Maharashtra

Solapur

CC/10/574

Chitralekha Dattatrya Kanade - Complainant(s)

Versus

Udyaraj Damodar Bhosale Patil - Opp.Party(s)

P.P.Kulkarni

11 Feb 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/10/574
1. Chitralekha Dattatrya KanadeBl.No.15 Rote Apt.Kumarchouk,Wadiya Hospital Near,solapursolapurmaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Udyaraj Damodar Bhosale PatilH.S.A. Advancery Solustion ltd,Gurucharan Sankul,165 D,R.line,7Rasta,SolapurSolapurmaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar ,MEMBERHONABLE MRS. Sanjeevani S. Shah ,MEMBER
PRESENT :

Dated : 11 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

        

                                                                 तक्रार दाखल दिनांक : 01/10/2010.     

                                                                तक्रार आदेश दिनांक : 11/02/2011.   

ग्राहक तक्रार क्रमांक : 574/2010.

 

श्रीमती चित्रलेखा दत्‍तात्रय कानडे, वय 58 वर्षे,

व्‍यवसाय : घरकाम, रा. ब्‍लॉक नं.15, रोटे अपार्टमेंट,

कुमार चौक, वाडिया हॉस्पिटलजवळ, सोलापूर.                       तक्रारदार

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 575/2010.

 

कु. प्रेरणा सिध्‍दय्या मठपती, वय 24 वर्षे,

व्‍यवसाय : नोकरी, रा. ब्‍लॉक नं.15, रोटे अपार्टमेंट,

कुमार चौक, वाडिया हॉस्पिटलजवळ, सोलापूर.                       तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

श्री. उदयराज दामोदर भोसले-पाटील, वय 44 वर्षे,

व्‍यवसाय : व्‍यापार, रा. एस.एस.ए. अडव्‍हायझरी सोल्‍युशन लि.,

कार्पोरेट ऑफीस : गुरुशरण संकूल, दुसरा मजला,

165/ड, रेल्‍वे लाईन्‍स, सात रस्‍ता, सोलापूर.                         विरुध्‍द पक्ष

 

       गणपुर्ती  :-   सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                      सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्‍य

                  सौ. संजीवनी एस. शहा, सदस्‍य

 

 

          तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्‍ता :  पी.पी. कुलकर्णी

          विरुध्‍द पक्ष गैरहजर / एकतर्फा

 

आदेश

 

सौ. संगिता एस. धायगुडे, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.     प्रस्‍तुत दोन्‍ही तक्रारींचे स्‍वरुप, विषय, विरुध्‍द पक्ष इ. मध्‍ये साम्‍य असल्‍यामुळे त्‍यांचा निर्णय एकत्रितरित्‍या देण्‍यात येत आहे.

 

2.    तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, विरुध्‍द पक्ष यांनी युनिव्‍हर्सल मेडिएटर्स फर्मद्वारे जनतेकडून मुदत ठेवी स्‍वीकारुन दरमहा आकर्षक व्‍याज देणार असल्‍याचे सांगितल्‍यामुळे तक्रारदार यांनी खालीलप्रमाणे नमूद रक्‍कम विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे गुंतवणूक केलेली आहे.

ग्राहक तक्रार क्रमांक

गुंतवणूक रक्‍कम

गुंतवणुकीचा दिनांक

गुंतवणुकीचा कालावधी

दरमहा प्राप्‍त होणारी रक्‍कम

574/2010

रु.2,00,000/-

22/8/2008

तीन वर्षे

रु.8,000/-

575/2010

रु.1,50,000/-

11/10/2008

तीन वर्षे

रु.5,800/-

 

3.    करारपत्राप्रमाणे तक्रारदार यांना अनुक्रमे 10 व 12 धनादेशाची रक्‍कम प्राप्‍त झाली. परंतु त्‍यानंतर एच.डी.एफ.सी. बँकचे व्‍यवहार बंद केल्‍याचे कारण देऊन विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना सोलापूर सिध्‍देश्‍वर सहकारी बँकेचे धनादेश दिले. सदर धनादेश बँकेतील त्‍यांच्‍या खात्‍यावर जमा केले असता ते न वटता परत आले आणि त्‍यांना रक्‍कम प्राप्‍त होऊ शकली नाही. तक्रारदार यांनी करार संपुष्‍टात आणण्‍यासाठी विरुध्‍द पक्ष यांना पत्र दिले आणि गुंतवणूक केलेली रक्‍कम परत मागणी केली असता, विरुध्‍द पक्ष यांनी रक्‍कम परत करण्‍यास नकार दिला. शिक्षण व कौटुंबिक वापरासाठी सदर रकमेची त्‍यांना निकड आहे. विरुध्‍द पक्ष यांनी रक्‍कम न देऊन सेवेमध्‍ये त्रुटी केलेली आहे. शेवटी तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रारींद्वारे विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे गुंतवणूक केलेली रक्‍कम व्‍याजासह मिळावी आणि मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी अनुक्रमे व प्रत्‍येकी रु.20,000/- व रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.

 

4.    विरुध्‍द पक्ष यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी झालेली आहे. त्‍यांना उचित संधी देऊनही त्‍यांनी मंचासमोर हजर होऊन म्‍हणणे दाखल केलेले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्‍यात आले.

 

5.    तक्रारदार यांची तक्रार व त्‍यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच त्‍यांचा युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                            उत्‍तर

 

1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्‍त सेवा

     दिली आहे काय ?                                                                          होय.

2. तक्रारदार विमा रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?            होय.

3. काय आदेश ?                                    शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

निष्‍कर्ष

 

6.    मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारीमध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदार व विरुध्‍द पक्ष यांच्‍यामध्‍ये रक्‍कम गुंतवणूक करणे व त्‍यावर प्रतिमहा मासिक मोबदला स्‍वरुपात तीन वर्षे रक्‍कम देण्‍याविषयी झालेला करार रेकॉर्डवर दाखल आहे. तक्रारदार यांना अनुक्रमे 10 व 12 धनादेशाची रक्‍कम प्राप्‍त झाली, परंतु त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी दिलेले धनादेश न वटता परत आले आणि त्‍यांना रक्‍कम प्राप्‍त होऊ शकली नाही, अशी त्‍यांची प्रमुख तक्रार आहे.

7.    तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे रक्‍कम गुंतवणूक करुन वित्‍तीय सेवा घेतलेली आहे. कराराप्रमाणे तक्रारदार यांना मोबदला हप्‍ते देणे विरुध्‍द पक्ष यांच्‍यावर बंधनकारक होते व आहे. परंतु कराराप्रमाणे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना रक्‍कम देण्‍यामध्‍ये खंड पाडला आहे. त्‍यानंतर तक्रारदार यांनी गुंतवणूक रकमेची वेळोवेळी मागणी करुनही त्‍यांना रक्‍कम परत करण्‍यात आलेली नाही. विरुध्‍द पक्ष यांची करारात्‍मक जबाबदारी व कर्तव्‍य स्‍वीकारलेले असतानाही त्‍यांनी गुंतवणूक रकमेचे मोबदला हप्‍ते परत न करुन सेवेमध्‍ये त्रुटी केल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.

 

8.    विरुध्‍द पक्ष यांनी मंचाच्‍या नोटीसला उत्‍तर दिलेले नसल्‍यामुळे तक्रारदार यांची तक्रार त्‍यांना मान्‍य आहे, या अनुमानास आम्‍ही आलो आहोत. शेवटी तक्रारदार हे गुंतवणूक केलेली रक्‍कम देय मोबदला हप्‍ते खंड पडल्‍यापासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने मिळविण्‍यास पात्र आहेत, या मतास आम्‍ही आलो आहोत.

 

9.    शेवटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

 

आदेश

 

      1. ग्राहक तक्रार क्र.574/2010 विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.2,00,000/- (रुपये दोन लक्ष फक्‍त) दि.1 ऑगस्‍ट, 2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

      2. ग्राहक तक्रार क्र.575/2010 विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.1,50,000/- (रुपये एक लक्ष पन्‍नास हजार फक्‍त) दि.1 नोव्‍हेंबर, 2009 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी.

      3. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी प्रत्‍येकी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत.

      4. विरुध्‍द पक्ष यांनी नमूद मुदतीच्‍या आत उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी न केल्‍यास तेथून पुढे देय रक्‍कम द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याज दराने द्यावी.

 

 

(सौ. संगिता एस. धायगुडे÷)

अध्‍यक्ष

(सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार)                       ( सौ. संजीवनी एस. शहा)

          सदस्‍य                                    सदस्‍य

  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                    ----00----

(संविक/स्‍व/5211)

 


[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER