(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराच्या पतीचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आलेल्या शेतकरी वैयक्तिक अपघात योजने अंतर्गत विमा रकमेची मागणी केली. गैरअर्जदार यांनी विमा रक्कम दिली नसल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पतीचे दि.12.05.2010 रोजी अपघाती निधन झाले. या अपघाताचे पोलीस पंचनामा तसेच पोस्टमार्टम करण्यात आले. दि.19.07.2010 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडे संबंधित कागदपत्रे दाखल करुन महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तिक अपघात योजने अंतर्गत विमा रक्कम देण्याची मागणी केली. अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांची गैरअर्जदार यांनी दखल घेतलेली नाही. अर्जदाराने दाखल केलेला क्लेम मंजूर किंवा नामंजूर करण्यात आला याचा खुलासाही गैरअर्जदाराने केलेला नाही. गैरअर्जदार यांच्या या कृतीमुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून, विमा रकमेची मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत सातबारा, फेरफार नोंदणी, पोलीस पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे जोडली आहेत. गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार, अर्जदाराने त्यांच्याकडे क्लेम फॉर्म दाखल केलेला नसून अर्जदाराची तक्रार प्रीमॅच्युअर्ड आहे. महाराष्ट्र शासनाबरोबर झालेल्या करारानुसार शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत क्लेम फॉर्म दाखल झाल्यानंतर 90 दिवसात विमा रक्कम द्यावी असे म्हटले आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या क्लेम फॉर्ममध्ये अनेक त्रुटी असल्याचे गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्र.3 यांना पाठविलेल्या पत्रावरुन स्पष्ट होते. अर्जदाराने फॉर्म क्र.6 ड तसेच केमिकल अनलायझरचा अहवाल क्लेम फॉर्म सोबत जोडलेला नसल्यामुळे त्यांच्या नागपूर येथील वरीष्ठ कार्यालयातून अर्जदाराचा क्लेम फॉर्म नामंजूर करण्यात आल्याचे जवाबात म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी मंचात जवाब दाखल केलेला नाही, म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला आहे. (3) त.क्र.608/10 गैरअर्जदार क्र.3 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी अर्जदाराचा शेतकरी अपघात विमा रक्कम मिळण्याचा प्रस्ताव परिपूर्ण करुन दि.26.10.2010 रोजी वरीष्ठ कार्यालयामार्फत संबंधित विमा कंपनीस पाठविल्याचे म्हटले आहे. सदरील प्रस्ताव, विमा कंपनीकडे (गैरअर्जदार क्र.1) प्रलंबित आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन मंचास असे आढळून येते की, अर्जदाराच्या पतीची अडूळ ता.पैठण जिल्हा औरंगाबाद येथे गट क्रमांक 95 मध्ये शेतजमिन असून, अर्जदाराचे पती हे शेतकरी होते. अर्जदाराच्या पतीचा दि.12.05.2010 रोजी औरंगाबाद बीड रस्त्यावर वाहनाच्या अपघातात मृत्यू झाला. या अपघाताचा पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट, मृत्यू प्रमाण पत्र, त्याचप्रमाणे अर्जदाराच्या नावे वारसा हक्क प्रमाणपत्र, शेतजमिनीची फेरफार नक्कल इत्यादी कागदपत्रे अर्जदाराने मंचात दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्र.3 यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अर्जदाराचा क्लेम फॉर्म हा सर्व कागदपत्रांसह दि.26.10.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे पाठविला असून, तो त्यांच्याच कार्यालयात प्रलंबित आहे. यावरुन अर्जदाराने क्लेम फॉर्म सोबत योग्य ती कागदपत्रे लावलेली आहेत. अर्जदाराने दि.10.11.2010 रोजी मंचात विमा रक्कम मिळण्याबाबत तक्रार दाखल केली असून, गैरअर्जदार यांनी दि.09.02.2011 रोजी मंचात दाखल केलेल्या लेखी जवाबात त्यांना अर्जदाराचा क्लेम फॉर्म मिळाला नसल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.05.03.2011 रोजी मंचात दाखल केलेल्या अतिरिक्त लेखी जवाबात, त्यांच्या नागपूर येथील वरिष्ठ कार्यालयाने क्लेम फॉर्म सोबत 6 ड व केमिकल अनलायझरचा अहवाल नसल्यामुळे अर्जदाराचा क्लेम नामंजूर करण्यात आल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांच्या नागपूर विभागातर्फे अर्जदारास दि.31.12.2010 रोजी पत्र पाठविण्यात आले असून, त्यात केमिकल अनलायझर रिपोर्ट व फॉर्म 6 ड जमा केलेला नसल्यामुळे अर्जदाराचा क्लेम नामंजूर केल्याचे पत्र दिले आहे. यावरुन गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.09.02.2011 रोजी त्यांना अर्जदाराचा क्लेम फॉर्म मिळाला नाही हे म्हणणे अत्यंत चुकीचे व मंचाची दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र.1 यांनी वरील कागदपत्राची पूर्तता करण्यास अर्जदारास कळविले असल्याचे दिसून येत नाही. वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदाराने योग्य त्या कागदपत्रासह गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी वैयक्तिक अपघात विमा रक्कम मिळण्यासाठी क्लेम फॉर्म दाखल केल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र.1 यांच्या वरिष्ठ कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या पत्रात केमिकल अनालायझर व फॉर्म 6 ड देण्याबाबतची मागणी चुकीची (4) त.क्र.608/10 असून गैरअर्जदार क्र.1 यांचा अर्जदारास विमा रक्कम नाकारण्याचा हेतूपुर्वक प्रयत्न असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार क्लेम फॉर्म 90 दिवसात म्हणजेच दि.19.12.2010 पर्यंत निकाली काढणे अपेक्षित आहे. गैरअर्जदार यांनी दि.31.12.2010 रोजी चुकीची कारणे दाखवून अर्जदाराचा क्लेम नामंजूर केला आहे. अर्जदाराची मागणी योग्य असून, ते दि.01.11.2010 पासून व्याजासह विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे. आदेश 1) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास रु.1,00,000/- दि.01.11.2010 पासून 14% व्याजासह 30 दिवसात द्यावे. 2) गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चाबददल रु.5,000/- 30 दिवसात द्यावे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |