जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्र. 90/2008. प्रकरण दाखल तारीख. – 29/02/2008. प्रकरण निकाल तारीख. – 23/07/2008. समक्ष - मा.श्री.सतीश सामते - अध्यक्ष (प्र.) श्रीमती सुजाता पाटणकर, - सदस्या साहेबराव पुरभाजी ढवळे अर्जदार. वय, 45 वर्षे धंदा नोकरी(वैद्यकीय अधिकारी) रा. कैलास नगर ता. जि.नांदेड. विरुध्द. युनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी लि. गैरअर्जदार तर्फे शाखा व्यवस्थापक, दयावान कॉम्ल्पेक्स, दुसरा मजला, स्टेशन रोड, परभणी अर्जदारा तर्फे वकील – अड.एस.एल. कापसे गैरअर्जदार तर्फे - अड.जी.एस.औढेंकर. निकालपत्र (द्वारा - मा.श्री.सतीश सामते,अध्यक्ष (प्र ) गैरअर्जदार यूनायटेड इंडिया इन्शूरन्स कंपनी मर्यादित यांच्या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांची तक्रार आहे. अर्जदाराच्या वाहनाच्या झालेलया नूकसानी बददल रु.1,33,968/- त्यांना गैरअर्जदाराकडून व्याजासह मिळावेत अशी त्यांची मागणी आहे. अर्जदार हे वाहन क्र. एम.एच.-22-डी.-2005 यांचे मालक आहेत. त्यांनी दि.23.2.2007 रोजी गैरअर्जदार यांच्याकडून विमा उतरविला व त्यांचा कालावधी दि.23.2.2007 ते 3.7.2007 पर्यत होता. यापूर्वीचा कालावधी दि.4.5.2006 ते 3.5.2007 हे पूर्वीच्या मालकाच्या नांवाने होते.ही पॉलिसी नंतर अर्जदाराच्या नांवाने हस्तांतरीत झाली. दि.18.3.2007 रोजी अर्जदार हे नांदेडहून परभणी कडे त्यांच्या एम. एच.-22-डी.-2005 या फोर्ड कारने जात असताना गाडीचे इंजिनला खालून दगड लागून गाडी बंद पडली व बोनेट मधून धूर नीघू लागला. रेडिएटर बंद पडले. व त्यामुळे त्यांची कार टोचन लाऊन वाय झेड (फोर्ड) मोटर्स प्रा. लि. औरगांबाद येथे दूरुस्तीसाठी न्यावी लागली. सदर वाहन टोचण करुन औरंगाबाद येथे नेण्यासाठी अर्जदार यांना रु.1500/- एवढा खर्च आला. वाहनाच्या दूरुस्तीसाठी रु.1,28,968/- एवढा खर्च आला असून ती रक्कम अर्जदाराने दि.16.08.2007 रोजी दिलेली आहे, त्यांची पावती नंबर 624 असा आहे. सदर वाहनाच्या नूकसानी बाबत विमा कंपनीस अर्जदाराने पूर्व सूचना दिलेली होती व किती खर्च दूरुस्तीसाठी येणार हे ही सांगितले होते व त्यांस गैरअर्जदार यांनी संमती पण दिली होती. यानंतर देखील गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना नूकसानीची रक्कम तर दिली नाहीच पण अद्यापपावेतो काहीही कळवलेले नाही. म्हणून अर्जदार यांच्या मागणीप्रमाणे गैरअर्जदाराकडून नूकसानीची रक्कम मिळावी यासाठी तक्रार अर्ज दाखल केला आहे. गैरअर्जदार हे वकिलमार्फत हजर झाले, त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले आहे. ते म्हणतात अर्जदार यांचे म्हणणे धांदात खोटे आहे. व अर्जदार यांनी अपघात झाल्यानंतर गैरअर्जदारास कूठलीही सूचना न देता वाहन जागेवरुन हलविले आहे. अर्जदार यांनी रु.1500/- टोचन चार्जेस व दूरुस्तीसाठी रु.1,28,968/- दिले हे त्यांनी अमान्य केले आहे. गैरअर्जदार यांना क्लेम मिळाल्यावर सर्व्हेअर म्हणून श्री. कीशोर पिसे यांना पाठविले व त्यांनी वाहनाची तपासणी करुन गैरअर्जदार यांची जबाबदारी आलीच तर रु.30,200/- अशी ठरविली आहे. अर्जदार यांनी रु.10,900/- ची बिले दिलेली आहेत. गैरअर्जदार यांनी ते पाहून रु.10,988/- चा क्लेल सेंटल करुन त्याप्रमाणे व्हाऊचर अर्जदार यांना दिले असता त्यांनी वापस दिलेच नाही त्यामुळे त्यांनी सेवेत ञूटी केली असे होणार नाही. त्यामुळे अर्जदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून स्वतःचे शपथपञ दाखल केले आहे. तसेच त्यांनी वाहनाचे आर. सी.बूक, अर्जदाराचे ड्रायव्हींग लायसन्स, विमा पॉलिसी, विमा हस्तांतरणासाठी भरलेल्या रक्कमेची पावती, वाय झेड मोटार्स औरंगाबाद यांनी दूरुस्तीसाठी दिलेले अंदाजपञक, वाय झेड मोटार्स औरंगाबाद यांनी वाहन दूरुस्तीस आलेल्या एकूण खर्चाची बिले, वाय झेड मोटार्स औरंगाबाद यांनी पावती क्र.624 प्रमाणे रु.1,28,068/- बिल दाखल केले आहे. तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून श्री. भगवान कोठाळे यांची शपथपञाद्वारे नोंदविली आहे तसेच त्यांनी सव्हेअर व लॉस रिपोर्ट, फोटो, बिल चेक रिपोर्ट, असेंसमेंट ऑफ लॉस बिलाप्रमाणे दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज तपासून व दोन्ही पक्षकारांनी वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकूण खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदाराने विमा पॉलिसी नंबर 230601/31//06/01/00000944 दाखल केलेली आहे. ज्यावर वाहनाचा क्रमांक एम.एच.-22-डी.-2005 असा असून विम्याचा कालावधी हा दि.23.2.2007 ते 3.5.2007 असा दर्शविला आहे. पॉलिसी ही अर्जदाराच्या नांवावर आहे. त्यामुळे पॉलिसी बददल वाद नाही. अर्जदार यांनी दाखल केलेल्या आर.सी. बूकावरुन वाहन हे अर्जदाराच्या नांवावर हस्तांतरीत झालेले आहे. त्यामुळे आता तोही वाद नाही. अर्जदार यांनी दाखल केलेले इस्टीमेंट व बिले यावरुन वाय झेड फोर्ड या कंपनीची टॅक्स इनव्हाईस रु.1,28,968/- चे आहे व तेवढे पेमेंट केल्या बददलची पावती नंबर 624 अर्जदाराने दाखल केलेली आहे. ज्यावेळेस सर्व्हेअरने औरंगाबाद येथे जाऊन वाय झेड मोटार्स प्रा. लि. या कंपनीत अर्जदाराच्या वाहनाची तपासणी केली असता खालून लागलेल्या दगडामूळे इंजीन व रेडीएटरला काय नूकसान झाले हे स्वतः तपासून पाहिले आहे. त्यामुळे वाहनाची नक्की काय दूरुस्ती करायची हे सर्व्हेअरशिवाय दूसरे कोणीही सांगू शकत नाही. दुरुस्ती साठी सर्व्हेअरनी कोणते पार्टस अलाऊड केले आहेत, तेच महत्वाचे आहे. त्याबाहेरील दुरुस्ती नामंजूर होईल. म्हणून सर्व्हेअरने जो सर्व्हे रिपोर्ट दाखल केलेला आहे यावरुन गैरअर्जदार यांच्यावरील जबाबदारी रु.30,200/- एवढी ठरवलेली आहे. अर्जदार यांनी दिलेल्या इस्टीमेंट पक्की सर्व्हेअरने रु.47,451/-अशी रक्कम नूकसानीची दाखवलेली आहे. व यावर मेटल पार्टस 25% व रबर पार्ट 50% सांगितले आहेत. डिप्रिसिऐशनची रक्कम रु.15,739/- तसेच लेस एक्सेस रु.1,000/- व साल्व्हेज रु.1576/- एवढी रक्कम कमी करुन रु.30,200/- एवढी रक्कम ठरवलेली आहे.अर्जदार यांनी जास्त रक्कम मागितली जरी असली तरी खालून दगड लागून जे इंजिन व रेडीएटरचे नूकसान झालेले आहे. त्यांला सर्व्हेअरनी दिलेली रक्कम ही पूरेशी वाटते. गाडी बंद पडल्यानंतर ती टोचन लाऊन औरंगाबाद पर्यत नेली ही सत्य स्थिती आहे. त्यामुळे अर्जदाराने पावती जरी दाखल केलेली नसली तरी रु.1500/- हे टोचणसाठी विमा कंपनी नेहमी देत असते, त्याप्रमाणे टोचनचे रु.1500/- अर्जदार मिळावयास पाहिजे हे सर्व्हेअरने गृहीत धरलेले नाही. म्हणून रु.30,200/- + रु.1500/- = रु.31700/- एवढी रक्कम मिळण्यास अर्जदार हे पाञ आहेत. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा क्लेम प्रोपोजल आल्यानंतर तिन महिन्यापर्यत त्यांचा क्लेम कायदयाप्रमणे सेटल करणे आवश्यक होते. दि.21.3.2007 रोजी सर्व्हेअरनी सर्व्हे केला. यानंतर आजपर्यत गैरअर्जदार यांनी होकार /नकार काही कळवलेला नाही. यांचा अर्थ गैरअर्जदार यांचा रक्कम देण्यास नकार आहे असाच अर्थ घ्यावा लागेल. व सर्व्हेअरने ठरवलेली नूकसान भरपाई ही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना देणे बंधनकारक आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. हा निकाल लागल्यापासून 30 दिवसाचे आंत गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.31,700/- व त्यावर प्रकरण दाखल केलेल्या दिनांकापासून म्हणजे दि.29.02.2008 पासून 9% व्याजासह रक्कम दयावी, असे न केलयास दंडव्याज म्हणून 12% दराने पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.1000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना निकाल कळविण्यात यावा. (श्रीमती सुजाता पाटणकर ) ( श्री.सतीश सामते ) सदस्या प्रभारी अध्यक्ष जे.यू.पारवेकर लघूलेखक |