DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR | New Administrative Building | 5th Floor, Civil Lines, | Nagpur-440 001 | 0712-2548522 |
|
|
Complaint Case No. CC/532/2021 | ( Date of Filing : 16 Sep 2021 ) |
| | 1. SHRI. SURESH GANGADHAR HINGE | R/O. PLOT NO.444, BABULBAN, GAROBA MAIDAN, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. UNION BANK OF INDIA THROUGH MANAGER | BRANCH-RESHIMBAGH, NAGPUR, BANTE HOUSE, PLOT NO.212, RESHIMBAGH ROAD, KESHAV DWAR, RESHIMBAGH, NAGPUR-09 | NAGPUR | MAHARASHTRA | 2. UNION BANK OF INDIA THROUGH MANAGER | REG. OFF.AT, 34/2, 2ND FLOOR, AASHIRWAD COMPLEX, CENTRAL BAZAR RD. RAMDASPETH, NAGPUR-10 | NAGPUR | MAHARASHTRA | 3. STATE BANK OF INDIA THROUGH MANAGER | BRANCH CHAPPRUNAGAR, KHANDWANI CHAMBER, NEAR DR. AMBEDKAR SQ. C.A. ROAD, NAGPUR-08 | NAGPUR | MAHARASHTRA | 4. SHRI. RAKESH GANGADHAR BHUTE | R/O. PLOT NO.317/A/82, ATKAR LAYOUT, AAJAD COLONY, NEAR PARMATMA EK HOSPITAL, NAGPUR-440009 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
|
BEFORE: | | | HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT | | HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER | | HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER | |
|
PRESENT: | ADV. Shilpa G. Barbate /Prerana Bhusari , Advocate for the Complainant 1 | | ADV S. D. INGOLE/ ALKA BORIKAR, Advocate for the Opp. Party 1 | |
Dated : 24 May 2023 |
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजने यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्यात नमूद केले की, विरुध्द पक्ष क्रं. 4 चे वि.प. 1 यांच्या बॅंकेत खाते असून त्याचा खाते क्रं. 434802010006396 असा आहे. तसेच तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्ष 3 कडे बचत खाते आहे. तक्रारकर्ता व वि.प. 4 यांच्यामध्ये स्थावर मालमत्ताबाबत करारनामा करण्यात आला होता. त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष 4 यांनी तक्रारकर्त्याच्या नांवे विरुध्द पक्ष 1 या बॅंकेचा रुपये 30,00,000/- एवढया रक्कमेचा धनादेश क्रं. 041774, दि. 22.10.2020 रोजीचा दिला होता. तक्रारकर्त्याने सदरचा धनादेश विरुध्द पक्ष 3 यांच्याकडे दि. 28.12.2020 रोजी वटविण्याकरिता सादर केला होता. परंतु सदरचा धनादेश Drawer signature differ या कारणास्तव वटविण्यात आला नाही. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी विरुध्द पक्ष क्रं. 4 यांची स्वाक्षरी जुळत नसल्याबाबतची सूचना न देता सदर धनादेश वटविला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचे आर्थिक नुकसान झाले. व तक्रारकर्त्याला रुपये 177/- दंडापोटी अदा करावे लागले. तसेच तक्रारकर्त्याचे दि. 28.12.2020 ते 02.02.2021 या कालावधीकरिता व्याजाचे नुकसान झाले.
- तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, त्याने विरुध्द पक्ष क्रं. 4 ला दिलेला धनादेश न वटविल्याबाबत कळविले असता विरुध्द पक्ष क्रं. 4 यांनी तक्रारकर्त्याला सदरचा धनादेश विरुध्द पक्ष 1 यांनी कोणतीही सूचना न देता व कारण नसतांना सदरचा धनादेश न वटविल्याबाबत कळविले. विरुध्द पक्ष 4 यांनी वि.प. 1 यांच्याकडे पाठपुरावा करुन पुनश्च तक्रारकर्त्याला व धनादेश विरुध्द पक्ष 3 यांच्याकडे सादर करण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 3 यांच्याकडे पुनश्च धनादेश वटविण्याकरिता दि. 02.02.2021 ला सादर केला व तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्रं. 4 यांच्यामधील व्यवहार पूर्ण झाले.
- तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, विरुध्द पक्ष क्रं. 4 यांनी तक्रारकर्त्याला दिलेला रुपये 30,00,000/- एवढया रक्कमेचा धनादेश विरुध्द पक्ष 3 च्या चुकिमुळे वटविल्या गेला नसल्याने तक्रारकर्त्याचे रुपये 15,000/- एवढे व्याजाचे व धनादेश न वटविल्या कारणास्तव लावलेला दंड रुपये 177/- असे एकूण रुपये 15,177/- एवढया रक्कमेचे नुकसान झाल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या रुपये 15,177/- च्या नुकसानीकरिता दि.28.12.2020 पासून द.सा.द.शे. 24 टक्के दराने व्याजासह रक्कम देण्याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश द्यावा.
- विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी आपल्या लेखी जबाबात तक्रारकर्त्याचे तक्रारीतील बहुतांश परिच्छेद निहाय नाकारलेले असून पुढे नमूद केले की, विरुध्द पक्ष क्रं. 4 यांचे विरुध्द पक्ष 1 कडे खाते आहे. वि.प. 1 व 2 यांना तक्रारकर्ता व वि.प. 4 यांच्या मध्ये होणा-या स्थावर मालमत्ताबाबतच्या व्यवहाराबाबत माहिती नव्हती. वि.प. 4 यांनी तक्रारकर्त्याच्या नांवे धनोदश निर्गमित केला होता व सदरचा धनादेश क्रं. 041774 दि. 22.12.2020 रुपये 30,00,000/- हा वटविण्याकरिता सादर करण्यात आला होता. विरुध्द पक्ष 4 यांनी वि.प. 1 यांच्याकडे बॅंक खाते काढतांना घेण्यात आलेल्या स्वाक्षरीची धनादेशावरील स्वाक्षरी जुळत नसल्यामुळे वि.प. क्रं. 1 यांनी सदरचा धनादेश प्रचलित बॅंकेच्या कार्यप्रणालीनुसार Drawer signature differ या कारणास्तव परत केला व सदरचा धनादेश परत करीत असतांना विरुध्द पक्ष 1 यांनी विरुध्द पक्ष 4 यांना कळविले. परंतु विरुध्द पक्ष 4 यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे विरुध्द पक्ष 1 यांना तक्रारकर्त्याच्या बॅंकेला (वि.प. 3) ला परत करावे लागले. त्यानंतर वि.प. 4 यांनी पुनश्च धनादेशावर स्वाक्षरी केल्यानंतर सदरचा धनादेश तक्रारकर्त्याने पुनश्च वि.प. 1 यांच्याकडे वटविण्याकरिता सादर केल्यानंतर धनादेश वटविण्यात आला. त्यामुळे वि.प. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही. त्यामुळे सदरची तक्रार खारीज करण्यात यावी.
- विरुध्द पक्ष 3 व 4 ला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त होऊन ही ते आयोगा समक्ष हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि.17.01.2022 रोजी पारित करण्यात आला.
- उभय पक्षाने दाखल केलेले दस्तावेजाचे अवलोकन केले व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
- तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
निष्कर्ष - मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –. तक्रारकर्त्याचे विरुध्द पक्ष 3 यांच्या बॅंकेत बचत खाता असून त्याचा खाते क्रं. 30965740434 असल्याचे नि.क्रं. 2 (4) वरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्द पक्ष 3 चा ग्राहक असल्याचे दिसून येते. तसेच विरुध्द पक्ष क्रं. 4 यांनी विरुध्द पक्ष 1 यांच्या बॅंकेत असलेल्या खाते क्रं. 434802010006396 मधून तक्रारकर्त्याच्या नांवे रुपये 30,00ृ,000/- एवढया रक्कमेचा धनादेश क्रं. 041774 दि. 22.12.2020 ला निर्गमित केल्याचे व सदरचा धनोदश तक्रारकर्त्याने वि.प. 3 मार्फत वि.प. 1 यांच्याकडे वटविण्याकरिता दि. 28.12.2020 ला सादर केल्यानंतर तो Drawer signature differ या कारणास्तव न वटविल्या गेल्याचे नि.क्रं. 2 (1, 2) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. धनादेश बॅंकेत वटविण्याकरिता सादर केल्यानंतर सदरच्या धनादेशावरील स्वाक्षरीची बॅंकेत असलेल्या खातेधारकाच्या स्वाक्षरीशी जुळवाजुळव करणे व सत्यता पडताळणे हे प्रत्येक बॅंकेच्या अधिका-याची जबाबदारी व आद्यकर्तव्य आहे व ते त्यांनी बॅंकेच्या प्रचलित कार्यप्रणालीनुसार पार पाडले असल्यामुळे विरुध्द पक्ष 4 यांनी तक्रारकर्त्याला दिलेला धनादेश स्वाक्षरी जुळत नसल्याच्या कारणाने विरुध्द पक्ष 3 कडे परत पाठवून कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्याचे दिसून येते असे आयोगाचे स्पष्ट मत आहे.
सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार खारीज.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
| |
|
| [HON'BLE MR. ATUL D. ALSI] | PRESIDENT
| | | [HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS] | MEMBER
| | | [HON'BLE MR. SUBHASH R. AJANE] | MEMBER
| | |