Maharashtra

Nagpur

CC/111/2019

ADV PRASHANT PRABHAKAR KHEVLE - Complainant(s)

Versus

UNION BANK OF INDIA THROUGH BANK MANAGER - Opp.Party(s)

ADV SANJAY KASTURE

31 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/111/2019
( Date of Filing : 07 Feb 2019 )
 
1. ADV PRASHANT PRABHAKAR KHEVLE
PLOT NO 192, GOKULPETH , NAGPUR 440010
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. UNION BANK OF INDIA THROUGH BANK MANAGER
GOKULPETH BRANCH, KOKULPETH, NAGPUR 440010
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 31 Dec 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्री एस.आर. आजने, मा. सदस्‍य)

 

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केलेली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याने माहे ऑक्‍टोबर २०१७ चे प्रिमीयम भरण्‍याकरीता संबंधीत विमाकर्त्‍याच्‍या अभिकर्ता यास रुपये १८,४०८/- चा धनादेश क्रमांक ०७३१६, दिनांक ६/११/२०१७ ला दिला. त्‍यानुसार संबंधीत अभिकर्ता  यांनी धनादेश ००७३१६ दिनांक ७/११/२०१७ ला भारतीय जिवन विमा निगम च्‍या सदर नागपूर शाखेतील कार्यालयात जमा केला. भारतीय जिवन विमा निगम यांच्‍या अधिका-याने तक्रारकर्त्‍याला माहिती दिली की, आपल्‍या  खात्‍यात पुरेशी निधी नसल्‍याकारणाने आपण दिलेला धनादेश ००७३१६ हा परत आला. त्‍यानंतर भारतीय जिवन विमा निगम, सदर शाखा, नागपूर या कार्यालयाने तक्रारकर्त्‍याला दिनांक १४/११/२०१७ ला पञ दिले व त्‍या पञामध्‍ये सुद्धा अर्जदार यांच्‍या खात्‍यात पुरेशी रक्‍कम नसल्‍याचे त्‍यांनी कळविले. तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात पुरेशी रक्‍कम शिल्‍लक असतांना विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा धनादेश न वटविता तो परत पाठविला ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ता प्रती दोषपूर्ण सेवा आहे. तक्रारकर्त्‍याचे खात्‍यातुन Cheque Dishonoured Charges म्‍हणून रुपये २९५/- इतकी रक्‍कम कपात करण्‍यात आली तसेच विरुध्‍द पक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला एल.आय.सी पॉलिसी चे ऑक्‍टोबर २०१७ चे प्रिमीयम उशीरा भरल्‍यामुळे रुपये २९७/- इतक्‍या रकमेचा अतिरीक्‍त भरणा करावा लागला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला झालेल्‍या नुकसानाची भरपाई मागितली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिनांक ९/१/२०१८ ला कायदेशीर नोटीस बजावली परंतु नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास काहीही प्रतिसाद दिला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर प्रकरण दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाच्‍या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला अपु-या निधी अभावी धनादेश न वटविण्‍याकरीता लागलेले शुल्‍क रुपये २९५/- व भारतीय जिवन विमा निगम यांना विमा हप्‍त्‍यापोटी द्यावी लागणारे अतिरीक्‍त शुल्‍क यावर १८ टक्‍के व्‍याजासह दिनांक १०/११/२०१७ पासुन रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारकर्त्‍याला अदा होईपर्यंत देण्‍याचे आदेशीत व्‍हावे.
  2. मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये ५००००/- व तक्रारीचा खर्च रुपये १५०००/- देण्‍याचे आदेशीत करावे.
  1. विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष हजर झाले नाही करीता मंचाने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द दिनांक २८/५/२०१९ ला एकतर्फी आदेश पारीत केला.
  2. तक्रारीसोबत निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍तावेज व तोंडी युक्‍तीवाद ऐकूण निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नोंदविले आहे.
    1.                           मुद्दे                                                         उत्‍तर
    2. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?              होय
    3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा

     दिली काय ?                                                                       होय

  1. काय आदेश ?                                                     अंतिम आदेशाप्रमाणे

 

 

कारणमिमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1,2 व 3 बाबत- तक्रारकर्त्‍याने माहे ऑक्‍टोबर २०१७ चे प्रिमीयम भरण्‍याकरीता संबंधीत विमाकर्त्‍याच्‍या अभिकर्ता यास रुपये १८,४०८/- चा धनादेश क्रमांक ०७३१६, दिनांक ६/११/२०१७ ला दिला. त्‍यानुसार संबंधीत अभिकर्ता यांनी धनादेश ००७३१६ दिनांक ७/११/२०१७ ला भारतीय जिवन विमा निगम च्‍या सदर नागपूर शाखेतील कार्यालयात जमा केला. भारतीय जिवन विमा निगम यांच्‍या अधिका-याने तक्रारकर्त्‍याला माहिती दिली की, आपल्‍या  खात्‍यात पुरेशी निधी नसल्‍याकारणाने आपण दिलेला धनादेश ००७३१६ हा परत आला. त्‍यानंतर भारतीय जिवन विमा निगम, सदर शाखा, नागपूर या कार्यालयाने तक्रारकर्त्‍याला दिनांक १४/११/२०१७ ला पञ दिले व त्‍या पञामध्‍ये सुद्धा अर्जदार यांच्‍या खात्‍यात पुरेशी रक्‍कम नसल्‍याचे त्‍यांनी कळविले. तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात पुरेशी रक्‍कम शिल्‍लक असतांना विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा धनादेश न वटविता तो परत पाठविला ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ता प्रती दोषपूर्ण सेवा आहे. तक्रारकर्त्‍याचे खात्‍यातुन Cheque Dishonoured Charges म्‍हणून रुपये २९५/- इतकी रक्‍कम कपात करण्‍यात आली. तक्रारकर्त्‍याने अभिलेखावर दाखल केलेले दस्‍ताऐवजाचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा खातेदार असुन त्‍याचा खाता क्रमांक ३४९८०२०१०००८३२७ हा आहे. यावरुन हे निर्दशनास येते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवज क्रमांक १ चे अवलोकन केले असता असे निर्दशनास येते की, तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यामधुन दिनांक १०/११/२०१७ ला खात्‍यामध्ये रुपये २४,०७४.४८/- एवढी पुरेशी रक्‍कम असतांनासुद्धा तक्रारकर्त्‍याने एल.आय.सी. ऑफ इंडिया यांना विम्‍याच्‍या प्रिमीयम अदा करण्‍यापोटी दिलेला धनादेश क्रमांक १२००७३१६ विरुध्‍द पक्षाने परत पाठविला व त्‍यापोटी तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यातुन रुपये २९५/- एवढी रक्‍कम कपात केली. ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍यापोटी दोषपूर्ण सेवा होय असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. विरुध्‍द पक्षाच्‍या  दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला पुनश्‍य अतिरीक्‍त रक्‍कम रुपये २९७/- विमा हप्‍त्‍यापोटी एल.आय.सी ऑफ इंडिया ला अदा करावी लागली. करीता खालिल प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला दिलेल्‍या ञुटीपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला रुपये ५९२/- (२९५/- + २९७/-) अदा करावे व सदर रकमेवर ८ टक्‍के व्‍याज दिनांक १०/११/२०१७ पासुन तक्रारकर्त्‍याला (व्‍याजासह) रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द्यावे.
  3. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारीरिक ञासाकरीता रुपये ३०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.