Maharashtra

Nagpur

CC/512/2017

RAMESH CHANDER RAMRATAN SHARMA - Complainant(s)

Versus

UNION OF INDIA THROUGH SECRETARY POST AND TELEGRAPH DEPARTMENT - Opp.Party(s)

21 Dec 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/512/2017
( Date of Filing : 18 Nov 2017 )
 
1. RAMESH CHANDER RAMRATAN SHARMA
R/O. CHAITANYA APARTMENT, CLARK TOWN NAGPUR
...........Complainant(s)
Versus
1. UNION OF INDIA THROUGH SECRETARY POST AND TELEGRAPH DEPARTMENT
NEW DELHI
DELHI
UP
2. SENIOR POST MASTER GENERAL POST OFFICE
CIVIL LINES, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party: ADV. R. G. AGRAWAL, Advocate
Dated : 21 Dec 2018
Final Order / Judgement

(मा. सदस्‍य, श्री. नितिन एम. घरडे यांच्‍या आदेशान्‍वये)

निकालपत्र

                                                                                             (पारित दिनांक 21.12.2018)

  1.      तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांच्‍याकडे त्‍यांचे पोस्‍टाचे खाते आहेत. विरुध्‍द पक्ष क्रं. 2 सिनियर पोस्‍ट मास्‍टर जनरल पोस्‍ट ऑफिस, सिव्‍हील लाईन्‍स, नागपूर येथे तक्रारकर्ता व त्‍याची पत्‍नी यांच्‍या नांवे संयुक्‍त खाते क्रं.456941 गेल्‍या 20 वर्षापासून आहे. तक्रारकर्त्‍याला फेब्रुवारी 2015 मध्‍ये असे लक्षात आले की, विरुध्‍द पक्ष यांनी कोणतीही सूचना न देता त्‍यांच्‍या खात्‍यातून रुपये 16,000/- कपात केली, त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने दिनांक 03.02.2015 रोजी विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांना पत्र पाठवून लेजर इन्‍ट्रीची प्रत मागितली. परंतु विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यांना सदरची प्रत पुरविली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने माहितीच्‍या अधिकारा खाली दिनांक. 01.05.2005 पासून ते 31.03.2007 या दरम्‍यानचे खाते पुस्तिकेचे तपशीलवार विवरण मागितले असता, त्‍याची देखील पूर्तता विरुध्‍द पक्षाने केली नाही. त्‍यामुळे माहिती अधिकाराची अपील मुख्‍य माहिती अधिकारी नवी दिल्‍ली यांच्‍याकडे दाखल केली. त्‍यांनी सुध्‍दा समाधानकारक उत्‍तर दिले नाही व माहिती पुरविली नाही व याबाबत समाधान न झाल्‍यास  दुय्यम अपील करावे असे कळविले. विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांनी सेवेत निष्‍काळजीपणा केलेला आहे व त्‍यांनी रुपये 16,000/- ही रक्‍कम लेजरवर नोंद केलेली नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाची सदरची कृती ही सेवेतील त्रुटी आहे. करिता तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचात दाखल केलेली आहे.
  2.       तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्ष  यांनी तक्रारकर्त्‍याला रुपये 16,000/-, 24 टक्‍के व्‍याजासह द्यावे. तसेच तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.
  3.       विरुध्‍द पक्ष यांनी आपले लेखी उत्‍तर नि.क्रं. 8 वर दाखल केले असून त्‍यात नमूद केले की,  तक्रारकर्त्‍याचे खाते क्रं. 654941 हे विरुध्‍द पक्ष क्रं. 2  सदर बाजार पोस्‍ट ऑफिस नागपूर येथे होते. धनादेश क्रं. 434012  दिनांक 28.04.2006 प्रमाणे दि. 01.05.2006 रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या स्‍टेट बॅंक खाता क्रं. 654941 मधून विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांच्‍याकडे असलेल्‍या तक्रारकर्त्‍याच्‍या संयुक्‍त खात्‍यामध्‍ये जमा झालेले होते. परंतु विरुध्‍द पक्ष क्रं. 2  यांच्‍या लेजर बुक वर त्‍याची नोंदणी झाली नव्‍हती. कारण सन 2015 मध्‍ये संगणकीयकरण होत असल्‍या कारणास्‍तव सदरची नोंद झाली नव्‍हती, परंतु लगेच फेबुवारी 2015 मध्‍ये विरुध्‍द पक्ष क्रं.2 चे लेजर पुस्तिकामध्‍ये याबाबतची पाहणी करुन त्‍याप्रमाणे नोंद घेण्‍यात आली. तक्रारकर्ता यांनी दिनांक 03.02.2015 रोजी  सदर बाबत माहिती अधिकारा अंतर्गत माहिती मागितली व त्‍याबाबत माहिती सुध्‍दा पुरविण्‍यात आली होती. त्‍यावर ही तक्रारकर्त्‍याचे समाधान न झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दुय्यम अपील माहिती अधिकारी नवी दिल्‍ली येथे केली होती, त्‍यामध्‍ये सुध्‍दा निर्णय देण्‍यात आला होता. परंतु तक्रारकर्ता  हे विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्ष यांना त्रास देण्‍याकरिता सदरची तक्रार दाखल केली आहे. तसेच तक्रारकर्त्‍याचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे.
  4.       तक्रारकर्त्‍याने सदर तक्रारी बरोबर अ.क्र. 1 ते 7 दस्‍तावेज दाखल केले. त्‍यामध्‍ये दिनांक 03.02.2015 चे पत्र, दि. 16.02.2015 रोजी माहिती अधिकारा अंतर्गत केलेला अर्ज, दिनांक 25.02.2015 रोजी विरुध्‍द पक्षाने माहिती अधिकारात दिलेले पत्र, दिनांक 03.02.2016 रोजी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिलेले पत्र, दिनांक 29.02.2016 रोजी दुय्यम अपिल यामध्‍ये दिलेल्‍या आदेशाची प्रत व दिनांक 23.05.2016 रोजी तक्रारकर्त्‍याने दिलेले पत्र इत्‍यादी दस्‍तावेज दाखल केले. विरुध्‍द पक्षाने आपल्‍या उत्‍तराबरोबर  दिनांक 01.05.2006 रोजी चे  डाकघर / उप डाकघर की लेन देन की सूची, दिनांक. 02.02.2015 रोजी तक्रारकर्त्‍याला दिलेले पत्र, माहिती अधिकारात माहिती पुरविल्‍याचे पत्र, तसेच खाता क्रं. 654941 वरील तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍याची संगणकीय उता-याची प्रत व माहिती अधिकार दुय्यम अपील आदेशाची प्रत  इत्‍यादी दस्‍तावेज दाखल केले.  
  5.       उभय पक्षानी दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन करुन व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले व त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे.

मुद्दे निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?                  होय
  2. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 ने सेवेत त्रुटी करुन

अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याचे दिसून येते काय?       नाही.

  1. काय आदेश ?                                        आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्षाकडे संयुक्‍त खाते होते हे याबाबत वाद नाही. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. विरुध्‍द पक्ष क्रं. 2 कडे असलेल्‍या संयुक्‍त खात्‍यात धनादेशा द्वारे रक्‍कम जमा केलेली होती. परंतु सदरच्‍या रक्‍कमेबाबतची नोंद विरुध्‍द पक्ष 2 यांनी खात्‍यावर नोंदविली नाही याबाबतचा सदरचा वाद आहे.  विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे सन सन 2015 मध्‍ये संपूर्ण खाते संगणकीयकरण करण्‍याचे कार्य होत होते. त्‍यामुळे त्‍याची नोंद लेजर मध्‍ये झाली नव्‍हती. परंतु त्‍याची नोंद ही नागपूर जी.पी.ओ. या मुख्‍य कार्यालयात  झालेली होती. तसेच सदरची बाब लक्षात आल्‍यावर त्‍याची नोंद घेण्‍यात आली.  उभय पक्षांनी दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता ही बाब स्‍पष्‍ट होते की,  जरी तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यावर रक्‍कमेची नोंद झाली नव्‍हती, परंतु याबाबत माहिती मिळताच सदरची नोंद विरुध्‍द पक्ष 2 यांनी आपल्‍या लेजरवर घेतली व तत्‍पूर्वी त्‍याची नोंद मुख्‍य जी.पी.ओ. कार्यालयात झाल्‍याचे दिसून येते. सदरच्‍या विरुध्‍द पक्षाच्‍या  कृत्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही ही बाब स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे तक्रारकर्ता हा कोणत्‍याही प्रकारची नुकसान भरपासई मिळण्‍यास पात्र नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येते.

आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. उभय पक्षाने खर्चाचे वहन स्‍वतः सोसावे.
  3. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.       
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.