Maharashtra

Satara

CC/14/119

AVINASH GOPAL BIDRUR - Complainant(s)

Versus

TVC NETWORK LTD. - Opp.Party(s)

kadam

16 Jan 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                                                              मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                           तक्रार क्र. 119/2014.

                                                                                                          तक्रार दाखल दि.8-08-2014.

                                                                                                        तक्रार निकाली दि.16-1-2015. 

 

श्री.अविनाश गोपाल बिदनुर,

घ.नं.876 शनिवार पेठ,

स्‍वच्‍छंदानंद अपार्टमेंट, ता.जि.सातारा                                 ....  तक्रारदार

           विरुध्‍द

1. व्‍यवस्‍थापक,

   टी.व्‍ही.सी.नेटवर्क लि.

   ए-3 एम.आय.डी.सी. पर्मनंट मॅग्‍नेटसमोर,

   मीरारोड, मिरा, ठाणे, 401104.

2. व्‍यवस्‍थापक,

   टी.व्‍ही.सी.हाऊस, खांडवाला सेंटर,

   डफट्रे रोड, मालाड, ईस्‍ट, मुंबई 400 097.        ....  जाबदार

 

                तक्रारदारातर्फे अँड.पी.आर.इनामदार.

                   जाबदार एकतर्फा.

                                                                  

                        न्‍यायनिर्णय  

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

 

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

         तक्रारदार हे सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवासी आहेत.  त्‍यांनी जाबदार कंपनीकडून दि.4-8-2013 रोजी आय बुक प्रो कंपनीचा मिनी लॅपटॉप ऑर्डर क्र.ओसी.3065296 ने तारीख 5-8-2013 रोजी रक्‍कम रु.7,490/-(रु.सात हजार चारशे नव्‍वद मात्र) व डिलीव्‍हरी चार्जेस रु.200/-(रु.दोनशे मात्र) असा एकूण रु.7,690/-(रु.सात हजार सहाशे नव्‍वद मात्र) ला ऑनलाईन खरेदी कला असून त्‍याचा बारकोड नंबर एलटीएनएन 11010511 एए 3550 ने पर कॉंटीटी रेट रु.7,133/- व व्‍हॅट पर कॉंटीटी रु.357/- होता.  प्रस्‍तुत लॅपटॉप खरेदीची पावती टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस तक्रारदाराने कागदयादीसोबत मे.मंचात दाखल केली आहे. 

        सदर लॅपटॉप खरेदी केल्‍यानंतर दोनच दिवसात तो खराब असल्‍याची कल्‍पना तक्रारदारास आली.  त्‍यानी लगेचच 24 तासात कॉलसेंटरला तक्रार दिली होती.  परंतु जाबदाराने सदर तक्रारीची कोणत्‍याही प्रकारे दखल घेतली नाही.  नंतर तिस-या व पाचव्‍या दिवशीही तक्रारदाराने कॉलसेंटरला तक्रार दिली व लॅपटॉप हाखराब असून व्‍हर्जन ओपन होत नव्‍हते तसेच कोणताही प्रोग्रॅम ओपन होत नव्‍हता, तसेच सदर लॅपटॉपला ऑफिस 2008 च्‍या फाईल्‍स ओपन होत नव्‍हत्‍या.  तक्रारदाराने कॉलसेंटरला प्रस्‍तुत बाबतीत सॉफ्टवेअर कसे टाकावे याबाबत वारंवार विचारणा केली परंतु तक्रारदारास कोणीही दाद दिली नाही, परंतु नवीन व्‍हर्जन टाकू शकता अशी चुकीची माहिती दिली.  तक्रारदाराने अनेक तज्ञांना विचारणा केली असता त्‍यांनी पूर्ण अभ्‍यासाअंती सांगितले की, प्रॉडक्‍टमध्‍ये कोणतेही बदल करणे शक्‍य नाहीत, हे प्रॉडक्‍ट आजचे काळात वापरणे अशक्‍य आहे.  त्‍यामुळे तक्रारदार संभ्रमात पडले व आपली फसवणूक झाल्‍याचे त्‍यांच्‍या लक्षात आले. 

       प्रस्‍तुत लॅपटॉपमध्‍ये कोणतेही प्रोग्रॅम ओपन होत नव्‍हते तसेच रन होत असताना त्‍या कन्‍व्‍हर्टही होत नव्‍हत्‍या, तसेच व्‍हीडीओ फाईल्‍सही ओपन होत नव्‍हत्‍या.  फक्‍त फॉरमॅटमधील फाईल्‍स ओपन होत होत्‍या.  तसेच कोणतेही अधुनिक सॉफ्टवेअर मॅच होत नव्‍हते व अपडेट होत नाही.  सदरचा लॅपटॉप हा पूर्णपणे आउटडेटेड व्‍हर्जनचा तसेच सन 2013-14 या जमान्‍यात वापरणे अशक्‍य आहे.  या पध्‍दतीचे प्रॉडक्‍ट या काळात ऑर्डर घेताना कोणतीही कल्‍पना देता विकणे हे चुकीचे आहे व अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब करणे आहे. 

       जाबदारानी तक्रारदारास कोणतीही खरी माहिती न देता अंधारात ठेवून त्‍यांचेकडून पैसे उकळण्‍याचा धंदा करीत असल्‍याचे दिसून आले.  ऑर्डर देतेवेळी जाबदाराने तक्रारदाराला वेबसाईटवरील व्‍हीडीओवर असे सांगितले होते की, हे प्रॉडक्‍ट उत्‍तम प्रकारे वापरु शकतो.  सदर लॅपटॉप कोणत्‍याही प्रकारची कामे करणेस सुसज्‍ज आहे असे तक्रारदारास सांगून तक्रारदारास लॅपटॉप खरेदी करावयास लावणे ही अनुचित व्‍यापारी प्रथा आहे.   प्रस्‍तुत तक्रारदाराने सदर तक्रारीची जाबदाराकडे सविस्‍तर माहिती ईमेलद्वारे कळविली होती, परंतु त्‍यास कोणतेही उत्‍तर आले नाही, त्‍यामुळे तक्रारदाराने जाबदार कंपनीस कुरियरद्वारे पत्र पाठवले असून अदयाप जाबदाराने उत्‍तर दिलेले नाही, त्‍यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.  प्रस्‍तुत लॅपटॉप तसाच पडून आहे.  त्‍याचा वॉरंटी कालावधी एक वर्षाचा आहे.  तक्रारदाराना जाबदाराने अदयाप कोणताच प्रतिसाद दिलेला नाही, तसेच नोटिसीला उत्‍तरही दिलेले नाही व लॅपटॉपची रक्‍कम परत अदा केलेली नाही.  सबब तक्रारदाराने जाबदाराकडून लॅपटॉपची रक्‍कम परत मिळणेसाठी व नुकसानभरपाई मिळणेसाठी सदरचा तक्रारअर्ज मे.मंचात दाखल केला आहे. 

2.        प्रस्‍तुत कामी तक्रारदारानी जाबदार कंपनीकडून मिनी लॅपटॉपची रक्‍कम रु.7,690/- वसूल होऊन मिळावी, तक्रारदाराना झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- जाबदाराकडून वसूल होऊन मिळावेत व सदरची रक्‍कम वसूल होऊन मिळेपर्यंत जाबदाराकडून सदर रकमेवर 15 टक्‍क्‍याप्रमाणे नियमाप्रमाणे होणारे व्‍याज वसूल होऊन मिळावे व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.10000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. 

3.     तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 व 5/2 कडे अनुक्रमे तक्रारदाराने खरेदी केलेल्‍या लॅपटॉपचे टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस व तक्रारदाराने जाबदाराना वकीलांतर्फे पाठवलेल्‍या  नोटीसची स्‍थळप्रत व परत आलेला लखोटा व पोहोचपावती, नि.9 कडे तक्रारअर्जासोबत दाखल केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे हाच पुरावा समजणेत यावा म्‍हणून दिलेली पुरसीस, नि.8 कडे लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे मे.मंचात तक्रारदाराने दाखल केली आहेत. 

