अंतीम आदेश 1.तक्रार क्र.212/2009, 213/2009, 214/2009, 215/2009, 216/2009, 217/2009, 218/2009, 219/2009, 220/2009, अंशतः मंजुर करण्यात येत असुन या तक्रारीचा खर्च प्रत्येकी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) प्रत्येक तक्रारदारास विरुध्द पक्षकार यांनी द्यावा. 2. विरुध्द पक्षकार यांनी वरील सर्व तक्रारीमधील मागणीप्रमाणे तक्रारदारास उभयपक्षाने झालेल्या तत्तसम करारनाम्यानुसार 3 वर्षे मुदतीअंती खालील प्रमाणे एकंदर रक्कम द्यावी.
तक्रार दाखल दिनांक – 26/03/2009 निकालपञ दिनांक – 01/07/2010 कालावधी - 1वर्ष 04महिने 25 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर तक्रार क्रमांक –212/2009 श्री.अनिकेत लक्षमण पाटील रा.बी-3, त्रीसंगम को.ऑप.हा. सो. चिंचोलीपाडा,सुभाष रोड, डोंबिवली(प). ..तक्रारदार तक्रार क्रमांक –213/2009 श्रीमती. सुनंदा कृष्णा पाटील 23/डी, स्वदर्शन जी.डी. अंबेडकर मार्ग, परेल, मुंबई 12. ..तक्रारदार तक्रार क्रमांक – 214/2009 श्री. रमाकांत हरिभाऊ कदम रा. ज्ञानगिताई भवन, दुसरा मजला, रु.नं.211,चिंचोलीपडा सुभाष रोड, डोंबिवली(प). ..तक्रारदार तक्रार क्रमांक – 215/2009 प्रेरणा प्रविण ठाकरे रा. ब्लु बाली को.ऑ.हॉ.सो. गणेश नगर, सुभाष रोड, डोंबिवली(प). ..तक्रारदार तक्रार क्रमांक – 216/2009 नि तीशा न. पाराशरे रा. बी, 201, अम्बर पॅराडाईज सुनिल नगर, डोंबिवली(पु). ..तक्रारदार तक्रार क्रमांक – 217/2009 सौ. विजया लक्षमण पाटील, बी 3, त्रीसंगम को.ऑ.हा.सो. चिंचोलीपाडा, सुभाष रोड, डोंबिवली(प). ..तक्रारदार तक्रार क्रमांक – 218/2009 श्री. लक्षमण विष्णु पाटील रा. बी-3, त्रीसंगम को.ऑ.हॉ.सो. चिंचोलीपाडा, सुभाष रोड, डोंबिवली(प). ..तक्रारदार
.. 2 .. तक्रार क्रमांक – 219/2009 श्रीमती. स्मिता कृष्णा पाटील रा.26/डी, सुर्यदर्शन जी.डी.अंबेडकर मार्ग, परेल, मुंबई 12. ..तक्रारदार तक्रार क्रमांक – 220/2009 श्रीमती. स्वप्नाली कृष्णा पाटील रा. 26/डी.सुर्यदर्शन, जी.डी.आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई 12. .. तक्रारकर्ता विरूध्द युनीक ग्रृप तर्फे प्रोपराइटर व डायरेक्टर प्रमचंद अशोक कांबले रा. 101, कापरी हिरानंदानी कॉम्प्लेक्स, बोरबंदर रोड, ठाणे(पश्चिम) कायमचा पत्ता- पोस्ट – कबनुर, ता.हातकनांगणे, जि - कोल्हापुर ऐरवडा मध्यवर्ती कारागृह, यु.टी.नं.1616, सर्कल नं.2, बॅरेक नं.12, पुण्र क्र. 06. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्रिसायडींग मेंबर श्री. पी. एन. शिरसाट - मेंबर उपस्थितीः- त.क तर्फे वकील श्री.आर.डी.खराते वि.प एकतर्फा एकत्रीत आदेश (पारित दिः 01/07/2010)
मा. सदस्य सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु वरील सर्व तक्रारीमध्ये विविध तत्सम तक्रारदारांनी विरुध्द पक्षकार डायरेक्टर व प्रोपरायटर युनिक ग्रृप यांचे विरुध्द तक्रार दाखल केली आहे व त्यांनी 3 वर्षासाठी ठेवलेल्या मुदत ठेवीचा तत्सम करारनाम्यानुसार ठरलेल्या रकमेचा परतावा मागितला आहे.
2. विरुध्द पक्षकार यांनी युनीक डिल इन न्यु कारस अशा नावाने एक स्कीम जाहीरात करुन राबावली होती. यामध्ये ग्राहकाने त्यांच्या ठरलेल्या गाडीसाठी डाऊन पेमेंट करुन त्यानंतर 3 वर्षे मुदतीनंतर त्यांनी ठरवलेली गाडी घ्यायची व तोपर्यत 3 वर्षापर्यंत गाडी वापरण्याच्या बदल्यात विरुध्द पक्षकार हे
.. 3 .. दरमहा ठरलेले व्याजाची रक्कम तक्रारकर्ता यांना देणार होते. मुळ रकमेच्या 30% रक्क्म विरुध्दपक्षकार तक्रारकर्ता यांना देणार होते अशा स्कीममधुन आकर्षीत होऊन अनेक ग्राहकांनी विरुध्द पक्षकार यांच्या स्कीमद्वारे ठराविक रकमेची इन्व्हेस्टमेंट केली. त्यापैकी काही ठेवीदारांना विरुध्द पक्षकार यांनी काही व्याजाच्या रकमा दिलेल्या आहेत परंतु शिल्लक राहीलेली रक्कम त्यांच्या स्कीमनुसार मिळावी म्हणुन सर्व तक्रारकर्तानी या तक्रारी दाखल केल्या आहेत मंचाच्या मते विरुध्द पक्षकार हे त्यांनीच प्रसिध्द केलेल्या स्कीममधील अटी पुर्ण करण्यास जबाबदार व बांधील आहेत. परंतु त्यांनी अनुचित व्यापारी दृष्टीकोन ठेवल्यामुळे विरुध्द पक्षकार हे करारनाम्यानुसार व स्कीमप्रमाणे त्यातील नियमांची अंमलबजावणी करण्यास असमर्थ ठरले आहेत. वरील सर्व तक्रारदारांनी विरुध्द पक्षकार कडे त्यांच्या स्कीमनुसार मुदत ठेवी ठेवल्या त्याबाबत खालील तकत्यामध्ये तपशील दिला आहे. वर्गवारीनुसार. तक्रार क्र. व नाव | करारनाम्याची तारीख | मुदत ठेवीची मुळ रक्कम, काळ व दरमहा व्याज(रु). | मुदतीनंतर एकुण मिळणारी रक्कम(रु.) | वि.प कडुन आतापर्यंत मिळालेली रक्कम (रु.) | वि.प यांनी तक्रारकर्तायास देणे असलेली रक्कम(रु.) | त.क्र.212/2009 अनिकेत लक्ष्मण पाटील | 30/07/2007 | रु.70,740/- 3वर्ष दरमहा रु.7,000/- | 2,52,000/- | - | 2,52,000/- | त.क्र.213/2009श्री.सुनंदा कृष्णा पाटील | 06/08/2007 | रु.70,740/- 3वर्ष दरमहा रु.7,000/- | 2,52,000/- | - | 2,52,000/- | त.क्र.214/2009 श्री. रमाकांत हिरभाऊ कदम | 21/02/2007 | 70,740/- 3वर्ष दरमहा रु.7,000/- | 2,52,000/- | 35,000/- | 2,17,000/- | त.क्र.215/2009 प्रेरणा प्रविण ठाकरे | 21/04/2007 | 70,740/- 3वर्ष दरमहा रु.7,000/- | 2,52,000/- | 21,000/- | 2,31,000/-
| त.क्र.216/2009 नितीशा पाराशरे | 26/07/2007 | 50,000/- 3वर्ष दरमहा रु.5,000/- .. 4 .. | 1,80,000/- | - | 1,80,000/- | तक्रार क्र. व नाव | करारनाम्याची तारीख | मुदत ठेवीची मुळ रक्कम, काळ व दरमहा व्याज(रु). | मुदतीनंतर एकुण मिळणारी रक्कम(रु.) | वि.प कडुन आतापर्यंत मिळालेली रक्कम (रु.) | वि.प यांनी तक्रारकर्तायास देणे असलेली रक्कम(रु.) | त.क्र.217/2009 सौ.विजया ल. पाटील | 21/04/2007 | 41,364/- 3वर्ष दरमहा रु.4,000/- | 1,44000/- | 12,000/- | 1,32,000/- | त.क्र.218/2009 श्री. लक्षमण विष्णु पाटील | 06/04/2006 | 70,740/- 3वर्ष दरमहा रु.7,000/- | 2,52,000/- | 1,12,000/- | 1,40,000/- | त.क्र.219/2009 श्रीमती. स्मीता कृ. पटील | 06/08/2007 | 41,364/- 3वर्ष दरमहा रु.4,000/- | 1,44,000/- | - | 1,44,000/- | त.क्र.220/2009 स्वप्नाली कृ. पटील | 06/08/2007 | 41,364/- 3वर्ष दरमहा रु.4,000/- | 1,44,000/- | - | 1,44,000/- |
3. विरुध्द पक्षकार यांना मंचाने नोटीस बजावणी केली तत्सम वरील सर्व तक्रारीसाठी वकील हजर झाले परंतु मुदत देऊनही त्यांनी त्यांची लेखी कैफीयत दाखल केली नाही म्हणुन मचांने दि.25/08/2009 रोजी 'नो डब्ल्यु एस' आदेश केला नंतर दि.02/03/2010 रोजी एकतर्फा सुनावणी होऊन सदर प्रकरणात एकतर्फा आदेश पारीत करुन मंचाने खालील अंतिम आदेश केला आहे. अंतीम आदेश
1.तक्रार क्र.212/2009, 213/2009, 214/2009, 215/2009, 216/2009, 217/2009, 218/2009, 219/2009, 220/2009, अंशतः मंजुर करण्यात येत असुन या तक्रारीचा खर्च प्रत्येकी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) प्रत्येक तक्रारदारास विरुध्द पक्षकार यांनी द्यावा. 2. विरुध्द पक्षकार यांनी वरील सर्व तक्रारीमधील मागणीप्रमाणे तक्रारदारास उभयपक्षाने झालेल्या तत्तसम करारनाम्यानुसार 3 वर्षे मुदतीअंती खालील प्रमाणे एकंदर रक्कम द्यावी.
.. 5 .. तक्रार क्र. व नाव | 3 वर्ष मुदतीअंती वि.प यांनी खालील रक्कम द्यावी (रु.) | त.क्र.212/2009 अनिकेत लक्ष्मण पाटील | 2,52,000/- | त.क्र.213/2009 श्री.सुनंदा कृष्णा पाटील | 2,52,000/- | त.क्र.214/2009 श्री. रमाकांत हिरभाऊ कदम | 2,17,000/- | त.क्र.215/2009 प्रेरणा प्रविण ठाकरे
| 2,31,000/- | त.क्र.216/2009 नितीशा पाराशरे | 1,80,000/- | त.क्र.217/2009 सौ.विजया ल. पाटील | 1,32,000/- | त.क्र.218/2009 श्री. लक्षमण विष्णु पाटील | 1,40,000/- | त.क्र.219/2009 श्रीमती. स्मीता कृ. पटील | 1,44,000/- | त.क्र.220/2009 स्वप्नाली कृ. पटील | 1,44,000/- |
3.विरुध्द पक्षकार यांनी प्रत्येक तक्रारकर्तास प्रत्येकी रु.1,000/- (रु.एक हजार फक्त) मानसिक त्रासाचे द्यावे.
4 .उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
दिनांक – 01/07/2010 ठिकान - ठाणे
(सौ. भावना पिसाळ) (श्री.पी.एन.शिरसाट) प्रिसायडींग मेंबर मेंबर
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|