Maharashtra

DCF, South Mumbai

CC/10/43

Samuel Nadvi - Complainant(s)

Versus

Umerkhadi Co.Operative Housing Soceity Ltd. - Opp.Party(s)

-

17 Oct 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/43
 
1. Samuel Nadvi
24,Saomson Apartments,UmerkhadiCo.Op.Housing Society Ltd.57,RamchandandraBhatt Marg,
Mumbai-09
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Umerkhadi Co.Operative Housing Soceity Ltd.
Society Ltd.,57Ramchndra bhatt marg, Umerkhadi
mumbai-09
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. SHRI.S.B.DHUMAL. HONORABLE PRESIDENT
  Shri S.S. Patil , HONORABLE MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

द्वारा - श्री. एस़्.बी.धुमाळ: मा.अध्यक्ष

ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालीलप्रमाणे :-

1) तक्रारदार हे व्‍यवसायाने अडव्‍होकेट असून जेष्‍ठ नागरीक आहेत. सामनेवाला ही उमरखाडी को-ऑप. हौ.सो. नोंदणीकृत सहकारी संस्‍था असून तिचा नोंदणी क्रं. BOM/HSG/1535/1967 असा आहे. The Bombay Diocesan Trust Association Private Ltd. ने भाडे तत्‍वावर 2900 स्‍क्‍वेअर यार्ड जमीन सामनेवाला यांना 98 वर्षासाठी दिलेली आहे. सामनेवाला सोसायटी व BDTA यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या लेखी कराराप्रमाणे सामनेवाला सोसायटीने दरवर्षी जमिनीच्‍या भाडयापोटी रक्‍कम रु. 13,500/- BDTA ला सुरुवातीची 50 वर्षे देण्‍याचे आहेत. उर्वरित काळासाठी ते भाडे जमिनीच्‍या बाजार भावाच्‍या आधारे देण्‍याचे ठरलेले आहे. सामनेवाला सोसायटी वार्षिक भाडयाची रक्‍कम BDTA ला तिमाही हफ्त्‍याने देण्‍याचे असून पहिला हफ्ता सन 1969 मध्‍ये देण्‍यात आला. भाडेपट्टीची 50 वर्षाची मुदत 2020 साली संपत आहे. त्‍यानंतर सोसायटीने सदरच्‍या भाडेपट्टीचे नूतणीकरण करायचे की नाही याचा पर्याय उपलब्‍ध आहे.

2) तक्रारदार हे सामनेवाला सोसायटीचे सभासद आहेत. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला सोसायटी त्‍यांच्‍या सभासदांकडून कार पार्कींगचे चार्जेसची आकारणी म्‍हणून भरमसाठ रक्‍कम वसूल करीत असतात अशा त-हेने सभासदांकडून भरमसाठ रक्‍कम वसूल करणे हे सहकारी तत्‍वाच्‍या विरुध्‍द आहे. सहकारी संस्‍थेने ना नफा ना तोटा या तत्‍वावर कार्य करणे अपेक्षित असते. सामनेवाला सोसायटीतील सभासदांकडे एकूण 40 कार व 40 दुचाकी वाहने असून ती सोसायटीच्‍या कंपाऊंडमध्‍ये पार्क केली जातात. दि.01/04/2009 पासून सामनेवाला सोसायटीने कारसाठी दरमहा रु.300/- व दुचाकी वाहनासाठी दरमहा रु.150/- पार्कींगची आकारणी सुरु केली. अशा त-हेने सोसायटी पार्कींग चार्जेसची आकारणी म्‍हणून दरमहा रु.12,000/- त्‍यांच्‍या सभासदांकडून वसूल करते. सोसायटी BDTA ला जमिनीच्‍या भाडयापोटी देत असलेल्‍या रकमेच्‍या 900 टक्‍के जास्‍त रक्‍कम पार्कींगचे चार्जेस म्‍हणून त्‍यांच्‍या सभासदांकडून वसूल करीत आहे.

3) तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला सोसायटीने BDTA बरोबर झालेल्‍या कराराच्‍या अटी शर्तीमध्‍ये बदल केला असून दरवर्षी रु.50,000/- जादा BDTA ला सोसायटीने देण्‍याचा करार केला आहे. सामनेवाला सोसायटीने करारात वरीलप्रमाणे केलेला बदल त्‍यांच्‍या सभासदांच्‍या संमतीशिवय व त्‍यांना कोणतीही माहिती होऊ न देता एकतर्फा केलेला आहे. सोसायटीने BDTA ला किती वर्षे रु.50,000/- देण्‍याचे कबूल केले आहे सुध्‍दा सभासदांना कळू दिले नाही. सदरची बाब सभासदांना सोसायटीच्‍या सन 2006-07 च्‍या अहवालावरुन निदर्शनास आली.

4) सामनेवाला सोसायटीने कराराच्‍या अटी शर्तीचे तंतोतत पालन करणे आवश्‍यक आहे. सभासदांकडून गैरवाजवी वाहनांच्‍या पार्कींग चार्जेसची आकारणी वसूल करुन सोसायटी नफेखोरी करीत आहे व ही बाब महाराष्‍ट्र को-ऑप. सोसायटीच्‍या 1960 च्‍या कलम 4 मध्‍ये नमूद केलेल्‍या उद्देश्‍यांच्‍या विरुध्‍द आहे. सभासदांच्‍या समंतीशिवाय BDTA ला दरवर्षी रु.50,000/- जादा देणे हा सोसायटी फंडाचा अपहार असून सदरची रक्‍कम सोसायटीच्‍या सेक्रटरी व कार्यकारणीचे सदस्‍य यांच्‍याकडून वसूल करणे आवश्‍यक आहे.

 5) दि.02/02/2007 व दि.16/10/2009 च्‍या पत्राने तक्रारदारांनी सोसायटीकडे अवाजवी पार्कींग चार्जेसची आकारणी व BDTAला देण्‍यात येत असणारी जादा रक्‍कम रु.50,000/- याबाबतीत तक्रार केली असता सोसायटीने काहीच प्रतिसाद दिलेला नाही. सोसायटीने त्‍यांच्‍या सभासदांना कागदपत्रांची तपासणी करण्‍याची परवानगी दिली नाही ही सामनेवाला सोसायटीच्‍या सेवेतील कमतरता आहे. वरील कारणास्‍तव तक्रारदारांनी सदरचा तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. सामनेवाला सोसायटी ना नफा ना तोटा या तत्‍वावर काम न करता सभासदांकडून पार्कींग चार्जेसच्‍या आकारणीपोटी अवास्‍तव जादा रक्‍कम वसूल करीत असून सहकारी तत्‍वांचे उल्‍लंघन करीत आहे असे जाहिर करावे अशी तक्रारदारांनी विनंती केलेली आहे. सामनेवाला सोसायटीने त्‍यांच्‍या सभासदांची कसलीही परवानगी न घेता व सभासदांना काहीच माहिती न देता एकतर्फा BDTA ला जादा रु.50,000/- देत आहे. ती रक्‍कम सोसायटीचे सेक्रटरी व सोसायटीच्‍या कार्यकारणी सदस्‍यांकडून वसूल करावी. सामनेवाला सोसायटी जमिनीच्‍या भाडेपट्याच्‍या जी रक्‍कम ट्रस्‍टला देते त्‍या प्रमाणात पार्कींग चार्जेसची आकारणी करावी असा सोसायटीला आदेश करावा अशी तक्रारदारांनी विनंती केलेली आहे.

6) सामनेवाला सोसायटीने सभासदांना योग्‍य ती सेवा न पुरवल्‍याबद्दल सोसायटीच्‍या सेक्रटरीवर दंडात्‍मक कार्यवाही करण्‍यात यावी व इतर योग्‍य ते न्‍यायाचे आदेश व्‍हावेत अशी तक्रारदारांनी विनंती केलेली आहे.

7) तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत सामनेवाला सोसायटीने BDTA बरोबर केलेल्‍या जानेवारी, 1969 ला भाडेपट्टी कराराची छायांकित प्रत, सोसायटीची दि.25/01/2009 ची पार्कींग आकारणी वाढविण्‍यासांबंधीची नोटीसीची छायांकित प्रत, सोसायटीच्‍या व्‍यवस्‍थापनाच्‍या सन 2006-07 च्‍या अहवालाची छायांकित प्रत इत्‍यादी कागदपत्रे तक्रार अर्जासोबत दाखल केलेली आहेत. तक्रारदारांनी तक्रार अर्जाच्‍या पृष्‍ठयर्थ आपले प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.


8) सामनेवाला यांनी कैफीयत दाखल करुन तक्रारदारांची मागणी अमान्‍य केली आहे. तक्रार अर्ज खोटा व चुकीचा असून तो रद्द होण्‍यास पात्र आहे असे सामनेवाला यांचे म्‍हणणे आहे. तक्रार अर्ज मुदतीत दाखल न केल्‍यामुळे तो रद्द होण्‍यास पात्र आहे. सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांच्‍या सोसायटीत एकूण 85 सभासद आहेत. तक्रारदारांशिवाय सोसायटीचे इतर सभासद एकमेकांशी सहकार्याने वागतात. तक्रारदारांना नेहमीच खोटया तक्रारी करण्‍याची सवय असून त्‍यांनी सोसायटी विरुध्‍द अनेक तक्रारी रजिस्‍ट्रार, को-ऑप सोसायटी तसेच वेगवेगळया कोर्टात केलेल्‍या होत्‍या. तक्रारदारांनी सोसायटीविरुध्‍द केलेल्‍या तक्रारीपैकी काही तक्रारी तकारदारांनी स्‍वतः माघारी घेतल्‍या व उर्वरित तक्रारी कोर्टानी नाकारलेल्‍या आहेत.


9) सभासदांकडून पार्कींग चार्जेसची आकारणी सामनेवाला अवाजवी दराने वसूल करतात हा तक्रारदारांनी केलेला आरोप बिनबुडाचा व खोटा आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्‍या निशाणी ‘B’ मध्‍ये स्‍पष्‍टपणे नमूद केलेले आहे की, पार्कीगच्‍या सवलतीचा गैरवापर थांबविण्‍यासाठी व्‍यवस्‍थापनाने पार्कींग आकारणी वाढीव दराने करण्‍याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच सोसायटीने देखभाल खर्चाची रक्‍कम कमी केल्‍याचे नमूद केलेले आहे. सामनेवाला सोसायटीने नफेखोरी न करता त्‍यांच्‍या सदस्‍यांना सोयी सवलती योग्‍य दराने पुरविण्‍याचा प्रयत्‍न केला पाहिजे परंतु सामनेवाला हे सहकारी तत्‍वाच्‍या विरुध्‍द कार्य करतात हा तक्रारदारांचा आरोप सामनेवाला यांनी नाकारलेला आहे. सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांनी तक्रार अर्जात केलली विधाने दिशाभूल करणारी आहेत. सोसायटीने BDTA ला जमिनीच्‍या भाडयापोटी रक्‍कम रु.13,500/- दरमहा देत असत. सन 1969 साली सामनेवाला यांच्‍या सभासदांकडे स्‍वतःच्‍या मालकीची वाहने नव्‍हती. सन 1996 साली सोसायटीने सोसायटीच्‍या इमारतीचा व आवाराचा गैरवापर थांबविण्‍यासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली. मूळ मालकांकडून जमीन वापरासाठी घेतली व त्‍यासाठी दरवर्षी सोसायटी त्‍या जमिनीचे भाडे मूळ मालकास देत असत. सुरक्षा रक्षकांसाठी दरवर्षी रु.3,90,000/- खर्च करावे लागतात तसेच क्‍लोझ सर्कीट कॅमेरे बसविण्‍यासाठी खर्च केलेला असून त्‍यांच्‍या देखभालीसाठी दरवर्षी रु.30,000/- खर्च करावा लागतो. सोसायटीला जादा दराने जमिनीचा महसूल कर भरावा लागतो. सभासदांच्‍या गाडया धुण्‍यासाठी लागणा-या पाण्‍यासाठी खर्च करावा लागतो. सोसायटी सर्वसाधारणपणे रु.5,00,000/- त्‍यांच्‍या सभासदांच्‍या सोयीसुविधांसाठी खर्च करीत असते व त्‍यासाठी पार्कींग चार्जेसची आकारणी म्‍हणून सोसायटीकडे रु.1,44,000/- फक्‍त जमा होते. या तक्रार अर्जामध्‍ये तक्रारदार सामनेवाला सोसायटीच्‍या दि.12/08/2006 च्‍या सर्वसाधारण सभेत पारित झालेल्‍या ठरावास या मंचासमोर आवाहन देऊ पाहतात. तक्रारदारांची या संबंधीची मागणी मुदतीत नाही. तक्रार अर्ज गैरसमजूतीवर आधारित असून तक्रार अर्जात केलेली विधाने खोटी असल्‍यामुळे तक्रार अर्ज खर्चासहित रद्द करण्‍यात यावा असे सामनेवाला यांचे म्‍हणणे आहे.

10) सामनेवाला सोसायटीने BDTA बरोबर झालेल्‍या करारात बदल केला हा आरोप सामनेवाला यांनी स्‍पष्‍टपणे नाकारलेला आहे. सोसायटीचा BDTA बरोबर झालेल्‍या कराराला या मंचासमोर आवाहन देता येणार नाही. तक्रार अर्जात नमूद केलेले दि.02/02/2007 व 16/10/2009 ची पत्रे सामनेवाला सोसायटीला मिळालेली नाहीत. तक्रारदार हे अडव्‍होकेट म्‍हणून व्‍यवसाय करतात व त्‍यांना सोसायटीविरुध्‍द खोटयानाटया तक्रारी करण्‍याची सवय आहे. तक्रारदारांना त्‍यांच्‍या वाहनाच्‍या पार्कींगची जागा बदलून पाहिजे. एप्रिल, 2008 पासून तक्रारदारांनी पार्कींग चार्जेस दिलेले नाहीत त्‍यामुळे तक्रारदारांचे नाव थकबाकीदार म्‍हणून नोटीस बोर्डावर लावण्‍यात आलेले आहे. थकबाकीची रक्‍कम वसूल केली जावू नये म्‍हणून तक्रारदार सामनेवाला यांच्‍या व्‍यवस्‍थापन कमिटी विरुध्‍द फौजदारी व दिवाणी केसेस दाखल करण्‍याची धमकी देत असतात. सामनेवाला सोसायटीने त्‍यांच्‍या सभासदांना सोसायटीची कागदपत्रे दाखविण्‍यासाठी कधीच हरकत घेतली नाही. सोसायटीने सभासदांच्‍या पत्रांना वेळोवेळी उत्‍तर पाठवून त्‍यांच्‍या अडीअडचणी दूर केलेल्‍या आहेत. तक्रारदार सामनेवाला सोसायटीच्‍या सभेस कधीच हजर राहिले नाहीत. तक्रारदार जेष्‍ठ नागरीक व अडव्‍होकेट असले तरी व्‍यवस्‍थापन कमिटीच्‍या सदस्‍यांबद्दल अपशब्‍द वापरत असतात. सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांच्‍या सेवेत कसलीही कमतरता नाही तसेच तक्रार अर्ज मुदतीत दाखल केला नसल्‍यामुळे तो खर्चासहित रद्द करण्‍यात यावा. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या कैफीयतीसोबत तक्रारदारांनी त्‍यांना दि.31/03/2010 रोजी पाठविलेल्‍या पत्राची छायांकित प्रत तसेच तक्रारदारांनी सामनेवाला यांच्‍या सेक्रटरींना दि.18/03/2010 राजी पाठविलेल्‍या पत्राची छायांकित प्रत दाखल केलेली आहे.


11) सामनेवाला यांनी या मंचास सदरचा तक्रार अर्ज चालविण्‍याचा अधिकार नाही असा अर्ज दि.19/04/2010 रोजी दाखल केलेला आहे. तक्रारदारांनी त्‍यास लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. तक्रारदारांनी प्रतिनिवेदन दाखल करुन सामनेवाला यांचे कैफीयतीमधील आरोप नाकारलेले आहेत. तक्रारदारांनी लेखी युक्तिवाद दाखल केला तसेच सामनेवाला यांनी लेखी युक्तिवाद दाखल केला. तक्रारदार स्‍वतः व सामनेवाला यांचे अडव्‍होकेट नितीन तरे यांचा तोंडी युक्तिवाद ऐकला.


12) निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात :-


मुद्दा क्रं. 1 तक्रारदार हे सामनेवाला यांच्‍या सेवेत कमतरता आहे हे सिध्‍द करतात काय? 

उत्तर नाही.
 
मुद्दा क्रं.2 तक्रारदारांना सामनेवाला यांच्‍या विरुध्‍द तक्रार अर्जात नमूद केल्‍याप्रमाणे दाद मागता येईल काय? 
उत्तर नाही.
 
कारण मिमांसा :- 
मुद्दा क्रं. 1 - तक्रारदारांनी सामनेवाला यांच्‍या विरुध्‍द केलेला पहिला आरोप म्‍हणजे सामनेवाला सोसायटीने ना नफा ना तोटा या सहकारी तत्‍वावर काम न करता त्‍यांच्‍या सोसायटीच्‍या सभासदांकडून दि.01/04/2009 पासून भरमसाठ वाढीव दराने म्‍हणजेच कारसाठी दरमहा रु.300/- व दुचाकी वाहनासाठी दरमहा रु.150/- पार्कींग चार्जेस वसूल करुन नफेखोरी केलेली आहे. सामनेवाला सोसायटीने अशा त-हने नफेखोरी करणे हे सहकारी तत्‍वाच्‍या विरुध्‍द आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला सोसायटीने The Bombay Diocesan Trust Association Private Ltd.यांच्‍याकडून 2900 यार्ड स्‍क्‍वेअर जमीन 98 वर्षाच्‍या भाडेपटृटयावर घेतली असून जमिनीच्‍या भाडयापोटी रक्‍कम रु.13,500/- सामनेवाला वर नमूद केलेल्‍या ट्रस्‍टला देत असतात. सोसायटी ट्रस्‍टला देता असलेले वार्षिक भाडे विचारात घेता सभासदांकडून सोसायटी पार्कींग चार्जेसपोटी वसूल करीत असलेली रक्‍कम 900 टक्‍के जादा आहे. सामनेवाला सोसायटी BDTA ला जमिनीच्‍या देत असलेल्‍या वार्षिक भाडयाच्‍या प्रमाणात पार्कींग चार्जेसची आकारणी पूर्वलक्षिपणे दि.01/04/2009 पासून करावी अशी विनंती केलेली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत सामनेवाला सोसायटीने BDTA बरोबर जागेसंबंधीच्‍या भाडेपट्टीच्‍या केलेल्‍या कराराची छायांकित प्रत दाखल केलेली आहे.
 
            सामनेवाला यांनी तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या भाडेपट्टीच्‍या प्रतीमध्‍ये नमूद करण्‍यात आलेल वार्षिक भाडे व इतर मजकूर मान्‍य केलेला आहे. तथापि, सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे जमिनीच्‍या वार्षिक भाडयाच्‍या प्रमाणात पार्कींग चार्जेसची आकारणी करावी ही तक्रारदारांची मागणी संयुक्तिक नसून ती चुकीची, दिशाभूल करणारी व बेकायदेशीर आहे. सामनेवाला यांच्‍या वकिलांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला सोसायटी त्‍यांच्‍या सभासदांना अनेक सुविधा पुरवत असतात. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत सामनेवाला सोसायटीची दि.25/01/2009 च्‍या नोटीसीची प्रत जोडली आहे. त्‍यामध्‍ये वाढीव दराने पार्कींग चार्जेसची आकारणी दि.01/04/2009 पासून केली जाईल असे नमूद केले असले तरी त्‍या नोटीसीमध्‍ये सामनेवाला सोसायटीने देखभालीच्‍या खर्चाची रक्‍कम 50 टक्‍क्‍यांनी कमी केलेली आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या इमारत व आवाराचा गैरवापर होवू नये म्‍हणून सुरक्षा रक्षक तैनात केले असून C.C.TV कॅमेरे बसविले. त्‍या कॅमे-याच्‍या देखभालीसाठी बरीचशी रक्‍कम सोसायटी खर्च करीत असते. वरील वाढीव खर्चाची तरतूद करण्‍यासाठी सोसायटीला पार्कींग चार्जेसमध्‍ये वाढ करणे भाग पडले.

                सोसायटीने वाढीव पार्कींग चार्जेस वाढविले असले तरी ते तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे ती भरमसाठ वाढ नाही व नफेखोरीच्‍या उद्देश्‍याने पार्कींग चार्जेसमध्‍ये वाढ केलेली नाही. पार्कींग चार्जेसमधील वाढ माफक स्‍वरुपाची असून अशी वाढ करण्‍यापूर्वी सामनेवाला सोसायटीने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्‍ये अशा त-हेचा ठराव मांडला व तो ठराव सोसायटीतील सभासदांनी बहुमताने मंजूर झालेला आहे. वरील ठरावाच्‍या विरुध्‍द तक्रारदारांनी सहकारी न्‍यायालयात दाद मागणे आवश्‍यक होते. सर्वसाधारण सभेत दि.12/08/2006 रोजी पारित झालेल्‍या ठरावाविरुध्‍द केलेले मागणी मुदतीत नाही.


                उपलब्‍ध कागदपत्रांवरुन असे दिसुन येते की, सामनेवाला सोसायटीने त्‍यांच्‍या सभासदांसाठी अनेक सोयीसुविधा पुरविल्‍या आहेत. सोसायटीच्‍या मालमत्‍तेचे संरक्षण करण्‍यासाठी सुरक्षा रक्षक तैनात केलेले असून C.C.TV कॅमेरे बसविलेले आहे. सोसायटीला वरील बाबींसाठी जादा खर्च करावा लागतो असे दिसते. वास्‍तविक सभासदांना कोणत्‍या सोयी पुरवायच्‍या व त्‍यासाठी किती कर आकारायचा हा सामनेवाला सोसायटीच्‍या अंतर्गत व्‍यवस्‍थापनाचा भाग आहे. सर्वसाधारणपणे सोसायटीच्‍या अंतर्गत व्‍यवस्‍थापनात ग्राहक मंचाने हस्‍तक्षेप करु नये. या कामी तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे BDTA ला जे वार्षिक भू-भाडे देते त्‍या प्रमाणात पार्कींग चार्जेसची आकारणी सामनेवाला सोसायटीने करावी ही तक्रारदारांची मागणी संयुक्तिक व रास्‍त वाटत नाही. पार्कींग चार्जेसमध्‍ये वाढ करण्‍यास सोसायटीच्‍या सर्वसाधारण सभेने मान्‍यता दिलेली आहे. सामनेवाला यांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे तक्रारदारांव्‍यतिरिक्‍त अन्‍य कोणत्‍याही सभासदांनी पार्कींग चार्जेसबद्दल तक्रार केलेली नाही. या प्रकरणातील वस्‍तुस्थितीचा साकल्‍याने विचार करता सामनेवाला सोसायटीने पार्कींग चार्जेसमध्‍ये काही प्रमाणात वाढ केली म्‍हणून ती सामनेवाला सोसायटीच्‍या सेवेतील कमतरता आहे किंवा सामनेवाला सोसायटीने अनुचित व्‍यापारी कृतीचा अवलंब केला असे म्‍हणता येणार नाही.
 

               तक्रारदारांनी तक्रार अर्जात सामनेवाला सोसायटीच्‍या विरोधात केलेला दूसरा महत्‍वाचा आरोप म्‍हणजेच सोसायटीचे सेक्रटरी व व्‍यवस्‍थापकीय मंडळाने सोसायटीच्‍या सभासदांना काहीच माहिती न देता BDTA बरोबर झालेल्‍या करारामध्‍ये अनावश्‍यक दुरूस्‍ती करुन BDTA ला दरवर्षी रु.50,000/- जादा देत आहेत. वर नमूद केल्‍याप्रमाणे जादा देण्‍यात येणारी रक्‍कम सामनेवाला सोसायटीचे सेक्रटरी व व्‍यवस्‍थापकीय मंडळाकडून वसूल करावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जात सामनेवाला सोसायटीने सभासदांना कसलीही माहिती न देता BDTA बरोबर झालेल्‍या करारातील अटी शर्तीमध्‍ये बदल करुन BDTA ला दरवर्षी रु.50,000/- देत आहेत असे म्‍हटले असले तरी प्रत्‍यक्ष सामनेवाला यांनी BDTA बरोबर झालेल्‍या करारात कधी दुरूस्‍ती केली याचा उल्‍लेख केलेला नाही. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे सामनेवाला सोसायटीच्‍या व्‍यवस्‍थापकीय मंडळाचा सन 2006-07 चा अहवाल ज्‍यावेळी पाहिला त्‍यावेळी वरील बाब त्‍यांच्‍या निदर्शनास आली. वास्‍तविक तक्रारदारांनी या बाबतची तक्रार सदरची बाब निदर्शनास आल्‍यानंतर 2 वर्षाच्‍या आत या मंचासमोर करणे आवश्‍यक होते परंतु तक्रारदारांनी सदरचा तक्रार अर्ज सामनेवाला यांच्‍या व्‍यवस्‍थापन मंडळाच्‍या दि.07/08/2007 च्‍या अहवालानंतर दि.24/02/2010 रोजी म्‍हणजेच 2 वर्षाच्‍या कालावधीनंतर दाखल केलेला आहे. वरील तक्रार दाखल करण्‍यासाठी 6 महिन्‍यांपेक्षा अधिक कालावधीचा विलंब लागला असून त्‍यासाठी विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला नाही.

               तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत सामनेवाला सोसायटीने BDTA बरोबर केलेल्‍या भाडेपटृटीच्‍या कराराची छायांकित प्रत दाखल केलेली आहे. परंतु सामनेवाला यांनी त्‍या करारातील कोणत्‍या अटी शर्तीमध्‍ये बदल केला हे तक्रारदारांनी या मंचाच्‍या निदर्शनास आणलेले नाही. सामनेवाला यांनी BDTA बरोबर भाडेपट्टीच्‍या करारातील अटी शर्तींमध्‍ये नंतर बदल केले हा आरोप तक्रारदारांना पुराव्‍यानिशी सिध्‍द करता आले नाही. तसेच, तक्रार अर्जात केलेले इतर आरोपसुध्‍दा तक्रारदारांना सामनेवाला यांच्‍या विरुध्‍द सिध्‍द करता आले नाही. वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदारांना सामनेवाला यांच्‍या सेवेत कमतरता आहे हे सिध्‍द करता आले नाही. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.


मुद्दा क्रं. 2 तक्रारदारांनी सामनेवाला यांच्‍या विरोधात केलेले आरोप पुराव्‍यानिशी सिध्‍द करता आले नाहीत. तसेच, सामनेवाला यांच्‍या सेवेतील कमतरता सिध्‍द करता आली नसल्‍यामुळे तक्रारदारांना तक्रार अर्जात मागितलेली दाद सामनेवाला यांच्‍याकडून मागता येणार नाही. त्‍यामुळेच मुद्दा क्रं. 2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.

                वर नमूद केलेल्या कारणास्तव तक्रार अर्ज रद्द करण्यात येवून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

आ दे श


1) तक्रार अर्ज क्रं.43/2010 रद्द करण्यात येतो.
 

2) खर्चाबद्दल आदेश नाही.
 
3) सदर आदेशाची प्रमाणित प्रत उभयपक्षकारांना देणेत यावी.

 

 
 
[HON'ABLE MR. SHRI.S.B.DHUMAL. HONORABLE]
PRESIDENT
 
[ Shri S.S. Patil , HONORABLE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.