निकालपत्र :- (दि.21/09/2010) (सौ. प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की – तक्रारदाराने स्वत:च्या मालकीच्या टाटा सुमो गाडीचा विमा(Comprehensive policy) दि.20/10/2006 ते 18/10/2007 या मुदतीसाठी सामनेवाला विमा कंपनीकडून उतरवला असून पॉलीसी नं.160305/31/06/01/0000118 असा आहे. तक्रारदार प्रस्तुत गाडीचा मालक व ड्रायव्हरही आहे. (2) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, दि.22/11/2006 रोजी तक्रारदार आपल्या 6/7 मित्रांना घेऊन अलमट्टी धरण पाहण्यासाठी चालले होते तेव्हा विजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांच्या वाहनाला अपघात होऊन त्यांचे वाहन पलटी झाले या अपघातात स्वत: तक्रारदारांना व त्यांच्या मित्रांनाही जखमा झाल्या व वाहनाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. सदरची वाहतूक तक्रारदाराने केवळ मैत्रीखातर केली होती व त्यासंबंधात कुठल्याही त-हेचा मोबदला घेतला नव्हता. सदर अपघातामध्ये तक्रारदाराला झालेल्या जखमा गंभीर स्वरुपाच्या होत्या. तक्रारदाराच्या मित्राने लगेचच पोलीस स्टेशनला अपघाताची वर्दी दिली. तसेच सामनेवाला विमा कंपनीसही अपघात झाल्याबद्दल कळवले. सामनेवाला कंपनीने अपघातग्रस्त वाहन पंडीत ऑटोमोटीव्ह गॅरेज,सांगली यांच्याकडे पाठवण्यास सांगितले. पंडीत गॅरेजने दि.11/04/2007रोजी सदर वाहनाचा दुरुस्तीचा रु.2,55,824/-पर्यंत येईल असे तक्रारदारांना कळवले. यावेळी तक्रारदार हा गंभीर जखमी असल्याने दवाखान्यात दाखल होता त्यामुळे अपघातग्रस्त वाहनाचे फोटो काढू शकत नव्हता. तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन दिली आहे. तक्रारदाराकडे ड्रायव्हींग लायसन्स आहे. परंतु वारंवार मागणी करुनही सामनेवालाने तक्रारदारांना कुठलीही नुकसान भरपाईची रक्कम दिली नाही. दि.23/07/2007 रोजी तक्रारदाराने पॉलीसीच्या अटी व शर्तींचा भंग केला असे चुकीचे व खोटे कारण दाखवून तक्रारदाराचा क्लेम बेजबाबदारपणे नामंजूर केल्याचे सामनेवालाने तक्रारदारांना कळवले. तक्रारदाराचे व्हॅलीड ड्रायव्हींग लायसन्स असताना तसेच वाहनामध्ये क्षमतेप्रमाणे8 + 1 एवढेच लोक बसले होते. तसेच तक्रारदाराने सर्व कागदपत्रे जसे व्हॅल्यूएशन रिपोर्ट, पोलीस पेपर्स, स्पॉट पंचनामा इत्यादी सामनेवाला विमा कंपनीकडे वेळेवर दाखल केली असतानाही सामनेवालाने चुकीच्या कारणाने तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला आहे. तक्रारदाराची पॉलीसी कॉम्प्रेहेन्सीव्ह स्वरुपाची होती तरीही सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा न्याय क्लेम नामंजूर केल्यामुळे तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीविरुध्द सदरची तक्रार दाखल केली आहे व आपल्या पुढीलप्रमाणे मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून विनंती केली आहे. पंडीत अटोमोटीव्ह सांगली यांचेकडून वाहन दुरुसतीसाठी आलेले रक्कम रु.2,55,824/-चे बील, सदर अपघात ग्रस्त वाहन सांगली येथून आणणेचा खर्च, आदिनाथ सहकारी बॅंकेचे सदर वाहन तारण असलेल्या कर्जाची रक्कम व त्यावरील तसेच मानसिक त्रासाची रक्कम असे एकूण रक्कम रु.44,176/-असे एकूण रक्कम रु.3,00,000/-सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत जबाब, फायनल रिपोर्ट/चार्जशिट फॉर्म,एफ.आय.आर,अक्सिडेंट रिपोर्ट, तक्रारदाराचे लायसन्सची प्रत, इन्शुरन्स सर्टीफिकेट,क्लेम फॉर्म, सामनेवाला यांना तक्रारदाराने दिलेले पत्र, पंडीत अटोमोटीव्ह लि.चे वाहन दुरुसतीचे बील, सामनेवाला यांचे क्लेम नाकारलेचे पत्र, डॉ.सतीश पाटील यांचो मेडिकल रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला विमा कंपनीने आपल्या कथनात तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु तक्रारदाराच्या इतर सर्व कथनाला तीव्र आक्षेप घेतला आहे. सामनेवाला पुढे असे म्हणतात की तक्रारदारकडून क्लेम दाखल झाल्यावर सामनेवाला विमा कंपनीने याकामी सर्वे करण्यासाठी मे. पाटील सर्व्हेअर यांची नेमणूक केली. त्यांच्या सर्व्हे रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सदरची टाटा सुमो गाडी क्र.MH-12-BV-2461 तक्रारदाराने मोबदला स्विकारुन भाडयाने दिली होती. सर्व्हेअरने चौकशी केल्यानंतर असे दिसून आले की,सदर वाहनामध्ये बसलेले लोक हे पेड पॅसेंजर्स होते. तसे त्यांन शपथपत्र घातले आहे. गाडीच्या विमा पॉलीसीत सदरचे वाहन खाजगी व वैयक्तिक उपयोगासाठी आहे असे नमुद केले असूनही तक्रारदाराने भाडयाने पॅसेंजर्स घेणे हे विमा करारातील अटींचा(क्र.3-बी) भंग आहे. त्यामुळेच सामनेवाला विमा कंपनीने पूर्ण विचार करुनच सदरचा क्लेम नामंजूर केला आहे. त्यामध्ये सामनेवाला विमा कंपनीची कुठलीही त्रुटी नाही. (5) सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, प्रस्तुत वाहनाचा डिटेल सर्व्हे मे. प्रकाश पुराणिक कृपा सर्व्हेअरने प्रस्तुत वाहनाच्या नुकसानीचा आकडा रु.1,90,033.75पै. इतका दाखवला. परंतु तक्रारदाराने वाहन दुरुस्त केले नाही किंवा त्याचा बिलचेक रिपोर्टही तक्रारदाराने दाखल केला नाही. जोपर्यंत बिलचेक रिपोर्ट येत नाही तोपर्यंत सामनेवाला विमा कंपनी नुकसानीचे पूर्ण असेसमेंट करु शकत नाही. ही सर्व परिस्थिती विशद करुन सामनेवाला विमा कंपनीने प्रस्तुतची तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी अशी विनंती केली आहे. (6) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत इन्शुरन्स पॉलीसी प्रत, श्री पाटील सर्व्हेअर्स अन्ड व्हॅल्यअर्स यांचा इन्व्हीस्टीगेशन रिपोर्ट जबाबासह व कृपा सवर्हेअर्स यांचा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट जबाबासह दाखल केले आहेत. (7) या मंचाने तक्रारदाराची तक्रार, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, दोन्ही बाजूंच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद ऐकला तसेच त्यांनी दाखल केलेले कागदपत्रही तपासले. (8) सामनेवाला यांना तक्रारदाराची विमा पॉलीसी मान्य केली आहे त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत याबद्दल वाद नाही. आता सदर मंचास पुढील महत्वाचे मुद्दे विचारात घ्यावयाचे आहेत. 1) सामनेवाला विमा कंपनी तक्रारदारास नुकसानभरपाई देय आहे का ? ---होय. 2) त्याबद्दल सामनेवाला विमा कंपनी तक्रारदारास नुकसान भरपाई देय आहे का ? ---होय. 3) काय आदेश ? ---पुढीलप्रमाणे (9) तक्रारदार आपल्या कथनामध्ये सुमो गाडीत बसलेले लोक हे पेड पॅसेंजर्स नसून आपले मित्र होते असे शपथेवर म्हणत आहेत. सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा क्लेम गाडीमध्ये पेड पॅसेंजर्स घेतल्यामुळे पॉलीसीतील महत्वाच्या अटींचा( नं.3-बी) चा भंग झाला या कारणामुळे नामंजूर केला आहे. सामनेवालाने गाडीत बसलेल्या लोकांनी (हडपद वगैरे) सदरची गाडी प्रती किलोमिटर रु.5.50 दराने ठरवली होती असे लिहून दिल्याचे कथन केले आहे व ती कागदपत्रेही दाखल केली आहेत. परंतु तक्रारदार व सामनेवालाने दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी केली असता असे दिसून येते की दि.22/11/2006 रोजी प्रस्तुत गाडीतून प्रवास करणा-या प्रदिप हडपद, रमेश हडपद, महेश हडपद इत्यादी तसेच गजानन अनंतपुरे इत्यादी लोकांनी विजापूर पोलीस ठाणे मधील ट्रॅफीक पीएसआय यांच्ययासमोर लिहून दिलेल्या कैफियतमध्ये कुठेही सदरची गाडी भाडयाने घेतली असल्याबद्दल उल्लेख नाही. तसेच उपरोक्त सर्व संबंधीत प्रवाशांनी दि.17/08/2010 रोजी शपथपत्र घालून संदिप बेडगे हा आपला मित्र आहे व आम्ही मित्रमित्र मिळून अलमट्टी धरण पाहण्यास सहलीसाठी गेलो होतो. सदरी गाडी भाडयाने घेतली होती हे म्हणणे खोटे आहे से कथन केले नाही.सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या अरुण महादेव पाटील या इसमाला आमच्याकडे पाठवून तुम्हाला व अर्जदार यांना पैसे दयायचे ओहत असे सांगून को-या कागदावर आमच्या सहया घेतलया आहेत असे स्पष्ट निवेदन केले आहे.त्यामुळे सामनेवालाचे तक्रारदाराने गाडीमध्ये पेड पॅसेंजर्स घेतल्याने पॉलीसीच्या अटींचा भंग केला या कारणामुळे तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केला हे कथन हे मंच ग्राहय धरु शकत नाही. कुठलाही सबळ पुरावा असल्याशिवाय पॉलीसीतील अटींचा भंग केला असे केवळ तांत्रिक व काल्पनिक कारण दाखवून विमाधारकाचा न्याय क्लेम नामंजूर करणे ही सामनेवालाच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे अशा ठाम निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) तक्रारदाराने आपल्या कथनामध्ये (पॅरा-6) स्वत: पदरमोड करुन गाडीची दुरुस्ती करुन घेणे आपल्या आर्थिक परिसिथतीमुळे आपल्याला शक्य नसल्याचे म्हटले आहे. सामनेवालाने तक्रारदाराने गाडी दुरुस्त करुन घेऊन बील चेक रिपोर्ट दिला नाही. त्यामुळे अॅसेसमेंट करता आले नाही असेही एक कारण क्लेम नामंजूर करण्यासाठी पुढे केले आहे. परंतु तक्रारदार आर्थिक कुवत नसल्यामुळे गाडी दुरुस्तीचा खर्च करु शकत नसेल तर ही अट त्याच्यावर बंधनकारक ठरु शकत नाही. (11) सदर बाबतीत सामनेवालाने विमा कराराचा मूळ हेतू (main purpose) विचारात घेणे आवश्यक होते. मा. सर्वोच्च न्यायालयाने बी.व्ही. नागाराजू विरुध्द ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी (1996)या तक्रारीत दिलेला निकाल हे मंच मार्गदर्शक मानत आहे. सदर तक्रारीतील निकालात मा. सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, " Wheather the breach of carrying persons in a goods vehicle more than the number permitted in terms of the insurance policy is so fundamental a breach so as to afford ground to the insurer to eschew liability altogether and Held-No. The terms of the policy had not be construed strictly but be read downto advance the main purpose of the contract." " Even for the sake of argument----------- travelling the vehicle." ( S.C. Judgement page 1180) वरील निकालात मा. सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय आदर्श असे मार्गदर्शक तत्व सांगितले आहे की, When the option is between opting for aview which will relievel the distress and misery of the victims of accidents or their dependents on the one hand and the equally plausible view which will reduce the profitability of the insurer in regard to the occupational hazarad undertaken by it, by way of business activity there is hardly any choice. The court cannot but opt for the former view the doctrine of reading down. The exclusion clause in the light of main purpose of the provision, so that the exclusion clause does not cross swords with main purpose,. The effort must be to harmonize the two instead of allwoing the exclusion clause to snipe successfully at the main purpose." (11) वरील विवेचनावरुन हे स्पष्ट होत आहे की, प्रस्तुत तक्रारीत सामनेवाला विमा कंपनीने केवळ तांत्रिक व काल्पनिक कारण दाखवून तक्रारदाराचा न्याय क्लेम नामंजूर करणे ही निश्चितच सामनेवाला विमा कपंनीच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे. सदर तक्रारीत कृपा सर्व्हेअरच्या प्रकाश पुराणिक यांनी सकृतदर्शनी पाहणी करुन रक्कम रु.1,90,033.75पै.इतका रक्कमेचा नुकसानीचा अंदाज आपल्या सर्व्हे रिपोर्टमध्ये दिला आहे तो हे मंच ग्राहय मानून खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराला नुकसानभरपाई दाखल रु.1,90,,033.75पै. (रु.एक लाख नव्वद हजार तेहतीस पैसे पंच्याहत्तर फक्त) दि.23/07/2007 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने अदा करावी. 3) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासाबद्दल रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |