Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/10/77

Anjuman-e-Tanzimul Musaleem - Complainant(s)

Versus

UCO Bank - Opp.Party(s)

Wavikar

24 Apr 2017

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT
ADMINISTRATIVE BLDG, NEAR DR.BABASAHEB AMBEDKAR GARDEN , BANDRA (E), MUMBAI-400051
 
Complaint Case No. CC/10/77
 
1. Anjuman-e-Tanzimul Musaleem
Gausulwara Jama Masjid, Mapkhan Nagar, Marol, Andheri-W, Mumbai-59.
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. UCO Bank
Marol Maroshi Road, Next to Marol Fire Brigade Station, Andheri-East, Mumbai-59.
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.Y.MANKAR PRESIDENT
 HON'ABLE MR. S.R.SANAP MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 24 Apr 2017
Final Order / Judgement

       तक्रारदार ट्रस्‍टचे प्रतिनीधी -  श्री.मोहम्‍मद अन्‍वर.  

            सामनेवाले तर्फे वकील- श्री. डि. एस.जोशी

                 (युक्‍तीवादाच्‍या वेळेस)

आदेश - मा. शां. रा. सानप, सदस्‍य.         ठिकाणः बांद्रा (पू.)

निकालपत्र

(दिनांक 24/04/2017 रोजी घोषित)

1.   सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिल्‍याचा आरोप करून तक्रारदाराने प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.

2.    तक्रारदारांची तक्रार थेाडक्‍यात खालीलप्रमाणे आहे.

3.   प्रस्‍तुतची  तक्रार, तक्रारदारानी ग्रा.सं.कायदा 1986 कलम 12 (a),  2 (1) (g ) व  2 (1) (r) अन्‍वये मंचात दाखल केली आहे.

4.   प्रस्‍तुतच्‍या तक्रारीतील सामनेवाले  हे भारत सरकारचा सार्वजनिक उपक्रम, अंगीकृत व्‍यवसाय करणारी युको बँक आहे तर तक्रारदार ही नोंदणीकृत ट्रस्‍ट आहे. तक्रारदार व सामनेवाले हे तक्रारीतील पत्‍यावर स्थित असून सेवा व व्‍यवसाय करतात.

5.  तक्रारदारांच्‍या तक्रारीत असे कथन आहे की, तक्रारदार ही चॉरीटेबल रजिष्ट्रर ट्रस्‍ट असून, सांस्‍कृतीक, धार्मीक व शैक्षणीक कार्य करतात. सामनेवाले यांनी तक्रारदाराना अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करून सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली आहे.

6.  तक्रारदारांचे तक्रारीत पुढे असेही कथन आहे की,  त्‍यांचे सामनेवाले बँकेमध्‍ये बचत खाते आहे. दि. 28/05/2009 रोजी सामनेवाले यांनी तक्रारदाराना कळविले की, श्री. राजु आर. पिल्‍लई यांनी क्रॉस धनादेश क्र. 487077 या द्वारे, रक्‍कम रू. 15,85,000/-,हा धनादेश  आय.सी.आय.सी.आय बँक सी.जी.रोड, चेंम्‍बुर, मुंबई येथील त्‍यांच्‍या खात्‍यात जमा करून, तो आय.सी.आय.सी. आय बँकेने क्लिअरन्‍ससाठी पाठवून, सदर  धनादेश सामनेवाले यांनी क्लिअर केला आहे. तसेच, सामनेवाले यांनी पुढे असेही कळविले आहे की, क्रॉस धनादेश क्र. 487068, दि. 27/05/2009 रोजीचा, रक्‍कम रू. 45,10,500/-, हा, श्री. राजु आर. पिल्‍लई यांचे नावे असलेला,  आय.सी.आय.सी. आय बँक, चेंम्‍बुर मुंबई येथील, त्‍यांच्‍या खात्‍यात जमा केलेला धनादेश, हा  क्लिअरन्‍ससाठी आय.सी.आय.सी. आय बँकेने त्‍यांचेकडे पाठविलेला आहे. सदर, माहिती मिळाल्‍याबरोबर तक्रारदार ट्रस्‍टचे मुख्‍य ट्रस्‍टी/अध्‍यक्ष यांनी युको बँकेत धाव घेतली. सामनेवाले, यांनी सूचित केल्याप्रमाणे तक्रारदाराने युको बँकेच्‍या व्‍यवस्‍थापकांना स्‍टॉप पेमेंट, हा लेखी आदेश/निवेदन तक्रारदारानी धनादेश क्र 487068 व 487079 बाबत सामनेवाले बँकेला दिला व सामनेवाले यांनी सदर पत्राची पोचपावती तक्रारदाराना दिली.

7.   तक्रारदारांचे तक्रारीत पुढे असेही कथन आहे की,  सामनेवाले यांनी तक्रारदारांना रक्‍कम रू. 15,85,000/-,चा धनादेश क्लिअर केला असल्‍याबाबत कळवून, रक्‍कम रू. 45,10,500/-,चा क्रॉस धनादेश क्लिअर करण्‍याचे थांबवून तक्रारदाराना सहजरित्‍या कळविले असल्‍यामूळे तक्रारदार हे संभ्रमीत झाले. तक्रारदाराना, स्‍पष्‍टपणे कळून चुकले की, हाकेच्‍या अंतरावर असलेल्‍या युको बँकेनी तक्रारदारांना काही एक न कळविता रक्‍कम रूपये. 15,85,000/-,चा क्रॉस धनादेश सहज क्लिअर केला. परंतू, सदर धनादेश क्लिअर करण्‍याच्‍या अगोदर तक्रारदारांना सामनेवाले यांनी क्रॉस धनादेश रक्‍कम रू. 45,10,500/-,च्‍या बाबत जसे कळविले तसे रक्‍कम रू. 15,85,000/-,च्‍या धनादेशाबाबत का कळविले नाही ? याबाबतीत तक्रारदार संभ्रमीत झाले व निष्‍कर्षाप्रत आले की,  सामनेवाले बँकेतील, कुणीतरी हात मिळवणी करून, तक्रारदार यांच्‍या सहयांची योग्‍य ती तपासणी/पडताळणी न करता, इतक्‍या मोठया रकमेचा क्रॉस धनादेश क्लिअर केला की, ज्‍यावर अधिकृत सिग्‍नेटोरी यांनी त्‍या धनादेशावर सहया केलेल्‍या नसतांनाही तो क्लिअर केलेला आहे व त्‍या क्लिअर केलेल्‍या क्रॉस धनादेशावर असलेल्‍या सहया हया तक्रारदार यांच्‍या नाहीत. तरीही, सदर धनादेश सामनेवाले यांनी क्लिअर केलेला आहे. त्‍यानंतर, तक्रारदारांनी स्‍वतःच्‍या कार्यालयात जाऊन चेकबुकची तपासणी केली असता, तक्रारदारांच्‍या असे लक्षात आले की, सदर चेकबुकमधील तीन धनादेश क्र. 487068, 487077 व 487079 हे गहाळ असल्याचे दिसून आले.  तक्रारदारांचे तक्रारीत पुढे असेही कथन आहे की,  सदर बँकेने धनादेशाचे क्लिअरन्‍स/वटवणूक करतांना, सदर क्रॉस धनादेशाची योग्‍य ती तपासणी/पडताळणी ही, त्‍या धनादेशावर असलेल्‍या सहयांची तपासणी/पडताळणी ही सामनेवाले बँकेकडे असलेल्‍या नमूना सहया बरोबर तपासणी/पडताळणी केलेली नाही असे तक्रारदारांच्‍या लक्षात आले.

8.  तक्रारदारांचे तक्रारीत पुढे असेही कथन आहे की,  सन 2007 मध्‍ये एका प्रकरणात तक्रारदाराना रोख रक्‍कम रू. 2,50,000/-,हवी होती. परंतू सामनेवाले यांनी सदर धनादेश घेऊन येणा-या/धारण करणा-या इसमास ती रोख रक्‍कम दिली नाही व तक्रारदारांना प्रत्‍यक्ष बोलवून योग्‍य ती तपासणी करून रक्‍कम अदा केली. परंतू, रक्‍कम रू. 15,85,000/-,इतक्‍या मोठया रकमेचा क्रॉस धनादेश क्लिअर/वटवणूक करतांना सामनेवाले यांनी पूर्वी घडलेल्‍या घटनेप्रमाणे तक्रारदाराना आगाऊ कल्‍पना का दिली नाही व सदरील क्रॉस  धनादेश सहज क्लिअर केला. याचे तक्रारदाराना आश्‍चर्य वाटते. तक्रारदारांच्‍या खात्‍यातुन रक्‍कम रू. 15,85,000/-,ही रक्‍कम, धनादेश चोरून, त्‍या धनादेशावर खोटया सहया करून, सदरील रकमेचा अपहार केल्‍याबद्दल तक्रारदारानी मरोळ पोलीस स्‍टेशनमध्‍ये दि. 28/05/2009 रोजी तक्रार नोंदविली. त्‍यानंतर, तक्रारदारांना कळले की, सदर रक्‍कम अपहार प्रकरणातील दोन संशयीतांना पोलीसांनी अटक केली आहे. परंतू, श्री. राजु आर. पिल्‍लई हा फरार आहे. सदर, क्रॉस धनादेशावर त्‍यांच्‍या वरीष्‍ठांची सही नसतांना/आज्ञा नसतांनाही सदर युको बँकेने रक्‍कम रू. 15,85,000/-,एवढया मोठया रकमेचा खोटा/बनावट (खोटया सहया असलेला) धनादेश हा त्‍यावरील सहयांची तपासणी/पडताळणी, सामनेवाले यांच्‍याकडे असलेला नमूना सहयाबरोबर पडताळणी/तपासणी न करता क्लिअर/वटवणूक केला असल्‍यामूळे सदर युको बँक ही तक्रारदाराना झालेली आर्थिक हानी/तोटा भरून देण्‍यास जबाबदार आहे.

9.  तक्रारदारांचे तक्रारीत पुढे असेही कथन आहे की,  भविष्‍यात अशा प्रकारच्‍या अप्रिय घटना घडू नये म्‍हणून तक्रारदारांनी दि. 01/06/2009 रोजी सामनेवाले यांना पत्र लिहून कळविले की, रक्‍कम रू. 50,000/-,पेक्षा मोठी रक्‍कम ही प्राधीकृत केलेल्‍या, सहया धारकांची सही, असल्‍याशिवाय व सोबत कव्‍हरींग लेटर असल्‍याशिवाय सामनेवाले यांनी यापुढे कुणासही रक्‍कम अदा करू नये/धनादेश क्लिअर करू नये. परंतू, तसे करण्‍यास सामनेवाले बँकेनी तक्रारदारांना नकार दिला व असमर्थता दर्शविली. कारण, कोअर बँकीग सिस्‍टीम असल्‍यामूळे, भारतातील कोणत्‍याही शाखेतुन रक्‍कम काढता येऊ शकते. त्‍यानंतर, तक्रारदारानी सामनेवाले बँक यांना त्‍यांच्‍या वकीलामार्फत दि. 13/06/2009  रोजी नोटीस पाठवून, तक्रारदारांना रू. 15,85,000/-,चा झालेला तोटा/हानी याची भरपाई सामनेवाले यांनी करून दयावी असे निर्देशीत केले. त्‍यानंतर, सामनेवाले यांनी त्‍यांचे  वकील श्रीमती. मनिषा पटेल यांचेमार्फत सदर नोटीसला दि. 27/06/2009 रोजी उत्‍तर पाठवून कळविले की, कृपया चेकबुक हे व्‍यवस्‍थीत लॉक अॅण्‍ड की मध्‍ये जपून ठेवावे व त्‍यांनी क्लिअर केलेला धनादेश हा, बँकेचे असलेल्‍या सर्व नियमांचे पालन करूनच क्लिअर/वटवणूक केलेला आहे. त्‍यामुळे आपली नोटीसमध्‍ये केलेली मागणी मान्‍य करता येऊ शकत नाही. त्‍यानंतर तक्रारदारानी दि. 03/07/2009 रोजी त्‍यांचे  वकीलामार्फत सामनेवाले यांना पत्र पाठवून, सामनेवाले यांच्‍या दि. 27/06/2009 चे उत्‍तरातील चुका तक्रारदारांच्‍या वकीलांनी निदर्शनास आणुन दिल्‍या व त्‍यानुसार खोटया/बनावट सहया असलेला धनादेश हा ईलेक्‍ट्रॉनीक गॅझेटद्वारे त्‍या सहयांची तपासणी/पडताळणी ही नमूना सहया बरोबर पडताळणी/तपासणी करणे आवश्‍यक होते. परंतू सदर प्रकरणात सामनेवाले यांनी त्‍या चोरलेल्‍या धनादेशावरील असलेल्‍या सहयांची तपासणी/पडताळणी केलेली दिसून येत नाही व ती आवश्‍यक होती.

10.  तक्रारदारांचे तक्रारीत पुढे असेही कथन आहे की,   सामनेवाले यांनी खोटा/बनावट धनादेश व त्यावरील खोटया/बनावट सहयांची व्‍यवस्‍थीत तपासणी/पडताळणी न करून, सदर धनादेश क्लिअरन्‍स करून/वटवणूक केली आहे. परंतू, त्‍याबाबतची जबाबदारी सामनेवाले यांनी न स्विकारून/झटकुन टाकल्‍यामूळे त्रृटीची सेवा दिल्‍यामूळे  तक्रारदारांची झालेली आर्थिक हानी/तोटा भरून देण्‍यास सामनेवाले हे जबाबदार आहेत. म्हणून, तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून सदर रकमेची भरपाई मिळण्‍यास पात्र आहे. सामनेवाले, यांचे म्हणण्‍याप्रमाणे  तक्रारदारानी सदरील चेकबुक व्‍यवस्‍थीत सेफ-क‍स्‍टडीमध्‍ये ठेवले नव्‍हते, हे सामनेवाले यांचे उत्‍तर हे समाधानकारक नाही व तक्रारदाराना झालेली आर्थिक हानी नाकारण्‍याचे कारण होऊ शकत नाही. म्हणून, सामनेवाले हे सदरील जबाबदारीमधून मुक्‍त होऊ शकत नाही. अतएव, सामनेवाले यांनी तक्रारदारांना उपरोक्‍त रकमेची भरपाई/परतावा करून दयावा. परंतू, सामनेवाले यांनी सदर बाबीस नकार दिला. म्‍हणून तक्रारदारांनी सामनेवाले यांचेविरूध्‍द सदरील तक्रार मंचात दाखल करून निवेदन केले की, रक्‍कम रू. 15,85,000/-,अधिक त्‍यावरील व्‍याज मिळण्‍यास तक्रारदार हे, तक्रार दाखल केलेल्‍या दिनांकापासून मिळण्‍यास पात्र आहेत. तक्रारदार, हे मजलीस व दात्‍यांच्‍या,  या प्रकरणामुळे, त्‍यांच्‍या नजरेतुन उतरल्‍यामूळे, तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यासही पात्र आहेत.

11.  तक्रारदारांचे तक्रारीत पुढे असेही कथन आहे की,  सामनेवाले यांनी खोटा बनावट धनादेश व त्‍यावरील खोटया व बनावट सहया यांची व्‍यवस्‍थीत पडताळणी/तपासणी न करता सदर धनादेश क्लिअरन्‍स/वटवणुक केल्‍यामूळे तक्रारदारांची आर्थिक हानी/तोटा झाला आहे. त्‍यामुळे, सामनेवाले हे तक्रारदाराना रक्‍कम रू. 15,85,000/-, ही परत व्‍याजासह परत करण्‍यास जबाबदार आहेत. तसेच तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत. तक्रारदारांनी यापूर्वी सदर मंचात तक्रार क्र 625/2009 ही दाखल केली होती. परंतू, ती त्‍यांनी दि. 16/10/2009 रोजी मागे घेतली होती.

12.  तक्रारदारांचे तक्रारीत पुढे असेही कथन आहे की,  सामनेवाले यांनी तक्रारदाराना अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करून सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली आहे व सामनेवाले यांच्‍या सदर त्रृटीमुळे तक्रारदारांचे रू. 15,85,000/-,चे आर्थिक नुकसान झाले आहे. म्‍हणून तक्रारदारानी, सदरची तक्रार मंचात दाखल करून, पुढील मागण्‍या, आपल्‍या तक्रारीतील, प्रार्थनेत केल्‍या आहेत.

      (अ)  सामनेवाले यांनी तक्रारदार यांना अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करून सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली आहे असे मंचाने जाहीर करावे.

      (ब)  खोटा/बनावट धनादेशाचे सामनेवाले यांनी, सहयांची पडताळणी/तपासणी ही, नमूना सहया बरोबर न करता, धनादेशाचे क्लिअरन्‍स/वटवणुक केल्‍यामूळे, सामनेवाले यांनी तक्रारदाराना रककम रू. 15,85,000/-,अदा करावे व सदर रकमेवर दि. 28/05/2009 पासून द.सा.द.शे 10 टक्‍के व्‍याज रक्‍कम अदा होईपर्यंत अदा करावे..

   (क)  सामनेवाले यांनी तक्रारदाराना मानसिक नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रू. 25,000/-,व तक्रार खर्चाबद्दल रक्‍कम रू. 25,000/-,अदा करावे. असे निर्देश मंचाने सामनेवाले यांना दयावे.

13.  सामनेवाले यांना तक्रारीची नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर सामनेवाले यांनी दि. 22/04/2014 रोजी लेखीकैफियत मंचात दाखल करून कथन केले की, सदर तक्रार मंचात चालविण्‍यास योग्‍य नाही, तक्रारदारानी महत्‍वाच्‍या बाबी मंचापासून लपवून ठेवल्‍या आहेत, तक्रार ही चुकीची व क्षुल्‍लक आहे, असद्भभावपूर्वक, खोडसाळपणे मंचात दाखल केली आहे. म्‍हणून ती फेटाळण्‍यात यावी. तसेच, सदर तक्रारीतील  बाबी हया कायदयाशी व तथ्‍याशी संबधीत असल्‍यामूळे या मंचासमोर सदर तक्रार चालु शकत नाही. त्‍याकरीता, तक्रारदारानी सदर तक्रार मा. दिवाणी न्‍यायालायात दाखल करावयास हवी होती. म्‍हणून ती या मंचासमोर चालु शकत नाही व कोर्ट फी भरण्‍याचे/टाळण्‍याच्‍या   उद्देशाने मंचात तक्रार दाखल केली आहे.  तसेच सदर तक्रारीतील मूळ मुद्दा लक्षात घेता सदर तक्रारीत पुष्‍कळशे पुरावे, जाबजबाब, तपासणी, उलटतपासणी होणे आवश्‍यक आहे. म्हणून,  सदर तक्रार मा. दिवाणी न्‍यायालयात तक्रारदारानी दाखल करावयास हवी होती. म्‍हणूनही सदर  तक्रार फेटाळण्‍यास पात्र आहे. तक्रारदारानी तक्रारीत केलेले आरोप हे बिनबुडाचे व पुराव्‍याअभावी केलेले आहे. म्‍हणून, सामनेवाले हे तक्रारदारांचे आरोप अमान्‍य करतात. तक्रारदारानी यापूर्वी याच मुद्दयावर/कारणासाठी मंचात तक्रार क्र 625/2009 दाखल केली होती. म्‍हणून सदर तक्रारीस रेस-ज्‍युडीकेटा या तत्‍वाची बाधा होते. म्‍हणून ती फेटाळण्‍यात यावी.

14.  सामनेवाले यांचे पुढे असेही कथन आहे की, सामनेवाले यांनी तक्रारदाराना सेवासुविधा पु‍रविण्‍यात कोणतीही कसुर केलेली नाही. म्हणून ती फेटाळण्यात यावी. तक्रारदारारानी त्यांच्‍या तक्रारीत कबुल केलेले आहे की, सदरचे तीन धनादेश कुणीतरी चोरले असल्‍याबद्दल त्‍यांना काहीही माहिती नाही. तक्रारदारानी धनादेश पुस्‍तीका व पासबुक हे बँकेने घालवून दिलेल्‍या नियम, अटी व रेग्‍युलेशनप्रमाणे, तक्रारदारांनी व्‍यवस्‍थीत सेफ-कस्‍टडीमध्‍ये ठेवले नाही म्‍हणून ते चोरीस गेले. ही तक्रारदारानी चुक आहे. त्‍यात सामनेवाले यांचा काही एक दोष नाही. तसेच,  तक्रारदारांचे सामनेवाले बँकेत खाते उघडते वेळेस तक्रारदाराना खात्‍या बाबतचे नियम, धनादेश पुस्‍तीकेबाबतचे नियम, पासबुकाबाबतचे नियम, अटी, तक्रारदारांची जबाबदारी व रेग्‍युलेशनची माहिती सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या बँकेत खाते उघडतांना तक्रारदारांना दिली होती. तरीही, तक्रारदारानी सदर माहिती, नियम, अटी व रेग्‍युलेशनचे पालन केले नाही. तक्रारदार यांनी मनात वाईट हेतू ठेवून सामनेवाले यांचेकडून पैसे उखळण्‍याच्‍या हेतूने मंचात तक्रार दाखल केली आहे. ती न्‍यायास धरून नाही व कायदयाच्‍या कोणत्‍याही कसोटीवर ठिकणारी नाही. तक्रारदारानी त्‍यांना अनुग्रहीत असलेलेच पुरावे तक्रारीसोबत दाखल केलेले आहे व मंचापासून ब-याचशा बाबी लपवून ठेवल्‍या आहेत. तक्रारदार हे  स्‍वतःची जबाबदारी ही त्‍यांनी प्रामाणिकपणे पार पाडलेली नाही व ती जबाबदारी सामनेवाले यांचेवर ढकलू पाहत आहे. म्‍हणूनही ही सदर तक्रार फेटाळण्‍यात यावी. तक्रारदारानी धनादेश पुस्‍तीका व पासबुक कुठे व कसे ठेवले होते याबद्दल तक्रारीत कुठेही उल्लेख केलेला नाही. तसेच,सदर धनादेश सांभाळणा-या कर्मचा-यांवर/अधिका-यावर/ट्रस्‍टीच्‍या पदाधिका-यावर काय कार्यवाही केली याबाबत तक्रारदारानी आपल्‍या तक्रारीत काहीही माहिती नमूद केलेली नाही. म्‍हणून तक्रारदार ट्रस्‍टच्‍या पदाधि-यांची वर्तवणुक ही संशयास्‍पद आहे. महणजेच, सदर प्रकरणात तक्रारदार ट्रस्‍टचे ट्रस्‍टी, कर्मचारी  व इतर बाहेरील व्‍यक्‍ती यांनी संगणमत करून तीन धनादेश चोरून, ते गहाळ झाले असे दर्शवून, सदर रकमेचा अपहार त्‍यांनीच केला आहे  व स्‍वतःचा बचाव करण्‍यासाठी व फौजदारी कारवाईपासून बचाव होणेकामी/करण्‍यासाठी, सदरची तक्रार मंचात दाखल केली आहे. तसेच तक्रारदारानी स्‍थानिक पोलीस स्‍टेशनमध्‍ये दाखल केलेली तक्रार व पोलीसांनी तक्रारीच्‍या अनुषंगाने केलेली कारवाई जसे- किती आरोपींना अटक केली, त्‍यांचेकडून काही/किती मुद्दे माल वसुल केला याबाबतची माहिती तक्रारदारानी तक्रारीत दिलेली नाही व ती लपवून ठेवली आहे. परिणीती म्‍हणून वसुली दाव्‍यातुन वसुल झालेली रक्कमही वजावट म्हणून दर्शविण्‍यात आलेली नाही. म्‍हणून तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाही.

15.  सामनेवाले यांचे पुढे असेही कथन आहे की,  तक्रारदारानी त्‍यांच्‍या तक्रारीत, सामनेवाले यांनी तक्रारदारांना अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करून सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली आहे. याबाबतचा तक्रारदारानी तक्रारीसोबत कोणताही ठोस पुरावादाखल केलेला नाही. महणून सदरची तक्रार फेटाळण्‍यास पात्र आहे. तसेच, तक्रारदारांनी तक्रारीत निवेदन केल्‍याप्रमाणे पासबुकाची छायांकित प्रत  तक्रारीसोबत जोडलेली नाही.

16.  सामनेवाले यांचे पुढे असेही कथन आहे की,  धनादेश क्र 487077 रक्‍कम रू. 15,85,000/-,हा भारतीय रिझर्व्‍ह बँक यांनी घालुन दिलेल्‍या नियम, अटी, शर्ती व पध्‍दती यांचे पूर्ण पालन करूनच सदरील क्रॉस धनादेशाचे सामनेवाले तर्फे क्लिअरन्‍स/वटवणुक करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे सामनेवाले हे पूर्णतः निर्दोष आहेत. तसेच, सदरील क्रॉस धनादेश हा, निगोशीएबल इंन्‍स्‍टृमेंट अॅक्‍ट 1881 च्‍या कलमांच्‍या  नियमांच्‍या अधीन राहूनच, सदरील अकाऊंट पेई/ क्रॉस  धनादेशाचे क्लिअरन्‍स/वटवणुक केलेली आहे. म्‍हणून तक्रारीतील परिच्‍छेद क्र 3 (बी) हा कपोलकल्‍पीत/खोटा/रचलेली गोष्‍ट आहे. म्‍हणून सामनेवाले हे सदर आरोप पूर्ण नाकारतात. तसेच, परिच्‍छेद क्र 3 (सी) मधील मजकुर खोटा आहे. तक्रारदारांनी दि. 28/05/2009 रोजी लेखी विनंती दाखल केल्‍यानूसारच, पुढील इतर धनादेशांच्‍या क्लिअरन्‍सवर/वटवणुकीवर सामनेवाले यांनी बंधी घातली आहे हे सामनेवाले यांच्‍या तत्‍पर सेवेचे व कार्याचे निदर्शकच आहे.   

 

17.    सामनेवाले यांचे पुढे असेही कथन आहे की, क्रॉस धनादेश क्र 487077 रक्‍कम रू. 15,85,000/-,  हा दिनांक 20/05/2009 रोजी रिझर्व्‍ह बँकेनी घालून दिलेले नियम व निगोशीएबल इन्‍सृमेंट अॅक्‍ट 1881 कलमां नूसारच क्लिअरन्‍स/वटवणूक/पेमेंट केले आहे. कारण, सदर धनादेशावर सहयांच्‍या खाली स्‍टॅम्‍पही उठविलेला आहे, अंकात व अक्षरात फेरफार केलेली नव्‍हती. तसेच, सामनेवाले यांच्‍याकडे असलेल्‍या नमूना सहया बरोबर पडताळणी/तपासणी करूनच सदर धनादेशाचे क्लिअरनस केले आहे.  तसेच, सामनेवाले यांनी धनादेशावर असलेल्‍या सहयांची श‍हानिशा/तपासणी/पडताळणी न करताच धनादेशांचे वटवणूक केली आहे या तक्रारदारांच्‍या आरोपात काही एक तथ्‍य नाही व त्‍याबाबत तक्रारदारांना हस्‍ताक्षर तज्ञांचा/एक्‍सपर्ट ओपीनियन हे पुरावा म्‍हणून दाखल करण्‍यास पूर्णतः अपयश आले आहे. म्‍हणून, सदरील मंच हा व्‍हेरीफिकेशन ऑफ सिग्‍नेचर हा मुद्दा विचारात घेऊ शकत नाही. तसेच, मनुष्‍य स्‍वभावानूसार काही वेळेस सहयामध्‍ये किंचीत फरकाची शक्‍यताही असते. तशी परिस्थिती या प्रकरणातील धनादेशावरील सहयांबाबत असू शकते. परंतू, याचा अर्थ असा नव्‍हे की, सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍या सहयांची पडताळणी केली नाही. हे तक्रारदारांचे  म्‍हणणे योग्‍य नाही व ते चुक आहे व स्विकारण्‍याजोगे नाही. याबाबत सामनेवाले यांनी यापूर्वी तक्रारदारांच्‍या पूर्वी क्लिअरन्‍स केलेल्‍या धनादेशांच्‍या छायांकित प्रती दाखल केल्‍या आहेत. त्‍यावरून तक्रारदारांच्‍या सहयामध्‍ये  प्रत्‍येक वेळेस किंचीत फरकाने वेगवेगळया दिसून येतात व सदर प्रकरणातील धनादेश हा क्रॉस धनादेश आहे. तसेच, तक्रारदारांच्‍या खात्‍यात सदरील धनादेशाचे क्लिअरन्‍स करण्‍याइतपत बॅलेन्‍सही त्‍यावेळेस त्‍यांच्‍या खात्‍यात होता. हया बाबी नजरेआड करता येऊ शकत नाही. म्‍हणून, तक्रारदारांचे, सहयांची पडताळणी/तपासणी न करताच सामनेवाले यांनी धनादेशाचे क्लिअरन्‍स केले हे म्‍हणणे सर्वस्‍वी चुक आहे व स्विकार्य नाही.

18.   सामनेवाले यांचे पुढे असेही कथन आहे की, सदर धनादेश हा बेअरर नव्‍हता.  तर तो क्रॉस धनादेश होता व सामनेवाले यांनी रिझर्व्‍ह बँकेच्‍या नियमांचे पालन करूनच, सदर धनादेशाचे क्लिअरन्‍स केले आहे. म्‍हणून तक्रारदारांच्‍या तक्रारीतील परिच्‍छेद क्र 3 (एफ) मधील आरोप हे पुराव्‍याअभावी, तक्रारदारानी केलेले आरोप असून, ते मान्‍य करता येण्‍याजोगे नाही. म्‍हणून, सामनेवाले यांनी तक्रारदाराना सेवासुविधा पुरविण्‍यात कोणतीही कसुर केलेली नाही.

19.   सामनेवाले यांचे पुढे असेही कथन आहे की, तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीतील परिच्‍छेद क्र 3 (एच) मध्‍ये सामनेवाले यांचेवर केलेले सर्व आरोप खोटे आहे. कारण, सामनेवाले यांनी सदर धनादेश क्र 487077 रक्‍क्‍म रू. 15,85,000/-,च्‍या बाबत, बँकेच्‍या नियमानूसारच कार्यवाही करून धनादेशाचे क्लिअरन्‍स केले आहे. त्‍यामुळे, तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानूसार वादातीत धनादेशावर तक्रारदारांच्‍या सहया या खोटया आहेत. म्‍हणून सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर रकमेचा परतावा करणे आवश्‍यक आहे. याबाबत, तक्रारदाराना पुरावा दाखल करण्‍यात अपयश आले आहे. महणून तक्रारदारांचे म्‍हणणे/आरोप मान्‍य करता येत नाही. तसेच, खातेदार हे कोर बॅंकींग सिस्‍टीम मध्‍ये येत असल्‍यामूळे ग्राहक, बँकेच्‍या कोणत्‍याही शाखेतुन रक्‍कम काढू शकता. म्‍हणून, तक्रारदारांचे पत्र दि. 01/06/2009 नूसार कार्यवाही करणे सामनेवाले यांना शक्‍य नाही. त्‍यामुळे खातेदारांना जास्‍त त्रास होण्‍याची शक्‍यता असते. म्‍हणूनच, सी.बी.एस सिस्‍टीमचा वापर बँकेने स्विकारलेला आहे.  

20.    सामनेवाले यांचे पुढे असेही कथन आहे की, तक्रारदारांच्‍या वकीलांनी पाठविलेल्‍या नोटीस मधील आरेाप हे तक्रारदारानी पुरावा न सादर करताच केलेले आहे. त्‍यामुळे रक्‍कम रू. 15,85,000/-,चा परतावा करणे शक्‍य नाही. कारण,  सामनेवाले यांनी धनादेशावरील सहयांची पूर्ण पडताळणी/तपासणी करूनच धनादेशाचे  क्लिअरन्‍स/वटवणूक केले आहे. म्‍हणून धनादेशावरील सहया हया खोटया आहेत हे तक्रारदारांचे म्‍हणणे सर्वस्‍वी चुक आहे.

21.  सामनेवाले यांचे पुढे असेही कथन आहे की,  तक्रारदारानी  त्‍यांच्‍या तक्रारीतील परिच्‍छेद क्र 3 (के) (एल) (एम) (एन) यामध्‍ये सामनेवाले यांचेवर केलेले आरोप हे बिनाबुडाचे, विनापुरावा असल्‍यामूळे तक्रारदारानी रकमेच्‍या परताव्‍याची मागणी मान्‍य करता येऊ शकत नाही व तक्रारदारांचे सर्व म्‍हणणे आधारहिन आहे. सामनेवाले यांनी सदर धनादेशाचे क्लिअरन्‍स/वटवणूक हे रिझर्व्‍ह बँक यांचे नियमांचे पूर्ण पालन करून केलेले आहे. त्‍यामुळे, सामनेवाले यांनी तक्रारदाराना सेवासुविधा पुरविण्‍यात कोणतीच कसुर केलेली नाही. म्‍हणून तक्रारदार हे आर्थिक नुकसान व मानसिक नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाहीत. कारण, तक्रारदार हेच स्‍वतः सदर प्रकरणास जबाबदार आहेत. तसेच, तक्रारदारांनी धनादेश पुस्तिका व पासबुक व्‍यवस्‍थीत सेफ कस्‍टडीमध्‍ये जपून ठेवलेले नव्‍हते. तक्रारदारानी, स्‍वतःच्‍या चुकीवर पाघंरून घाल्‍ण्‍यासाठी सदरची तक्रार मंचात दाखल केली आहे. अतएव, तक्रारदारांनी तक्रारीत केलेल्‍या मागण्‍या मान्‍य करता येऊ शकत नाही, सदरची तक्रार ही खोटी आहे व पुराव्‍याविना दाखल केलेली आहे. म्‍हणून ती फेटाळण्‍यास पात्र आहे.

22.  प्रस्‍तुत मंचाने तक्रारदारांची तक्रार, पुराव्‍याचे शपथपत्र, लेखीयुक्‍तीवाद, नोटीस, पत्रव्‍यवहार व  कागदपत्रे यांचे वाचन व अवलोकन केले. तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेली नोटीस, पत्रव्‍यवहार, कागदपत्रे व धनादेशांच्‍या छायांकित प्रती यांचे मंचाने वाचन व अवलोकन केले. तसेच, तक्रारदार व सामनेवाले  यांचा तोंडीयुक्‍तीवादही ऐकण्‍यात आला. प्रकरण अंतिम न्‍यायनिर्णयकामी नेमण्‍यात आले. उपरोक्‍तबाबीवरून तक्रार निकाल कामी पुढील मुद्दे कायम करण्‍यात येतात.

             मुद्दे

      निष्‍कर्ष

1. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली हे तक्रारदारानी सिध्‍द केले आहे काय ?                  

      नकारार्थी

2. मागीतलेली दाद मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहेत काय ?                                   

      नकारार्थी

3.   काय आदेश ?                            

   अंतिम आदेशाप्रमाणे

                     कारणमिमांसा

मुद्दा क्रमांक 1 व 2

23.    सदरील तक्रार ही, तक्रारदारानी, सामनेवाले यांनी दि. 28/05/2009 रोजी तक्रारदारांना कळविले की, क्रॉस धनादेश क्र 487068 हा दि. 27/05/2009 रोजीचा, रक्‍कम रू. 45,10,500/-,हा श्री. राजु आर. पिल्‍लई यांचे खाते असलेल्‍या, आय.सी.आय.सी. आय बँक, सी.जी.रोड, चेंम्‍बुर, मुंबई या बँकेने, उपरोक्‍त खातेदारांचे खाते असलेल्‍या खात्‍यात जमा करून, सदर आय.सी.आय.सी.आय बँकेने, सामनेवाले बँक यांच्‍याकडे क्लिअरन्‍स/वटवणूकसाठी पाठविलेला आहे. तरी, कृपया आपण सदर बाबतीत चर्चा/निवेदन/माहिती देण्‍यासाठी यावे. त्‍यानूसार तक्रारदार संस्‍थेचे मुख्‍य ट्रस्‍टी/अध्‍यक्ष सामनेवाले बँकेत हजर झाले व त्‍यांना उपारेकत क्रॉस धनादेशाबाबत सामनेवाले यांनी माहिती दिली. तसेच, सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍या पुढे असेही निदर्शनास आणुन दिले की, यापूर्वीही आपल्‍या खात्‍यातुन, क्रॉस धनादेश क्र 487077 दि. 19/05/2009 रोजीचा, रक्‍कम रू. 15,85,000/-,चा धनादेश सामनेवाले यांनी, श्री. राजु आर. पिल्‍लई यांचे आय.सी.आय.सी. आय बँकेत असलेले खात्‍यात दि. 20/05/2009 रोजी क्लिअरन्‍स/वटवणूक करून रक्‍कम अदा केली आहे. सदर, बाब तक्रारदाराना कळताच तक्रारदारानी सामनेवाले यांना पुढील धनादेशाबाबत स्‍टॉप पेमेंटचा लेखी आदेश दि. 28/05/2009 रोजी दिला व लगेचच आपल्‍या कार्यालयात जाऊन तक्रारदारानी धनादेश पुस्‍तीकेची तपासणी केली असता, तक्रारदारांच्‍या लक्षात आले की, सदर धनादेश पुस्‍तीकेमधून तीन धनादेश क्र. 487068, 487077 व 487079  हे गहाळ झालेले आहेत व त्‍यानूसार तक्रारदारानी एम.आय.डी.सी मरोळ पोलीस स्‍टेशनमध्‍ये दि. 28/05/2009 रोजी तक्रार नोंदविली व त्‍या तक्रारीच्‍या अनुषंगाने पोलीस खात्‍याने दोन संशयीत आरोपींना अटक केली. परंतू, श्री.राजु आर.  पिल्‍लई हा फरार असल्‍याचे पोलीसस्‍टेशन कर्मचा-यांनी आपल्‍या दस्‍ताऐवजामध्‍ये नोंदणी केली. परंतू, तक्रारदारानी संशयीत आरोपीकडून किती मुद्दे माल हस्‍तगत केला याबाबत तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीत काही एक निवेदन केलेले नाही.

     त्‍यानंतर तक्रारदारानी, आपल्‍या वकीलामार्फत सामनेवाले यांना दि. 13/06/2009 रोजी नोटीस पाठवून सामनेवाले यांचेवर आरोप केले की,  सामनेवाले यांनी काही लोकांशी व बँकेतील कर्मचा-यांशी संगनमत करून तक्रारदार यांच्‍या खातयातील रक्‍कम रू. 15,85,000/-,चा अपहार हा, खोटया व बनावट धनादेशाद्वारे व खोटया सहया करून, तसेच सदर धनादेशावरील सहयांची सामनेवाले यांच्‍याकडे असलेल्‍या नमूना सहयांशी पडताळणी/तपासणी न करताच, सदर क्रॉस धनादेश क्र 487077 दि. 19/05/2009 रोजीचा, रक्‍कम रू. 15,85,000/-,सदर धनादेश दि. 20/05/2009 रोजी क्लिअरन्‍स/वटवणूक करून तक्रारदार यांच्‍या खात्‍यातील रकमेचा अपहार केला. म्‍हणून सामनेवाले हे उपरोक्‍त रक्‍कम व्‍याजासह तक्रारदारांना परत करण्‍यास जबाबदार आहे व तक्रारदार ती रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे व सामनेवाले यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करून तक्रारदाराना सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली आहे असे सदरील नोटीसीद्वारे तक्रारदारांनी सामनेवाले यांना कळविले आहे. सदर, तक्रारदारांचया नोटीसीस प्रतीउत्‍तर म्‍हणनू सामनेवाले दि. 27/06/2009 रोजी त्‍यांचे वकीलामार्फत उत्‍तर देऊन तक्रारदारानी केलेले आरोप हे बिनबुडाचे व पुराव्‍याविना केले आहे. तसेच, सामनेवाले यांचेकडून पैस उकळण्‍याच्‍या हेतूने, व स्‍वतःच्‍या चुकीवर पाघरूण घालण्‍याच्‍या उद्देशाने सदरची नोटीस सामनेवाले यांना पाठविलेली आहे. सामनेवाले, यांनी दि. 13/06/2009 च्‍या नोटीसीतील सर्व आरोप अमान्‍य करून सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कळविले की, त्‍यांच्‍याकडे क्लिअरन्‍ससाठी आलेला धनादेश क्र. 487077, दि. 19/05/2009 रोजीचा रक्‍कम रू. 15,85,000/-,चा हा धनादेश सामनेवाले यांनी रिझर्व्‍ह बँकेने घालून दिलेल्‍या सर्व नियमांचे पालन करून तसेच धनादेशावरील सहयांची नमूना सहयांशी तपासणी/पडताळणी करूनच व बँकेच्‍या सर्व नियमांचे पालन करून, तसेच निगोशीएबल इस्‍टृमेंट अॅक्‍ट 1881 च्‍या कायदयानूसारच दि. 20/05/2009 रोजी, सदर धनादेशाचे क्लिअरन्‍स केले आहे.  तसेच, सामनेवाले यांनी पुढे असेही कळविले की, सदर घटनेस तक्रारदार ट्रस्‍टचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून सदरील रकमेचा इतर इसमांशी संगनमत करून ट्रस्‍टच्‍या रकमेचा स्‍वतःच अपहार केला आहे. पुढील अप्रिय /फौजदारी/ वाईट कार्यवाही टाळण्‍यासाठी व स्‍वतःच्‍या चुकीवर पांघरून घालण्‍यासाठी, सदर बनाव स्‍वतःच घडवून आणला आहे. तसेच, तक्रारदार यांनी धनादेश पुस्‍तीका व पासबुक व्‍यवस्‍थीत सेफ कस्‍टडीमध्‍ये ठेवलेले नव्‍हते व ते कुठे, कसे जतन करून ठेवले होते. याबाबत, कोणताच उल्‍लेख तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीत केलेला नाही. तक्रारदारानी ट्रस्‍टच्‍या पदाधिका-यावर व कर्मचा-यांवर काय कारवाई केली हेही तक्रारीत नमूद केलेले नाही. तरीही, तक्रारदारांनी पुन्‍हा सामनेवाले यांना दि. 03/07/2009 रोजी पुन्‍हा त्‍यांचे वकीलामार्फत नोटीस पाठवून उपरोक्‍त रकमेचा व्‍याजासह परताव्‍याची मागणी केली.

     त्‍यानंतर, सामनेवाले यांनी आपली लेखीकैफियत मंचात दाखल करून तक्रारदारानी त्‍यांच्‍या तक्रारीत केलेले आरोप हे खोटे, तथ्‍यहीन, विनापुरावा, सामनेवाले यांचेकडून, मनात वाईट हेतू ठेवून पैसे उकळण्‍याच्‍या हेतूने सदरील तक्रार मंचात दाखल केली आहे. सामनेवाले यांनी पुढे असेही निवेदन केले आहे की, सामनेवाले यांनी दि. 19/05/2009 चा धनादेश क्र 487077 रक्‍कम रू. 15,85,000/-,हा रिझर्व्‍ह बँकेचे नियम, धनादेशावरील सहयाची पडताळणी ही नमूना सहयांशी करून तसेच निगोशीएबल इस्‍टृमेंट अॅक्‍ट 1881 च्‍या कायदयातील कलमांचे पालन करूनच सदर क्रॉस धनादेशाचे क्लिअरन्‍स केले आहे. त्‍यामुळे, तक्रारदाराना रक्‍कम रू. 15,85,000/-, व्‍याजासह परत करण्‍याचा प्रश्‍नच उद्दभवत नाही. तक्रारदारांचे आरोप हे कोणताही पुरावा दाखल न करता केलेले आहे. त्‍यामुळे सामनेवाले यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करून तक्रारदाराना सेवासुवि धा पुरविण्‍यात कसुर केली आहे हे तक्रारदारांचे  म्‍हणणे खोटे व विनापुरावा आहे. म्‍हणून, सदर तक्रार फेटाळण्‍यात यावी.

24.  मंचाने तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, लेखीकैफियत, पुराव्‍याचे शपथपत्र व लेखीयुक्‍तीवाद तसेच सामनेवाले यांनी दाखल केलेली लेखीकैफियत, पुराव्‍याचे शपथपत्र व लेखीयुक्‍तीवाद व संचिकेत दाखल असलेले न्‍यायनिवाडे, नोटीस, कागदपत्रे यांचे बारकाईने निरीक्षण, अवलेाकन व वाचन केले असता, मंचाचे नजरेसमोर पुढील बाबी स्‍पष्‍टपणे दिसून आल्‍या.

    (अ)  तक्रारदार यांनी सदर प्रकरण/तक्रार ही Forged Cheque, बनावट सहया करून, काही त्रयस्‍थ, पदाधिकारी व  कर्मचारी यांनी संगनमत करून तीन धनादेशांची चोरी करून धनादेशावर खोटया सहया करून सदर रकमेचा अपहार केला.  असे आपल्‍या तक्रारीत नमूद केले आहे.

   (ब)  उभयपक्षकारांनी एकमेंकावर केलेले आरोप/प्रत्‍यारोप हे सहया ख-या/ ,खोटया आहेत हे उभयपक्षकारांनी आपल्‍या तक्रारीत व कैफियतीमध्‍ये नमूद केले आहे.

    (क)  तक्रारदारानी सदर सहया खोटया व बनावट आहेत याबाबतचा हस्‍ताक्षर तज्ञांचा अहवाल/पुरावा/एक्‍सपर्ट ओपीनीयन दाखल केलेले नाही.  

    (ड)   सदर प्रकरणात पुरावा, जाबजबाब नोंदविणे, तपासणी करणे/घेणे, उलट तपासणी व सरतपासणी आवश्‍यक ठरते.  

    सदरील मंच हा तक्रारींचा निपटारा हा जलद गतीने व समरी पध्‍दतीने करीत असल्‍यामूळे सदर Forged Cheque, खोटया सहयांची तपासणी, बनावटीकरण याबाबतच्‍या तक्रारी या मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येत नाही व सदरील मंच हा अशा तक्रारी चालवू शकत नाही. हे सदरील मंच स्‍पष्‍टपणे येथे नमूद करीत आहे. त्‍यामुळे सदरची तक्रार ही या मंचात दाखल न करता अन्‍य मा. दिवाणी न्‍यायालयात दाखल करणे योग्‍य, संयुक्तिक व न्‍यायोचित ठरले असते. म्‍हणून सदरची तक्रार फेटाळण्‍यास पात्र ठरते.

      तक्रारदारानी त्‍यांच्‍या तक्रारीत निवेदन केल्‍याप्रमाणे धनादेश क्र 487077 यावर केलेल्‍या सहया या खोटया आहेत/बनावट आहेत व त्‍या त्‍यांच्‍या ट्रस्‍टींच्‍या/अध्‍यक्ष/सभासदांच्‍या नाहीत. हे तक्रारदारांचे म्‍हणणे पुराव्‍याविना व हस्‍ताक्षर तज्ञांच्‍या ( Expert Opinion) अहवालाविना मान्‍य करता येत नाही.

    सामनेवाले यांनी निवेदन केल्‍याप्रमाणे तक्रारदारांच्‍या खात्‍यात भरपूर रक्‍कम जमा होती. तसेच, सामनेवाले यांनी रिझर्व्‍ह बँकेचे नियम, निगोशीएबल इस्‍टृमेंट अॅक्‍ट 1881 च्‍या कायदयाचे पूर्ण पालन केले आहे व त्‍यानंतरच सदर धनादेशाचे क्लिअरन्‍स केले आहे. तक्रारदारानी धनादेश पुस्‍तीका व पासबुक सेफ कस्‍टडीमध्‍ये ठेवले नव्‍हते. हे स्‍पष्‍ट झाले आहे. म्‍हणनू तक्रारदार हे सदर रकमेची भरपाई सामनेवाले यांचेकडून मागु शकत नाही. कारण, सदर धनादेश हा बेअरर नव्‍हता. तर तो क्रॉस, व अकाऊंट पेई असल्‍यामूळे तो क्लिअरन्‍स करतांना केाणत्‍याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. त्‍यामुळे, सामनेवाले यांनी तक्रारदाराना त्रृटीची सेवा दिली आहे हे तक्रारदारांचे म्‍हणणे मंचास मान्‍य करता येत नाही. तसेच, उपरोक्‍त बाबी विचारात घेता सदरील मंच या निष्‍कर्षाप्रत आला आहे की, सदरची तक्रार फेटाळण्‍यास पात्र आहे.

    तसेच, सामनेवाले यांनी आपला लेखीयुक्‍तीवादही दाखल केला. त्‍यातील नमूद न्‍यायनिवाडे हे सामनेवाले यांनी तोंडीयुक्‍तीवादाच्‍या वेळेस त्‍यांच्‍या प्रती दाखल केल्‍या. ते पुढील प्रमाणे-

   1.   Oriental Insurance co.Ltd. V/s Munimahesh patel. Reported in 2006 (7) SC. 655

  2.  D. Sunderson  Sr. Manager, Canara Bank & Ors. V/s R.K. Singhal – 1995 (2) Consumer Protection Reporter - 170

(3)   M/s. Navayuga CHS. Ltd. V/s. The State Bank Of Bikaner  & Ors.  Reported In 1994  (3) Consumer Protection Reporter – 21

4.   Bank Of Maharastra V/s. M/s. Automotive Engineering Co.  Reported in 1993 (2) SC. Cases 97 हे न्‍यायनिवाडे पूर्णतः सदर प्रकरणास लागु पडतात.  तसेच, त्या न्‍यायनिवाडयातील महत्‍वाच्‍या बाबी Re-Produce करण्‍याची आवश्‍कता मंचास वाटत नाही. तसेच, सर्व न्‍यायनिवाडे सुर्यपक्राशाइतके स्‍वयंस्‍पष्‍ट आहेत.  त्‍यांचे वाचन केले असता, सदरील मंच या निष्‍कर्षाप्रत आला आहे की,

1.  खोटया सहया, बनावट धनादेश, Forgery Cases  यासाठी तक्रारदारानी सदरची तक्रार मा. दिवाणी नयायालयात दाखल करणे न्‍यायोचित ठरते. म्‍हणून सदरची तक्रार फेटाळण्‍यास पात्र आहे.

2. तक्रारदारांनी हस्‍ताक्षर तज्ञांचा अहवाल ( Expert Opinion) हा पुरावा म्‍हणून दाखल केलेला नाही. त्‍यामुळे सहया ख-या किंवा खोटया आहेत हे स्‍पष्‍टही होत नाही. तसेच, त्‍या ख-या किंवा खोटया आहेत हे ठरविण्‍याचा अधिकार मंचास पोहचत नाही. म्‍हणूनही सदर तक्रार फेटाळण्‍यास पात्र ठरते.

3. सामनेवाले यांच्‍या प्रमाणे  सदर प्रकरणास Res-Judicata  या तत्‍वाची बाधा येते. परंतू तक्रार क्र 625/2009 ही तक्रारदारानी मागे घेतली असलयामूळे व ती गुणवत्‍तेवर निकाली काढण्‍यात आली नसल्‍यामूळे आमच्‍या मते Res-Judicata  चे तत्‍व  या तक्रारीस लागु पडत नाही. म्‍हणून सामनेवाले यांचे म्‍हणणे  अमान्‍य करण्‍यात येते. सबब,  सामनेवाले यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करून तक्रारदाराना सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केली आहे हे तक्रारदारांचे म्‍हणणे अमान्‍य करण्‍यात येते व तक्रार फेटाळण्‍यास पात्र ठरते. तसेच, सदर तक्रार ही मा. दिवाणी न्‍यायालयात दाखल करणे आवश्‍यक ठरते. म्‍हणूनही ती फेटाळण्‍यास पात्र आहे. अतिमहत्‍वाचे म्‍हणजे तक्रारदाराना आपली तक्रार सिध्‍द करण्‍यास पुराव्‍याअभावी अपयश आल्‍यामूळे ते आर्थिक नुकसान भरपाई, मानसिक नुकसान भरपाई, तक्रार खर्चास पात्र ठरत नाही व तक्रार फेटाळण्‍यास पात्र ठरते. त्‍यामुळे तक्रारदारानी तक्रारीत केलेल्‍या मागण्‍या अमान्‍य करण्‍यात येतात.  अतएव, सदरील मंच म्‍हणून मुद्दा क्र 1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.   

25.  वरील सविस्‍तर चर्चेनुरुप व निष्‍कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

                 आदेश

1.  ग्राहक तक्रार  क्रमांक 77/2010 फेटाळण्‍यात  येते.

2.  खर्चाबद्दल आदेश नाही.

3.   सदर आदेशाची प्रत उभयपक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात यावी.   

 4.  अतिरीक्‍त संच तक्रारदार यांना परत करण्‍यात यावे.       

npk/-

 
 
[HON'BLE MR. M.Y.MANKAR]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.R.SANAP]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.