दिलेला आहे. अर्जदाराचा मूलगा यांनी ते लेखी मान्यही केले आहे. त्यामुळे अर्जदारास रु.5,00,000/- 12 टक्के व्याजप्रमाणे मागण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदाराने पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. गैरअर्जदाराने आपली साक्ष श्री. भगवान रामजी कोठाळे यांचे शपथपञाद्वारे नोंदविली आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून आणि वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकूण खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय होय 2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदारांनी अतिवृष्टी मूळे त्यांचे गोडाऊन मधील मालाचे नूकसान पावसाच्या पाण्यामूळे झाले म्हणून याबाबत गैरअर्जदार यांना दि.21.9.2005 रोजी पञ पाठवून सूचना दिलेली आहे. या बाबतचे पोलिस स्टेशनला एफ.आय.आर., व घटनास्थळ पंचनामा अर्जदाराने दाखल केलेला आहे. पंचनाम्यावरुन कारखान्याभोवती पावसाचे पाणी साचून ते आंतमध्ये शिरले व गोडाऊनची भिंत कोसळली व मधील मालाचे नूकसान झाले. अर्जदाराने नूकसान झालेल्या मालाचे विवरण दाखल केलेले आहे. याप्रमाणे रु.2,71,926/- नूकसान झाल्याचे म्हटले आहे व देशपांडे अन्ड असोशियेटस यांचे बिल्डींगची भिंत कोसळून रु.29,000/- चे नूकसान झाले असे प्रमाणपञ दाखल केलेले आहे पण यावर तारीख नाही. अर्जदाराने 2004,2005 व 2006 चे ट्रेडींग अकॉऊन्टस स्टेटमेंट व बॅलान्स शिट दाखल केलेले आहे. यात ट्रेडींग अकॉऊन्टस मध्ये स्टॉक रु.1,74,580/- फिनशिगूड चा आहे व रॉ मेटेरियल रु.4,67,078/- चे आहे, दि.27.8.2007 रोजी गैरअर्जदारांनी तहसिल पचंनामा केलेला नाही या मूददयावरुन अर्जदाराचा क्लेम नामंजूर केला होता ते पञ देखील अर्जदाराने दाखल केलेले आहे.गैरअर्जदार यांनी रॉबर्ट राड्रीक्स यां त्यांच्या सर्व्हेअरला पाठवून जायमोक्यावर नूकसानीचे अवलोकन केले असता सर्व्हेअरने दि.26.9.2005 रोजी सर्व्हे करुन त्यांचा अहवाल दि.12.12.2005 रोजी दिलेला आहे. पॉलिसी नंबर 230600/11/04/00778 ही दि.6.2.2005 ते 5.2.2006 या कालावधीसाठी होती. बिल्डींग साठी रु.5,00,000/- चा विमा, गोडाऊनसाठी रु.10,00,000/- चा, तयार मालासाठी रु.4,00,000/-, रॉ मेटेरियल साठीची रु.5,00,000/- व इस्ट्रमेंटसाठी रु.1,00,000/- असे एकूण रु.25,00,000/- चा विमा गैरअर्जदाराने दिलेला आहे. सर्व्हेअर यांनी प्रसंगाबददल असे म्हटले आहे की, दि.20, 21 सप्टेंबर 2005 रोजी अतिवृष्टी मूळे सर्व नदयाना पूर आले व जागोजागी पाणी साचून इमारतीचे पण नूकसान झाले व हया अतिवृष्टीमूळे अर्जदार यांच्या कारखान्याभोवती पाणी साचून पाण्याच्या दाबामूळे कारखान्याची मागील भिंत कोसळली व पाणी कारखान्यामध्ये शिरले. त्यामूळे मधील मालाचे नूकसान झाले. पोलिसानी यांनी पंचनामा केलेला होता पण तहसिलचा पंचनामा झालेला नाही. सर्व्हेअरनी स्वतः जायमोक्यावर जाऊन नूकसानीचे अवलोकन केलेले आहे व याबाबतचा पूरावा म्हणून पोलिस पंचनामा दाखल आहे. नूकसान झाल्याचे मान्य असताना केवळ तहसिल कार्यालयाचा पंचनामा नाही या कारणावरुन क्लेम नाकारणे हे अर्जदारावर अन्याय करणे आहे. व तहसिल कार्यालयाच्या पंचनाम्यामूळे वेगळा काही सत्य उघड होणार नाही. त्यामूळे आमच्या मते यांची गरज नाही. झालेल्या नूकसानीची जबाबदारी गैरअर्जदार टाळू शकणार नाहीत. सर्व्हेअरनी असे म्हटले आहे की, इमारतीचे किरकोळ नूकसान झाले व स्वतःच म्हणतात की, भिंत पडलेली आहे. त्यांने बिल्डींग बददल सर्व्हेमध्ये कोणतीही रक्कम लिहीलेली नाही तेव्हा अर्जदार यांनी जी रु.29,000/- चे भिंतीचे नूकसान दाखवलेले आहे त्यात 15 टक्के डिप्रिसियेशन धरले तर रु.4500/- कमी करता रु.24,500/- भिंतीच्या नूकसानीसाठी देणे योग्य राहील. दूसरे मालाचे नूकसान रु.1,37,533/ असे दाखवलेले आहे व या 40 टक्के प्राफिट मारजीन आहे. रु.93,897/- दर कमी केलेले आहे. कारण सर्व्हे रिपोर्टच्या असेंसमेंट नंबर 10 च्या परिच्छेदामध्ये सर्व्हेअरनी असे म्हटले आहे की, I have disallowed 40 % towards profit margin, since the rates stated in the labels were M.R.P. In respect of raw material, I have considered the purchase price after verification of purchase bills. जेव्हा सर्व बिल, परचेस बिल डिपॉझीटमधून व्हेरिफिकेशन करुन किंमत घेतलेल्या आहेत व एमआरपी चे लेबल व त्यावरची किंमत घेण्यास नाकारले आहे. तेव्हा 40 टक्के मारजीन प्राफीट शक्य नाही. म्हणून रु.37,559/- कमी करणे ही देखील नीर्णय योग्य नाही. तर तयार मालामध्ये फक्त 10 टक्के प्राफीट एवढेच फार तर कमी करता येईल. रॉ मटेरियल पैकी लेदर, कॅन्व्हास, शूज बॉक्स हे पाणी भिंजून खराब झाल्यामूळे यापैकी कूठलाही भाग नवीन कामासाठी उपयोगात येणार नाही व तो सगळा कचरा समजून फेकून दयावा लागेल त्यामूळे 25 टक्के साल्वेज धरणे हे ही बरोबर नाही, फार तर गैरअर्जदार हे साल्वेज स्वतः ठेऊन घेऊ शकतात. म्हणून या गोष्टी सर्व्हेअरच्या रिपोर्टमधून कमी करीत आहोत. व ते न्यायाच्या दृष्टीने योग्य होईल. पॉलिसीतील नियमाप्रमाणे पॉलिसी एवढी रक्कम त्यांना कमी करता येईल. एकूण मालाचे नूकसान रु.1,37,533/- यातून रु.93,897/- वर 10 टक्के नफा वजा जाता रु.9390/- कमी करुन रु.1,28,143/- व यातयून पॉलिसी एक्सेस रु.10,000/- वजा जाता रु.1,18,143/- व बिल्डींगची नूकसान भरपाई रु.24,500/- असे एकूण रु.1,42,643/- अर्जदाराच्या नूकसानी बददल देण्याची जबाबदारी गैरअर्जदार यांच्यावर येते. ही रक्कम गैरअर्जदार यांनी नाकारुन सेवेत ञूटी केलेली आहे. म्हणून दावा नाकारलेला दिनांक 27.6.2007 पासून यावर 9 टक्के व्याज ही देणे बंधनकारक आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना रु.1,42,643/- व त्यावर दि.27.6.2007 पासून 9 टक्के व्याजासह रक्कम अर्जदारास दयावी, असे न केल्यास दंडणीय व्याज म्हणून 12 टक्के याप्रमाणे पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह अर्जदारास दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.20,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते सदस्या अध्यक्ष (प्र.) जे. यु. पारवेकर लघूलेखक. |