Maharashtra

Nagpur

CC/140/2015

Paramount Profiles, Through Partner Shri. Mahesh Praduman Goyanka - Complainant(s)

Versus

United India Insurance Co Ltd., Manager - Opp.Party(s)

Mayur V Gangwal

08 Jan 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/140/2015
( Date of Filing : 16 Mar 2015 )
 
1. Paramount Profiles, Through Partner Shri. Mahesh Praduman Goyanka
Archana apartment, H.B. Town, Bhandara road/R/o. Deshpande Layout, Wardhaman Nagar, Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance Co Ltd., Manager
19, Dharampeth, estern, shankar nagar chowk, Nagpur-440010
Nagpur
Maharastra
2. United India Insurance Co Ltd., Manager
Main office, white road, Chennai 600014
Chennai
Tamilnadu
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:Mayur V Gangwal , Advocate
For the Opp. Party: B. LAHIRI/ D.P.SHOUCHE/DHIRAN CHATTARJEE, Advocate
Dated : 08 Jan 2020
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, त्‍यांची भागीदारी संस्‍था असून ती भागीदारा तर्फे स्‍वयंरोजगारासाठी सुरु केली आहे. विरुध्‍द पक्ष 1 ही विरुध्‍द पक्ष 2 विमा कंपनीची शाखा आहे. तक्रारकर्ता गॅलव्‍हेनाईज स्‍टील सिटस्  क्‍वाईल कच्‍चा मालापासून बनवितात व तो माल भारत देशात रोड ने किंवा रेल्‍वे मार्गाने पाठवितात,  त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याला पक्‍क्‍या मालाचा विमा करावा लागतो. तक्रारकर्त्‍याने मालाचा सन 2010-2011 या कालावधीकरिता विमा मरीन कारगो ओपन पॉलिसी या नावाखाली उतरविला होता व त्‍याचा पॉलिसी क्रं. 230200/21/10/02/00000169 असा आहे. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने सन 2011-2012 या कालावधीकरिता पुन्‍हा विमा उतरविला व त्‍याचा  विमा पॉलिसी क्रं. 230105/21/11/02/00000006 (?) असा असून ती दि. 28.07.2011 ते 27.07.2012 या कालावधीकरिता विमाकृत केली होती. सन 2012-2013 या कालावधीकरिता पॉलिसीसाठी विरुध्‍द पक्षाकडे आवदेन पत्र केले होते. त्‍या आवेदन पत्रात माल कुठून जात आहे व कोणाला देत आहे याची सर्व माहिती विरुध्‍द पक्षाला देऊन त्‍यावर तक्रारकर्त्‍याने सही करुन दिली होती. परंतु वि.प.ने आवेदन पत्रातील माहिती न घेता सन 2011-2012 या पॉलिसीकरिता विरुध्‍द पक्षाने स्‍वतः हून भरलेल्‍या माहितीच्‍या आधारे सन 2012-2013 ही पॉलिसी निर्गमित केली व तिचा पॉलिसी क्रं. 230105/21/12/02/00000009 (?) असा असून त्‍याचा विमा कालावधी दि. 26.07.2012 ते 25.07.2013 पर्यंत आहे.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने सन 2012-2013 च्‍या  पॉलिसीत लिहिलेली बाब ही विरुध्‍द पक्ष कंपनीच्‍या पदाधिका-यांच्‍या निष्‍काळजीपणामुळे घडलेली आहे. सन 2012-2013 च्‍या पॉलिसी मध्‍ये खालीलप्रमाणे नमूद आहे की, .........

