Maharashtra

Thane

CC/12/107

Mrs.Darshana Chandrakant Rawal - Complainant(s)

Versus

Union Bank of India - Opp.Party(s)

A.D.Vidwans

29 Jan 2016

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/12/107
 
1. Mrs.Darshana Chandrakant Rawal
Flat No.A/203, Shanti Nagar, Station Road, Bhayander(w), Tq.& Dist-Thane-401101.
...........Complainant(s)
Versus
1. Union Bank of India
Zainab Manzil, Ground Floor, Station Road, Bhaynder(w), Thane.
2. Union Bank of India
239 Vidhan Bhawan Marg, Nariman Point, Mumbai-400021.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 29 Jan 2016

               न्‍यायनिर्णय   

               (द्वारा सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

  1.         तक्रारदार सामनेवाले बँकेचे खातेधारक असून सन 2006 पासून सामनेवाले यांनी दिलेल्‍या डेबिट कार्डचा वापर करत आहेत.
  2.          तक्रारदारांचे डेबिट कार्ड डिसेंबर, 2007 मध्‍ये गहाळ झाले. सदर माहिती सामनेवाले बँकेस देऊन डेबिट कार्ड रद्द करण्‍याची मागणी केली.   सामनेवाले बँकेने त्‍यानंतर दुसरे नविन डेबिट कार्ड जानेवारी 2008 ते जानेवारी, 2013 या कालावधीकरीता इश्‍यू केले.
  3.       तक्रारदारांच्‍या खात्‍यातुन रक्‍कम रु. 3,61,900/- जुन्‍या डेबिट कार्डच्‍या ट्रान्‍झेक्‍शनद्वारे कपात केल्‍याची बाब दि. 02/11/2011 रोजी निदर्शनास आली. सदर रक्‍कम दि. 29/09/2011 ते दि. 25/10/2011 या कालावधीत कपात झाल्‍याचे पासबुकमधील नोंदीनुसार दिसून आले. तक्रारदारांनी दि. 04/11/2011 रोजी सामनेवाले बँकेकडे यासंदर्भात तक्रार दिली
  4.        सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांनी त्‍यांचे जुने डेबिट कार्ड हरवल्‍याबाबतची माहिती बँकेस दिली नाही. सामनेवाले बँक सन 2008 पर्यंत ग्राहकांना एकापेक्षा जास्‍त डेबिट कार्ड देणे शक्‍य होते. परंतु त्‍यानंतर कॉम्‍प्‍युटर सिस्‍टम एकपेक्षा जास्‍त डेबिट कार्डच्‍या नोंदी स्विकारत नाही. तक्रारदारांना सामनवेाले बँकेने पासबुक दिलेले असून त्‍यावरील नोंदीचे परिक्षण करण्‍याची तक्रारदारांची जबाबदारी आहे.
  5.       तक्रारदारांच्‍या खात्‍यातून दि. 21/05/2010 रोजी जुन्‍या डेबिट कार्डद्वारे रु. 500/- रकमेचा व्‍यवहार झालेला असून तक्रारदारांनी सदर व्‍यवहाराबाबत आक्षेप घेतला नाही. दि. 21/05/2010 नंतर तक्रारदारांनी बँक खात्‍यात रकमा Deposit  व Withdraw केल्‍या आहेत. तक्रारदारांनी दि. 09/11/2011 रोजी यासंदर्भात माहिती दिल्‍यानंतर जुने डेबिट कार्डचे ट्रान्‍झॅक्‍शन लॉक केले असून दि. 05/11/2011 रोजी नोटीसीस उत्‍तर दिले आहे.
  6.           तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद, सामनेवाले यांची लेखी कैफियत, पुरावा शपथपत्र यांचे मंचाने वाचन केले. तक्रारदार यांचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकला. सामनेवाले गैरहजर असल्‍याने उपलब्‍ध कागदपत्रांआधारे मंच खालीलप्रमाणे निष्‍कर्ष काढीत आहेः
  7.     तक्रारदारांचे सामनेवाल बँकेत बचतखाते क्र. 392802010051762 असून सन 2006 मध्‍ये बँकेने तक्रारदारांना डेबिट कार्ड क्र. 4213683928015211 इश्‍यू केले आहे.

ब.       तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदर कार्ड गहाळ झाल्‍याची माहिती सामनेवाले यांना देऊन डेबिट कार्ड रद्द करण्‍याबाबत सूचना दिली. त्‍याप्रमाणे सामनेवाले यांनी सदर कार्ड रद्द  करुन दुसरे नविन कार्ड नं. 4213683928035607 जानेवारी, 2008 ते जानेवारी, 2013 या कालावधीकरीता दिले. सामनेवाले बँकेने अशाप्रकारच्‍या सूचना तक्रारदारांकडून प्राप्‍त झाल्‍याची बाब नाकारली आहे. तसेच सन 2008 पर्यंत ग्राहकांना एकापेक्षा जास्‍त डेबिट कार्ड देणे शक्‍य होते. परंतु त्‍यानंतर कॉम्‍प्‍युटर सिस्‍टम एकापेक्षा जास्‍त डेबिट कार्डची नोंद स्विकारत नाही असे लेखी कैफियतीमध्‍ये नमूद केले आहे. तसेच तक्रारदारांनी दि. 21/05/2010 रोजी जुन्‍या डेबिट कार्डद्वारे केलेले ट्रान्‍झॅक्‍शनबाबत कोणताही आक्षेप घेतला नाही.

क.            सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार 2008 नंतर  कॉम्‍प्‍युटर सिस्‍टम एकापेक्षा जास्‍त डेबिट कार्डची नोंद स्विकारत नाही. तक्रारदारांचे  रु. 3,61,900/- एवढया रकमेचे जुन्‍या डेबिट कार्डद्वारे झालेले ट्रान्‍झॅक्‍शन दि. 29/09/2011 ते दि. 25/10/2011 या कालावधीचे आहे. तक्रारदारांचे नविन डेबिट कार्डद्वारे जानेवारी, 2008 पासूनचे व्‍यवहार जानेवारी, 2012 पर्यंतच्‍या मुदतीचे आहेत. म्‍हणजेच दि. 29/09/2011 ते दि. 25/10/2011 या कालावधीत तक्रारदारांचे नविन डेबिट कार्डद्वारे व्‍यवहार चालू असतांना सामनेवाले बँकेच्‍या कॉम्‍प्‍युटर सिस्‍टमने जुन्‍या डेबिट कार्डची नोंद कशी स्विकारली? सामनेवाले बँकेने यासंदर्भात खुलासा केलेला नाही. तसेच तक्रारदारांना नविन डेबिट कार्ड त्‍यांच्‍या लेखी अर्जाद्वारे इश्‍यू केले आहे किंवा कसे? कोणत्‍याआधारे नविन डेबिट कार्ड इश्‍यू केले याबाबतचा पुरावा मंचात दाखल नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांचे जुने डेबिट कार्ड गहाळ झाल्‍यामुळे सामनेवाले यांनी 2008 मध्‍ये नविन डेबिट कार्ड त्‍यांना दिल्‍याबाबतचा तक्रारीतील मजकूर ग्राहय धरणे उचित होईल असे मंचाला वाटते. त्‍यामुळे तक्रारदारांचे जुने डेबिट कार्ड सामनेवाले यांनी block न केल्‍यामुळे सदर डेबिट कार्डद्वारे दि. 29/09/2011 ते  दि. 25/10/2011 या कालावधीचे ट्रान्‍झॅक्‍शन झाले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍या जुन्‍या डेबिट कार्डबाबतची कार्यवाही योग्‍यप्रकारे केली नाही. त्‍यामुळे तक्रारदारांना दि. 29/09/2011 ते दि. 25/10/2011 या कालावधीत झालेल्‍या ट्रान्‍झेक्‍शनची रक्‍कम रु. 3,61,900/- सामनेवाले यांनी  परत करणे न्‍यायोचित आहे असे मंचाचे मत आहे.

ड.                  तक्रारदारांनी दि. 02/11/2011 रोजी त्‍यांचे पासबुकच्‍या खातेउता-यामधील नोंदीवरुन वादग्रस्‍त ट्रान्‍झॅक्‍शन रक्‍कम रु. 3,61,900/- बाबत माहिती मिळाली. तक्रारदारांनी यांसदर्भात सामनेवाले बँकेकडे दि. 04/11/2011 रोजी तक्रार दिली व त्‍यानंतर विहीत मुदतीत प्रस्‍तुत तक्रार दाखल केल्‍याची बाब तक्रारीतील दाखल कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट होते.

सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

                 आ दे श

  1. तक्रार क्र. 107/2012 अंशतः मान्‍य करण्‍यात येते.
  2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना नविन डेबिट कार्ड दिल्‍यानंतर जुने डेबिट कार्ड रद्द न करता जुन्‍या डेबिट काड्रद्वारे ट्रान्‍झॅक्‍शन करुन तक्रारदारांच्‍या खात्‍यातून रक्‍कम कपात करुन  त्रुटीची सेवा दिल्‍याचे जाहिर करण्‍यात येते.
  3. सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की त्‍यांनी तक्रारदारांना रक्‍कम रु. 3,61,900/- (अक्षरी रुपये तीन लाख एकसष्‍ट हजार नऊशे) तक्रार दाखल तारखेपासून म्‍हणजेच दि. 30/03/2012 पासून दि. 16/03/2016 पर्यंत 6% दराने दयावी. विहीत मुदतीत अदा न केल्‍यास दि. 17/03/2016 पासून संपूर्ण रक्‍कम 9% व्‍याजदाराने दयावी.
  4. सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की त्‍यांनी तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चाची रक्‍कम रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार) दि. 16/03/2016 पर्यंत दयावी. विहीत मुदतीत अदा न केल्‍यास दि. 17/03/2016 पासून संपूर्ण रक्‍कम 9% व्‍याजदाराने दयावी.
  5. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्‍य पोष्‍टाने पाठविण्‍यात   याव्‍यात.
  6. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.