::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- ०६/०४/२०१५ )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
१. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार यांनी गैरअर्जदार याच्याकडून मौजा – उमरी सर्व्हे नं. ७ प्लॉट क्र.०५ आराजी २६० चौ.मी. जागेचे क्षेञफळ २७९८ चौ. फु. २७ रु प्रति फुट याप्रमाणे प्लॉटची एकूण किंमत ७५५५६ /- रु. अर्जदाराला प्लॉटची विक्री करण्याचा सौदा केला. सदर सौदा दि. २०/०१/२००६ रोजी झाला. अर्जदाराने वेळोवेळी प्लॉटची मासीक किस्त प्रमाणे रु. ३०,०००/- गैरअर्जदार यांना दिले आहे. गैरअर्जदार यांनी विसारपञ झाल्यानंतर 24 महिण्यापर्यंत किंवा त्यापूर्वी प्लॉटची उर्वरित रक्कम घेवून प्लॉटची विक्री करुन देणे आवश्यक होते परंतु गैरअर्जदारांनी सदर प्लॉटची विक्री करुन देण्यास अर्जदाराला टाळमटाळ करीत राहीले. अर्जदाराने गैरअर्जदार यांना दि. २३/१०/२०१२ व २७/११/२०१२ रोजी लेखीपञ पाठवून प्लॉटची विक्री करुन देणे किंवा घेतलेली रक्कम परत करणे असे कळविले. परंतु गैरअर्जदाराने त्या पञांवर काहीही दखल घेतली नाही. सबब अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
२. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदारा यांनी घेतलेले पैसे ३०,०००/- रु. दि. १०/०१/२००८ पासून १८ टक्के व्याजासह गैरअर्जदाराने अर्जदाराला देण्याचे आदेश दयावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
३. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्रं.११ दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार ने अर्जदारासोबत कोणताही प्लॉट विक्रीचा करार केला नाही व रक्कम स्विकारली नाही. अर्जदाराची सदर तक्रार मदत ही मुदतबाहय आसल्याने खारीज पात्र आहे. अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असून गैरअर्जदार ला नाकबुल आहे. गैरअर्जदारने अशी मागणी केली आहे कि, सदर तक्रार खर्चासह खारीज करावी.
४. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
१) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
२) सदर तक्रार मुदतीत दाखल आहे काय ? नाही.
३) आदेश काय ? अंतीम आदेशा प्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. १ बाबत ः-
४. अर्जदार यांनी गैरअर्जदार याच्याकडून मौजा – उमरी सर्व्हे नं. ७ प्लॉट क्र.०५ आराजी २६० चौ.मी. जागेचे क्षेञफळ २७९८ चौ. फु. २७ रु प्रति फुट याप्रमाणे प्लॉटची एकूण किंमत ७५५५६/- रु. अर्जदाराला प्लॉटची विक्री करण्याचा सौदा केला. सदर सौदा दि. २०/०१/२००६ रोजी झाला. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि. क्रं. ५ वर दस्त क्रं. अ- १ वरुन सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. १ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. २ बाबत ः-
५. अर्जदार यांनी गैरअर्जदार याच्याकडून मौजा – उमरी सर्व्हे नं. ७ प्लॉट क्र.०५ आराजी २६० चौ.मी. जागेचे क्षेञफळ २७९८ चौ. फु. २७ रु प्रति फुट याप्रमाणे प्लॉटची एकूण किंमत ७५५५६/- रु. अर्जदाराला प्लॉटची विक्री करण्याचा सौदा केला. सदर सौदा दि. २०/०१/२००६ रोजी झाला. अर्जदाराने वेळोवेळी प्लॉटची मासीक किस्त प्रमाणे रु. ३०,०००/- गैरअर्जदार यांना दिले आहे. गैरअर्जदार यांनी विसारपञ झाल्यानंतर 24 महिण्यापर्यंत किंवा त्यापूर्वी प्लॉटची उर्वरित रक्कम घेवून प्लॉटची विक्री करुन देणे आवश्यक होते परंतु गैरअर्जदारांनी सदर प्लॉटची विक्री करुन देण्यास अर्जदाराला टाळमटाळ करीत राहीले.परंतु गैरअर्जदार हे सदर प्लॉटची विक्री करुन देण्यास अर्जदाराला टाळमटाळ करीत राहीले. व अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदारा यांनी घेतलेले पैसे ३०,०००/- रु. दि. २४/०८/२००७ पासून १८ टक्के व्याजासह गैरअर्जदाराने अर्जदाराला देण्याचे आदेश दयावे . यावरुन असे निष्पन्न होते कि, सदर तक्रार दाखल करण्याचे कारण दि. २४/०८/२००७ रोजी घडले. अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दि. ०२/०९/२०१३ रोजी दाखल केलेली आहे. सदर तक्रार कलम २४ अ (१) ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ मधील नमुद असलेल्या मुदतीचे बाहेर असल्यामुळे मुद्दा क्रं. २ चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. ३ बाबत ः-
६. मुद्दा क्रं. १ ते २ च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
१) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
२) उभयपक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
३) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - ०६/०४/२०१५