Maharashtra

Kolhapur

CC/10/290

Ramakant Rajaram Bhosale - Complainant(s)

Versus

Union Bank of India - Opp.Party(s)

Sanjay D cruz

21 Sep 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/290
1. Ramakant Rajaram BhosaleMadhuri Residency Plot no 94.Shivaji Park.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Union Bank of IndiaStaion Road.Kolhaur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Sanjay D cruz, Advocate for Complainant

Dated : 21 Sep 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

  निकालपत्र :- (दि.21/09/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)

 (1)        तक्रार स्‍विकत करुन सामनेवाला यांना नोटीस आदेश झाला सामनेवाला वकीला मार्फत सदर मंचा समोर उपस्‍थीत राहीले लेखी म्‍हणणे दाखल केले. तक्रारदारांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला.
             सदरची तक्रार सामनेवाला बँकेने चेक वटविणेबाबतचे सेवेत कसुर केलेमुळे दाखल केली आहे. 
(2)        तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी:- अ) तक्रारदार हे वयावसायिक असून त्‍यांची स्‍टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्‍हरसिज बॅंक, येस बँक इत्‍यादी बँकेत बचत व चालू खात्‍याने तक्रारदाराचे ऑफिसपासून जवळ असलेल्‍या शिवाजी बँकेत यापूर्वी दोन्‍ही अर्जदारांची स्‍वतंत्र खाती होतीत. सदर बँक बंद झालेने सामनेवाला बँकेत दि.29/05/2008 रोजी दोन्‍ही तक्रारदारांची स्‍वतंत्रपणे बचत खाते उघडले. सदर बचत खाते क्रमांक अनुक्रमे 20174359 व 20174360 असा आहे. तसेच तक्रारदारांची मुलगी सुदेष्‍णा हिचा खाते क्र.20174358 असा आहे. प्रस्‍तुत खातेवर दोन्‍ही तक्रारदारांना व्‍यवहार करणेसाठी चेक बुक्‍सही दिलेले आहेत. व्‍यावसायाचे दृष्‍टीने तक्रारदारांना एकमेकांचे खातेवर व्‍यवहार करणे सोईस्‍कर होते व तशी स्‍पष्‍ट कल्‍पना शाखा व्‍यवस्‍थापकांना दिली होती. त्‍यासाठी व्‍यवस्‍थापकांनी लेखी मागणी करणेस तक्रारदारांना सांगितले. त्‍यांचे सुचनेवरुन तक्रारदारांनी स्‍वतंत्र असे अर्ज देऊन चेक व्‍यवहार होताना तक्रारदार क्र.1 चे खातेवर कमी रक्‍कम असताना त्‍यांचा एखादा चेक आलेस तक्रारदार क्र.2 यांचे खातेवरुन रक्‍कम वर्ग करणेचा अधिकार व असाच उलटपक्षी अर्जदार क्र.2 चा चेक आलेस व खातेवर रक्‍कम कमी असलेस ती रक्‍कम तक्रारदार क्र.1 यांचे खातेवरुन वर्ग करणेचा अधिकार सामनेवाला क्र.1 बँकेस दिला होता. त्‍याबाबतचे अधिकाराचे दोन्‍ही अर्ज दि.30/05/2008रोजी सामनेवाला बँकेकडे दिलेले आहेत व ते त्‍यांनी स्विकारलेले आहेत व त्‍याप्रमाणे व्‍यवहार करणेस संमत्‍ती दिली.
           ब) तक्रारदाराने सदर दोन्‍ही खात्‍यावरील व्‍यवहार सुरु असताना खालीलप्रमाणे व्‍यवहार केलेले आहेत.
तक्रारदार क्र.1 यांनी केलेला व्‍यवहाराचा तपशील

व्‍यवहाराचा तपशील
रक्‍कम
चेक वटणेसाठी आलेली तारीख
तक्रा.1 चे खाते क्र.20174359
वरील शिल्‍लक
तक्रा.2चे खाते क्र.20174360 वरीलशिल्‍लक
चेक न वटलेने खर्ची टाकलेली रक्‍कमव दंड
टेलिफोन क्र. 2667671 व क्र.2537673 चे बील
 
रु. 411/-
रु.462/-
बीएसएनएल कडून
01/10/08
 
 
रु.591.65 पै.
 
रु.2806.00पै.
 
रु.75.00पै.
बीएसएनएल दंड रु.20/-
महाराष्‍ट्र राज्‍यविद्यूत वितरण कं.ची दोन बीले
 
रु.300/-
रु.150/-
दि.03/02/09चा
चेक क्र.35248
दि.07/02/09
 
रु.3,935/-
रु.15,474/-
चेक दंड रु.75/-
एम.एस.ई.डी.सी.चा दंड रु.250/-
 त्‍यांनी चेकने बील भरण्‍याची सुविधा बंद केली व कलम 138 खाली नोटीस.

   
 
तक्रारदार क्र.2 यांनी केलेला व्‍यवहाराचा तपशील

व्‍यवहाराचा तपशील
रक्‍कम
चेक वटणेसाठी आलेली तारीख
तक्रा.1चे खाते क्र.20174359
वरील शिल्‍लक
तक्रा.2चे खाते क्र.20174360 वरीलशिल्‍लक
चेकन वटलेनेखर्ची टाकलेली रक्‍कम व दंड
वकील नाईक निंबाळकर यांना दिलेली फी
 
रु.2,000/-    
दि.05/01/09चा चेकक्र.35244
दि.13/01/09    
 
 
रु.3,918.05 
 
रु.975.00
 
रु.75.00पै.
त्‍यावेळी ATM मधून फी अदा केली. 

 
     वरीलप्रमाणे तक्रारदार क्र. 1 व 2 यांनी चेकचे व्‍यवहार केले मात्र खात्‍यावर रक्‍कम असूनही प्रस्‍तुतचे चेक्‍स वटवलेले नाहीत. तसेच महाराष्‍ट्र राज्‍य विद्यूत वितरण कंपनीला दिलेला चेक हा सहीत फरक आहे. असा शेरा मारुन परत आलेचे नमुद कंपनीच्‍या अधिका-यांनी सांगितले व आताच्‍या आता रक्‍कम भरणा न केलेच विज पुरवठा खंडीत करणेची धमकी दिली. सदरची रक्‍कम तक्रारदार मुंबईत असलेने कोल्‍हापूरात आलेवर भरतो व सदरची रक्‍कम पुढील बीलात समाविष्ट करा अशी विनंती केली. परंतु ती ऐकली नाही. तेव्‍हा चेकने बील भरण्‍याची सेवा बंद केलेली आहे ती अदयापही सुरु केलेली नाही. सहीत फरक पडला असता तर सामनेवालांनी तक्रारदारास फोन करुन सही घेता येणे सहज शक्य होते चेक परत पाठवणेचे कोणतेही कारण नव्‍हते. याची कोणतीही कल्‍पना तक्रारदारास दिली नव्‍हती. बीएसएनएलची सुध्‍दा चेकने बील भरण्‍याची सुविधा बंद केली होती. मात्र त्‍यांचे अधिका-यांना भेटून सत्‍य परिस्थिती सांगून सदर सुविधा पुन्‍हा सुरु करुन देणेस तक्रारदारास प्रयास करावे लागले. तकारदाराने सामनेवालांना सदर दोन्‍ही खातेवरील रक्‍कम कमी असताना तक्रारदारांचे एकमेकांच्‍या खातेवरील रक्‍कम वर्ग करुन चेक वटणेकरिता तसेच सदरची बाब लक्षात यावी म्‍हणून तक्रारदाराने चेक्‍सवर स्‍वत:चे नांवे व मोबाईल नंबर असलेले शिक्‍के मारले. सामनेवाला बँकेने साधा फोन करुनही चेक परत जाणेपूर्वी सुचना केलेली नाही ही सामनेवालांच्‍या सेवेतील त्रुटी आहे.      
 
