जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/66. प्रकरण दाखल तारीख - 18/03/2009 प्रकरण निकाल तारीख – 19/12/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या सौरभ पि. बळवंत आमृते वय, 14 वर्षे, धंदा शिक्षण, अज्ञानपालन कर्ते वडील, बळवंतराव कीशनराव आमृते रा. जिजाऊ नगर ता.हदगांव जि. नांदेड अर्जदार विरुध्द. श्री.उदय लक्ष्मीकांत गंधेवार रा. नॅशनल क्लब, गंधेवार इलेक्ट्रानिक्स गैरअर्जदार हदगांव ता. हदगांव जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.बालाजी सिरफूले गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एस.ऐ.नेवरकर. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या ) गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदारांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी दि.12.10.2005 रोजी गैरअर्जदार क्र.1 कडून रु.10500/- किंमतीचा एक रेफरीजरेटर विकत घेतला होता त्यावेळेस त्यांनी त्यांची वॉरंटी दिली होती. काही दिवसानंतर रेफरीजरेटर बीघाड झाल्यामूळे त्यांचेकडे तक्रार केली.गैरअर्जदारांनी दि.26.7.2008 रोजी त्यांचा मॅकेनिक पाठविला त्यांनी गेलेल्या पार्टससाठी रु.1300/- ची मागणी केली. अर्जदाराने सदर दूरुस्ती ही वांरटी असल्यामूळे ती करावी अशी मागणी केली परंतू गैरअर्जदार यांनी तसे करण्यास नकार दिला. अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदार यांनी त्यांना गोदरेज कंपनीचाच रेफरीजरेटर म्हणून साधा रेफरीजरेटर दिला व किंमत माञ मूळ गोदरेज कंपनीच्या रेफरीजरेटरची घेतली. त्यावेळेस अर्जदारास मूळ पावती न देता डिलेव्हरी चालनवरच बिल दिले तसेच सदरील बिलावर अनूक्रमांक लिहीला नाही. अर्जदार यांचे हदगांव येथे हॉटेल आहे त्यामध्ये थंड वस्तू ठेवण्यासाठी रेफरीजरेटरची खूप आवश्यकता पडते. त्यामूळे सहा महिन्यापासून रेफरीजरेटर नादूरुस्त असल्यामूळे अर्जदाराचे दरमहा रु.6000/- प्रमाणे आर्थीक नूकसान झाले असे एकूण रु.36000/-चे नूकसान झाले. वारंवार विनंती करुनही गैरअर्जदाराने अर्जदाराचा रेफरीजरेटर दूरुस्त करुन दिला किंवा बदलूनही दिला नाही. असे करुन त्यांनी सेवेत ञूटी केली आहे. गैरअर्जदारास दि.9.1.2009 रोजी वकिलामार्फत रजिस्ट्रर पोस्टाने नोटीस पाठविली परंतु त्यांस कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणून ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची मागणी आहे की, डूप्लीकेट रेफरीजरेटर दिल्यामूळे अर्जदारास रु.51,500/- इतकी नूकसान भरपाई गैरअर्जदाराकडून मिळावी. गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. हे मान्य आहे की, अर्जदाराने गोदरेज कंपनीचा रेफरीजरेटर खरेदी केला होता. अर्जदारास पाच वर्षाची वॉरंटी दिली नव्हती. अर्जदाराची तक्रार आल्याबरोबर कंपनीस कळविल्यानंतर कंपनीचा मॅकेनिक दि.26.7.2008 रोजी आला त्यांने वॉरंटीच्या नियमाप्रमाणे अर्जदारास दूरुस्ती बाबत शूक्ल आकारला होता. त्यामध्ये गैरअर्जदार यांचा कोणताही सहभाग नाही. हे म्हणणे खरे नाही की, गैरअर्जदाराने वॉरंटीमध्ये दर्शविल्याप्रमाणे दूरुस्त करुन देण्यास नकार दिला. हे म्हणणे खरे नाही की, गैरअर्जदाराने अर्जदारास गोदरेज कंपनीचा रेफरीजरेटर न देता साधा रेफरीजरेटर दिला.हे म्हणणे मान्य नाही की, अर्जदाराचे कोणतेही हॉटेल आहे. त्यामूळे दर्शवलेली रु.36000/- ची नूकसान भरपाई त्यांना मान्य नाही. अर्जदाराने केवळ खोडसाळ पध्दतीने बिनबूडाचे आरोप करुन केवळ मानसिक ञास देण्याच्या उददेशाने ही तक्रार दाखल केलेली आहे. सदर तक्रारीमध्ये अर्जदाराने रेफरीजरेटरचा नेमका कोणता पार्ट खराब झाला आहे व त्या बाबत किती कालावधीची वॉरंटी आहे हे अर्जामध्येच दिसून येत नाही. गैरअर्जदारांनी अर्जदारास गोदरेज कंपनीचा नवीन रेफरीजरेटर रु.10500/- किंमत घेऊन दिलेला आहे. खरे तर अर्जदारांनी सदरील रेफरीजरेटर 33 महिने विना तक्रार वापरला. त्यामूळे अर्जदाराने केलेली तक्रार ही तथ्यहीन आहे त्यामूळे त्यांचे रु.51500/- चे कोणतेही नूकसान झालेले नाही. अर्जदाराने वकिलामार्फत पाठविलेली नोटीसचे उत्तर गैरअर्जदाराने अर्जदारास पाठविलेले आहे परंतु सदरील उत्तर अर्जदाराने स्विकारलेले नाही. त्यामूळे अर्जदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.2 यांना या मंचाचेकामी आवश्यक पक्षकार केल्यानंतर अर्जदार यांना अनेकदा संधी देऊनही गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस तामील करणे बाबत अर्जदार यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. त्यामूळे दि.25.09.2009 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्द सदरचे प्रकरण बंद करण्यात आलेले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच लेखी यूक्तीवाद दाखल केलेले आहे. अर्जदांरानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार गैरअर्जदारांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून रेफरीजरेटर घेतला आहे. रेफरीजरेटरची घेतल्या बाबतचे डिलेव्हरी चालन,पोलीस स्टेशन हदगांव यांना तक्रार केल्याची प्रत,कायदेशीर नोटीस इत्यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. तसेच गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी जवाबामध्ये अर्जदार त्यांचे ग्राहक आहेत ही बाब नाकारलेली नाही. यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मते आहे. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून दि.12.10.2005 रोजी गोदरेज कंपनीचा रेफरीजरेटर खरेदी केलेला आहे. अर्जदार यांनी त्यांच्या अर्जामध्ये गैरअर्जदार यांचेकडे गोदरेज कंपनीचा रेफरीजरेटर घेण्यासाठी गेले असता गैरअर्जदार यांनी अर्जदारास गोदरेज कंपनीचा रेफरीजरेटर म्हणून साधा रेफरीजरेटर दिला, अर्जदार यांना डूप्लीकेट रेफरीजरेटर दिला परंतु गोदरेज कंपनीच्या रेफरीजरेटर ची किंमत घेतली असे नमूद केलेले आहे. अर्जदाराने त्यांच्या तक्रार अर्जामध्ये वास्तविक रेफरीजरेटर मध्ये कोणत्या पार्टमध्ये यांञिक बिघाड होता हे कूठेही नमूद केलेले नाही. अर्जदार यांना दिलेला रेफरीजरेटर हा डूप्लीकेट होता हे दर्शविणारा कोणताही कागदोपञी पूरावा अर्जदार यांनी या अर्जासोबत या कामी दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी सदर रेफरीजरेटर चे वॉरंटी कार्ड या अर्जाचे कामी दाखल केलेले नाही. अर्जदार यांचा रेफरीजरेटर नादूरुस्त होता अगर रेफरीजरेटर मध्ये काही यांञिक बिघाड होता अगर अर्जदार यांचा रेफरीजरेटर डूप्लीकेट होता हे दर्शविणारा पूरावा म्हणजेच रेफरीजरेटर संदर्भातील तज्ञ व्यक्तीचा अहवाल, शपथपञ अर्जदार यांनी या अर्जाचे कामी दाखल केलेले नाही. अर्जदार यांनी सदर रेफरीजरेटर मध्ये दूरुस्ती केले बाबत जॉब कार्ड, अगर मेकेनिकचे शपथपञ या अर्जाचे कामी या अर्जासोबत दाखल केलेले नाही. अर्जदार यांनी दि.12.10.2005 रोजी रेफरीजरेटर खरेदी केलेला आहे व नादूरुस्त झाले बाबतची तक्रार दि.28.10.2008 रोजी पोलिस स्टेशनला दिलेली आहे. अर्जदार यांचा अर्ज,शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ तसेच गैरअर्जदार क्र.1 यांचे लेखी म्हणणे, शपथपञ यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी गोदरेज कंपनीच्या मूळ उत्पादक कंपनीला पार्टी करणेसाठी या मंचामध्ये अर्ज दिलेला होता. सदरचा अर्ज मंजूर होऊन मूळ गोदरेज उत्पादक कंपनीला या अर्जाचे कामी पक्षकार म्हणून सामीलही केलेले होते. परंतु अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांना नोटीस तामील करण्याचे दृष्टीने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. वास्तविक सदर अर्जाचे कामी गैरअर्जदार क्र.2 मूळ उत्पादक कंपनी हजर असणे आवश्यक व गरजेचे असे होते. परंतु अर्जदार यांनी त्या बाबत कोणतीही पूर्तता केली नसल्याचे दाखल कागदपञावरुन स्पष्ट होत आहे. अर्जदार व त्यांचे वकील हे यूक्तीवादाचे वेळी गैरहजर राहीलेले आहेत. अर्जदार यांचा अर्ज, शपथपञ व त्यांनी दाखल केलेले कागदपञ. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांचा लेखी जवाब,शपथपञ, लेखी यूक्तीवाद यांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार खारीज करण्यात येतो. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर अध्यक्ष सदस्या जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |