जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नंदेड प्रकरण क्र.172/2008. प्रकरण दाखल दिनांक – 09/05/2008. प्रकरण निकाल दिनांक –26/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे अध्यक्ष. मा.श्रीमती. सुजाता पाटणकर. सदस्या. मा.श्री.सतीश सामते सदस्य. श्री.दसविंदरसिंग पि.अमरीकसिंग चड्डा, अर्जदार. वय वर्षे सज्ञान, व्यवसाय व्यापार, रा.मालेगांव ता.जि.जि.नांदेड. विरुध्द. विभीगीय व्यवस्थापक, गैरअर्जदार. दि.युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि, गुरु कॉम्प्लेक्स,श्री. गुरु गोविंदसिंघ रोड, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.एम.एम.कनकदंडे. गैरअर्जदारा तर्फे - अड.श्रीनिवास मददे्. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे,अध्यक्ष) यातील अर्जदार याची तक्रार अशी की, ते वाहन क्र. एम.एच.26.एल.2039 चे मालक व ताबेदार आहेत. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे वाहनाचा विमा दि. 24/03/2007 ते 23/03/2008 या कालावधीसाठी कालावधीसाठी काढला होता. गैरअर्जदार विमा कंपनीने कार अपघाता बाबतीत नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे. दि.08/05/2007 रोजी सदरील वाहन रोडने जात असतांना औंढा नागनाथ पोलिस स्टेशनच्या हद्यीमध्ये एक ट्रॅक्टर रोउने जात होते व त्यास नांगर जोडला होता त्याने अचानक ट्रॅक्टरला वळविले व त्यामुळे नांगराचा भाग कारमध्ये अडकला व ट्रॅक्टरने पल्टी खाल्ली व अपघात होऊन गाडीचे नुकसान झाले. याबाबत संबंधीत पोलिस स्टेशनला गुन्हा क्र.57/2007 नोंदविला आहे तसेच घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. सदरील घटने बाबत गैरअर्जदार यांना सुचना देण्यात आली त्यानंतर गैरअर्जदार यांनी बाफना मोटर्स प्रा.लि.नांदेड यांचे द्वारा वाहनाचे नुकसानी बाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले. त्याप्रकरण अर्जदारांनी रु.71,898/- नुकसानीचे अहवाल व पोलीस पेपर्स,फिर्याद, घटनास्थळ पंचनामा व गाडीचे इतर दस्तऐजवज दाखल केले. त्याप्रमाणे गैरअर्जदाराने नुकसानीची रु.71,898/- मान्य केले. परंतु आपघाताच्या दिवशी वाहन चालकाकडे असलेल्या परवानाची नुतनीकरण झालेले नसल्यामुळे अर्जदाराची मागणी दि.11/07/2007 रोजी फेटाळुन लावली. गैरअर्जदाराची ही कार्यवाही चुकीची व गैरकायदेशिर आहे. परीवहन अधिकारी यांनी परवाना प्राप्त करण्यास अपात्र ठरवीणे किंवा त्यास दिलेला परवाना अपात्र म्हणुन घोषीत केला असेल व असा दोषी व्यक्ती वाहन चालवित असेल तरच गैरअर्जदार यांना सदरील क्लेम नाकारता येतो अन्यथा नाही. सदरील वाहनाचा वाहन चालक हा अपात्र म्हणुन घोषीत केलेला नाही म्हणुन गैरअर्जदार यांनी केलेली कार्यवाही चुकीची व गैरकायदेशिर आहे. अपघातग्रस्त वाहनाचे क्लेमची रक्कम न दिल्यामुळे अर्जदारास मानसिक त्रास सहन करावा लागला. म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल करुन तीद्वारे वाहनाची नुकसानीबद्यल रु.1,00,000/- तीवर 12 टक्के व्याज दराने व्याजासह देण्यात यावी व तक्रारीचा खर्च देण्यात यावा अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणण असे की,अर्जदाराचा तक्रारअर्ज वास्तविक घटनेवर आधारीत नाही आणि तो त्यांना दाखल करता येणार नाही. अर्जदार यांनी पॉलिसीतील नियमांचे उल्लंघन केले आहे. गैरअर्जदार यांनी पॉलीसी काढल्याची बाबत मान्य केली आहे. अर्जदार यांनी वाहन क्र.एमएच26/एल 2039 चा विमा काढलेला होता परंतु वाहन क्र.एमएच 28/एल 2039 चा विमा काढलेला नाही. दि.08/05/2007 रोजी सदरील वाहनाचे किरकोळ नुकसान झाले कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. अपघाता बाबत सुचना मिळताच गैरअर्जदारांनी सर्व्हेअर नेमुन तपासणी करुन सर्व्हे रिपोर्ट आणि करुन असेसमेंट केलेले आहे. वाहनाचे रु.71,898/- एवढे नुकसान झाले नाही. सर्व्हेअरच्या रिपोर्टप्रमाणे रु.53,000/- एवढे नुकसान झालेले आहे. अर्जदाराने क्लेमसोबत पोलीस पेपर्स,फिर्याद, घटनास्थळ पंचनामा दाखल केला नाही. अपघाताच्या दिवशी म्हणजे दि.08/05/2007 रोजी वाहन चालकाकडे कायेदशिर आणि प्रभावी परवाना नव्हता म्हणुन त्यांचा क्लेम दि.11/07/2007 रोजी फेटाळुन लावण्यात आला आहे. अर्जदाराने जे वाहन चालक परवाना दाखल केलेला आहे त्याचा कालावधी दि.07/10/2002 ते दि.06/10/2005 असा होता सदर कालावधी बदलुन दि.06/10/2008 असे करुन दिशाभुल केलेली आहे. वाहनाचा अपघात ज्या दिवशी झाला त्या दिवशी वाहन चालकाकडे प्रभावी परवाना नव्हता असे असतांना वाहन चालकाने वाहन चालवून अपघातास कारणीभुत ठरले आहे. अर्जदार यांचा क्लेम नाकारुन गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही. अर्जदाराने केलेली इतर सर्व विपरीत विधाने त्यांनी नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा. अर्जदार यांनी आपल्या तक्रारअर्जा सोबत शपथपत्र, दि.08/05/2007 चे झेरॉक्स प्रत, दि.08/05/2007 चा पंचनामा, विमा पॉलिसी, इस्टीमेट, क्लेम नाकारल्याचे पत्र इत्यादी कागदपत्र दाखल केले आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबासोबत आर.टी.ओ. यांनी दिलेले वाहन नंबर पत्र, आर.टी.ओ.ची पावती, इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट, वाहन परवाना, विमा पॉलीसी, क्लेम फॉर्म, सर्व्हेअर यांचा फायनल इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट, बिल चेक मेमो, बाफना मोटर्स यांचा इनवायस, शपथपत्र इत्यादी दस्तऐवज दाखल केलेले आहे. अर्जदार यांचे तर्फे वकील श्री.एम.एम.कनकदंडे आणि गैरअर्जदार यांचे तर्फे वकील श्री.एस.जी.मद्दे यांनी युक्तीवाद केला. सदर प्रकरणांत वाहनाचा विमा, अपघात इत्यादी संबंधी पुरेसा विविद नाही.गैरअर्जदार विमा कंपनीने वाहन चालकाचा चालक परवाना हा अपघाताच्या वेळेस नोंदणीकृत नव्हता, त्याची मुदत दि.06/10/2005 रोजी संपली होती आणि म्हणुन त्याच्या जवळ अपघाताच्या वेळेस वैध परवाना नसल्याचे कारणांवरुन क्लेम नाकारलेला आहे. अपघात हा दि.08/05/2007 रोजी झालेला आहे.अर्जदारांनी यास उत्तर देतांना असा युक्तीवाद केला की, त्यांनी वाहनाच्या चालकाचा परवाना हा नंतर नुतनीकृत करुन घेतला आहे. (त्याचे दस्तऐवज दाखल आहे व त्याप्रमाणे दि.27/03/2008 ते 26/03/2011 या कालावधीसाठी परवानान्याचे नुतनीकरण झालेले आहे) चालक हा चालक परवाना धारण करण्यासाठी कोणत्याही प्रकारे अपात्र ठरलेला नव्हता आणि तो अनुभवी चालक असल्यामुळे विमा कंपनीला त्यांचा क्लेम नाकरता येत नाही. या संदर्भात त्यांनी 2007 ए.सी.जे., 2784, या ठिकाणी प्रकाशीत झालेले मा. जम्मु आणि काश्मीर उच्च न्यायालयाचा निकाल जो न्यु. इंडिया अशुरन्स कंपनी लि, विरुध्द सुधराबी व इतर यांच्यातील प्रकरणात दिलेला आहे, यावर भिस्त ठेवली. सदर निकालात परवाना नोंदणीकृत केला नाही तरी अनुभवी चालक हा आपले वाहन चालविण्याचे कौशल्य विसरु शकत नाही, असा निकाल दिलेला आहे. मोटर वाहन कायदयाच्या तरतुदीप्रमाणे चालक हा आपला वाहन चालक परवाना पाच वर्षापर्यंत नुतणीकृत करु शकतो व त्यानंतर मात्र त्याला नुतणीकरण मागता येत नाही. यातील गैरअर्जदारांनी त्यांची भिस्त या संदर्भात जम्मु काश्मीर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग यांनी दिलेला ओरीएंटन इन्शुरन्स कंपनी लि विरुध्द अविनाशसिंघ अण्ड सन्स यांच्या प्रकरणांती निकाल जोII (2008) सी.पी.जे.197, या ठिकाणी प्रकाशीत झालेला आहे तसेच सोहनसिंघ विरुध्द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि, यांच्या प्रकरणांतील निकाल जो पंजाब राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलेला असुन I (2008) सी.पी.जे.48, या ठिकाणी प्रकाशीत झालेला आहे यावर ठेवली आहे. यातील दुसरा निकाल म्हणजे सोहनसिंघ विरुध्द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि, यातील वस्तुस्थिती व आमच्या समोरील प्रकरणांतील वस्तुस्थिती भिन्न आहे.त्यात चालक परवाना खोटा होता. पहीला निकाल ओरीएंटन इन्शुरन्स कंपनी लि विरुध्द अविनाशसिंघ अण्ड सन्स हा निकाल राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलेला आहे व अर्जदारांनी या संदर्भात दाखविलेला निकाल न्यु. इंडिया अशुरन्स कंपनी लि, विरुध्द सुधराबी व इतर हा उच्च न्यायालयाने दिलेले आहे त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे हे प्रकरण निकाली काढीत आहोत. अशा स्थितीत अर्जदाराने केलेला युक्तीवाद मान्य करण्या जोगा आहे, त्यामुळे त्याचा क्लेम नाकारण्याची कृती ही चुकीची होती हे स्पष्ट आहे. सदर प्रकरणांत अर्जदाराने वाहन दुरुस्तीचे बिल ही रु.71,898.78 चे दाखल केलेले आहे, या उलट सर्व्हेअरने अर्जदारास देय नुकसानीची रक्कम रु.51,502/- काढलेली आहे. सर्व्हेअरने जी नुकसानीची रक्कम निर्धारित केली ती सकृतदर्शनी चुकीची आहे, असे अर्जदार दाखवु शकले नाही आणि त्यामुळे अर्जदारास तेवढी नुकसानी पोटी रक्कम मिळणे योग्य होईल, असे आम्हास वाटते. यास्तव आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास रु.51,502/- तीवर क्लेम नाकारल्याची तारीख दि.11/07/2007 पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.9 टक्के व्याज दराने मिळुन येणारी रक्कम द्यावी. 3. गैरअर्जदार यांनी अर्जदारास तक्रारीचा खर्चा दाखल रु.1,000/- द्यावे. 4. आदेशाचे पालन एक महिन्यात करावे. 5. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह राणे) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |