निकालपत्र :- (दि.27/01/2012) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे. अंतिम युक्तीवादाच्या वेळेस उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाला बँकेने तक्रारदाराचे खातेवर पुरेशी शिल्लक असतानाही धनादेशाचा अनादर करुन सेवात्रुटी केलेने सदरची तक्रार दाखल करणेत आली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदार हे कोडोली या गावचे कायमचे रहिवाशी आहेत. फेब्रुवारी-10 पासून वोडाफोन एस्सार सेल्यलर लि;कोल्हापूर यांचे अधिकृत वितरक आहे. तक्रारदार हा सामनेवाला बॅकेचा ग्राहक असून त्याचे सामनेवालांचे कोडोली येथील शाखेत खाते क्र.डी-57700101010050068 जय श्री महालक्ष्मी कम्युनिकेशन नांवे खाते आहे. तक्रारदार हे वितरक असलेने त्यांचे ग्राहकांना सेवा देण्यासाठी (रिचार्जस, पेपर व्हौचेस, व इतर सुविधा) धनादेशाचा वापर करतात. त्याप्रमाणे दि.17/02/2010 रोजी रिचार्ज पेपर व्हौचेस व रोमिंग सर्व्हीस खरेदीसाठी रु.52,910/- च्या रक्कमेपोटी नमुद व्होडाफोन यांना दिलेला चेक क्र.002451 सामनेवालांच्या कोडोली शाखेत दि.18/02/2010 रोजी भरला मात्र फंड इन्सफीशियन्ट या कारणास्तव प्रस्तुत धनादेशाचा अनादर झालेला आहे. मात्र सदर दिवशी तक्रारदाराचे खातेवर रु.66,950/- शिल्लक होती. त्यामुळे पुढील दिवशीचे बील तक्रारदाराने कंपनीस रु.5,000/- चा डी.डी. ने दिले. तदनंतर सदर बाबीची विचारणा सामनेवालांकडे केली असता त्यांनी उत्तर देणेस टाळाटाळ केली. त्यानंतर धनादेश क्र.02463दि.22/03/2010 चे बीलरक्कमेपोटी दिलेला होता.तोही इनसफिशियन्ट शे-यानिशी न वटता परत आलेला आहे. त्यादिवशी तक्रारदाराचे खातेवर रु.69,140/-इतकी रक्कम शिल्लक होती. पुढील दिवशी तक्रारदाराने सदर चेकची रक्कम तसेच दंड रक्कम रु.5,000/-वोडाफोन एस्सार सेल्यूलर यांना दिली. मात्र सदर कंपनीचा तक्रारदारावरील विश्वास गेलेने सामनेवाला कंपनीने तक्रारदारास धनादेशाचेपोटी कोणतीही सुविधा देणेस नकार दिलेला आहे. त्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे तक्रारदाराने दि.27/03/2010 रोजी सामनेवाला यांना वकीलांमार्फत नोटीस पाठवलेली आहे. तक्रारदाराचे विनंतीवरुन दि.25/03/2010 रोजी धनादेश रक्कमेपोटी सेवा देणेचे मान्य केले. त्यास अनुसरुन तक्रारदाराने चेक क्र.002466 दिला.सदरचा चेकसुध्दा फंडस इनसफिशियन्ट शे-यानिशी न वटता परत आलेला आहे. सदर दिवशी तक्रारदाराचे खातेवर रक्कम रु.55,800/- इतकी रक्कम शिल्लक होती. तक्रारदाराने सदर चेकची रकक्म रु.5,000/- सहीत सामनेवाला यांना डी.डी.व्दारे अदा केलेली आहे. सामनेवाला यांनी केलेल्या वारंवार चुकामुळे तक्रारदारास आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 व 2 यांना पाठविलेल्या वकील नोटीसला उत्तर दिलेले नाही. सामनेवाला यांचे कृत्यामुळे तक्रारदारास त्याचे व्यवसायास मुकावे लागले आहे. त्याचे प्रतिष्ठेस धक्का पोहोचलेला आहे. सबब सामनेवाला क.1 व 2 यांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार धरुन अनादर झालेल्या धनादेशापोटी भरलेली रक्कम रु.15,000/- आर्थिक व व्यवसायीक नुकसानीपोटी रक्कम रु.10,00,000/- ब्रिच ऑफ ट्रस्टसाठी नुकसान भरपाई रु.5,00,000/- मानसिक त्रासापोटी व खर्चापोटी रक्कम रु.4,85,000/- असे एकूण रु.20,00,000/- सामनेवालांना देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केलेली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ वोडाफोन कंपनीची रिसीट व इन्व्हाईस, कार्पोरेशन बँकेचे रिटर्न स्टेटमेंट, चेक क्र.002451, 002463, 002466 ची झेरॉक्स प्रत, चेक क्र.002451, 002463, 002466 चा रिटर्न मेमो, सामनेवाला यांचे स्टेटमेंट अकौन्ट, कार्पोरेशन बँकेचा रिटर्न इन्स्ट्रूमेंट अॅडव्हाईज, सामनेवाला यांना पाठविलेली वकील नोटीस, त्याचे पोहोच पावती, वोडाफोन एस्सार यांची डिमांड नोटीस, डी.डी.क्र.574499, 574498, 581583, 581588, 581592, 581602, 581604, 581612 च्या झेरॉक्स प्रती, ऑगस्ट-09 ते मार्च-10 पर्यंतचे वोडाफोनचे प्रायमरी ट्रॅकर, तक्रारदार यांनी वोडाफोन यांना दिलेला अर्ज इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. दि.15/10/11 रोजी तक्रारदार यांचा वोडाफोन एस्सार कंपनीशी केलेला खातेउतारा दाखल केला आहे. (04) सामनेवाला यांनी दि.16/06/2010 रोजी त्यांचे वकीलांनी म्हणणे दाखल करणेसाठीचा मुदत अर्ज रक्कम रु.1,000/- कॉस्ट भरणेचे अटीवर मंजूर केलेला आहे. तसा आदेश मंचाने पारीत केलेला आहे. सदर कॉस्ट दि.21/06/2010 रोजी डी.डी.व्दारे भरलेली आहे व म्हणणे दाखल करुन घेतलेले आहे. (05) सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार प्रस्तुतची तक्रार कायदयाचे दृष्टीने चालणेस पात्र नाही. सामनेवाला विरुध्द तक्रारीस कारण घडलेले नाही. प्रस्तुत तक्रारीस नॉन जॉइन्डर ऑफ नेसेसरी पार्टीजचा बाध येतो. सामनेवाला क्र.1 यांचे विरुध्द कधीही तक्रारीस कारण घडलेले नाही. सामनेवाला क्र.2 यांचे विभागीय कार्यालय कोल्हापूर येथे असून त्यांचे विविध शाखांवर नियंत्रण आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्दही तक्रारीस कारण घडलेले नाही. तक्रारदारांनी आर्थिक, मानसिक नुकसान झालेबाबत तसेच सामाजिक पत प्रतिष्ठेस धक्का बसलेबाबत तसेच ब्रिच ऑफ ट्रस्ट झालेबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सामनेवाला क्र.1 ही नामांकित बँक आहे. संपूर्ण भारतभर तिच्या शाखा आहेत. सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. प्रस्तुतची तक्रार खोटी व लबाडीची असलेने खर्चासह नामंजूर करणेत यावी. मा. मे. मंचाने “ An inadvertent error committed by the bank, officials cannot be taken advantage of to make an unconscionable bargain. It is also not a consumer dispute as there has been no deficiency in service.” या तत्वाचा विचार करुन प्रस्तुत तक्रार खर्चासह फेटाळावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (06) सामनेवाला यांनी सदरचे म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. (07) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्हणणे, उभय पक्षकारांचे वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे काय ? ---होय. 2. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? ---होय. 3. काय आदेश ? ---शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- सामनेवाला यांनी प्रस्तुतची तक्रार कायदयाने चालणेस पात्र नसलेचे प्रतिपादन केले आहे. यासाठी सामनेवाला यांनी नॉन जॉइन्डर ऑफ नेसेसरी पार्टीजचा बाध येत असलेचा आक्षेप घेतलेला आहे. तसेच सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेविरुध्द तक्रारीस कारण घडलेले नाही असाही आक्षेप घेतलेला आहे. तसेच युक्तीवादाच्या वेळेस भविष्य कालीन नुकसानीची दाद मे. मंचात मागता येणार नाही तसेच प्रस्तुत सामनेवालांचे दाखल लेखी म्हणणेतील कलम 7 मध्ये नमुद केलेल्या तत्वाचा आधार घेऊन प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही असा आक्षेप घेतलेला आहे. सदर बाबीचा विचार करता तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन तक्रारदार व वोडाफोन एस्सार सेल्यूलर कंपनी यांचेमध्ये वितरकाबाबत व्यवहार झालेचे दिसून येतो. तसेच त्यास अनुषंगीक अशी कागदपत्रे दाखल आहेत. त्यामुळे सदर वोडाफोन यांना आवश्यक पक्षकार करणेचा आक्षेप हे मंच फेटाळत आहे. सबब सदर तक्रारीस नॉन जॉइन्डर ऑफ नेसेसरी पार्टीजची बाध येत नसलेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच तक्रारीत नमुद धनादेशाच्या अनादराबाबतचा व्यवहार हा सामनेवाला क्र.1 व 2 कार्यरत होते. तसेच नमुद तीनही धनादेश फंड इनसफिशियन्ट म्हणून परत पाठवलेले आहेत व प्रस्तुत खातेवर Inward cheque return charges Kolhapur , Kolhapur main असे स्पष्टपणे नमुद केले आहे. सबब सामनेवाला क्र. 1 व 2यांचेविरुध्द तक्रारीस कारण घडलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे भविष्यकालीन नुकसानीपेक्षा प्रत्यक्षात झालेल्या नुकसानी तसेच तक्रारदाराचे पत प्रतिष्ठेस बसलेला धक्का तसेच आर्थिक, व्यावसायिक, शारिरीक, मानसिक, सामाजिक इत्यादीच्या प्रत्यक्ष नुकसानीचा विचार करणेस हे मंच बांधील आहे. सबब प्रस्तुतची तक्रार मे. मंचात चालवणेचा व ती निर्णित करणेचा पूर्णत: अधिकार आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 व 3 :- तक्रारदाराने दि.26/04/2010 रोजीचे दाखल केलेले कागदपत्र यादी अनुक्रमांक 1 ते 3 वोडाफोनचे इन्व्हाईस व पावतीवरुन वोडाफोन व तक्रारदाराचे मे.जय श्री महालक्ष्मी कम्युनिकेशन यांचेमध्ये वितरक म्हणून व्यवहार झालेचे दिसून येते. तक्रारदाराने नमुद वोडाफोन एस्सार सेल्यूलर लि. यांना दि.18/02/2010, 22/03/2010 व 25/03/2010 रोजीचे चेक क्र.2451, 2463, 2466 अन्वये अनुक्रमे रक्कम रु.52,910/-, 50,024/-, 24,050/- यांना व्यवहारापोटी दिलेले होते. सदर धनादेश इनसफिशियन्ट फंड या शे-यानिशी न वटता परत गेलेले आहेत. प्रस्तुत तीन्ही धनादेशांचे रिटर्न मेमो प्रस्तुत प्रकरणी दाखल आहेत. सामनेवाला क्र.1 बँकेकडे तक्रारदाराचे खाते क्र.डी-57700101010050068 चे खातेउता-यावर सदर चेक वटणेसाठी आले असता सदर दिवशी तक्रारदाराचे खातेवर दि.19/2/2010 रोजी इनवर्ड चेक रिटर्न चेक चार्जेस रु.50/- ची नोद दिसते. तसेच दि.18/02/2010 व दि.19/02/2010 रोजी सदर खातेवर अनुक्रमे रक्कम रु.66,995.70/- व रु.90,415.70 इतकी रक्कम शिल्लक आहे. दि.23/03/2010 रोजी इनवर्ड चेक रिटर्न चार्जेस कोल्हापूर मेन म्हणून रक्कम रु.50/- ची नोंद आहे. दि.22/03/2010 व दि.23/03/2010 रोजी अनुक्रमे रु.69,140.70 व रु.95,080.70 इतकी रक्कम शिल्लक असलेची नोंद आहे. तसेच दि.25/03/2010 रोजी रु.34,455.70 तर दि.26/03/2010 रोजी रु.55,800.70 इतक्या शिल्लक रक्कमेची नोंद दिसून येते. नमुद खातेवर चेक व्यवहारासाठी रक्कम रु.5,000/5 इतक्या कमीतकमी रक्कम शिल्लक असणेबाबतची अट आहे. धनादेशाव्दारे अदा केलेल्या रक्कमा अधिक कमीत कमी शिल्लक रक्कम रु.5,000/5 इतके मिळून असणारी रक्कम सदर धनादेश वटणेसाठी आला असता तक्रारदाराचे खातेवर शिल्लक असलेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. प्रस्तुत खातेवर पुरेशी शिल्लक असतानाही तक्रारदाराचे तीन धनादेश इनसफिशियन्ट फंड या कारणास्तव न वटता परत पाठवलेले आहेत ही सामनेवालांचे सेवेतील अक्षम्य त्रुटी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला यांचे वकीलांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये “ An inadvertent error committed by the bank, officials cannot be taken advantage of to make an unconscionable bargain. It is also not a consumer dispute as there has been no deficiency in service.” हे तत्व प्रस्तुत प्रकरणी तंतोतंत लागू होत असलेबाबत प्रतिपादन केले आहे. तसेच Ravneet Singh Bagga Vs. KLM Royal dutch Airlines, 1999 (9) Supreme 90, 199(10) SRJ 434: 1999 NCJ 655 या पूर्वाधाराचा आधार घेतलेला आहे. मात्र प्रस्तुत पूर्वाधार प्रस्तुत प्रकरणी लागू होत नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच II (1994) CPJ 109 (NC) NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI – NINA ARORA Vs. SR. MANAAGER, CANARA BANK F.A. No.329 of 1992 – Decided on 17.5.1994 –Consumer Protection Act, 1986-Section 19-“Appeal”-Section 2(1)(g),-“Deficiency in Service”- “Banking Services”-Complainant/appellant who is financier presented 10 cheques to O.P/bank where he was having his account-Cheques dishonored-Respondent/O.P. bank credited amount to anticipation of their realization-When dishonored O.P. debited the same from some other account due to error- Error when detected after one year, complainant’s account debited-Whether thee is any ‘deficiency in service’ in debiting the amount by O.P?-(No)-Whether there is any ‘Consumer Despute?(No). प्रस्तुत मा. राष्ट्रीय आयोगाचा आदर राखून हे मंच पुढे असे स्पष्ट करीत आहे की सदर पूर्वाधार लागू पडत नाही. कारण प्रस्तुत पूर्वाधाराप्रमाणे तक्रारदार हा फायनान्सर असून त्याची विविध खाती सामनेवालांकडे होती. चुकीमुळे क्रेडीट झालेली रक्कम एक वर्षाने डेबीट केलेली आहे. तशी वस्तुस्थिती प्रस्तुत प्रकरणी नाही. तसेच प्रस्तुत तक्रारदार हा फायनान्सर नाही. तो सामनेवालांचाही चालूखातेधारक आहे. त्यामुळे तो सामनेवालांचा ग्राहक तर आहेच शिवाय प्रस्तुत सामनेवाला बँकेकडून चुकीने एकापाठोपाठ एक तीन धनादेश अनादर झालेबाबतचा कोणताही पुरावा सामनेवाला बँकेने प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. तसेच सामनेवाला बँकेने आपल्या दाखल केले लेखी म्हणणेमध्ये प्रस्तुत तक्रारदाराची तक्रार स्पष्टपणे नाकारलेली नाही. अथवा तक्रारदाराचे कथनाबाबत आक्षेप घेतलेबाबत साधा उल्लेखही नाही. केवळ एका तत्वाचा आधार घेऊन प्रस्तुतची तक्रार फेटाळणेची विनंती केलेली आहे. तक्रारदाराची कथने स्पष्टपणे नाकारणे व तक्रारदाराची तक्रार खोटी असलेचे सिध्द करणेबाबत सामनेवालांनी योग्य तो पुरावा देऊन ती शाबीत करणेची जबाबदारी सामनेवालांची होती ती त्यांनी केलेली नाही. याउलट तक्रारदाराने त्यांचे वोडाफोन सेल्यूलर लि. यांचेबरोबर झालेला व्यवहार तसेच धनादेशांच्या सत्यप्रती, धनादेश अनादर झालेचा रिटर्न मेमो, खातेउतारा, तसेच प्रस्तुत धनादेश अनादर झालेने वोडाफोन सेल्यूलर यांना सदर तीन धनादेशाचे अनादरापोटी प्रत्येकी रक्कम रु.5,000/- दंड भरावा लागलेचे त्यांनी दाखल केलेल्या खातेउता-यावरुन निदर्शनास येते. यावरुन सामनेवाला यांनी नॉन जॉइन्डर ऑफ नेसेसरी पार्टीजचा बाध येत असलेचा आक्षेप हे मंच फेटाळत आहे. तसेच तक्रारदाराने भविष्यातील नुकसानीपोटी केलेल्या मागणीची दाद दिवाणी न्यायालयात मागावयास हवी. मे; मंचास सदर बाब निर्णित करता येणार नाही असा युक्तीवादाच्या वेळेस आक्षेप घेतलेला आहे. सदर बाबींचा विचार करता मे.मंच तक्रारदाराचे खातेवर नियमाप्रमाणे पुरेशी शिल्लक असतानाही तक्रारदाराचे तीन धनादेश इनसफिशियन्ट फंड म्हणून परत पाठवून सेवात्रुटी केलेली आहे व ही सेवात्रुटी निर्णित करणेचा अधिकार मे. मंचास आहे. तसेच प्रस्तुत सेवात्रुटीमुळे तक्रारदाराचे प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीाचा विचार करणेस हे मंच बांधील आहे. त्याअनुषंगाने सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे प्रस्तुत धनादेशाचा अनादर झालेमुळे तक्रारदाराचे सामाजिक व व्यवसायिक प्रतिष्ठेस धक्का बसलेला आहे. तसेच प्रस्तुत धनादेशाचा अनादर झालेमुळे वोडाफोन एस्सार सेल्यूलर कंपनीच्या रक्कमा तक्रारदाराने प्रत्येक धनादेशामागे रु.5,000/- दंडासहीत भरणा केलेचे दाखल कागदपत्रावरुन निर्विवाद आहे. सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे तक्रारदारास प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागलेने तसेच त्यास विनाकारण दंडाच्या रक्कमेचे आर्थिक नुकसान तसेच मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. तसेच प्रस्तुत धनादेश न वटता परत गेलेने प्रस्तुत प्रत्येक धनादेशामागे रु.50/- इतका रिटर्न चार्जेस म्हणून आकार घेतलेला आहे. यामुळे तक्रारदाराचे आर्थिक, मानसिक, शारिरीक, सामाजिक व व्यावसायिक नुकसान झालेले आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. यासाठी खालील पूर्वाधार हे मंच विचारात घेत आहे. 2005 (3) CPR 105 KARNATAKA STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, BANGALORE – V. R. Kollali Vs. Vijaya Bank – Complaint No.102/2000 Decided on 10-8-2005-Consumer Protection Act, 1986-Sections 12 and 17-Banking service deficiency-Dishonour of cheq ue with endorsement “ funds insufficient” despite sufficient funds in account on which cheque was drawn amounts deficiency in service-Except a plea that there was confusion about account no, no material placed by bank to substantiate any such plea-Cheque issued by comnplainant was for Rs.62]930/- in a business transaction-Its dishonor was injury to reputation of complainant- Compensation of Rs.50,000/- awarded. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तसेच वरील पूर्वाधाराचा विचार करता तक्रारदार सामनेवाला यांनी केलेल्या सेवात्रुटीमुळे झालेल्या धनादेशाच्या अनादरामुळे त्याचे सामाजिक व व्यावसायिक पत प्रतिष्ठेस धक्का बसलेला आहे. त्यामुळे तक्रारदारास आर्थिक, मानसिक, शारिरीक त्रास झालेला आहे. सबब तक्रारदार त्यापोटी एकंदरीत (लमसम) नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे. तसेच तक्रारदार तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.20,000/-(रु.वीस हजार फक्त) अदा करावी. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |