निकालपत्र :- (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तक्रारदार तसेच त्यांचे वकिल गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी सन 2005 मध्ये महिन्द्रा ट्रॅक्टर, ट्रॉलीसह खरेदी केला आहे. त्याचा ट्रॅक्टर नं.एम्.एच्.09 एएल् 6718 व ट्रॉली नं.अनुक्रमे एम्.एच्.09 यु 410 व एम्.एच्.09 यु 440 असा आहे. सदर वाहनावर सामनेवाला विमा कंपनीकडे दि.21.07.2009 रोजी विमा उतरविला व त्याचा पॉलीसी नं.160582/47/48/96/00009065 असा आहे. सदर ट्रॅक्टरला दि.14.04.2009 रोजी रात्री 10.30 चे दरम्यान कागल येथेन समोरुन बेभान येत असलेल्या टेम्पोने जोरात धडक देवून अपघात झाला व त्यामध्ये ट्रॅक्टरचे बरेच नुकसान झाले. त्यासंबंधी कागल पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद होवून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. सामनेवाला विमा कंपनीने सर्व्हेअरकडून सर्व्हे करुन 1,93,000/- चा क्लेम मंजूर करणेत येईल असे सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदारांनी ट्रॅक्टर दुरुस्त करुन घेतला, त्याकरिता तक्रारदारांना अंदाजे रुपये 2,20,000/- इतका खर्च आलेला आहे. परंतु, सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेम दाखल केला असता सामनेवाला विमा कंपनीने रुपये 1,35,000/- इतका क्लेम मंजूर केला व ट्रॅक्टरमध्ये ऊस वाहतुकीचेवेळी पॅसेंजर होता या कारणाने मंजूर केले क्लेमपैकी 25 टक्के रक्कम बेकायदेशीररित्या कपात केली. तक्रारदारांना शेतीच्या कामासाठी रक्कमेची निकड लागलेने रुपये 1,05,000/- चा चेक स्विकारलेला आहे. सबब, सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांना रुपये 1,19,932/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह देणेचे आदेश व्हावेत. तसेच, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 500/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत जबाब व पंचनामा, आर.सी.बुक, विमा पॉलीसी, विमा रक्कम भरलेची रिसीट, ट्रॅक्टर व ट्रॉली रिपेअरी केलेबाबतची बिले, टॅक्स इन्व्हॉईस, बॅटरी खरेदी बिल, क्रेन भाडे पावती, डेबिट मेमोज इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, अपघातावेळेस सदर वाहनातून ऊस वाहतुक होत असताना अतिरिक्त प्रवाशांची वाहतुक होत होती. त्यामुळे नॉन-स्टॅण्डर्ड बेसिसवरती सर्व्हेअर यांच्या अहवालात मंजूर केलेल्या रक्कमेपैकी 25 टक्के रक्कम कपात करुन तक्रारदारांनी उर्वरित रककम रुपये 1,05,000/- अंतिम परिपूर्ती म्हणून स्विकारलेली असल्याने त्यांना विमा क्लेम रक्कमेची मागणी करता येणार नाही. सदर रक्कम तक्रारदारांनी स्वत:हून स्विकारलेली आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे तक्रारदारांच्या ट्रॅक्टरला अपघात झालेला आहे. सदर अपघाती वाहनाचा सर्व्हेअर यांचेकडून अहवाल घेणेत आलेला आहे. सदरची वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास आणून दिली आहे. युक्तिवादाचेवेळेस सदर ट्रॅक्टरमधून ऊस वाहतुक होत होती व त्यावेळेस अगणित प्रवाशांची वाहतुक होत होती या मुद्याकडे या मंचाचे लक्ष वेधले आहे. सर्व्हेअर यांनी एकूण नुकसानी निश्चित केली, त्याप्रमाणे सामनेवाला विमा कंपनीने नॉन-स्टॅण्डर्ड बेसिसवरती रुपये 1,05,000/- इतक्या रक्कमेचा क्लेम तक्रारदारांना मंजूर केला. तसेच, सदरची रक्कम तक्रारदारांनी चेकद्वारे अंतिम परिपुर्ती म्हणून स्विकृत केलेली असून डिस्चार्ज व्हौचरवर सही केलेली आहे. अंतिम परिपुर्ती म्हणून रक्कम स्विकारलेली असल्याने तक्रारदारांना पुन्हा क्लेम रक्कमेची मागणी करता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |