::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये उमेश वि. जावळीकर, मा. अध्यक्ष
१. सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदार ही मौजा नगीनाबाग वार्ड, चंद्रपुर येथिल रहिवासी असुन जे.पी.इलेक्ट्रीकल ची संचालीका आहे. अर्जदाराने व्यवसाया निमीत्त्य काम करणारे कुशल व अकुशल कर्मचारी यांच्या भविष्याचा विचार करुन गैरअर्जदारासोबत ६ कामगारांसाठी विमा संरक्षण घेतले. सदर कराराप्रमाणे संरक्षीत कालावधी मध्ये १ कामगार नामे आनंदराव हजारे दिनांक ०८.०२.२०११ रोजी विजेच्या खाबांवरुन पडुन मरण पावला. त्याची सुचना अर्जदारांनी गैरअर्जदार यांना दिल्यानंतर गैरअर्जदारांनी विमा कराराप्रमाणे संपुर्ण कागदपत्रे सादर करण्यास अर्जदारास सांगीतल्यामुळे अर्जदाराने कागदपत्रासह विमा दावा दाखल केला. सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदार यांनी ३० दिवसांच्या आंत विमा दावा निकाली काढणे विमा कंपनीचे दायित्व होते. त्यांनी नियमाप्रमाणे तपासणी अधिकारी यांची त्वरीत नेमणुक केली होती. तपासणी अहवाल प्राप्त होवुन देखील विमा कंपनीने विमा दावा देण्यास टाळाटाळ केलेली आहे. अर्जदाराची रक्कम गैरअर्जदार कंपनीने वापरली आहे. अर्जदारांनी शव विच्छेदन अहवालाची प्रत गैरअर्जदाराकडे सादर न केल्याने विमा दावा अमान्य करण्यात आल्याचे कळविले. गैरअर्जदारांनी सेवासुविधा पुरविण्यास कसुर केल्याने अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन विमा दाव्याची रक्कम रु. १०,०६,६१२/- द.सा.द.शे. १८% व्याजाने गैरअर्जदार यांनी देण्याबाबत आदेश व्हावे अशी विनंती अर्जदारांनी केली आहे
३. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस पाठविली असता नोटीस प्राप्त होवुन गैरअर्जदार मंचात हजर होवुन त्यांनी लेखी म्हणने दाखल केले आहे. गैरअर्जदार यांनी सदर प्रकरणात तपासणी अधिकारी यांची नेमणुक करुन तपासणी अधिकारी यांना तपासणी अहवाल देण्यास सांगीतले, पण तपासणी अधिकारी यांनी वेळेवर तपासणी अहवाल न दिल्यामुळे व अर्जदारांनी शव विच्छेदन अहवाल न दिल्यामुळे अर्जदाराचा दावा नामंजुर करण्यात आला. गैरअर्जदारांनी अर्जदाराचा दावा अमान्य करण्यात यावा अशी विनंती केली आहे.
४. अर्जदाराची तक्रार कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, गैरअर्जदार क्र. ३ यांचे कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन केले असता तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार यांनी अर्जदारास विमा कराराप्रमाणे
प्रतीपुर्ती दावा रक्कमेबाबत सेवासुविधा पुरविण्यात
कसूर केल्याची बाब अर्जदार सिद्ध करतात काय ? होय
२. गैरअर्जदार यांनी अर्जदारास प्रतीपुर्ती दावा
रक्कम अदा न केल्याने नुकसान भरपाई अदा करण्यास
पात्र आहेत काय ? होय
३. आदेश ? अंशत: मान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ बाबत :
५. जे.पी.इलेक्ट्रीकल ची संचालीका आहे. अर्जदाराने व्यवसाया निमीत्त्य काम करणारे कुशल व अकुशल कर्मचारी यांच्या भविष्याचा विचार करुन गैरअर्जदारासोबत ६ कामगारांसाठी विमा संरक्षण घेतले. सदर कराराप्रमाणे संरक्षीत कालावधी मध्ये १ कामगार नामे आनंदराव हजारे दिनांक ०८.०२.२०११ रोजी विजेच्या खाबांवरुन पडुन मरण पावला. त्याची सुचना अर्जदारांनी गैरअर्जदार यांना दिल्यानंतर गैरअर्जदारांनी विमा कराराप्रमाणे संपुर्ण कागदपत्रे सादर करण्यास अर्जदारास सांगीतल्यामुळे अर्जदाराने कागदपत्रासह विमा दावा दाखल केला. सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदार यांनी ३० दिवसांच्या आंत विमा दावा निकाली काढणे आवश्यक होते, परंतु गैरअर्जदारांनी शव विच्छेदन अहवाल व विमा कंपनीच्या तपासणी अधिकारी यांचा तपासणी अहवाल वेळेवर सादर न केल्यामुळे विमा दावा नाकारुन कोणत्याही न्यायोचित कारणांशिवाय सदर विमा करारातील अटी व शर्तीचा भंग करुन अर्जदाराचा न्यायोचित विमा दावा नाकारुन सेवासुविधा पुरविण्यास कसुर केला आहे. तसेच अर्जदार यांनी कुशल व अकुशल कर्मचारी यांच्या भविष्याचा विचार करुन गैरअर्जदारासोबत ६ कामगारांसाठी विमा संरक्षण घेतले असुन गैरअर्जदार यांनी दावा नाकराणे योग्य नाही. सदर विमा दाव्याच्या अटी व शर्तीप्रमाणे गैरअर्जदार हा विमा दावा देणे बंधनकारक आहे. अद्याप विमा दाव्याची रक्कम अर्जदारास प्राप्त न झाल्याने अर्जदारास मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास होवुन प्रस्तुत तक्रारीपोटी खर्च करावा लागला आहे. सबब गैरअर्जदार अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत. सबब मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र. ३ बाबत :
६. सबब मुद्दा क्र. १ व २ च्या विवेचनावरून मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. ८८/२०१६ अंशत: मान्य करण्यात येते.
२. गैरअर्जदार यांनी अर्जदारास ग्राहक संरक्षण अधिनीयम तरतुदी प्रमाणे
विमा कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यामध्ये कसुर केल्याची बाब जाहीर
करण्यात येते.
३. गैरअर्जदार यांनी अर्जदारास वैद्यकीय प्रतीपुर्ती दावा रक्कम रु. १०,०६,६१२/-
दिनांक १५.११.२०१७ पासुन अदा करेपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के व्याजासह अदा
करावी.
४. गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक, शारीरीक त्रासापोटी व तक्रार
खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. २५,०००/- या आदेश प्राप्ती दिनांकापासुन ३०
दिवसात अदा करावी.
५. गैरअर्जदार यांनी नियुक्त केलेल्या तपासणी अधिकारी यांनी विहीत
कालावधीमध्ये संपुर्ण कागदपत्रासह तपासणी अहवाल गैरअर्जदार यांचेकडे दाखल
करण्याचे ग्राहक संरक्षण अधिनीयम कलम १४ (फ) गैरअर्जदार यांना देण्यात
येवुन सदर बाबींची पुर्नरावृत्ती होउ नये याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात येते.
६. न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती.कल्पना जांगडे श्रीमती. किर्ती गाडगीळ श्री.उमेश वि. जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)