4.       प्रस्‍तुत कामी जाबदाराना सदर तक्रारअर्जाची नोटीस पाठवली होती परंतु ती नोटीस जाबदार 1 ने स्विकारली नाही म्‍हणून लखोटा परत आला आहे तर जाबदार क्र.2 यास सदर तक्रारअर्जाची नोटीस मिळालेची पोहोचपावती मंचात नि.10 कडे दाखल आहे, परंतु जाबदार 1 व 2 हे मंचात हजर राहिलेले नाहीत तसेच त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे/कैफियत सदर कामी दाखल केलेली नसल्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश नि.1 वर पारित केलेला आहे.  त्‍यामुळे तक्रारअर्ज एकतर्फा चालवणेत आला.

5.        वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदारानी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन करुन सदर तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मंचाने पुढील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.        मुद्दा                                              उत्‍तर

 1. तक्रारदार व जाबदार हे नात्‍याने ग्राहक व सेवादेणार आहेत काय?      होय.

 2. तक्रारदाराना जाबदाराने सदोष सेवा पुरविली आहे काय?              होय.

 3. अंतिम आदेश काय?                                शेवटी नमूद केलेप्रमाणे.

विवेचन- मुद्दा क्र.1 ते 2-

6.       वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत कारण तक्रारदारानी जाबदार कंपनीकडून आय बुक प्रो कंपनीचा मिनी लॅपटॉप ऑर्डर क्र.ओसी.3065296 ने तारीख 5-8-2013 रोजी ऑनलाईन खरेदी केला होता.  त्‍याची किंमत एकूण रक्‍कम रु.7,690/- होती.  याबाबत खरेदीचे टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडे दाखल केले आहे.  म्‍हणजेच यावरुन तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असल्‍याचे निर्विवादरित्‍या सिध्‍द होते.  तसेच सदरचा लॅपटॉप खरेदीनंतर दोनच दिवसात तो बिघडल्‍याचे व प्रस्‍तुत लॅपटॉपमध्‍ये अनेक दोष व उणीवा असल्‍याचे तक्रारदाराला लक्षात आल्‍यानंतर तक्रारदाराने लगेच कॉलसेंटरला तक्रार दिली, कंपनीला मेलने कळविले, परंतु जाबदाराने तक्रारदारास कोणतीही दाद दिली नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराने वकीलांतर्फे कायदेशीर नोटीस जाबदारास पाठवली आहे.  सदरची नोटीस नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/2 कडे दाखल आहे.  सदर नोटीस जाबदार 2 ला मिळूनही जाबदाराने तक्रारदाराना लॅपटॉप रक्‍कम पर‍त दिली नाही त्‍यामुळे तक्रारदाराना जाबदाराने सदोष सेवा दिली असून जाबदाराने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याचे निर्विवादरित्‍या सिध्‍द होते आहे.  सबब मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिलेले आहे.

7.        वरील सर्व मुद्दयांचा विचार करता तक्रारदाराना जाबदारानी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराची फसवणूक केलेचे स्‍पष्‍ट होते व जाबदाराने तक्रारदारास सदोष सेवा पुरवल्‍याचे सिध्‍द होते.  सबब प्रस्‍तुत कामी तक्रारदाराना जाबदारानी मिनी लॅपटॉपची रक्‍कम परत अदा करणे न्‍यायोचित होणार आहे. 

8.      सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                           आदेश

1.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2.   तक्रारदाराना जाबदारांनी लॅपटॉपची रक्‍कम रु.7,690/-(रु.सात हजार सहाशे नव्‍वद मात्र) अदा करावेत.  या रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्‍कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज अदा करावे.

3.   तक्रारदाराना झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासापोटी जाबदारानी रक्‍कम रु.5,000/-(रु.पाच हजार मात्र) तक्रारदाराना अदा करावेत.  तसेच तक्रारअर्जाचे खर्चापोटी तक्रारदाराना जाबदारानी रु.3,000/-(रु.तीन हजार मात्र) अदा करावेत.

4.    वरील सर्व आदेशांचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत जाबदारांनी करावे.

5.    सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

6.    सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

ठिकाण- सातारा.

दि.16-1-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.