Maharashtra

Kolhapur

CC/09/702

Pandurang Baburao Patil, - Complainant(s)

Versus

Unique Markantile services Pvt ltd. - Opp.Party(s)

Kiran Patil.

30 Nov 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/702
1. Pandurang Baburao Patil,Gadhinglaj.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Unique Markantile services Pvt ltd.Laxmipuri.Kolhapur2. M/s.Unique Marcantile India Pvt.LtdBranch-F-2, Milagre,Murad Maphsa.Goa,3. United India Insurance co ltd.Cambatta Building,3rd.Fllor.maharshi Karve Road.Mumbai4. United India Insurance co ltd.Branch-Laxmipuri.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBER
PRESENT :Kiran Patil., Advocate for Complainant
S.K.Dandge., Advocate for Opp.Party S.K.Dandge., Advocate for Opp.Party

Dated : 30 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.30/11/2010) ( सौ. प्रतिभा जे. करमरकर,सदस्‍या) 

(1)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी :- तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 कंपनीचे दि.30/11/2003 रोजी सभासद झाले असून त्‍या मोबदल्‍यात सामनेवाला क्र. 1 यांनी सामनेवाला क्र.3 कंपनीकडे त्‍यांचा मेडिकल इन्‍शुरन्‍स उतरवला होता. सदर इन्‍शुरन्‍स पॉलीसीचा कालावधी दि.31/12/2003 ते 30/12/2004 पर्यंत होता व पॉलीसी क्र.407000254 असा होता.
 
(02)       तक्रारदार आपल्‍या तक्रारीत पुढे सांगतात, यातील तक्रारदार हे दि.10/12/2004 ते 24/12/2004 पर्यंत आजारी असल्‍यामुळे शिवकृपा मॉडर्न हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, गडहिंग्‍लज येथे अडमिट होते. त्‍यानंतर दि.27/12/2004 रोजी तक्रारदाराने सर्व आवश्‍यक कागदपत्रांसह सामनेवाला विमा कंपनीकडे क्‍लेम फॉर्म पाठवला. सदर क्‍लेमच्‍या तारखांमध्‍ये विसंगती असल्‍याचे चुकीचे कारण दाखवून सामनेवाला विमा कंपनीने प्रस्‍तुत क्‍लेम नाकारला असल्‍याचे पत्र सामनेवाला क्र.1 कडे दि.06/07/2005 रोजी पाठवले. सदर क्‍लेम पूर्णपणे चुकीच्‍या कारणाने नाकारला असल्‍याचे तक्रारदाराने सामनेवाला विमा कंपनीला कळवले तरीही सामनेवाला विमा कंपनीने त्‍याची कुठलीही दखल घेतली नाही. ही सामनेवालांच्‍या विमा कंपनीच्‍या सेवेतील गंभीर सेवात्रुटी असल्‍यामुळे मागणी केलेली रक्‍कम रु.14,058/- 15 टक्‍के व्‍याजासह मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व नोटीस खर्च रु.2,000/- सामनेवाला विमा कंपनीकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीत केली आहे.
 
(03)       तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीसोबत सामनेवाला विमा कंपनीचे विमा क्‍लेम नाकारलेचे पत्र, सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास पाठविलेले पत्र, सामनेवाला क्र.1 यांचे झोनल ऑफिसला पाठविलेले पत्र, तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांना पाठविलेले पत्र, तक्रारदाराने पाठविलेला क्‍लेम फॉर्म, तक्रारदाराने सामनेवाला यांना वकीलांमार्फत पाठवलेली नोटीस, त्‍यास सामनेवाला क्र.2 यांनी पाठविलेले उत्‍तर, सामनेवाला क्र.1 यांनी त्‍यांचे रिजनल ऑफिसला व झोनल ऑफिसला पाठविलेले पत्र, तक्रारदार सामनेवाला क्र.1 यांचे सभासद झालेची रिसीट कम पोचपावती(पॉलीसी) इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(04)       सामनेवाला विमा कंपनीने आपल्‍या कथनात काही प्राथमिक मुद्दे उपस्थित केले आहेत. तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 च्‍यां गोवा येथील कार्यालयास पैसे भरुन सभासदत्‍व घेतले आहे व त्‍यांच्‍या तर्फे सामनेवाला विमा कंपनी मुंबई येथील(सामनेवाला क्र.3) तक्रारदाराची प्रस्‍तुत मेडिक्‍लेम पॉलीसी घेतली आहे. त्‍यामुळे सदर तक्रारीला क्षेत्रिय अधिकारतेची बाधा येत नाही. सामनेवाला क्र.4 ने याबाबतीत तक्रारदाराला कुठलीही सेवा दिली नव्‍हती व नाही.
 
(05)       तक्रारदाराचा तथाकथीत विमा क्‍लेम सामनेवाला विमा कंपनीने दि.06/07/2005 रोजी हॉस्पिटलमधील वास्‍तव्‍याच्‍या तारखांतील विसंगतीमुळे नामंजूर केल्‍याचे पत्र सामनेवाला क्र.1 कडे पाठवले. तसेच सदर पत्राची कॉपीही सामनेवाला विमा कंपनीने त्‍याच दिवशी तक्रारदाराकडे पाठवली. तक्रारदारांना सामनेवाला विमा कंपनीचा निर्णय चुकीचा वाटला असता तर त्‍यांनी सदर तारखेपासून 12 कॅलेंडर महिन्‍यांच्‍या आत त्‍यांनी सामनेवाला विमा कंपनीस कळवणे आवश्‍यक होते. तसे तक्रारदाराने केले नाही. ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 24 ए प्रमाणेही सदर तक्रारीस मुदतीची बाधा येते. तक्रारदाराने या संदर्भात विलंबमाफीचा अर्जही केला नाही. इतयादी सर्व बाबी विचारात घेऊन तक्रारदाराची प्रस्‍तुत तक्रार खर्चासह फेटाळून टाकावी अशी मागणी सामनेवाला यांन सदर मंचास केली आहे.
 
(06)       सामनेवाला विमा कंपनीने आपल्‍या लेखी म्‍हणणेसोबत क्‍लेम फॉर्म, सामनेवाला विमा कंपनीने सामनेवाला क्र.1 यांना पाठविलेले पत्र व त्‍याची प्रत तक्रारदार यांना पाठविलेच्‍या नोंदीसह, सर्टीफिकेट ऑफ इन्‍शुरन्‍स इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(07)       सामनेवाला क्र. 1 व 2 यांना प्रस्‍तुत प्रकरणी नोटीस लागू होऊनदेखील ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणेही दाखल केलेले नाही.
 
(08)       आम्‍ही दोन्‍ही बाजूंच्‍या वकीलांचे युक्‍तीवाद ऐकले. तसेच त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्र तपासले. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 चे सभासदत्‍व गोवा येथील ऑफिसमधून घेतले होते व त्‍यांच्‍यामार्फत तक्रारदाराची मेडिक्‍लेम पॉलीसी विमा कंपनीच्‍या मुंबई येथील कार्यालयातून घेतली होती हे कागदपत्रांवरुन सिध्‍द होत आहे. त्‍यामुळे सामनेवाला विमा कंपनीने सदर तक्रारीत घेतलेला क्षेत्रिय अधिकारसिमेचा मुद्दा आम्‍ही ग्राहय धरत आहोत.
 
(09)       सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्‍लेम नामंजूर केल्‍याचे पत्र सामनेवाला क्र.1 यांना दि.06/07/2005 रोजी पाठवले तसेच त्‍याच दिवशी त्‍या पत्राची कॉपीही तक्रारदारास पाठवली. त्‍यामुळे सदर तक्रारीस मुदतीची बाधा येते तसेच तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्जही नाही हे सामनेवालांचे म्‍हणणे आम्‍ही ग्राहय धरत आहोत.
 
(10)       गुणदोषाचा विचार करतानाही तक्रारदार शिवकृपा हॉस्पिटलमध्‍ये दि.10/12/2004 ते 24/12/2004 पर्यंत अॅडमिट होते. परंतु त्‍यांनी सामनेवाला विमा कंपनीला दि.14/12/2004रोजी पाठविलेल्‍या पत्रावर डिस्‍चार्ज तारीख 24/12/2004घालून क्‍लेम फॉर्म पाठवल्‍याचे सामनेवालांच्‍या इनवर्ड स्‍टॅम्‍पवरुन दिसून येते.त्‍यामुळे सदर तारखांमधील विसंगती लक्षात घेऊन तक्रारदाराने सदर क्‍लेम पश्‍चातबुध्‍दीने केलेला आहे हे सामनेवाला यांचे कथन तक्रारदाराने पुराव्‍यानिशी खोडून काढले नाही.  
 
(11)        वरील सर्व बाबींचा विचार करता हे मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येते. 
               
2) खर्चाविषयी काही आदेश नाही.
 

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT