Maharashtra

Nagpur

CC/396/2018

SHRI. BHARAT BHUSHAN CHOUDHARY - Complainant(s)

Versus

UNITECH LTD. - Opp.Party(s)

ADV. VINOD LALWANI

29 Nov 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/396/2018
( Date of Filing : 28 May 2018 )
 
1. SHRI. BHARAT BHUSHAN CHOUDHARY
R/O. B-603, UTKARSHA ANURADHA, BEHIND HERITAGE HOTEL, CIVIL LINES, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. UNITECH LTD.
6, COMMUNITY CENTRE, SAKET, NEW DELHI-110017
DELHI
UTTAR PRADESH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 29 Nov 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- एस. आर. आजने, मा. सदस्‍य )

  1. तक्रारकर्ता यांनी प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता नागपूर येथील रहिवासी असुन त्‍यांनी त्‍याची मिळकतीची रक्‍कम गुंतवणूक करण्‍याकरीता विरुध्‍द पक्षाकडे आवेदन सादर केले व रुपये ६,००,०००/- विरुध्‍द पक्षाकडे गुंतविले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला पाठविलेले मुदती ठेव प्रमाणपञ तक्रारकर्त्‍याला नागपूर येथे प्राप्‍त झाले. तक्रारकर्त्‍याने रुपये ६,००,०००/- ३६ महिण्‍यांकरीता १२.५ टक्‍के दराने दिनांक २८/०६/२०१३ ला गुंतविले. तक्रारकर्त्‍याने मुदती ठेव प्रमाणपञाच्‍या  परिपक्‍व तारखेनंतर म्‍हणजे दिनांक २८/०६/२०१६ नंतर मुळ मुदतीठेव प्रमाणपञ दिनांक ०६/०६/२०१६ ला रजिस्‍टर्ड पोस्‍टाद्वारे पञासह विरुध्‍द पक्षाला पाठविले व त्‍याद्वारे परिपक्‍वता रक्‍कम रुपये ८,७१,३०३/- मिळण्‍याची मागणी केली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला देय रक्‍कम दिली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिनांक ११/९/२०१७ ला रजिस्‍टर्ड पोस्‍टाद्वारे नोटीस पाठवुन त्‍याद्वारे मुदतीठेवीतील परिपक्‍वता रक्‍कम रुपये ८,७१,३०३/- १२.५ टक्‍के दराने व्‍याजासह मागणी केली परंतू विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे नोटीस बाबत काहीही कार्यवाही केली नाही व रक्‍कम अदा केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर प्रकरण दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला परिपक्‍वता रक्‍कम रुपये ८,७१,३०३/- दिनांक २८/०६/२०१६ पासुन १२.५ टक्‍के दराने व्‍याजासह परत करावे व मा‍नसिक व शारिरीक ञासाकरीता तसेच तक्रारीचा खर्च अदा करावा.
  1. मंचाद्वारे विरुध्‍द पक्षाला रजिस्‍टर्ड पोस्‍टाद्वारे नोटीस पाठविली व ती प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष हजर झाले नाही करीता मंचाने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द प्रकरण दिनांक १५/१२/२०१८ ला एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारीत केला.
  2. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक ४ सोबत दाखल दस्‍ताऐवज, लेखी युक्‍तीवाद व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर मंचाने खालिलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले व त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नोंदविले आहेत.               

          अ.क्र.            मुद्दे                                                                            उत्‍तर

I.        तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय

II.       विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?         होय

  1. काय आदेश ?                                                                      अंतिम आदेशाप्रमाणे 

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेकडे रुपये ६,००,०००/-,  ३६ महिण्‍यांकरीता १२.५ टक्‍के दराने गुंतविले होते. सदरचे मुदतीठेव प्रमाणपञ विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याचे नागपूर पत्‍त्‍यावर पाठविले व ते त्‍याला नागपूर येथे प्राप्‍त झाले. तक्रारकर्त्‍याने सर्व पञव्‍यवहार नागपूर येथूनच केलेला आहे. सबब या न्‍यायमंचाला तक्रार चालविण्‍याचा अधिकार आहे.  तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक ४ वर दाखल दस्‍ताऐवजांचे अवलोकन केल्‍यावर असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे मुदतीठेव मध्‍ये ठेवलेल्‍या रकमेच्‍या परिपक्‍वता तारखेनंतर विरुध्‍द पक्षाकडे मुळ प्रमाणपञ दिनांक ०६/०६/२०१६ ला स्‍पीड पोस्‍टाद्वारे पाठविले व परिपक्‍वता रक्‍कम रुपये ८,७१,३०३/- इतक्‍या रकमेची मागणी केली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रक्‍कम अदा केली नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याने मुदतीठेव मध्‍ये ठेवलेली रक्‍कम मुदती ठेवीच्‍या परिपक्‍वता तारखेनंतर अदा केली नाही. ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती दोषपूर्ण सेवा असुन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मुदतीठेव प्रमाणपञ क्रमांक १२२११२६ मधील परिपक्‍वता रक्‍कम रुपये ८,७१,३०३/- दिनांक २८/०६/२०१६ पासून १२.५ टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा होईपर्यंत अदा करावे.
  3. तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाने झालेल्‍या मा‍नसिक व शारिरीक ञासापोटी रुपये ४०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.