(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 24 एप्रिल 2014)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 सह 14 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्ता यांनी युनिक मोबाईल गॅलरी मधून दि.15.4.2013 रोजी मायक्रोमॅक्स या कंपनीचा मोबाईल मॉडेल नं. मायक्रोमॅकस A 54, IMEI No.1) 911250102170361 रुपये 5200/- मध्ये विकत घेतला. मोबाईल घेतल्यानंतर 4 महिन्याचे आंत बिघडला त्यामुळे दि.16.8.2013 ला चार्जींग दोष असल्यामुळे देण्यात आला. परंतु, अजुनपर्यंत मोबाईल दुरुस्त करुन देण्यात आलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थिक, मानसीक व शारीरीक ञास सहन करावा लागला व त्यामुळे दुसरा नविन मोबाईल विकत घ्यावा लागला. त्यामुळे तक्रारकर्त्याने रुपये 5200/-, तक्रारीचा खर्च रुपये 2000/- व शारिरीक व मानसिक ञासापोटी भरपाई रक्कम रुपये 10,000/- मिळण्याकरीता प्रार्थना केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 1 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.8 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.8 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरात नमूद केले की, गैरअर्जदार क्र.1 हा मोबाईल हॅन्डसेटचा विक्रेता आहे. गैरअर्जदार क्र.1 यास मोबाईलचे वॉरंटी काळात दुरुस्ती करण्याचा अधिकार नाही. मोबाईल हॅन्डसेट निर्मात्याकडून ग्राहकांना जी वॉरंटी दिली जाते त्या वॉरंटीकरीता गैरअर्जदार क्र.1 जबाबदार नाही, याबाबत गैरअर्जदाराचे बिलावर स्पष्टपणे नमूद केलेले आहे. ग्राहकाचे मोबाईल हॅन्डसेटमध्ये काही बिघाड उद्भवल्यास ग्राहकाने परस्पर कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरशी स्वतः संपर्क साधून वॉरंटी काळातील दुरुस्ती करुन घ्यावी असे सुध्दा स्पष्टपणे बिलात नमूद केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराचा मोबाईल हॅन्डसेट मायक्रोमॅक्स कंपनीचे नागपूर येथील अधिकृत सर्व्हिस सेंटर मध्ये आवश्यक त्या दुरुस्तीकरीता जमा केला. अर्जदाराचा मोबाईल हॅन्डसेट दुरुस्तीनंतर गैरअर्जदाराचे दुकानात आला परंतु अर्जदार ग्राहकाने मोबाईल पूर्ण पत्ता किंवा फोननंबर दिलेला नव्हता, त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 चा अर्जदार ग्राहकासोबत संपर्क झाला नाही व गैरसमजुतीने गैरअर्जदार क्र.1 व मोबाईल हॅन्डसेट कंपनीचे विरुध्द कुठलिही नोटीस न देता खोटी तक्रार दाखल केली. त्यामुळे अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज होऊन अर्जदाराकडून गैरअर्जदार क्र.1 ला रुपये 10,000/- देण्याची मागणी करीत आहे. अर्जदार ग्राहकाचा मोबाईल रितसर दुरुस्त होऊन आल्यामुळे गैरअर्जदाराकडून घेऊन जाण्यास हरकत नाही. अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती केली आहे.
5. अर्जदाराने नि.क्र.14 नुसार शपथपञ दाखल केला. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.15 नुसार शपथपञ व नि.क्र.16 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 विरुध्द नि.क्र.1 वर दि.25.3.2014 ला एकतर्फा आदेश पारीत केला. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय.
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदाराचा दावा मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
7. अर्जदाराने त्याचे तक्रारीत असे कथन केले आहे की, अर्जदार यांनी युनिक मोबाई गॅलरी मधून दि.15.4.2013 रोजी मायक्रोमॅक्स (गैरअर्जदार क्र.2) या कंपनीचा मोबाईल मॉडेल नं. मायक्रोमॅकस A 54, IMEI No.1) 911250102170361 रुपये 5200/- मध्ये गैरअर्जदार क्र.1 कडून विकत घेतला. ही बाब अर्जदार व गैरअर्जदारांना मान्य असून अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे असे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र.1 होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
8. अर्जदाराने दि.15.4.2013 रोजी गैरअर्जदार क्र.2 च्या कंपनीचा मोबाईल विकत घेतांना गैरअर्जदार क्र.2 नी अर्जदाराला मोबाईल संबंधी वॉरंटी दिली होती, ही बाब तिन्ही पक्षांना मान्य आहे. सदर मोबाईल हा वॉरंटी पिरेड मध्ये असतांना बिघडला व त्यासाठी अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 ला दुरुस्त करण्यासाठी दिला, ही बाब सुध्दा तिन्ही पक्षांना मान्य आहे. अर्जदाराच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे सदर तक्रार दाखल करेपर्यंत गैरअर्जदार क्र.1 नी वरील उल्लेख केलेला मोबाईल अर्जदाराला दुरुस्त करुन दिलेला नाही. सदर तक्रारीमध्ये गैरअर्जदार क्र.2 ला नोटीस मिळूनसुध्दा मंचासमक्ष हजर राहिलेला नाही व कोणतेही सदर तक्रारीवर उत्तर दिले नाही, म्हणून मंचाच्या मताप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 व 2 नी अर्जदाराप्रती न्युनतापूर्ण सेवा दिलेली आहे असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.2 होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
9. मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचन करुन व अर्जदाराने दाखल केलेली तक्रार, दस्ताऐवज, गैरअर्जदार क्र.1 चे जबाबाचे व दस्ताऐवजाचे अवलोकन करुन अर्जदार हा खालील अंतिम आदेशाप्रमाणे मागणीस पाञ आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार क्र.1 व 2 नी वैयक्तीक व संयुक्तरित्या अर्जदाराचा वरील उल्लेख केलेला मोबाईल आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत दुरुस्त करुन द्यावा.
(3) अर्जदाराने जर दुरुस्त झालेला मोबाईल गैरअर्जदार क्र.1 कडून 30 दिवसानंतर घेण्यास नाकारल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराचे पत्यावर पोष्टाने दुरुस्त मोबाईल पुढील 15 दिवसाचे आंत पाठवावे.
(4) अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 500/- तसेच, तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- वैयक्तीक किंवा संयुक्तरित्या आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :-24/4/2014