           तक्रारदाराने माहितीच्‍या अधिकाराखाली दि.02/03/2009 रोजी चेक परत पाठविलेबाबतची माहिती मागितली. सदरची माहिती 42 दिवस होऊनही न दिलेने दि.13/04/2009रोजी स्‍मरण पत्र पाठवले. सामनेवाला बँकेने सदर माहिती न देता अधिकार पत्राची कॉपी 52 दिवसाने दि.21/04/2009 रोजी मागितली व त्‍याप्रमाणे तक्रारदाराने ती दिली. माहिती मिळवणेबाबत दि.11/07/2009 रोजी दुसरे स्‍मरणपत्र पाठवले. त्‍यास 141 दिवसाने साध्‍या पोष्‍टाने संदिग्‍ध उत्‍तर आलेले आहे. सामनेवालांच्‍या या कृत्‍यामुळे तक्रारदाराच्‍या प्रतिष्‍ठेला तडा जाऊन शासकीय कार्यालय हे तक्रारदाराचे कडून चेकने व्‍यवहार करणेस प्रतिबंद करत आहेत. सामनेवाला यांनी केलेल्‍या सेवात्रुटी मुळे तक्रारदारास झालेल्‍या मानसिक, आर्थिक व सामाजिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,,00,395/-सामनेवालांकडून तक्रारदारास देणेबाबत हुकूम व्‍हावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(3)        तक्रारदाराने तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारदार क्र. 1 व 2यांचा खातेउतारा, त्‍यांनी सामनेवालांना दिलेले अधिकारपत्रे, कलम 138 खाली सुविधा बंद केलेबाबतची नोटीस, माहितीच्‍या अधिकाराखाली दिलेली पत्रे, स्‍मरणपत्रे, सामनेवालांचे अधिकारपत्राच्‍या मागणीचे पत्र, त्‍याचे आलेले उत्‍तर इत्‍यादीच्‍या सत्‍यप्रती दाखल केलेल्‍या आहेत.तसेच दि.13/09/2010रोजी राम कन्‍वर विरुध्‍द पंजाब नॅशनल बँकचा पूर्वाधार दाखल केलेला आहे.  
 
(4)        सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार प्रस्‍तुतच्‍या सेवा या ग्राहक संरक्षण कायदयातील सेवेत येत नाहीत. त्‍यामुळे तक्रारदार हे ग्राहक नाहीत. प्रसतुतचा अर्ज खोटा, चुकीचा असलेने तो मान्‍य व कबूल नाही.  कलम 1 मधील मजकूर सर्वसाधारण बरोबर आहे. कलम 2 मधील मजकूर खोटा व चुकीचा आहे. सामनेवालांच्‍या व्‍यवस्‍थापकांना तक्रारदारांनी कोणतीही कल्‍पना दिलेली नव्‍हती. अथवा सामनेवालांनी स्‍पष्‍ट लेखी मागणी करणेबाबत तक्रारदारांना कधीही कळवले नव्‍हते. तक्रारदाराने कोणतीही सुचना न देता स्‍वत:च्‍या मनाने अर्ज तयार करुन दिले. त्‍यावेळी सामनेवालांनी अशा सुचना बॅकेच्‍या नियमात येत नाहीत व त्‍याचे पालन करता येणार नाही व आपले खातेवर बॅलन्‍स ठेवणे इष्‍ट व योग्‍य आहे असे स्‍पष्‍टपणे सांगितले होते. आपल्‍या खातेवर रक्‍कम शिल्‍लक ठेवणे हे खातेदाराचेच काम आहे.
 
           सामनेवाला बँक ही राष्‍ट्रीयकृत बँकेत अग्रेसर बँक असून तीचे जाळे देशभर पसरलेले आहे व एका एका शाखेचे हजारो ग्राहक आहेत. चेक पास करतानाची प्रक्रिया जलद व्‍हावी यासाठी बँकेने संगणकीकरण करुन घेतलेने ग्राहकांच्‍या न्‍याय व रास्‍त सुचनांचा विचार करुन बँकेने त्‍याप्रमाणे संगणकांना सॉफ्टवेअर बसवून घेतलेले आहे. सदर सॉफ्टवेअर मुळे एखादी ठराविक रक्‍कम एका खात्‍यातून दुस-या खातेकडे वर्ग करणेची सुचना संगणकात फिड करणे शक्‍य आहे आणि तशा सुचनांचे पालन बँक खातेदारांच्‍या सोईसाठी बँक करत असते. मात्र एका खातेवरील रक्‍कम कमी असल्‍यास त्‍या खातेवरील चेक वटवणेसाठी त्‍याच व्‍यक्‍तीच्‍या अथवा त्‍यांचे इतर नातेवाईकांच्‍या खातेवरील रक्‍कम आवश्‍यक त्‍या खातेवर जमा करुन चेक वटवणे व तशी सेवा पुरवणे बँकेस शक्‍य नाही. व सदरची बाब बँकेवर बंधनकारक नाही. तक्रारदारास असे व्‍यवहार करणेस बँकेने कधीही संमत्‍ती दिली नव्‍हती. केवळ बँकेने पत्र स्विकारले याचा अर्थ ते बँकेवर बंधनकारक आहे असे नाही. कोणतेही पत्र केवळ व्‍यवहाराचा भाग म्‍हणून स्विकारले जाते. बॅकेच्‍या नियमाप्रमाणे कोणत्‍याही खातेवर कि‍मान रक्‍कम रु.1,000/- शिल्‍लक ठेवणे गरजेचे होते व ते त्‍यांनी ठेवलेले नाहीत हे स्‍पष्‍ट आहे. त्‍यामुळे चेक न वटता परत गेलेले आहेत व चेक परतीचा खर्च नांवे टाकला आहे. चेकचा अनादर झालेस त्‍याची माहिती चेक जारी करणा-या व्‍यक्‍तीस न कळवता चेक जमा करणारे व्‍यक्‍ती कळवत असते. तसे तक्रारदारास कळवणेचे बंधन बॅकेवर नाही. तक्रारदाराने स्‍वत:चे मोबाईल नंबरचे शिक्‍के चेकबुकवर उमटवणे ही चुकीची पध्‍दत आहे. तक्रारदाराने बीएसएनएल चे बील भरणेचे वेळेस सदर बाबींचा अनुभव येऊनही जाणीवपूर्वक तदनंतरही खातेवर शिल्‍लक नसताना चेक सोडलेला आहे. तसेच चेक वरील सहीमध्‍ये फरक पडल्‍याने चेक न वटता परत गेलेला आहे. त्‍यास सामनेवालांना जबाबदार धरता येणार नाही. कलम 138 खालील नोटीसीस तक्रारदार जबाबदार आहे. माहितीच्‍या अधिकारामध्‍ये सामनेवाला हे तक्रारदारास बँकेचे संबंधीत इसम व त्‍यांची शैक्षणिक पात्रता कळवलेली आहे. माहितीच्‍या अधिकाराची दाद सदर मंचापुढे मांडता येणार नाही. तक्रारदाराने मागणी केलेली नुकसान भरपाई रक्‍कम रु.1,00,395/- देणेचा प्रश्‍न उदभवत नाही. तक्रारीस कारण घडलेले नसून सामनेवालांकडून आर्थिक फायदा उकळण्‍यासाठी तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केलेली आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विंनती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.  
 
(5)        सामनेवाला यांनी प्रस्‍तुते लेखी म्‍हणणे शपथपत्रासह दाखल केलेले आहे अन्‍य कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.
 
(6)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचा लेखी युक्‍तीवाद, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1. सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?                             ---नाही.
2. काय आदेश ?                                   --- शेवटी दिलेप्रमाणे.
 
मुद्दा क्र.1 :- तक्रारदार क्र. 1 व 2 व त्‍यांची मुलगी सुदेष्‍णा यांची दि.29/05/2008 पासून बचत खाती अनुक्रमे 20174359, 20174360, 20174358 सामनेवाला बँकेत आहेत तसेच त्‍यांना चेकबुक्‍स दिलेची बाब सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेत मान्‍य केलेले आहे. तक्रारदाराने सामनेवाला बॅंकेस दि.30/05/2008 रोजी तक्रारदाराने त्‍यांचे खातेवर रक्‍कमा कमी असल्‍यास एकमेकांचे खातेवरील रक्‍कमा वर्ग करुन चेक वटवणेबाबतचे अधिकार दिलेबाबतचे पत्र प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने दाखल केलेले आहे व ते सामनेवालांनी सहीशिक्‍क्‍यानिशी स्विकारलेचे दिसून येते व ते सामनेवाला यांनी स्विकारलेचे मान्‍य केलेले आहे. सदर पत्राचा आधार घेऊन तक्रारदाराने सामनेवाला बँकेने पत्राप्रमाणे चेक रक्‍कमा वर्ग करणे व चेक वटवणेबाबतची सेवा पुरवली नसलेने प्रसतुतची तक्रार दाखल केली आहे. याचा विचार करता प्रस्‍तुत सामनेवाला ही राष्‍ट्रीयकृत अग्रणी बॅंक आहे व सदर बँकेचे सर्व व्‍यवहार हे संगणकीकृत असून त्‍यासाठीचे विशेष सॉफ्टवेअर बसवून घेतलेले आहे.
 
           प्रस्‍तुत तक्रारदारांनी वर नमुद केलेप्रमाणे सेवा पुरवावी असा लेखी अर्ज सामनेवाला बॅकेकडे दिलेचे व सामनेवाला बँकेने त्‍यांना वर नमुद प्रमाणे बँकेचे नांवे अधिकारपत्र देणेबाबत लेखी कळवलेचे कोणताही कागद प्रस्‍तुत प्रकरणी दाखल नाही अथवा अशाप्रकारे लेखी मागणी केलेचे तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीत कुठेही नमुद केलेले नाही. सबब सामनेवाला बँकेने फक्‍त तक्रारदाराकडून अधिकारपत्र स्विकारले म्‍हणजे सदर सेवा देणेचे मान्‍य केले असे म्‍हणता येणार नाही. सबब तक्रारदारास सदर सेवा देण्‍याचे सामनेवाला बँकेने मान्‍य केले होते ही बाब सिध्‍द करु शकलेला नाही. वादाकरिता अशी सेवा देण्‍याचे जर सामनेवालांनी मान्‍य केले असते तर तक्रारदाराने प्रथमत: बीएसएनएलचा टेलिफोन बीलासाठी चेक भरला सदरचा चेक इनसफीशिएन्‍ट असा शेरा मारुन परत गेला नसता. मात्र सदरचा चेक नमुद शे-यानिशी न वटता परत गेलेला आहे. याचा विचार करता सामनेवाला यांनी अशाप्रकारची कोणतीही सेवा देणे मान्‍य केले नसलेचे निदर्शनास येते. तदनंतरही तक्रारदाराने आपल्‍या खातेवर कमी शिल्‍लक असतानाही अॅड.नाईक निंबाळकर यांना फी पोटी दिलेला चेक न वटता परत गेलेला आहे. तक्रारदार क्र.1 यांनी टेलिफोन पोटी रु.873/-चा चेक बीएसएनएल ला दिला तयावेळी त्‍यांचे खातेवर रक्‍कम रु.591.65पै.बॅलन्‍स होता. तसेच तक्रारदार क्र.2 यांनी वकील नाईकनिंबाळकर यांना फीपोटी चेक क्र.35244 दिला. तदवेळी त्‍यांचे खातेवर रक्‍कम रु.975/- इतका बॅलन्‍स होता असे दाखल खातेउता-यावरुन निर्विवाद आहे. याचा विचार करता सामनेवाला बँकेच्‍या नियमाप्रमाणे चेक व्‍यवहारासाठी किमान रक्‍कम रु.1,000/- किमान शिल्‍लक ठेवणे अनिवार्य होते. त्‍यापध्‍दतीने सदरचा किमान शिल्‍लक अधिक चेकची रक्‍कम इतकाही बॅलन्‍स नमुद खातेवर नव्‍हता ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे व त्‍यामुळेच प्रस्‍तुतचे चेक्‍स न वटता परत गेलेले आहेत.
 
           तक्रारदार क्र.1 यांनी तक्रारदार क्र.2 यांचे नांवाचे आलेले विद्यूत बिल भरणा करणेसाठी रक्‍कम रु.450/- चा दि.03/02/2009 चा चेक क्र.35248 महाराष्‍ट्र राज्‍य विद्यूत वितरण कंपनीस दिलेला होता. त्‍यावेळी तक्रारदाराचे खातेवर रक्‍कम रु.3,935.05पै. शिल्‍लक होते. सदर चेकची व किमान रक्‍कम रु.1,000/-अशा रक्‍कम खातेवर शिल्‍लक होती असे दाखल खातेउता-यावरुन निर्विवाद आहे. मात्र प्रस्‍तुतचा चेक हा सहीमधील फरकामुळे न वटता परत गेलेला आहे. वरील चेक न वटता परत गेलेच्‍या वस्‍तुस्थितीचा विचार करता यात सामनेवाला बँकेची कोणतीही चूक दिसून येत नाही. बचत ठेवी खातेदाराने कोणत्‍याही व्‍यक्‍ती अथवा कपंनीस दिलेला चेक वटणेसाठी त्‍या बँकेच्‍या नियमाप्रमाणे सदर बचत खातेवर चेक व्‍यवहार करणेसाठी ठेवावी लागणारी किमान शिल्‍लक अधिक चेकची रक्‍कम इतकी शिल्‍लक आपले बचत खातेवर राहिल याची खात्री करणेची जबाबदारी ही ठेव खातेदाराची असते. तसेच चेकवर सहया करताना सहीवरील फरकामुळे चेक परत येऊ नये म्‍हणून स्‍पेसिमन सिग्‍नेचर प्रमाणेच सही करणेची जबाबदारीसुध्‍दा चेक देणा-याचीच असते. सदर जबाबदारी तक्रारदाराने पार पाडलेचे कुठेही निदर्शनास आलेले नाही. तक्रारदाराने सहीत असणारा फरक फोनवरुन जर कळवला असता तर पुन्‍हा सही केली असती व चेक वटला असता याचा विचार करता तक्रारदाराने स्‍वत: सदर चेक ज्‍या वेळी बॅंकेत वटणेस आला तयावेळी तो मुंबईत असलेचे आपल्‍या तक्रारीत नमुद केले आहे. सबब तक्रारदाराचे चेक न वटता परत गेले यास सामनेवाला बँक जबाबदार नसून तक्रारदारच जबाबदार आहे व स्‍वत:च्‍या चुकीचा फायदा नमुद दाखल अधिकारपत्राच्‍या आधारे सामनेवाला बँकेने सेवेत कसूर केला म्‍हणून उकळता येणार नाही असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच एखादया बँकेला एखादे पत्र दिले म्‍हणजे ठेवीदाराला सदर सेवा मिळणेचा हक्‍क व अधिकार प्राप्‍त झाला असे समजणे चुकीचे आहे.  
 
           तक्रारदाराने दाखल केलेला मा. राज्‍य आयोग, नवी‍ दिल्ली, राम कन्‍वर विरुध्‍द पंजाब नॅशनल बँक 1998 सी.पी.आर.646 या पूर्वाधाराचे अवलोकन केले असता प्रसतुत पुर्वाधारात तक्रारदाराचे खातेवर पुरेशी शिल्‍लक असतानाही चेक न वटता परत गेलेने तक्रारदारास झालेल्‍या आर्थिक नुकसान भरपाई देणे संदर्भातील आहे. प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार क्र. 1 व 2 यांनी बीएसएनएल व वकील नाईक निंबाळकर यांना दिलेले चेक हे त्‍यांचे खातेवर पुरेशी शिल्‍लक नसलेने न वटता परत गेलेले आहेत. तसेच महाराष्‍ट्र विद्यूत वितरण कंपनीस दिलेला चेक हा जरी पुरेशी शिल्‍लक असली तरी सहीत फरक असलेने न वटता परत गेलेला आहे. सबब सदरचा पूर्वाधार सदर प्रकरणी लागू होत नाही असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. 
 
           वरील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला बँकेने सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.2 :- सामनेवाला बँकेने सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही तसेच प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये सदर मंचास कोणतीही गुणवत्‍ता आढळून आलेली नाही. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.  
 
                            आदेश
 
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत येते.
 
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER