तक्रार दाखल ता.10/03/2014
तक्रार निकाल ता.09/12/2016
न्यायनिर्णय
द्वारा:- मा. सदस्या - सौ. रुपाली डी. घाटगे.
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-12 प्रमाणे वि.प. यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल केली आहे.
2. प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प.यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प.क्र.1 यांना नोटीस बजावणी होऊन देखील त्यांनी मंचापुढे उपस्थित राहून म्हणणे दाखल केले नाही. सबब, दि.07.07.2015 रोजी वि.प.क्र.1 यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करणेत आला. तसेच वि.प.क्र.2 यांनी मंचापुढे उपस्थित राहून म्हणणे दाखल केले. तक्रारदार व वि.प.क्र.2 तर्फे वकीलांचा तोंडी/लेखी अंतिम युक्तीवाद ऐकला.
3. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे:-
तक्रारदार यांनी टिव्हीएस मोटार कंपनीचे वाहन डाऊन पेमेंट करुन तसेच कर्ज काढून वि.प.क्र.2 यांचे शोरुममधून वि.प.क्र.1 ने बनविलेले “टि.व्ही.एस.वेगो” दुचाकी वाहन खरेदी केलेले होते. वि.प.क्र.1 हे दुचाकी बनवणारी कंपनी असून वि.प.क्र.2 हे त्यांचे कोल्हापूर परिक्षेत्रासाठी अधिकृत विक्रेता आहे. सबब, वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास वि.प.यांचेकडे डाऊन पेमेंटसाठी रक्कम भरणा बील रु.16,000/- भरलेले असून उर्वरीत रक्कमेची कर्ज रुपाने भरणा केलेली आहे. दैनंदिन जीवनामध्ये अनावश्यक तोटा झालेने त्याची रक्कम रु.50,000/- वि.प.यांचेकडून मिळावी अशी तक्रारदाराने मा.मंचात विनंती केलेली आहे.
4. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दि.04.11.2013 व दि.13.11.2013 रोजी सदर वाहनापोटी भरलेली रक्कमेची पावती, आर.टी.ओ.कडील टॅक्स पेमेंट पावती, आर.टी.ओ.कडील –बी एक्झॅट, टॅक्स इनव्हाईस, गेट पास, स्मार्ट कार्ड, सर्व्हीसचे पेमेंट केलेली पावती, ई-मेल, वकीलामार्फत वि.प.यांना पाठविलेली नोटीस, सदरचे नोटीस वि.प.क्र.1 व वि.प.क्र.2 यांना मिळालेची पोहोचपावती, तक्रारदार यांचेतर्फे विनायक विलास उलपे यांचे पुराव्याचे शपथपत्र, विनायक उलपे यांचे डिप्लोमा सर्टिफिकेट, दि.17.11.2014 रोजीचे तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र, विनोद महादेव चव्हाण यांचे पुराव्याचे शपथपत्र, दि.07.11.2015 रोजीचे तक्रारदारांचे जादा पुराव्याचे शपथपत्र, मोबाईल कॉन्हरसेशनची सी.डी., इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
5. वि.प.यांनी दि.07.07.2015 रोजी तक्रारदारांचे तक्रारीस म्हणणे दाखल केलेले असून तक्रारीतील सर्व कथने नाकारलेली आहेत. सदरचे वाहन विक्री करतेवेळी स्वच्छ व चांगल्या परिस्थितीतमध्ये होते हे म्हणणे चुकीचे आहे की, जे.डी.अॅटो 2235 असा नंबर सिटवर लिहलेला होता. दि.26.11.2013 रोजी सदरचे वाहनाबाबतीत तक्रारदारांचे कोणत्याही तक्रार नव्हत्या. जरी सदरचे वाहनाची डिलीव्हरी दि.14.11.2013 रोजी झाली, त्यावेळी शोरुममध्ये सदरचे वाहन उत्तम परिस्थितीत (Condition) मध्ये होते. सदरचे वाहनाचे दि.26.11.2013 रोजी आर.टी.ओ.यांचेकडून पासींग झाले. सदरचे वाहन चालु केलेस त्याचे इंजिन गरम होते हे संपुर्णपणे खोटे आहे. सदरचे वाहनास कोणताही दोष नव्हता. सदरचे वाहन दि.30.11.2013 रोजी शोरुममध्ये पेटींगसाठी किंवा रिपेअरींगसाठी आणलेले नव्हते. दि.01.12.2013 रोजी सदरचे वाहनाचे इंजिन ऑईल कंपनीचे डायरेक्शनप्रमाणे व पध्दतीने बदलणेत आले. त्या दिवशी तक्रारदारांची कोणतीही तक्रार नव्हती. तक्रारीतील कथने पुराव्यानिशी शाबीत करणेची जबाबदारी तक्रारदारांची आहे. सदरचे वाहन 6 ते 8 महिने वापरलेले नव्हते. दि.01.12.2013 रोजी सदरचे वाहनाचे टायरर्स वापरलेची तक्रार नव्हती. तक्रारदारांना सदरचे वाहनास unauthorized machines हा remark हे कथन पुराव्यानिशी शाबीत केले पाहिजे. सदरचे वाहनाचे टायरर्समध्ये दोष होता. त्याकारणाने 2-3 दिवसांत सदरचे टायर्स बदलून देणेचे वि.प.यांनी तक्रारदारांना कधीही प्रॉमीस केले नव्हते. सदरचे विक्री व्यवहारात वि.प.यांचा कोणताही दोष (Fault) नाही. सदरचे वाहनाचे टायर्स जर दोष (Fault) असेल तर तक्रारदाराने सदरचे टायर्स अत्पादित करण्याच्या कपंनी जबाबदार धरणे उचित होते. तथापि त्यांना सदर कामी पक्षकार न केलेले सदरचे तक्रारीस Non-joinder of necessary party या तत्वाची बाधा येत असलेने तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी. वि.प. यांना कॉम्पेनसेटरी कॉस्ट रक्कम रु.25,000/- मिळावी अशी वि.प.यांनी मंचास विनंती केलेली आहे.
6. वि.प.यांनी दि.18.08.2016 रोजी विश्वनाथ संकेश्वरी यांचे पुराव्याचे शपथपत्र, दि.01.09.2016 रोजी वि.प.तर्फे इंद्रजित चंद्रकांत पाटील यांचे पुराव्याचे शपथपत्र, दि.15.11.2016 रोजी जादा पुराव्याचे शपथपत्र, तसेच तक्रारदारांचे वाहनाचे डिलीव्हरी नोट, वि.प.कडील ऑईल चेंजबाबतचे जॉब कार्ड, इत्यादी कागदपत्रे मा.मंचात हजर केलेली आहेत.
7. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, वि.प.यांचे म्हणणे व सोबत दाखल केलेली अनुषांगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र, उभय पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवादाचा विचार करता, निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | वि.प.यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार हे वाहन मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
3 | तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | अंतिम आदेश काय ? | अंशत: मंजूर. |
कारणमिमांसा:-
8. मुद्दा क्र.1:- प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी वि.प.यांचेकडून डाऊन पेमेंट करुन कर्ज काढून टी.व्ही.एस.वेगो हे दुचाकी वाहन खरेदी केले. सदरचे वाहन खरेदी केलेनंतर, सदरचे वाहनाचे इंडिकेटरचा उजवा साईडचा बल्ब गेलेला होता. तसेच गाडीचे सीटचे धागे निघाले होते. गाडीचा सायलेन्सर गंजल्याचे दिसत होतै. गाडीवर जे.डी.अॅटो 2235 लिहीलेले होते. वाहनाचे टायरची झीज झालेली होती. ब्रेकलाईनची अतिरिक्त झीज झालेली होती. सबब, तक्रारदार यांनी वि.प.यांचेकडून सदरचे नवीन दुचाकी वाहन खरेदी केलेनंतर सदर वाहनामध्ये दोष होते. त्याकारणाने वि.प.यांनी तक्रारदार यांना सदरचे वापरलेले दुचाकी वाहन नवीन असल्याचे दाखवून विक्री केलने वि.प.यांनी अनुचित प्रथेचा अवलंब करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने सदरची तक्रार या मंचात दाखल केलेली आहे. सबब, प्रस्तुत कामी वि.प.यांनी विक्री केलेले दुचाकी वाहन हे नवीन होते का? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. प्रस्तुत कामी तक्रारदारांनी तक्रारीसोबत डाऊन पेमेंटची रक्कम रु.16,000/- भरलेची पावती दाखल केलेली आहे. अ.क्र.6 ला दि.14.11.2013 रोजीची टॅक्स इनव्हॉईसची प्रत दाखल केलेली असून त्यावर टोटल कॉस्ट रु.51,412/- नमुद असून तक्रारदारांचे नाव नमुद आहे. अ.क्र.7 ला New Vehicle Delivery Note दाखल असून सदरचे दुचाकी वाहन तक्रारदारांनी दि.14.11.2013 रोजी तक्रारदाराला दिलेले दिसत असून सदरचे वाहन Hypothecate to TVS credit केलेचे दिसून येते. दि.21.12.2013 रोजी तक्रारदारांनी वि.प.यांना पाठविलेले ई-मेलची प्रत दाखल केलेली आहे. सदरची ई-मेलचे अवलोकन केले असता, Your authorized dealer has been sold used second hand Wego Scooter नमुद असून त्यासोबत सदरचे वाहनाचे फोटो पाठविलेले आहेत. सदर कागदपत्रांवरुन तक्रारदारांनी वि.प.यांचेकडून दि.14.11.2010 रोजी सदरचे दुचाकी वाहन ताब्यात घतलेले होते. तक्रारदारांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये सदरचे वाहन दि.26.11.2013 रोजी आर.टी.ओ.पासींगसाठी वि.प.यांचेकडे सोडले असता, दि.30.11.2013 रोजी सदर दुचाकी वाहनाचा गेलेला बल्ब व गाडीचा सायलेन्सरचा गंजलेल्या भागावर रंग लावण्यात आला. त्याच दिवशी सदर वाहनाचे पाठीमागचे चाक पंक्चर झाले, सदरचे पंक्चर काढण्या-या व्यक्तीने सदरचे टायर 6 ते 8 महिने वापरले असलेचे सांगितले. त्यानुसार, दि.01.12.2013 रोजी तक्रारदाराचे पतीने मस्टरमध्ये रितसर तक्रार दाखल केलेली आहे. तसेच वि.प.यांचे इंजिनियरनी सदरचे टायरची पाहणी केलेनंतर सदरचे टायर सहा महिने वापरले असल्याबद्दलचे व टायर बदलता येत नसलेबाबतचे तक्रारदारांना सांगितले. सदर बाबींचे अनुषंगाने, तक्रारदारांनी दि.06.06.2016 रोजी विलास उलपे यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सदरचे शपथपत्रामध्ये सदरची दुचाकी गाडी तपासली असून सदरची गाडी आवश्यक त्या प्रतीची बनवली नसल्याचे दिसून येते. गाडीच्या टायरची झीज, ब्रेकलाईन अतिरिक्त झीज, गाडीचे खराब झालेले प्लॅस्टीक व इंजिनमध्ये असलेले दोष यावरुन दि.14.11.2013 रोजी गाडीचा खरेदी करणेपूर्वीच सुमारे सहा महिने वापर झालेचा दिसून येते असे कथन केले आहे. तसेच तक्रारदारांनी दि.03.09.2015 रोजी विनोद चव्हाण, फोटोग्राफर यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सदरचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये, सदर वाहनाचे फोटो, दि.20.12.2013 रोजी काढले आहे. सदरचे वाहनाचे फोटो, मी, वेगवेगळया अँगलने काढलेले आहेत. सदरचे वाहन जुने असून त्यात दोष आहेते असे पुराव्याचे शपथपत्रात नमुद केले. तथापि वि.प.यांनी सदरचे पुराव्याचे शपथपत्र नाकारलेली असून वि.प.यांनी दि.18.08.2016 रोजी विश्वनाथ संकेश्वरी यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल करुन सदरचे वाहनाची वेळोवेळी सर्व्हिंसिंग व कामे करुन दिेलेचे कथन केले आहे. तक्रारदार यांची सदरची वाहनाबाबत कोणतीही तक्रार नव्हती. टायरबाबत तक्रार नव्हती. सदर वाहनाचे रजिस्ट्रेशन होताना नवीन गाडीचे स्पिडॅमीटर होते. सदर वाहनामध्ये कोणताही उत्पादित दोष नाही असे पुराव्याचे शपथपत्रात नमुद केले आहेत. तसेच वि.प.यांनी दि.01.09.2015 रोजी इंद्रजित पाटील, इंजिनीअर यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सदरचे वाहन एकंदरीत चालुस्थित दिसून येते. त्यामध्ये कोणताही उत्पादित दोष दिसून आले नसलेचे कथन केले आहे. वरील वि.प.क्र.2 यांनी दाखल केलेल्या दोन्हीं पुराव्याचे शपथपत्रामध्ये या मंचाने अवलोकन केले असता, विश्वनाथ शंकर संकेश्वरी यांनी सदर वाहन प्रत्यक्ष तपासलेचे अनुषंगाने कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही अथवा जॉबकार्ड दाखल केलेले नाहीत. तसेच इंद्रजित पाटील यांनी सदरचा वाहन तपासलेचे कथन केलेले आहे. तथापि सदरचे वाहन हे तक्रारदारांचे ताब्यात आहे. त्याकारणाने, सदरचे वाहन कधी तपासले किंवा कुणा समक्ष तपासले यांचे कथन केलेले नाही. त्यानुसार साक्षीदारांची नावे नमुद नाहीत. अथवा सदरचे वाहन तपासणी स्वत: केलेबाबतचे वस्तुस्थितीजन्य पुरावा मंचात दाखल केलेला नाही. त्याकारणाने, सदरचे पुराव्याच्या शपथपत्रामधील कथने पुर्णपणे शाबीत करणेस वि.प. असमर्थ ठरले आहेत असे या मंचाचे मत आहे. तसेच सदरचे वि.प.क्र.2 यांनी दाखल केलेल्या दोन्हीं साक्षीदारांचे पुराव्याचे शपथपत्रामध्ये सदर दुचाकी वाहनामध्ये कोणताही उत्पादित दोष नाही या निष्कर्षाप्रत वि.प.क्र.2 आलेचे दिसून येते. तथापि तक्रारदारांनी मा.मंचात सदर दुचाकी वाहनात उत्पादित दोष असलेचे कारणाने सदरची तक्रार दाखल केलेली नसून सदरचे वापरलेले दुचाकी वाहन नवीन असल्याचे दाखवून वि.प.यांनी तक्रारदारांना विक्री केलेने सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
9. उपरोक्त कागदपत्रांचे अवलोकन केले असता, दि.21.12.2013 रोजी तक्रारदारांचे पतीने वि.प.क्र.1 यांना ई-मेल पाठवून तक्रार नोंद केलेली होती. सोबत गाडीचे फोटो पाठविले होते. तसेच तक्रारदारांनी पुजा मॅडमबरोबर सदर दुचाकी वाहनातील त्रुटीचे अनुषंगाने संवाद केलेला होता. सदरचा संवाद रेकॉर्ड मंचात दाखल केलेला आहे. तसेच सदर वाहनाचे दि.20.12.2013 रोजी फोटोग्राफरने फोटो काढलेले असून सदरचे वाहन जुने असलेचे कथन केले आहे. सबब, वरील सर्व कादगपत्रांवरुन वि.प.कथन, त्याप्रमाणे सदर दुचाकी वाहनात उत्पादित दोष नाही. परंतु तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन सदर वाहन आवश्यक त्या प्रतीची बनवलेले नसलेचे दिसून येते. सदर दुचाकी वाहनात दाखल कागदपत्रांवरुन गाडीचे टायरची झीज, ब्रेकलाईनची अतिरिक्त झीज, गाडीचे खराब झालेचे प्लॅस्टिक, इंजिन ऑर्इल गळती, इत्यादी दोष गाडी खरेदीपूर्वी असलेचे दिसून येतात. यावरुन वि.प.क्र.2 यांनी तक्रारदारांना विकलेले दुचाकी वाहन नवीन असल्याचे दाखवून सदर वाहन विक्री केलेचे स्पष्टपणे दिसून येते. कोणत्याही उत्पादनाची विक्री करत असताना विक्री पश्चात असणारी सेवा देणेची जबाबदारी Privity of Contract या तत्वानुसार विक्रेत्याची असते. तसचे सदरची जबाबदारी ही केवळ उत्पादन विक्री करणेपुरती मर्यादित नसून विक्री पश्चात सेवा देण्याची असते. प्रस्तुत कामी वि.प.क्र.1 ही कंपनी दुचाकी वाहन बनवणारी कंपनी (manufacturer) असून वि.प.क्र.2 ही कोल्हापूर परिक्षेत्रासाठी अधिकृत विक्रेता आहेत. वि.प.क्र.2 यांना वि.प.क्र.1 यांनी बनवलेल्या दुचाकी वाहनाची विक्री तसेच विक्री पश्चात कार्य देण्याचे कार्य वि.प.क्र.1 यांनी सोपवलेले आहे. वि.प.क्र.1 यांनी नोटीस लागु होऊन देखील सदर कामी हजर नाहीत. त्याकारणाने, त्यांचेविरुध्द दि.07.07.2015 रोजी एकतर्फा आदेश पारीत करणेत आलेला आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता, प्रिव्हीटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट तत्वानुसार वि.प.क्र.1 व वि.प.क्र.2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना सदरचे वापरलेले दुचाकी वाहन नवीन असलेचे दाखवून अनुचित प्रथेचा अवलंब केलेला आहे. सबब, सदरचे वापरलेले दुचाकी वाहन वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदारांना नवीन असलेचे दाखवून विक्री करुन तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहोत.
10. मुद्दा क्र.2 व 3:- उपरोक्त मुद्दा क्र.1 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता, वि.प.यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या सदरचे जुने दुचाकी टी.व्ही.एस.वेगो कंपनीचे वाहन परत घेऊन त्यापोटी (replace) सदर कंपनीचे नवीन दुचाकी वाहन तक्रारदारांना द्यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. प्रस्तुत कामी तक्रारदारांनी विनंती अर्जामध्ये रक्कम रु.50,000/- ची मानसिक व शारिरीक त्रासापोटी तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.7,000/- ही या मंचास योग्य व संयुक्तिक वाटत नसलेने मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
11. मुद्दा क्र.4:- सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे आहे.
आदेश
1 तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2 वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारांचे सदरचे जुने दुचाकी TVS Wego कंपनीचे वाहन परत घेऊन त्यापोटी (replace) तक्रारदारांना सदर कंपनीचे नवे दुचाकी वाहन द्यावे.
3 वि.प.क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रक्कम रुपये दहा हजार फक्त) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- (अक्षरी रक्कम रुपये तीन हजार फक्त) तक्रारदारांना अदा करावे.
4 वरील सर्व आदेशांची पुर्तता वि.प.कंपनीने आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5 विहीत मुदतीत वि.प.यांनी मे.मंचाचे आदेशांची पूर्तता न केलेस तक्रारदारांना वि.प.विरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम-25 व कलम-27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
6 आदेशाच्या सत्यप्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.