::: नि का ल प ञ::: (मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या) (पारीत दिनांक 29/08/2019) | | |
| |
१. अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम १२ सह १४ अन्वये दाखल केलेली आहे. अर्जदार हा वरील ठिकाणी राहत असून गैरअर्जदार भारतात नाव नावाजलेली बँक आहे. अर्जदाराचे नावाने बँकेत बचत खाते क्रमांक ४०७८०२१००२०४२ आहेत सदर खात्यात अर्जदाराचे रुपये 17,500 जमा होते. दिनांक 14.09.2018 रोजी अज्ञात इसमाने अर्जदाराचे पॅकेट काढून लंपास केले, त्यात अर्जदाराचा खात्याचा गैरअर्जदार बँकेचे एटीएम होते अज्ञात इसमाने अर्जदाराच्या एटीएम मधून दिनांक १४.०८.२०१८ रोजी दुपारी अडीच वाजता रुपये १०,०००/-काढले व दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी रुपये ५०००/- व दुपारी तीन वाजता दोन २०००/-रुपये काढले व पाचशेचा पेट्रोल भरला असे एकूण 17,500 अज्ञात इसमाने अर्जदाराच्या एटीएम मधून काढले. सदरची माहिती अर्जदाराच्या मोबाईलवर मेसेज द्वारा आली. अर्जदाराने लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 15 .9. 2018 रोजी गैरअर्जदार बँकेला माहिती दिली व एटीएम चे लोकेशन मागण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला. अर्जदाराने दिलेल्या अर्जाचा बँकेने कोणत्याही प्रकारे विचार केला नाही एटीएम हरवल्याचा बाबतची तक्रार दाखल केली तेव्हा पोलिस विभागाने सीसीटीव्ही फुटेज मागणी केली अर्जदाराने परत गैरअर्जदार बँकेला सीसीटीव्ही फुटेज घेण्याबाबत विनंती केली परंतु सदर गैरअर्जदार बँकेने सीसीटीव्ही फुटेज एटीएम चे लोकेशन देण्यास टाळाटाळ केली जात होती.अर्जदार मजुरीचे काम करीत असल्याने अर्जदाराचे रुपये 17,500/- अज्ञात इसमाने एटीएम मधून लंपास केल्याने अर्जदारावर आर्थिक भुर्दंड बसलेला आहे. गैरअर्जदाराने सदर तक्रारीची कोणतीही दखल घेतलेली नाही. गैरअर्जदार बँकेने बेकायदेशीर कृत्य केलेले असल्यामुळे अर्जदाराचा मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागला सबब गैरअर्जदाराविरुद्ध सदर तक्रार अर्जदाराने दाखल केलेली आहे.
अर्जदाराने तक्रारीत मागणी केलेली आहे की गैरअर्जदार बँकेने दिलेली सेवा ही न्यूनता पूर्ण सेवा आहे असे ठरवण्यात यावे तसेच अर्जदाराच्या खात्यात बेकायदेशीर रक्कम काढण्यात आल्याने व गैरअर्जदार बँकेने तक्रारीची दखल न घेतल्याने अर्जदाराला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला त्यामुळे गैरअर्जदार बँकेने अर्जदाराला खात्यावरील संपूर्ण रक्कम व न्यायालयीन झालेला खर्च परत करावे व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/-देण्यात यावा.
२. अर्जदाराची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदाराला नोटीस काढण्यात आली
गैरअर्जदाराने अर्जदाराचे तक्रारी म्हणणे खोडून काढत पुढे कथन केले की गैरअर्जदार बँकेकडे अर्जदाराचे बचत खाते क्रमांक ४०७८०२१००२०४२ असून दिनांक 14. 9. 2018 ला दुपारपर्यंत बचत खात्यात मधून एटीएम व्यवहारात द्वारे रुपये १०,०००/- रुपये, ५०००/- रुपये 2000/- रुपये काढण्यात आले. त्या संबंधित अर्जदाराच्या बचत खाते दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी दिनांक 15 .9 .2018 नवीन एटीएम मिळण्याबाबत अर्ज दाखल केला,तसेच बँकेने अर्जदाराचा जुना हरवलेला एटीएम कार्ड लगेच ब्लॉक करण्यात आला.अर्जदार यांनी 15. 9 .2018 च्या अर्जामध्ये मागणी केल्याप्रमाणे गैरअर्जदार बँकेने करायचे सदर अर्जाची प्रत व एटीएम लोकेशन डिटेल्स ची माहिती पूर्ण मिळण्याकरिता संबंधित एटीएम मॉनिटरिंग विभागाकडे दिनांक 15. 9. 2018 ला इलेक्ट्रॉनिक मेल पाठवला. त्यासंबंधी मेलची प्रत गैरअर्जदाराने दाखल केली आहे.त्यानंतर अर्जदाराच्या मागणीनुसार गैरअर्जदार बँकेने पुन्हा दिनांक 23.10.2018 ला संबंधित एटीएम मॉनिटरिंग विभागाकडे विभागाकडे मेल पाठवून अर्जदाराने पोलीस तक्रार केल्याची माहिती दिली व त्यामुळे तात्काळ तथाकथित एटीएम व्यवहाराचे एटीएम लोकेशन पाठवण्याची विनंती केली परंतु विचारणा केलेल्या मेल चे उत्तर आले नाही. सबब मेल गैर अर्जदाराने दाखल केला आहे. या नंतरही अर्जदाराच्या मागणीवरून पुन्हा दिनांक 15. 11. 2018 संबंधित विभागाकडे एटीएम चे लोकेशन व सीसीटीव्ही फुटेज लवकरात लवकर पाठवण्याबाबत मेल पाठवला परंतु अजून पर्यंत सदर माहिती गैरअर्जदार बँकेला मिळाली नाही. सदर दिनांक 15. 11 .2018 ची मेल द्वारा मागणी गैरअर्जदार बँकेने दाखल केली आहे. दिनांक 3.1.2019 ला संबंधित विभागाकडे मेल पाठवून विचारणा केली असता कोणतीही माहिती अजून पर्यंत प्राप्त झाली नाही. सदर दिनांक 3. 1. 2019 च्या मेलची पोरात गैरार्ज्दारणे दाखल केली आहे. गाई अर्जदार पुढे नमूद करतो कि एटीएम कार्ड मॉनिटरिंग कंट्रोल एजन्सी पुणे येथे कार्यरत आहे. एटीएम संबंधित संपूर्ण कार्य सदर एजन्सी पुणे येथील मुख्य कार्यालयातून कार्यान्वित होते, तसेच अर्जदाराने मागितलेली लोकेशन व सीसीटीव्ही फुटेज ची माहिती पुणे येथील कार्यालयातून संपूर्ण शहानिशा करून प्राप्त होते. त्यामुळे गैरअर्जदार बँकेचा प्रत्यक्ष संबंध सदर खासगी मॉनिटरिंग संस्थेचे नसतो एटीएम चे लोकेशन सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीचे मेल हे गैरअर्जदार बँकेला त्यांच्या विभागीय कार्यालयामार्फत सदर एटीएम मॉनिटरिंग एजन्सीला पाठवले जातात त्यामुळे बँकेचा अर्जदाराचा सदर मागणीबाबत प्रत्यक्ष संबंध नसतो. त्यामुळे गैरअर्जदार बँकेला माहिती प्राप्त होण्याची प्रतीक्षा करावी लागते गैरअर्जदार बँकेने वारंवार पाठवलेल्या मेल ची माहिती अजून पर्यंत गैरअर्जदार बँकेला मिळाली नाहीत तसेच सदर प्रकरण हे पोलिस चौकशी करता प्रलंबित आहे. त्यामुळे गैरअर्जदार बँकेतर्फे सेवेत न्यूनता निर्माण झाली असे ग्राह्य धरणे न्यायाच्या दृष्टीने योग्य होणार नाही. सदर प्रकरण हे पोलिस चौकशीचा भाग असल्यामुळे सदर माहिती पोलिसांना आवश्यक असल्यामुळे कायदेशीर रित्या चौकशी करता सदर माहिती पोलिसांना देणे गैरअर्जदार यांना बंधनकारक आहे. परंतु सदर माहिती गैरअर्जदार बँकेला अजून पर्यंत प्राप्त झाली नाही. अर्जदाराला उपरोक्त बाबी ची संपूर्ण माहिती गैरअर्जदाराने दिलेली असताना देखील सदर अनावश्यक त्रास देण्यासाठी खोटे ग्राहक कायद्याच्या चौकटीत व व्याख्यांमध्ये न बसणारे तथाकथित प्रकरण विद्यमान मंचात दाखल केलेले आहे.सबब सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी ही विनंती
३ . तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार . यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प यांचे तोंडी युक्तिवादावरून प्रकरणातील विवादीत मुद्याबाबत मंचाची कारणमिमांसा व निष्कर्ष खालीलप्रमाणे.
कारण मिमांसा
४. अर्जदाराची तक्रार व दस्तऐवज याचे अवलोकन केले असता अर्जदाराचे पॉकेट दिनांक 14.9.18 रोजी अज्ञात इसमाने चोरले व त्यात असलेल्या गैरअर्जदार अर्जदाराचे एटीएम चा उपयोग करून त्यांनी अर्जदाराच्या खात्यातून अनुक्रमे १०,०००/- रुपये 5०००/-, तसेच २०००/- व 500/- रुपये दिनांक 14. 9. 2018 रोजी काढले ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या निशाणी क्रमांक दोन सह दस्त क्रमांक आठ वरून सिद्ध होत आहे. त्याबद्दल अर्जदाराने पोलीस स्टेशन सावली येथे तक्रार दाखल केली.तसेच बँकेकडे दिनांक 15. 9. 2018 रोजी एटीएम ब्लॉक करण्याचे पत्र दिले सदर पत्र तक्रारीत दाखल आहे.गैरअर्जदार बँक यांनी अर्जदाराची तक्रार मिळताच त्याचे बचत खाते दिनांक 15. 9. 2018 ला बंद करून एटीएम ब्लॉक केले तसेच अर्जदाराच्या मागणीनुसार एटीएम लोकेशन डिटेल्सची माहिती मिळण्याकरिता संबंधित एटीएम मॉनिटरिंग विभागकडे दिनांक १५.०९.२०१८ रोजी, 23. 10 .2018 व दिनांक 15.11.2018 रोजी वारंवार एटीएम फुटेजची मागणी केली. एटीएम मॉनिटरिंग संस्थेला वारंवार मेल पाठवून उत्तर न मिळाल्यामुळे दिनांक 3. 1. 2019 रोजी पुन्हा मेल पाठवून गैरअर्जदार बँकेने फुटेजची मागणी केलेली आहे ही बाब गैर अर्जदाराने त्यांच्या उत्तरा सोबत दाखल केलेल्या दस्ता-ऐवजांवरून स्पष्ट होत आहे अर्जदाराची तक्रार व दस्तऐवज गैरअर्जदाराचे प्रत्युत्तर व दस्तावेज यावरून मंच या निष्कर्षास येत आहे कि, अर्जदाराचे पाकीट चोरीला गेल्यामुळे एटीएम द्वारा रक्कम काढल्याने अर्जदाराचे आर्थिक नुकसान झाले आहे हि बाब बरोबर असले तरी त्यासाठी गैरअर्जदार बँकेने अर्जदाराला सेवेत न्यूनता दिली ही बाब ग्राह्य धरण्यासारखी नाही कारण एटीएम कार्ड मॉनिटरी व कंट्रोलिंग एजन्सी पुणे येथून गैरअर्जदाराच्या वारंवार पाठवलेल्या मेल चे उत्तर येतपर्यंत अर्जदाराच्या बचत खात्यातील रक्कम सीसीटीव्ही फुटेज पाहिल्याशिवाय कोणी काढली ही बाब स्पष्ट होणार नाही तसेच अर्जदाराचे जरी एटीएम कार्ड हरवले तरी त्याचा पिन इतरांना माहित असल्याशिवाय अर्जदाराच्या खात्यातून रक्कम कोणी काढू शकत नाही, ही बाबही तितकीच महत्त्वाची आहे. सबब अर्जदाराने तक्रारीत केलेली मागणी कि गैरअर्जदार बँकेने चोरी गेलेली रक्कम अर्जदाराला परत करावी ही मागणी ग्राह्य धरण्या सारखी नाही. तसेच गैरअर्जदार बँकेने मेल द्वारे व सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याकरता केलेले प्रयत्न व तक्रारीत दाखल मेल ची प्रत वरून ही बाब स्पष्ट होत आहे कि अर्जदारप्रति गैरअर्जदार बँकेने कोणतीही सेवेत न्यूनता दिलेली नाही हि बाब सिद्ध होत असल्यामुळे,अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे
अंतिम आदेश
1) अर्जदाराची तक्रार क्र. 182/2018 खारीज करण्यात येत आहे.
2) उभय पक्षांनी आप आपला तक्रारखर्च सोसावा.
3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष