Maharashtra

Nagpur

CC/81/2019

RAHUL JAGDISH CHANDRA SHUKLA - Complainant(s)

Versus

UCO BANK THROUGH ITS BRANCH MANAGER - Opp.Party(s)

ADV. J. C. SHUKLA

04 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/81/2019
( Date of Filing : 28 Jan 2019 )
 
1. RAHUL JAGDISH CHANDRA SHUKLA
VIMAL VILLA, U 45, NARENDRA NAGAR, NAGPUR 440015
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. UCO BANK THROUGH ITS BRANCH MANAGER
5, SAI RISH BUILDING, GAWANDE LAYOUT, NAGPUR 440015
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 04 Mar 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्ष यांचे बॅंकेत बचत खाते आहे. श्री महेश गंगवानी यांनी तक्रारकर्त्‍याचे नावे दिलेला धनादेश क्रमांक ०७५५१, रुपये २२५००/- दिनांक ३/११/२०१८, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, नागपूर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे बॅंकेत असलेल्‍या एस.बी. खाते क्रमांक १९२८०११००००९७७, खात्‍यात दिनांक १३/११/२०१८ रोजी जमा केला. सदरचा धनादेश जमा करणा-या बॅंकेने कोणत्‍या कारणांनी वटविला नाही याबाबत तक्रारकर्त्‍याला माहिती दिली नाही.
  3. तक्रारकर्त्‍याने दिनांक २२/११/२०१८ रोजी विरुध्‍द पक्षाचे बॅंकेशी संपर्क साधला व तक्रारकर्त्‍याने न वटविलेल्‍या धनादेशाची मागणी केली परंतू विरुध्‍द पक्षाने धनादेश देण्‍याचे टाळले. तक्रारकर्त्‍याने बॅंकेत चौकशी केल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याला सांगण्‍यात आले की, न वटविण्‍यात आलेला धनादेश सर्विस बॅंकेतून परत आला नाही व जेव्‍हा धनादेश परत येईल त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याला दुरध्‍वनीवर कळ‍विण्‍यात येईल. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द बॅंकेशी संपर्क साधला त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याला सांगण्‍यात आला की, सदरचा धनादेश सापडत नाही आहे व ते त्‍याचा शोध घेत आहे. धनादेश देणा-या व्‍यक्‍तीने तक्रारकर्त्‍याला कळविले की, त्‍यांनी न वटविलेला धनादेश परत द्यावा. त्‍याबदली ते त्‍यांना नगदी रक्‍कम देण्‍यास तयार आहे.
  4. तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाने न वटविलेला धनादेश परत न केल्‍यामुळे व तो त्‍यांनी गहाळ केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिनांक ४/१/२०१९ रोजी कायदेशीर नोटीस बजावली व ती नोटीस विरुध्‍द पक्षाला दिनांक ७/१/२०१९ रोजी प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल घेतली नाही करीता तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍दपक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्षाने न वटविण्‍यात आलेला धनादेशाची रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी जो विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला परत केला नाही.
  2. रुपये २२,५००/- वर द.सा.द.शे. १०.५ टक्‍के दराने व्‍याज दिनांक १३/११/२०१८ पासून अदा करावे.
  3. धनादेश न वटविल्‍याबद्दल तक्रारकर्त्‍याकडुन वसुल करण्‍यात आलेले शुल्‍क रुपये ९७.२०/- तक्रारकर्त्‍याला अदा करावे.
  4. मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावे.
  1. मंचाने दिनांक १९/०८/२०१९ चे आदेशान्‍वये विरुध्‍द पक्षाला आदेशित केलेली कॉस्‍ट विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला अदा न केल्‍यामुळे मंचाने विरुध्‍द पक्षाविरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक २१/०९/२०१९ रोजी पारित केला.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍ताऐवज, लेखी युक्‍तीवाद तसेच न्‍यायनिवाडे यांचे वाचन केल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नमुद आहे.

        अ.क्र.                  मुद्दे                                                    उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?        होय
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्षाचे बॅंकेत बचत खाते असून त्‍याचा खाते क्रमांक १९२८०११००००९७७ हा आहे. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. श्री महेश गंगवानी यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍याचे नावे दिलेला धनादेश क्रमांक ०७५५१, दिनांक १३/११/२०१८, रुपये २२,५००/-, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, नागपूर, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे बॅंकेत असलेल्‍या बचत खाते क्रमांक १९२८०११००००९७७ या खात्‍यात दिनांक १३/११/२०१८ ला जमा केला असता सदरचा धनादेश वटविण्‍यात आला नाही. तक्रारकर्त्‍याने विनंती करुनही तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे बॅंकेत जमा केलेला धनादेश वटविण्‍यात आला नाही किंवा सदरचा न वटविलेला धनादेश तक्रारकर्त्‍याला परत करण्‍यात आला नाही. उलट तक्रारकर्त्‍याचे खात्‍यातून त्‍यापोटी रुपये ९७.२०/-  इतकी रक्‍कम खर्ची घालण्‍यात आली. ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती दोषपूर्ण सेवा आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. सदर प्रकरणात राष्‍ट्रीय ग्राहक आयोग यांनी आय.सी.आय.सी.आय बॅंक विरुध्‍द राम किशन चौधरी व इतर, II (2015) CPJ 269 (NC) प्रकरणातील न्‍यायनिवाडे विचारात घेतले व  खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍दपक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला न वटविलेला धनादेश क्रमांक ०७५५१, दिनांक १३/११/२०१८ परत करावा.
  3. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे खात्‍यातून खर्ची घातलेले रुपये ९७.२०/- तक्रारकर्त्‍याला अदा करावे व त्‍यावर दिनांक १५/११/२०१८ पासून द.सा.द.शे. १० टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा करेपर्यंत अदा करावे.
  4. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये १५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावे.
  5. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  6. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  7. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.