- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 24 जुन 2014)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्ता यांनी टि.व्ही. मध्ये 9X, Zee टॉकीजवर TVC SKYSHOP मध्ये Add बघितली आणि दि.4.1.2014 ला टि.व्ही. वर दाखवीत असलेला नंबर 8655099891 वरुन 1 Nuclear sx 71 नावाचा लॅपटॉप ऑर्डर दिला. काही दिवसानंतर संदीप मडावीच्या नावानी पोस्ट ऑफीसमध्ये डाग आलेली आहे ती सोडवून घ्या असे पोस्टमने सांगीतले. पोस्ट ऑफीसमध्ये जाऊन ती डाग रुपये 7685/- पेड करुन सोडवून आणि तिथेच उपस्थित असलेले श्री ओ.व्ही.धनवले, पोस्टल अॅसिस्टंन, गडचिरोली आणि श्री एस.के.आञाम पोस्टल अॅसिस्टन गडचिरोली यांच्या समोरच उघडला असता त्या बॉक्समध्ये लॅपटॉप नाही, पण त्याऐवजी Current tax Reporter अशा एकाच नावाचे चार पुस्तके होती. ते बॉक्स कंपनीकडून चांगल्याप्रकारे पॅक असतांना सुध्दा तीथे लॅपटॉप न निघता चार एकाच नावाची पुस्तके निघाली. त्यामुळे अर्जदाराने लॅपटॉप कंपनीतर्फे मिळवून देण्यात योवा, तसेच प्रकरणाचा खर्च रुपये 2000/- व मानसिक, शारिरीक ञासापोटी रुपये 5000/- देण्यात यावा अशी मागणी केली.
2. अर्जदाराचा अर्ज स्विकृत करुन गैरअर्जदारांना मंचासमक्ष त्यांच्या जवाबासह हजर राहण्याचा नोटीस काढण्यात आला. सदर नोटीस नि.क्र.3 ब प्रमाणे मिळून सुध्दा गैरअर्जदार मंचासमक्ष हजर झालेले नसल्यामुळे दि. 24.4.2014 रोजी नि.क्र.1 वर गैरअर्जदाराविरुध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
3. अर्जदाराची तक्रार, शपथपञ, तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती अनुचीत व्यवहार पध्दतीचा : होय.
अवलंब केला आहे काय ?
3) अर्जदाराचा दावा मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा -
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
4. तक्रारकर्ता यांनी टि.व्ही. मध्ये 9X, Zee टॉकीजवर TVC SKYSHOP मध्ये Add बघितली आणि दि.4.1.2014 ला टिव्ही वर दाखवीत असलेला नंबर 8655099891 वरुन 1 Nuclear sx 71 नावाचा लॅपटॉप ऑर्डर दिला. सदर तक्रारदाराचा कस्टमर कोड नंबर C 1583351 & Order No. ROC 3069547 असा होता व त्या आर्डर प्रमाणे तक्रारदाराने रुपये 7685/-पोष्टामार्फत गैरअर्जदाराला दिले होते म्हणून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे, असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
5. गैरअर्जदाराने टि.व्ही. मध्ये विज्ञापन देऊन अर्जदाराला गैरअर्जदाराकडून लॅपटॉप खरेदी करण्याबाबत प्रेरीत केले व अर्जदाराने टेलीफोनवरुन गैरअर्जदाराला सदर लॅपटॉप घेण्याबाबत ऑर्डर दिला. गैरअर्जदाराने पोष्टामार्फत व्ही.पी.पी. व्दारा अर्जदाराला लॅपटॉपच्या ऐवजी Current tax Reporter ची पुस्तके पाठवून अर्जदाराकडून रुपये 7685/- घेतले व त्यानंतर अर्जदाराची सदर प्रकरणाबाबत कोणतीही तक्रार ऐकली नाही व अर्जदाराला लॅपटॉप सुध्दा दिला नाही म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती अनुचीत व्यापार पध्दतीचा अवलंब केला आहे असे अर्जदाराची तक्रार व त्याचे शपथपञ व दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन सिध्द होते. सदर मुद्दा क्र.2 होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
6. मुद्दा क्रमांक 1 व 2 चे विवेचनावरुन व गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती अनुचीत व्यवहार पध्दतीचा अवलंब केला असे सिध्द झाल्यावर अर्जदार हा खालील आदेशाप्रमाणे मागणीस पाञ आहे, मुद्दा क्र.3 होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
7. मुद्दा क्र.1 ते 4 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) गैरअर्जदाराने अर्जदाराकडून घेतलेले रुपये 7685/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत अर्जदाराला द्यावे.
(2) अर्जदाराला झालेल्या मानसिक व शारीरीक ञासापोटी रुपये 5000/- गैरअर्जदाराने अर्जदाराला आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत द्यावे.
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराला सदर प्रकरणाचा खर्च रुपये 2000/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत द्यावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :-24/6/2014