Journey from Any where in India

Journey to 19th Milestone Village Saoli Bhandara Road, Nagpur,, Policy issued for incoming materials where as claim took place for outgoing material. From / to

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा रुपये 14,90,115/- मंजूर करावा व तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश व्‍हावा.
  2.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी आपला लेखी जबाब एकत्रित दाखल केला असून त्‍यात असे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने निर्गमित केलेली पॉलिसी ही Journey from Any where in India to Complainant Factory site at 19th Milestone Village Saoli Bhandara Road, Nagpur ही तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीवरुन काढण्‍यात आली होती. तक्रारकर्त्‍याने मरीन कारगो ओपन पॉलिसी अंतर्गत विरुध्‍द पक्षाकडे केलेली मागणी देय नाही. कारण तक्रारकर्त्‍याने त्‍याचा माल नागपूर वरुन कोचीन येथे पाठविल्‍याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारकर्त्‍याने विमा दाव्‍या सोबत दाखल केलेले दस्‍तऐवज मागणी अर्ज, सर्व्‍हेअर रिपोर्ट हे दर्शवितो की, तक्रारकर्ता Consignment प्रमाणे त्‍याचा माल त्‍याच्‍या फॅक्‍टरी मधून भारतात इतर ठिकाणी पाठवित होता.  तक्रारकर्त्‍याने काढलेली मालाची विमा पॉलिसी ही From Any where in India to Complainant Factory site at 19th Milestone Village Saoli Bhandara Road, Nagpur करिता काढली होती. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचा विमा दावा मंजूर करण्‍या योग्‍य नाही. त्‍यामुळे सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे.    
  3.        उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

मुद्दे                    उत्‍तर

 

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ            होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला कायॽ           नाही

  1. काय आदेश ॽ                             अंतिम आदेशाप्रमाणे

            निष्‍कर्ष

6. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून मरीन कारगो ओपन या नावाची  पॉलिसी दि. 26.07.2012 ते 25.06.2013 या कालावधीकरिता काढली असून त्‍याचा पॉलिसी क्रं. 23010521110200000006 असा आहे. सदरची पॉलिसी ही From Any where in India to Complainant Factory Site at 19th Milestone Villege Saoli, Bhandara Road, Nagpur करिता काढण्‍यात आली होती हे दाखल दस्‍ताऐवजावरुन स्‍पष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  दि. 18.02.2013 रोजी तक्रारकर्त्‍याने मे. सतपाल रोड लाईन्‍स अॅन्‍ड कंपनी भांडेवाडी नागपूर या ट्रान्‍स्‍पोर्ट द्वारे मे. स्‍टील कंपनी एन.एच.बायपास रोड ए.के.एम. मेडिकल सेंटर जवळ वेन्‍नला पी.ओ.पलीरिवत्‍तोम कोचीन 682028 येथे माल पाठवित असतांना दि. 21.02.2013 रोजी वाहन पलटल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या मालाचे नुकसान झाले. याबाबत तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा दाखल केला असतांना विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा सदरचा विमा दावा हा बाहेर पाठविलेल्‍या मालाबद्दल नसल्‍याच्‍या कारणाने नाकारला. विरुध्‍द पक्षाने नि.क्रं. 12 वर दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्‍याच्‍या मालाचा विमा हा माल बाहेर पाठविण्‍याकरिता काढलेला नसून सदरचा विमा भारतातून इतर ठिकाणाहून तक्रारकर्त्‍याच्‍या फॅक्‍टरी येतांना मालाचे होणा-या नुकसानीकरिता काढलेला आहे. ही बाब विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला निर्गमित केलेली नि.क्रं. 12 वरील पॉलिसीत खालीलप्रमाणे नमूद आहे.

Journey From                                         Journey to

FROM ANY WHERE IN INDIA19TH MILISTONE,VILLAGE- SAOLI

BHANDARA ROAD, NAGPUR

 

यावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारतांना कोणतीही त्रुटी केलेली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍या योग्‍य आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  

 

                 सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्‍यात येते.  

 

  1. उभय पक्षांनी खर्चाचे वहन स्‍वतः सोसावे.

 

  1. उभय पक्षानां आदेशाची प्रत निःशुल्क देण्‍यात यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.