जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, चंद्रपूर
ग्राहक तक्रार क्र. :- १०२/२०१६
नोंदणी दिनांक :- २२.०९.२०१६
निर्णय दिनांक :- २५.०१.२०१८
निर्णय कालावधी :- १ व.४म.३ दि.
अर्जदार :- सौ. नंदा राजकुमार गजभीये,
वय – ४८ वर्षे, धंदा – नौकरी,
मार्फत मुखत्यार
श्री. राजकुमार ऋषी गजभीये,
वय – ५२ वर्षे, धंदा – नौकरी,
रा. द्वारा सुनील व्यकुजी खुटेमाटे,
प्लॉट क्र. ४०, जगन्नाथ बाबा नगर,
आकाशवानी रोड, चंद्रपुर ता.जि. चंद्रपुर
:: वि रु ध्द ::
गैरअर्जदार :- युको बँक,
मार्फत सिनिअर MANAGER
७ मजला, महानगर पालिका इमारत,
चंद्रपुर ता.जि. चंद्रपुर
अर्जदार तर्फे :- श्री. अभय कुल्लरवार, वकील
गैरअर्जदार तर्फे :- श्री. विजय मोगरे, वकील
गणपुर्ती :- उमेश वि. जावळीकर, मा. अध्यक्ष
किर्ती गाडगीळ (वैदय) मा.सदस्या
कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या
::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वयेमा मा उमेश वि. जावळीकर मा.अध्यक्ष
१. गैरअर्जदार यांनी, अर्जदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार कराराप्रमाने सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
२. अर्जदाराने गैरअर्जदार कडून दिनांक २८.०७.२००५ रोजी रक्कम रु. ६,००,००० गृह कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड ७५०० रुपयाचे एकूण १२० मासिक हप्ते दिनांक जुलै २००६ ते जुन २०१६ पर्यंत भरायचे होते. त्याप्रमाणे अर्जदाराने ६ महिने मुदतपूर्व दिनांक १२.१०.२०१५ रोजी रु. ९,००,१७१ अदा करून कर्ज बेबाक केले. अर्जदाराने दिनांक २१.१०.२०१५ रोजी गैरअर्जदाराकडे बेबाक प्रमाणपत्र मागूनही न दिल्याने, दिनांक २१.११.२०१५ रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवूनही न दिल्याने ते देण्याचे आदेश करावे व नुकसान भरपाईसह तक्रार मंजुर करावी, अशी विनंती अर्जदाराने केली आहे.
३. गैरअर्जदार यांना मंचातर्फे नोटीस पाठविण्यात आली. गैरअर्जदार मंचात उपस्थित राहुन त्यानी त्यांचे लेखी जवाबामध्ये तक्रारीतील मुद्दयांचे खंडन करुन अर्जदाराने दिनांक १२.१०.२०१५ रोजी रु. ९,००,१७१ अदा करून कर्ज बेबाक केले व प्रमाणपत्र गैरअर्जदाराकडे मागीतले, परंतु अर्जदाराकडे थकबाकी असल्याने ते अर्जदारास दिले नाही. अर्जदारने गैरअर्जदारासोबत केलेल्या करारनाम्याचे अवलोकन केले असता अर्जदाराने प्रत्येक महिण्याच्या निश्चित तारखेला नियमितपणे परतफेड केलेली नाही. गैरअर्जदाराच्या नियमाप्रमाणे, रिजर्व बँक ऑफ इंडिया यांच्या निर्देशाप्रमाणे निश्चीत केलेल्या व्याजदरात BPLR १४% - ४.७५% दराने परंतु कमीत कमी ९.२५% दराने दरमहा आकारणी केली जाईल ही बाब अर्जदाराने दिनांक ०७.०६.२००८ रोजी करारनाम्यावर स्वाक्षरी करताना मान्य केली आहे. त्यामुळे अर्जदाराचा आक्षेप न्यायोचित नसून तक्रार खर्चासह अमान्य करावी, अशी विनती केली.
४. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवादाची पुरशीस व गैरअर्जदारचे लेखी उत्तर, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद, दस्तावेज तसेच दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्यात आले.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार यांनी अर्जदारास गृह कर्ज कराराप्रमाणे
बेबाक प्रमाणपत्र सेवासुविधा पुरविण्यात
कसूर केल्याची बाब अर्जदार सिद्ध करतात काय ? नाही
२. गैरअर्जदार यांनी अर्जदारास गृह कर्ज कराराप्रमाणे
बेबाक प्रमाणपत्र न दिल्याने नुकसान भरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? नाही
३. आदेश ? अमान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ बाबत - :
५. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तावेजावरून, अर्जदाराने दिनांक १२.१०.२०१५ रोजी रु. ९,००,१७१ अदा करून कर्ज बेबाक प्रमाणपत्र गैरअर्जदाराकडे मागीतले, परंतु अर्जदाराकडे दिनांक १२.१०.२०१५ नंतर थकबाकी असल्याने ते अर्जदारास दिले नाही. थकबाकी असल्याबाबत गैरअर्जदाराने दाखल केलेला पुरावा अर्जदाराने मान्य केल्याने अर्जदाराने मागणी केलेले बेबाक खाते उतारा देणे न्यायोचित नाही. गैरअर्जदार यांनी, करारातील अटी व शर्तीप्रमाणे अर्जदाराकडे थकबाकी असल्याने बेबाक प्रमाणपत्र देणे न्यायोचित नाही, असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार यांनी, अर्जदार थकबाकीदार असल्याची बाब सिध्द केल्याने व अर्जदाराची बेबाक प्रमाणपत्रची मागणी कोणत्याही न्यायोचित कारणाशिवाय असल्याने अमान्य कण्यात येते. सबब, गैरअर्जदार अर्जदारास नुकसान भरपाई अदा करण्यास पात्र नाहीत. सबब, मुद्दा क्र. १ व २ चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
मुद्दा क्र. ३ बाबत :
६. सबब मुद्दा क्र. १ व २ च्या विवेचनावरून मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र.१०२/२०१६ अमान्य करण्यात येते.
२. खर्चाबाबत आदेश नाहीत.
३. न्यायनिर्णयाची प्रत उभय पक्षाना तात्काळ पाठविण्यात यावी.
.
श्रीमती कल्पना जांगडे श्रीमती किर्ती गाडगीळ श्री. उमेश वि.जावळीकर
(सदस्या) (सदस्या) (अध्यक्ष)