(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 07/02/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 07.09.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याचे गैरअर्जदार बँकेत खाते क्र. 19280110000977 असुन सदर खात्याचा धनादेश क्र.890693 दि.01.07.2010 रोजी रु.4,000/- श्री. कन्हैया लालवानी यांचे नावे दिला. सदर धनादेश दि.02.07.2010 रोजी बँकेत वटविण्यासाठी आला तेव्हा तक्रारकर्त्याचे खात्यात रु.8,535.50 पैसे एवढी रक्कम असतांना तो अपर्याप्त निधी म्हणून अनादरीत करण्यांत आला, त्यामुळे तक्रारकर्त्यास रु.125/- धनादेश परतावा शुल्क आकारण्यांत आले व रु.2/- धनादेश परतावा व्याज म्हणून आकारण्यांत आले. याबाबत तक्रारकर्त्याने दि.02.08.2010 रोजी गैरअर्जदारांना नोटीस पाठविली सदर नोटीसला गैरअर्जदाराने उत्तर देतांना असे म्हटले आहे की, आलेला धनादेश हा 2 वाजता परत करतात आणि रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे समाशोधनाची जमा दुपारी 3 ते 3.30 च्या दरम्यान करतो. तक्रारकर्त्यानुसार गैरअर्जदाराच्या या कथनाला काहीही आधार नाही. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी दिलेली आहे, त्यामुळे धनादेश परतावा शुल्क व त्यावरील व्याज रु.127/- व मानसिक त्रासाबद्दल रु.50,000/-, प्रतिष्ठेच्या नुकसानाबद्दल रु.50,000/- आणि तक्रारीच्या खर्चाकरीता रु.5,000/- ची मागणी केलेली आहे. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला बजावण्यांत आली असता गैरअर्जदाराने सदर तक्रारीला आपल्या परिच्छेद निहाय उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याचा धनादेश हा दि.02.07.2010 रोजी दुपारी 2 वाजताचे आत वटविण्याकरता आलेला होता. त्यावेळी तक्रारकर्त्याचे खात्यात पूरेसा निधी नव्हता व रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे तो धनादेश दुपारी 3 ते 3.30 वाजताचे आधी रिझर्व बँकेला परत केला, त्यामुळे त्याची सेवेत कोणतीही त्रुटी नाही. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याचे खात्यात रु.5,000/- दि.02.07.2010 रोजी संध्याकाळी 6.04.31 सेकंदाला जमा झाले, त्यामुळे जेव्हा तक्रारकर्त्याचा धनादेश वटविण्याकरीता आला तेव्हा खात्यात पुरेसा निधी नव्हता, म्हणून त्याची सेवेत कोणतीही त्रुटी नाही. करीता सदर तक्रार खारिज करण्यांची मंचास विनंती केलेली आहे. 4. सदर तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.27.01.2011 रोजी आली असता मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीला मार्फत ऐकला. तसेच तक्रारीत दाखल दस्तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. तक्रारकर्त्याचे गैरअर्जदारांकडे खाते क्र.19280110000977 होता ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज व उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदार बँकेचा सेवाधारक ठरत असल्यामुळे ग्राहक या संज्ञेत येतो असे मंचाचे मत आहे. 7. तक्रारकर्त्याने दि.01.07.2010 रोजी धनादेश क्र.890693, रु.4,000/- चा श्री. कन्हैया लालवानी यांच्या नावे दिला होता असे नमुद केले आहे व सदर बाब ही गैरअर्जदाराने सुध्दा मान्य केली आहे. कारण गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तसा धनादेश वटवण्याकरता त्यांचेकडे आला होता. 8. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, खात्यामध्ये पर्याप्त रक्कम असतांना सुध्दा सदर धनादेश अनादरीत करण्यांत आला, ही बाब सिध्द करण्या करता तक्रारकर्त्याने दस्तावेज क्र.1 दाखल केलेला आहे. सदर दस्तावेजाचे अवलोकन केले असता दि.02.07.2010 ला तक्रारकर्त्याचे खात्यामध्ये रु.8,535.50 पैसे दर्शविलेले आहे व त्यानंतरच्या नोंदीमधे दि.02.07.2010 लाच धनादेश चार्जेस म्हणून रु.125/- व धनादेश पाठवण्यावर व्याज रु.2/- दर्शविलेले आहे. म्हणजेच धनादेश अनादरीत झाला त्यापूर्वी तक्रारकर्त्याचे खात्यात रु.8,535.50 होते ही बाब स्पष्ट होते. याउलट गैरअर्जदाराने असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याचे खात्यामधे रु.5,000/- संध्याकाळी 6.04.31 सेकंदानी जमा झाले व त्याकरीता त्याने खाते विवरणाची (Internet) आंतरजालची प्रत जोडली आहे. तसेच गैरअर्जदाराने आपल्या बचावात्मक मुद्दा घेतला आहे की, धनादेश वटविण्याकरता दुपारी 2 वाजता आला होता व त्यावेळी तक्रारकर्त्याचे खात्यात धनादेश वटविण्याकरता पर्याप्त रक्कम नव्हती. परंतु बँक बंद होण्याचे वेळ ही 5 वाजताची असतांनाही संध्याकाळी 6.04.31 वाजता रु.5,000/- कसे काय तक्रारकर्त्याचे खात्यात जमा झाले याबाबत कोणतेही स्पष्ट विवरण अथवा कथन केलेले नाही. या उलट तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.1 नुसार ही बाब स्पष्ट होते की, धनादेश अनादरीत होण्यापूर्वीच तक्रारकर्त्याचे खात्यात पर्याप्त रक्कम होती. अश्या परिस्थितीत तक्रारकर्त्याचा धनादेश अनादरीत करणे ही गैरअर्जदारांचे सेवेतील त्रुटी आहे व त्याकरीता तक्रारकर्त्यास आकारण्यांत आलेले धनादेश परतावा शुल्क रु.125/- त्यावरील व्याज रु.2/- असे एकूण रु.127/- तक्रारकर्ता मिळण्यांस पात्र ठरतो. 9. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीमध्ये मानसिक त्रासाबद्दल रु.50,000/-, प्रतिष्ठेच्या नुकसानाबद्दल रु.50,000/- ची मागणी केलेली आहे. सदर दोन्ही मागण्या अवास्तव वाटत असल्यामुळे तक्रारकर्ता हा रु.5,000/- मिळण्यांस पात्र ठरतो. तसेच तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की त्यांनी तक्रारकर्त्यास धनादेश परतावा शुल्क व व्यावरील व्याजाचे रु.127/- आदेश पारित झाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत अदा करावे. 3. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास. मानसिक त्रास व प्रतिष्ठेच्या क्षतीपूर्तीपोटी रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.2,000/- अदा करावे. 4. गैरअर्जदाराने वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |