निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 31/03/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 05/04/2011 तक्रार निकाल दिनांकः- 01/12/2011 कालावधी 07 महिन 26 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. शंकर पिता संभाजी शिंदे. अर्जदार वय 35 वर्ष.धंदा.- अड.एस.ए.देशपांडे. तथागत नगर परभणी ता.जि.परभणी. विरुध्द युनियन बँक ऑफ इंडिया. गैरअर्जदार. मुख्य शाखा. बसमत रोड.परभणी ता.जि.परभणी. अड.एम.ए.मुबीन. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार परभणी येथील रहीवासी असून युनियन बॅंकेचा ग्राहक असून त्याचा खाते क्रमांक 323102010202891 असून त्याला चेकबुकची सुविधाही देण्यात आलेली आहे.व त्याच्याकडे 935101 ते 935140 क्रमांकाचे चेकबुक आहे.अर्जदाराने इंड्सइंडीया बँकेकडून दुचाकी खरेदीसाठी अर्थसहाय्य घेतलेले असून दरमहा रु.1350/- चे चेक ईंडसईंडीया बँकेला दिलेले आहेत अर्जदाराने दिलेले 2010 मधील एप्रील ते सप्टेंबरचे चेक वटलेले असून नोव्हेंबर 2010 मध्ये दिलेला 935107 क्रमांकाचा चेक गैरअर्जदाराने “ चेक नॉट इश्युड ” या सबबी पोटी परत केला.तसेच डिसेंबर 2010 व जानेवारी फेब्रुवारी 2011 चे चेकसुध्दा गैरअर्जदाराने परत केले. अर्जदाराने याची चौकशी गैरअर्जदाराकडे केली असता त्यांच्या कर्मचा-यांनी अर्जदाराशी उध्दट वर्तन केले.अर्जदाराला परत केलेल्या चेकच्या रक्कमा दंडासहीत ईंडसईंडीया बँकेत भराव्या लागल्या गैरअर्जदाराने दिलेल्या शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे व सेवात्रुटी बद्दल रु.70,000/- देण्यात यावे व मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल रु.15,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, खाते विवरण, परत आलेले चेक मेमोरंडमसह इ. कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने चेकबुक गैरअर्जदाराला दाखवले नाही म्हणून चेक बुक अर्जदारास दिले आहे किंवा नाही हे सांगणे कठीण आहे.तसेच अर्जदाराच्या खात्यात पैसे नसल्यामुळे काही चेक्स वटले नाहीत अर्जदाराने परभणी शाखेत सदरचे चेक्स वटविण्यासाठी टाकले नाहीत व त्याबद्दलची माहितीसुध्दा परभणी येथील शाखेस दिली नाही.म्हणून गैरअर्जदाराला सदर व्यवहाराबद्दल माहिती नाही. अर्जदाराने चेक क्रमांक 935109 ते 935120 बद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही व पैसे उकळण्यासाठी खोटा अर्ज दिलेला आहे.अर्जदाराने सर्व चेक परभणी येथेच वटवावयास पाहिजे व इतर कोणत्याही व्यक्तिस किंवा कर्ज परतफेड करण्याच्या दृष्टीने देण्यासाठी घेतले असतील तर तशी पूर्वसुचना बँकेस दयावयास पाहिजे परंतु अर्जदाराने तशी कोणत्याही प्रकारची माहिती गैरअर्जदारास दिलेली नाही तसेच फेब्रुवारी 2011 मध्ये शिल्लक रक्कम रु. 1350/- पेक्षा कमी होती. अर्जदारास गैरअर्जदाराने कोणत्याही प्रकारची त्रुटीची सेवा दिलेली नाही व अर्जदारास कोणताही मानसिक त्रास झालेला नाही म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासहीत नामंजूर करण्याची विनंती गैरअर्जदाराने केलेली आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र दिलेले आहे. तक्रारीत दाखल कागदपत्र व युक्तीवादावरुन निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थीत होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 12/03/2010 रोजी खाते क्रमांक 323102010202891 उघडले ही बाब सर्वमान्य आहे. अर्जदारास गैरअर्जदाराने चेक बुक सुविधा दिलेली आहे व नि.5/2, 5/3, 5/4 वरील चेक्स वरुन सिध्द होते कारण त्यावर अर्जदाराचा खाते नंबर आहे व चेक्स परभणी शाखेचे आहेत देही दिसून येते. अर्जदाराने गैरअर्जदाराने दिलेल्या चेकबुक सुविधेतून अर्जदाराने कुणाला चेक दिले हे गैरअर्जदाराला सांगणे आवश्यक आहे असे गैरअर्जदाराचे म्हणणे आहे,परंतु तसा त्यांचा काही नियम असल्यास तो तक्रारीत दाखल नाही व अर्जदाराला दिलेल्या चेकबुकाची नोंद गैरअर्जदाराकडे निश्चित असतेच असते त्यामुळे अर्जदाराने चेकबुक गैरअर्जदाराच्या शाखाधिका-यांना दाखवले नाही म्हणून सदरील चेकबुक अर्जदाराला दिले आहे किंवा नाही हे सांगणे कठीण आहे असे गैरअर्जदाराचे म्हणणे चुकीचे आहे.तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या नि.5/1 वरील खाते उता-यावरुन 935101 ते 935106 चे चेक वटवले असतांना 935107 पासूनचे चेक अर्जदाराला दिलेले आहेत किंवा नाही हे सांगणे कठीण आहे असे गैरअर्जदाराचे म्हणणे बेजबाबदारपणाचे आहे.तसेच अर्जदाराचा चेक क्रमांक 935108 खात्यात पुरेसा निधी नाही.म्हणून परत केलेला आहे.खाते उता-या वरुन अर्जदाराच्या खात्यात पुरेसा निधी उपलब्ध होता असे सिध्द होते. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात म्हंटल्या प्रमाणे अर्जदाराने चेक परभणी शाखेतच वटवावेत इतर कोणत्याही व्यक्तिस किंवा कर्ज परतफेड करण्याच्या दृष्टीने देण्यासाठी घेतले असल्यास पूर्व सुचना बँकेस द्यावयास पाहिजे याबाबत बँकेंचा असा काही नियम असल्यास तो तक्रारीत दाखल केलेला नाही.अथवा अर्जदारासही कळवलेला दिसून येत नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराचे चेक्स “ चेक नॉट इश्युड ” या सबबी परत करुन व खात्यात पुरेसा निधी असतानाही अपुरा निधी म्हणून चेक परत पाठवुन अर्जदारास निश्चितच सेवात्रुटी दिलेली आहे.असे मंचाचे मत आहे.म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने अर्जदारास निकाल समजल्यापासून 30 दिवसाच्या आत मानसिक त्रासापोटी रु.8,000/- द्यावेत. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास आदेश मुदतीत तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- द्यावेत. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |