::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 09/03/2015 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार यांचे गैरअर्जदार क्रं. 1 कडे बचत खाते क्रं. 1802 असा आहे. गैरअर्जदार क्रं. 2 चे पती यांनी गैरअर्जदार क्रं. 1 चा बॅंकेतून दि. 01/01/08 रोजी 30,000/- रु. चे कर्ज घेतलेले होते. त्यावेळेस अर्जदार हा सदर कर्जाचे जमानतदार होता. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी कर्ज देतांना रु. 6,000/- बचत ठेव म्हणून कापून रु. 24,000/- गैरअर्जदार क्रं. 2 चे पतीला दिले होते. त्यावेळी गैरअर्जदार क्रं. 1 आणि गैरअर्जदार क्रं. 2 चे पती मध्ये असे ठरले होते कि, गैरअर्जदार क्रं. 2 चे पती प्रत्येक महिण्यात रु. 500/- गैरअर्जदार क्रं. 1 कडे जमा करतील. गैरअर्जदार क्रं. 2 चे पती यांनी काही महिणे रु. 500/- जमा केल्यानंतर मरण पावले. गैरअर्जदार क्रं. 2 चे पतीचे नावावर चार खोल्यांचे पक्के मकान, आटा चक्की आहे त्यानुसार गैरअर्जदार क्रं. 2 ही मय्यतची पत्नी असून वारसदार आहे. याकरीता गैरअर्जदार क्रं. 2 हीले त्याच्या पतीने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची जीम्मेदारी त्याच्यावर आहे. दि. 13/3/13 रोजी गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदाराच्या खात्यातुन बेकायदेशिररित्या 15,000/- रु. कापलेले आहे. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी गैरअर्जदार क्रं. 2 कडून नियमानुसार कर्जाची रक्कम वसुल करावयास हवी होती सदर कृत्य गैरअर्जदार क्रं.1 चे बेकायदेशिर असून अर्जदाराने त्याच्या वकीलामार्फत दि. 16/4/13 मार्फत गैरअर्जदार क्रं. 1 ला नोटीस पाठविले. गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदाराच्या खात्यातुन बेकायदेशिर 15,000/- रु. काढले म्हणून सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आली.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदाराच्या खात्यामधेन काढलेलीरक्कम रु. 15,000/- वयाजासह अर्जदाराला देण्याचा आदेश व्हावे. तसेच अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदार क्रं. 1 व 2 कडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदार क्रं. 1 व 2 विरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं. 2 ला काढलेला नोटीस अस्विकृत केल्याने दिनांक 3/4/14 ला नि. क्रं. 1 वर गैरअर्जदार क्रं.2 चे विरुध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रं. 1 हजर होवून नि. क्रं. 08 वर आपले लेखीउत्त्र दाखल केले. गैरअर्जदार क्रं. 1 ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले गैरअर्जदार क्रं. 1 चे विरुध्द तक्रारीत लावलेले आरोप हे खोटे असून ते त्यांना नाकबुल आहे. गैरअर्जदार क्रं. 1 ने पुढे असे कथन केले आहे कि, अर्जदाराने बॅंकेच्या कर्ज विवरणेच्या अटी व शर्ती व नियम यांचे अधिनस्थ राहून नियमाप्रमाणे जमानतदाराने न भरलेली कर्जाची रक्कम बॅकेंकडे जमा करणे आवश्यक होते परंतु अर्जदाराने तसे केले नाही म्हणून त्यांना नियमाप्रमाणे लेखी नोटीस देवून त्याच्या खात्यातुन कर्जदाराने घेतलेली रक्कम त्याच्या खात्यातुन हळूहळू वसुल करणे चालु केले आहे. कर्जाचा पहिला हप्ता दि. 19/9/09 पासून कापण्यात आलेला आहेत. त्यापूर्वी दि. 19/7/09 रोजी शाखा प्रबंधक सही शिक्क्यासह नोटीस अर्जदाराला स्वतः बॅंकेत आलेले असतांना दि. 24/7/09 रोजी दिलेला आहे. व त्याची प्रत कर्जदाराला पोष्टाने पाठविलेली आहे. ज्याअर्थी 24/7/09 रोजी नोटीस मिळाल्यावर तसेच 19/9/09 रोजी पहिला हप्ता कर्जापोटी कापल्यानंतर सदर तक्रारीची मुदत सुरु होते. अर्जदाराने दि. 6/9/13 रोजी वि. मंचासमक्ष सदर तक्रार दाखल केली आहे त्याअर्थी ती मुदतबाहय आहे. अर्जदाराने लेटर ऑफ गॅरंटी प्रमाणे गैरअर्जदार क्रं.1 ला लेखी नोटीस बॅंकेला देवून कधीही कळविले नाही. सदर तक्रार खोटी स्वरुपाची असल्याने खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे अशी विनंती गैरअर्जदार क्रं. 1 ने केली आहे.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदार क्रं. 1 चे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार क्रं. 1 यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 चा ग्राहक आहे काय ? होय.
(2) सदर तक्रार कारण घडल्याने मुदतीत दाखल करण्यात आली आहे काय ? नाही.
(3) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदार यांचे गैरअर्जदार क्रं. 1 कडे बचत खाते क्रं. 1802 असा आहे. ही बाब अर्जदार व गैरअर्जदार क्रं. 1 ला मान्य असल्याने अर्जदार हा गैरअर्जदार क्रं. 1 चा ग्राहक होते असे सिध्द होत आहे म्हणून मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. गैरअर्जदार क्रं. 1 ने नि. क्रं. 9 वर दस्त क्रं. ब- 2 ची पडताळणी करतांना असे दिसले कि, दि. 19/9/09 रोजी वरील नमुद असलेल्या कर्जाची परतफेड करीता अर्जदाराचे बचत खात्यामधून 8,000/- रु. गैरअर्जदार क्रं. 1 ने काढले होते. व त्यानंतर दि. 23/12/11 ला रु. 1,000/-, दि. 23/11/12 ला रु. 1,000/-, दि. 13/12/12 ला रु. 1,000/-, दि. 11/02/13 ला रु. 2,000/-, दि. 12/3/13 ला रु. 2,000/- दि. 12/09/13 ला रु. 1,000/- असे एकूण रु. 16,000/- गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदाराच्या खात्यातुन वरील कर्जाचे जमानतदार असून काढण्यात आलेले होते. मंचाच्या मताप्रमाणे अर्जदाराला, अर्जदाराचे खात्यातुन सदर रक्कम काढण्याचा जर आक्षेप होता तर सदर तक्रार प्रथमच दाखल करण्याचे कारण दि. 19/09/09 ला घडले होते. ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 24 -अ नुसार सदर तक्रार कारण घडल्याचे 02 वर्षाचे आत दाखल करायला पाहिजे होती परंतु अर्जदाराने सदर तक्रार दि. 17/09/13 ला दाखल केलेली आहे. सदर तक्रार दाखल करतेवेळेस कोणताही विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला नाही किंवा तक्रार दाखल करते वेळी अर्जदाराला झालेल्या विलंबमाफी देण्यात आली नव्हती म्हणून सदर तक्रार मुदतीच्या बाहेर असल्याने मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
(2) दोन्ही पक्षांनी आापआपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 09/03/2015